Marathi Letter Writing । मराठी पत्र लेखन । Marathi letter writing format, example
मित्रांनो पत्र लेखनाबद्दल तुम्ही नक्कीच ऐकले असेल तर काही जणांनी एकमेकांना पत्र देखील पाठवले असतील. पत्राची परंपरा ही पूर्वीच्या काळापासून चालत आलेली आहे पूर्वीच्या काळामध्ये मोबाईल, कॉम्प्युटर, लॅपटॉप यांसारखी साधने नसल्याने आपल्या नातेवाईकांची किंवा मित्र-मैत्रिणी यांची विचारपूस करण्यासाठी पत्रलेखनाचा वापर करीत होते.
Best Marathi Letter Writing Format- मराठी पत्र लेखन । Letter Writing In Marathi
परंतु अलीकडच्या काळामध्ये पत्र लेखनाचे प्रकार जरी संपुष्टात येत असली तरी विद्यार्थ्यांना पेपरमध्ये पत्रलेखन विषय नक्कीच प्रश्न विचारला जातो. त्यामुळे विद्यार्थी दशेतील प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी पत्र लेखन म्हणजे काय? माहिती असणे गरजेचे आहे त्यासोबतच पत्र लेखन कसे करावे? हे देखील माहिती असणे गरजेचे आहे.
Videos of weight training, cross training, pilates, yoga, fitness and boxing Decathlon E CLUB what do power cleans work the best motivation method for bodybuilding – my abs.आजच्या लेखातून ( Marathi Letter Writing | मराठी पत्र लेखन | Marathi letter writing format, example) आम्ही मराठी पत्र लेखन आणि पत्र लेखांचे नमुने | Marathi letter writing घेऊन आलोत.
मराठी पत्र लेखन आणि पत्र लेखांचे नमुने | Marathi letter writing
मराठी पत्रलेखनाचे साधारणता दोन प्रकार पडतात, ते पुढील प्रमाणे ;
- अनौपचारिक पत्र
- औपचारिक पत्र
पत्र लेखनाचे प्रकार | Types of letter writing
1. अनौपचारिक पत्र | Informal Letter in Marathi
अनौपचारिक पत्र हे साधारणता आई-वडील, भाऊ- बहीण, जवळचे नातेवाईक आणि मित्र-मैत्रिणींना लिहिली जातात. अनोपचारीक पत्रलेखनातून विचारपूस केली जाते, शुभेच्छा दिल्या जातात किंवा अभिनंदन केले जाते.
आधुनिक काळामध्ये अनौपचारिक पत्र लेखनाचे परंपराही संपुष्टात आली आहे. कारण आजचे काळ हेच संगणकाचे आणि इंटरनेटचे बनले आहे. त्यामुळे सध्या अनौपचारिक पत्र लेखनाचा कोणी वापर करीत नाही. तरीदेखील औपचारिक पत्र लेखन हा पत्रलेखनाचा खूप महत्त्वाचा भाग आहे.
2. औपचारिक पत्रे | Formal Letter Writing in Marathi
औपचारिक पत्र लेखनलाच व्यावसायिक पत्र लेखन असे देखील म्हणतात. हे पत्र आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तीला किंवा एखाद्या कार्यालयाला लिहिली जातात. औपचारिक पत्र लिहीत असताना सुरुवातीला उजव्या कोपऱ्यामध्ये स्वतःचा पत्ता लिहताना सर्वप्रथम स्वतःचे लिहावे.
तसेच पत्र लिहित असताना पत्रातील मजकूर मुद्देसूद मांडावा. या पत्राची भाषा जरी औपचारिक असली तरी पत्राचा विषय सर्वांना कळणे महत्त्वाचे आहे. तसेच या पात्राची भाषा मुद्देसूद आणि आकर्षित असावी.
अनौपचारिक पत्राचा नमुना | Informal Letter Writing in Marathi
1. तुमच्या मित्राचा परीक्षेत प्रथम क्रमांक आल्याबद्दल अभिनंदन करणारे पत्र…
242, शिवाजी नगर,
सोलापूर.
प्रिय मित्र रमेश,
सप्रेम नमस्कार !!!
अभिनंदन! मला सांगण्यास आनंद वाटतो की, आज सकाळी वर्तमानपत्र वाचत असताना तुझी बातमी वाचली. वाचून खूप आनंद झाला की, 12 तिच्या परीक्षा मध्ये उत्तीर्ण झाला तेही प्रथम क्रमांकाने.
तुझा आपल्या जिल्ह्यातील प्रथम क्रमांक आल्याने मला खूप खूप आनंद वाटत आहे लगेच तुला हे पत्र पाठवून अभिनंदन देत आहे.
तुमचे दहावीपर्यंत एकाच वर्गामध्ये होतो त्यानंतर आपण दोघे वेगवेगळ्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला परंतु मला तुझ्या जीद्दी वर पूर्ण विश्वास होता कि, तू जीवनामध्ये नक्कीच यशस्वी होशील. व यशाची पहिली पायरी तर तु जिंकली च आहे.
आज खुल्या जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले हे पाहून माझा आनंद गगनात मावेना सारखं झालंय. तुझ्या जीवनामध्ये असेच यश मिळवत राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!!!
तुला तुझ्या पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा!!!
कळावे,
तुझा बालमित्र राहुल.
औपचारिक पत्राचा नमुना | Formal Letter Format in Marathi
पत्रलेखनाचे स्वतःचे नाव
पत्र लेखकाचा स्वतःचा पत्ता व नंबर
दिनांक:———–
प्रति,
[ पत्र स्वीकार करणाऱ्या चे नाव,
पदाचे नाव किंवा संस्थेचा पत्ता
इत्यादी तपशील येथे लिहावे]
विषय: पत्राचा विषय कमीत कमी शब्दात लिहावा….
संदर्भ: [ पात्राला आधीच्या पत्रव्यवहाराचा संदर्भ असल्यास विषयाच्या खाली संदर्भ लिहा.]
महोदय / महोदया,
[येथे पत्र लिहण्यास सुरुवात होते. पत्र लिहिताना प्रत्येक मुद्या यासाठी स्वतंत्र परिच्छेद लिहावा. या मजकुरात अलंकारिक्त, वैयक्तिक भावभावनांची दर्शन नसावे. तक्रार सुद्धा सौम्य भाषेत लिहावी.]
[ – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – - – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – -].
आपला / आपली
स्वाक्षरी.
सोबत:
- काही वेळा विशिष्ट कागदपत्रे पत्रासोबत जोडावी लागतात.
- पत्रा सोबत जोडल्या जाणारा कागदपत्रांची यादी येथे लिहावी.
प्रत माहितीसाठी:
- काही पत्रे वेगवेगळ्या टप्प्यांवरील वेगवेगळ्या ठिकाणी पाठवल्या जातात.
- जी पत्रे वेगवेगळ्या ठिकाणी पाठवली जातात, त्या पत्रांमध्ये त्या व्यक्तीची यादी याठिकाणी लिहावी.
औपचारिक पत्र लेखनाचे प्रकार | Types Of Formal Letter Writing in Marathi
औपचारिक पत्र लेखनाचे साधारणता तीन प्रकार पडतात ते पुढीलप्रमाणे ;
- मागणी पत्र
- विनंती पत्र
- तक्रार पत्र
1. मागणी पत्र | Magani Patra in Marathi
- एखाद्या वस्तूची किंवा सेवेची मागणी करण्यासाठी ही पत्रे लिहिली जातात.
- मागणी पुरवणार्याला योग्य तो मोबदला देण्याची आपली तयारी असावी.
- पैशाच्या बदल्यात वस्तू सेवा देण्याघेण्याचा रोकडा व्यवहाराचा लेखाचा उद्देश या पत्र लेखनामध्ये करू नये.
- पत्र लिहीत असताना यामध्ये विनंती भाषा असावी.
मागणी पत्राचे विषय :
- शालेय वस्तूंची मागणी करणारे पत्र ( वह्या, पुस्तके, स्टेशनरी सामान, नकाशे, पेन्सिल रबर, प्रयोगशाळेतील वस्तू ).
- घरासाठी आवश्यक त्या वस्तूंची मागणी करणारे पत्र.
- वाढदिवसासाठी भेट वस्तू मागणारे पत्र.
- शाळेसाठी नियतकालिकांची मागणी करणारे पत्र.
मागणी पत्राचा नमुना | Format Of Magani Patra
1. शाळेच्या कार्यालया करिता स्टेशनरी सामानाची मागणी करणारे पत्र. ( शालेय वस्तू मागणी पत्र)
नेहरू विद्यालय,
शांती नगर,
पुणे: 416 416
दिनांक: 10-10-2021
प्रति,
सरस्वती स्टेशनरी मार्ट,
नवी पेठ,
पुणे: 10-10-2021
विषय: स्टेशनरी सामानाची मागणी करण्याकरिता….
महोदय,
दर वर्षी प्रमाणे या वर्षी देखील आमच्या शाळेला म्हणजे नेहरू विद्यालय आला आवश्यक स्टेशनरी सामानाची गरज आहे. आम्ही दरवर्षी तुमच्या सरस्वती स्टेशनरी मराठीमध्ये आमच्या शाळेकरिता स्टेशनरी सामानाची खरेदी करतो. यावर्षीदेखील आम्हाला काहीच स्टेशनरी सामानाची आवशक्यता आहे.
आम्हाला आवश्यक असणाऱ्या स्टेशनरी मालाची यादी आम्ही या पत्राची यादी कळवीत आहोत. कृपया सर्व सामान त्वरित पाठवावे. म्हणजेच शाळेचे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्या अगोदर सर्व सामान आम्हाला वेळेवर मिळेल.
स्टेशनरी मालाचे बिल ही सोबत पाठवावे म्हणजे रक्कम त्वरित पाठवून देता येईल.
कळावे आपला,
विश्वासू.
स्टेशनरी मालाची यादीन.
अ.नं. वस्तू. संख्या
- आलेख वह्या 2 डझन
- कंपास पेटी. 2 डझन
- शिस पेन्सिल 1 डझन
- रंगीत पेन्सिल 1 डझन
- ब्ल्यू पेन 4 डझन
- रेड पेन 4 डझन
- खोडरबर. 2 डझन आपला कृपाभिलाषी,
अनिल कांबळे,
विद्यार्थी भंडार प्रमुख. नेहरू विद्यालय, पुणे.
2. विनंती पत्र । Vinanti Patra in Marathi
एखाद्या व्यक्तीकडून किंवा संस्थेकडून आर्थिक मदत मिळवण्याकरिता विनंती पत्र लिहिले जाते. एखाद्या तज्ञ व्यक्तीच्या अनुभवाचा ज्ञानाचा लाभ व्हावा याकरिता विनंती पत्र लिहिले जाते. एखाद्या व्यक्तीने मदत करावी याकरिता विनंती पत्र लिहिले जाते.
निमंत्रणे देणे, देणगी मागणे, स्थळभेटी साठी परवाने देणे, विविध संस्थाना मार्गदर्शनासाठी बोलवणे, एखाद्या व्यक्तीला एखाद्या कार्यक्रमासाठी आमंत्रित करणे. विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी काय पालकांना आवाहन करणे इत्यादी प्रसंगासाठी विनंती पत्र लिहिले जाते.
विनंती पत्रा चे विषय: एखाद्या व्यक्तीला सभा समारंभासाठी एखाद्या व्यक्तीला बोलवण्यासाठी विनंती पत्र लिहिले जाते. स्थळ भेट सहल इत्यादी ठिकाणांना भेटी ला जाण्यासाठी परवानगी मिळवण्यासाठी विनंती पत्र लिहिले जाते. शालेय उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रण देण्याकरिता विनंती पत्र लिहिले जाते. विविध संस्थांना मार्गदर्शनासाठी बोलण्याकरीता विनंती पत्र लिहिले जाते.
विनंती पत्राचा नमुना । Format of Vinanti Patra writing in Marathi
1. शाळेमध्ये आयोजित केलेल्या वकृत्व स्पर्धा कार्यक्रम मध्ये जिल्हाप्रमुख यांना बोलवण्या करिता विनंती पत्र.
क.ख.ग.
वर्ग प्रतिनिधी दहावी अ,
स्वामी समर्थ विद्यालय,
सांगली, 403 416,
दिनांक- 14 जानेवारी 2021
प्रति,
माननीय जिल्हाप्रमुख,
विषय: वकृत्व स्पर्धा कार्यक्रमाला उपस्थित राहण्याबाबत…
महोदय,
सदर नमस्कार,
आम्ही दहावी अ च्या वतीने विनंती पत्र लिहीत आहोत. माननीय जिल्हाप्रमुख तुम्ही आमच्या शाळेमध्ये म्हणजे स्वामी समर्थ विद्यालया मध्ये आयोजित केलेल्या वकृत्व स्पर्धा मध्ये उपस्थित राहावे.
यंदाचे वर्ष हे आम्हाला दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी शेवटच्या वर्ष असल्याने आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला आहे. आणि या कार्यक्रमाला तुमची उपस्थिती असावी अशी आम्हा सर्व विद्यार्थ्यांची इच्छा आहे.
तरी आता आम्हाला विद्यार्थ्यांची विनंतीचा मान ठेवून कार्यक्रमाला उपस्थित राहावे हीज विनंती!
वकृत्व स्पर्धेचा कार्यक्रम आम्ही 20 ऑक्टोंबर 2021 रोजी आयोजित केला आहे त्या अगोदर आम्हाला कळवावे की, तुम्ही या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकत नाही ही विनंती!
आपला नम्र विद्यार्थी,
क.ख.ग.
वर्ग प्रतिनिधी दहावी अ
स्वामी समर्थ विद्यालय, सांगली.
3. तक्रार पत्र । Takrar Patra in Marathi
तक्रार पत्रा मध्ये एखाद्या विशिष्ट विषयात संबंधित तक्रार केली जाते.
तक्रार पत्रा मध्ये तक्रार निवारण करण्यासाठी विनंती केली जाते. तरी देखील विनंती पत्र आणि तक्रार पत्रांमध्ये खूप वेगळेपणा आहे.
फसवणूक, नुकसान, समाज विघातक गोष्टी, मानवी जीवनाला घातक बाबी, अन्याय इत्यादी अनेक कारणांसाठी तक्रार पत्र लिहिले जातात.
तक्रार पत्रा चे विषय :
- फसवणूक
- नुकसान
- अन्याय
- समाजधारणेला घातक बाबी
- मानवी जीवनाला धोका पोहोचवणाऱ्या गोष्टी
इत्यादी सर्व विषयांवर तक्रार पत्र लिहिले जाते.
तक्रार पत्राचा नमुना | Format of takrar Patra writing in Marathi
1. रस्त्यावरील कचरा पेटी ची दुर्दशा महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांना पत्र करून कळवा.
शोभा माने,
253, मातृ सदन,
सोमवार पेठ, गुरूनानक चौक,
कोल्हापूर, 411 030
दिनांक 12 ऑक्टोंबर 2021
प्रति,
माननीय आरोग्य अधिकारी
आरोग्य विभाग,
कोल्हापूर महानगरपालिका,
कोल्हापूर, 411 030
विषय: शहरातील स्वच्छतेबाबत तक्रार….
महोदय,.
म.न.वि.वि
माननीय आरोग्य अधिकारी मी कोल्हापूर जिल्ह्यातील समर्थ गेट येथील मातृ सदन मध्ये राहतो. पत्र लिहिण्यामागे चे कारण म्हणजे, आमच्या घरासमोर एक कचऱ्याची पेटी ठेवलेली आहे. दुर्देव असे की, या विभागामध्ये राहणारे सर्व लोक सुशिक्षित असून देखील आपल्या घरातला कचरा कचरा पेटी मध्ये टाकता इतरत्र टाकतात.
आणि जे कोणी कचरा पेटी कचरा टाकतात तो कचरा देखील सर्व रस्त्यावर असतो कारण त्या कचरापेटीची दशा खूप खराब झालेली आहे. त्यामुळे बराचसा कचरा रस्त्यावर पडला आहे त्याचा सर्वत्र दुर्गंधी पसरत आहे व मच्छर यांचे प्रमाण देखील वाढले आहे.
आमच्या परिसरामध्ये लहान मुलांचे प्रमाण देखील जास्त असल्याने़ त्यांचे आरोग्य धोक्यात येत आहे.
आपण याबाबत लक्ष घालून चौकशी करावी आणि दररोज किंवा एक दिवसाआड कचरा गाडी येथे यावी अशी व्यवस्था करावी हीच विनंती!!
तसदीबद्दल क्षमस्व.
आपली कृपाभिलाषी,
शोभा माने.
मित्रांनो! आजच्या या आर्टिकल ला तुमच्या इतर मित्रांशी अवश्य शेअर करा जेणे करून त्यांना हि खूप सोप्या पद्धतीने हे माहिती वाचायला मदत होईल… आणि मित्रांनो हा लिखाण ” Best Marathi Letter Writing Format- मराठी पत्र लेखन । Letter Writing In Marathi “ तुम्हाला कस वाटलं हे नक्की Comment द्यारे आम्हाला कळवा…
हे हि अवश्य वाचा :
- विज्ञानाचे महत्त्व निबंध मराठी । Vidnyanache Mahatva Nibandh In Marathi
- राष्ट्रीय एकात्मता निबंध मराठी । Rashtriya Ekatmata Essay In Marathi
- माझा परिचय मराठी निबंध । Maza Parichay in Marathi
- जर शिक्षक नसते तर मराठी निबंध । Jar Shikshak Naste Tar Essay in Marathi
- पाऊस पडला नाही तर निबंध । Paus Padla Nahi Tar Marathi Nibandh
धन्यवाद!!!
Best