महादेवाने बटुक अवतार का घेतले? बटूक अवतार घेण्यामागचे उद्देश? Mahadev Batuk Avatar Ka getle? Avatar genya magache udhesh

महादेवाने बटुक अवतार का घेतले? बटूक अवतार घेण्यामागचे उद्देश? Mahadev Batuk Avtar Ka Getle? Avtar Genya Magache Udhesh

हिंदू संस्कृतीमध्ये महादेवांना म्हणजे शंकराला सर्वात शक्तिशाली देव मानले जाते. त्यामुळेच सर्व देवतांचे देवता म्हणून देखील महादेवाला ओळखले जाते.

महादेवाचे विविध नावे आहेत जसे की, शिव शंकर, भोलेनाथ, निलकंठेश्वर इत्यादी अनेक नावांनी महादेवाला ओळखले जाते. महादेवाच्या अवताराबद्दल सर तुम्ही ऐकलेच असेल. महादेव आणि विविध अवतार घेऊन काही लोकांमध्ये आहाकार करणाऱ्या राक्षसांचा वध केला.

महादेवाने घेतलेल्या अवतारांपैकी बटुक भैरव हादेखील एक अवतार आहे. आजच्या लेखामध्ये आपण महादेवाने घेतलेल्या बटुक भैरव अवतार बद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

चला तर मग पाहूया, महादेवाने बटुक अवतार का घेतले? बटूक अवतार घेण्यामागचे उद्देश? Mahadev batuk Avatar ka getle? Avatar genya magache udhesh

महादेवाने बटुक अवतार का घेतले? बटूक अवतार घेण्यामागचे उद्देश? Mahadev batuk Avtar ka getle? Avtar genya magache udhesh

अवतार ही एक हिंदू धर्मातील धार्मिक कल्पना आहे. अवतारा नुसार स्वर्ग लोकांमध्ये राहणारे देव-देवता अर्ध देव किंवा मनुष्य रूपामध्ये जन्म घेत होते. आणि प्रत्येक देव-देवतांच्या अवतारावर एक प्राचीन आणि पौराणिक कथा प्रसिद्ध आहे.

महादेवाने अनेक अवतार घेतले आणि प्रत्येक अवतारामध्ये वाईटावर विजय मिळविला म्हणजेच दृष्ट आणि क्रूर राक्षसांचा वध केला.

महादेव आणि घेतलेल्या बटुक भैरव या अवतारामध्ये देखील त्यांनी आपद राक्षसाचा वध केला होता. परंतु सर्व अवतारांपैकी महादेवांचा हा अवतार खूपच आगळा वेगळा होता.

कारण बटुक भैरव या अवतारामध्ये महादेव केवळ पाच वर्षांचे बालक होते.

आता आपण महादेवाने बुटुक अवतार का घेतले? हे पाहणार आहोत.

महादेवाने बटुक अवतार का घेतले? या मागची कथा :

महादेवाने घेतलेल्या बटुक भैरव या अवताराची कथा प्राचीन ग्रंथांमध्ये वर्णन केलेली आहे. महादेवाने हा अवतार संपूर्ण देवदेवतांना आणि स्वर्ग लोकावर आलेल्या संकटातून मुक्ती देण्यासाठी घेतला होता.

अनेक ग्रंथांमधून कसे कळून येते महादेवाने बटुक भैरवाचा अवतार काली खंडांमध्ये घेतला होता. महादेवाने घेतलेला भैरव हा अवतार सर्वांसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो.

संकट हे देवावर असो किंवा मनुष्य सर्व संकटाचे निवारण करण्यासाठी बटुक भैरव या अवताराचे नामस्मरण केले जाते. तसेच भैरव देखील भक्तांच्या मनासारखे कार्य करून त्यांना प्रसन्न करतात असे मानले जाते.

खूप प्राचीन काळामध्ये म्हणजे देवी-देवतांच्या काळामध्ये आपद नावाचा एक राक्षस होता. या राक्षसाने घोर तपस्या करून भगवान शंकराला प्रसन्न केले. या राक्षसाला स्वतःच्या इच्छेनुसार वर हवा होता, त्यामुळे त्याने कित्येक वर्षे तपश्चर्या केली व त्याच्या तपश्चर्याला फळ देखील आले भगवान शंकर त्याच्यावर प्रसन्न झाले.

तेव्हा त्यांनी भगवान शंकराकडे वर मागितला कि त्याला सर्वात शक्तिशाली बनवावे. यासोबतच त्याने वर मागितला की त्याला कोणीही मारू शकणार नाही. देवी – देवता मनुष्य, नाग, गंधर्व, बेताल यामधल्या कोणाच्याही होती माझा मृत्यू होणार नाही असा वर त्याने मागितला.

त्यासोबतच त्याने मागितले जर माझा मृत्यू झाला तर तो केवळ पाच वर्ष खालील बालकाच्या हाती व्हावा. त्याच्या इच्छेनुसार त्याला वर मिळाला व तो अमर झाला.

परंतु त्याला स्वतःच्या वरदानावर गर्व झाला. वरदान मिळाल्याने अमर झाला असल्याने संपूर्ण सृष्टी मध्ये आपल्या शक्तीचे प्रदर्शन करू लागला. या सोबत तो देवी-देवता मनुष्य व इतर दानव सर्वांना आपल्या शक्ती मुळे त्रास देऊ लागला.

आपद राक्षस हा अतिशय बलाढ्य, शक्तिशाली, शरीराने मोठा आणि प्रवृत्तीचा होता. तो सर्वसामान्य लोकांवर आणि देवी देवतांवर आपल्या शक्तीचे प्रदर्शन करून त्यांना त्रास देऊ लागला.

त्यामुळे तिन्ही लोकांमध्ये राक्षसाचा हाहाकार माजला होता. सर्वजण त्याचे नाव घेताच कापू लागले. आपद राक्षसाच्या त्रासाला कंटाळून आणि त्याच्या अहंकाराला कंटाळून सर्वजण आपापली ठिकाणे सोडून इतरत्र जाऊ लागले. त्यामुळे सर्व देवी देवता, ऋषीमुनी आपद राक्षसाच्या अहंकारातून आणि त्याचा त्रासातून मुक्ती मिळवण्यासाठी प्रयत्न करू लागले.

परंतु आपद राक्षसा पासून मुक्ती मिळवण्याचा कोणताही उपाय सापडेना. त्यामुळे सर्व ऋषी-मुनी, देवगण चिंतेमध्ये पडले. तेव्हा सर्वजण मिळवणा-या राक्षसांपासून तिन्ही लोकांना मुक्ती मिळवून देण्यासाठी विचार करू लागले, ” आपण या आपद राक्षसाचा नाश कसा करायचा, आपद राक्षसाच्या अत्याचारापासून तीन्ही लोकांना कसे वाचवावे व स्वतःला देखील कसे वाचवायचे या विचारांमध्ये सर्वजण पडले.”

तेव्हा अचानक पणे सर्व देवीदेवतांच्या शरीरातून एक दिव्य शक्ती बाहेर निघू लागली व सर्व शक्ती एकाच ठिकाणी जाऊन जमा झाली व तेथे एका पाच वर्षीय बालकाचा जन्म झाला त्यालाच ” बटूक “ असे म्हंटले गेले.

आपद राक्षसाने वर मागितल्या प्रमाणे त्यांचा मृत्यू केवळ पाच वर्ष बालकाच्या हातून होणार होता. त्याप्रमाणेच आपद राक्षसाच्या मृत्यू बटूक नावाच्या बालकाच्या हातून झाला. आणि हा बटूक बालक इतर कोणी नसून महादेवाचा अवतार होता.

बटुक च्या हाती झालेल्या राक्षसाचा वादामुळे सर्व देवी-देवतांना राक्षसाच्या अत्याचारातून मुक्ती मिळाली.

अशा प्रकारे या मालकाच्या हातून झालेल्या आपद राक्षसाचा वध मुळे तिन्ही लोकांना मुक्ती मिळते. यामुळेच बटुक बालकाला “बटुक आपदुध्दारक” या नावाने देखील ओळखले जाते.

तिन्ही लोकांना भय पासून मुक्ती दिल्याने बटुक बालकाला “बटुक भैरव” सुद्धा म्हंटले जाते.

बटूक अवतार घेण्यामागचा उद्देश?

जेव्हा अत्याचार, भीती, आहाकार मोठ्या प्रमाणावर वाढतो तेव्हा तो अत्याचार थांबण्यासाठी देवाने कुठला ना कुठला अवतार घेतला आहे.

त्याप्रमाणेच वाईटावर विजय मिळवण्यासाठी म्हणजेच अपाद राक्षसाने अहंकारा मध्ये येऊन व स्वतःच्या शक्तीचा योग्य वापर न करता त्याने स्वतःचा शक्तीचा वापर देवी देवतांवर आणि लोकांवर अत्याचार करण्यासाठी व अहंकार माजवण्यासाठी केला. तेव्हा त्याच्या अत्याचारापासून संपूर्ण सृष्टीला मुक्त करण्यासाठी स्वयं शंकराने बटुक अवतार धारण केला.

आपद राक्षसाला कुणीही मारू शकणार नव्हते केवळ पाच वर्षाचे बालक त्याला मारू शकणार होते त्यामुळे शंकराने पाच वर्ष बालकाचा अवतार घेतला. त्यातलाच आपण बटूक अवतार असे म्हणतो.

थोडक्यात वाईटावर विजय मिळवण्याकरिता किंवा अत्याचारातून संपूर्ण सृष्टीला मुक्त करण्याच्या उद्देशाने महादेवाने बटुक अवतार घेतला म्हणूनच बटूक बालकाला बटुक भैरव देखील म्हटले जाते.

श्री बटुक भैरव मंत्र :

” ओम ह्री बटूकाय क्ष्यों क्ष्यों

आपदुध्दारणाय कुरु कुरू बटूकाय

ह्री बटूकाय स्वाहा ! “

श्री बटूकाय भैरव मंत्राला सर्व संकट निवारण मंत्र देखील म्हटले जाते. सर्व प्रकाराच्या संकटातून मुक्ती मिळवण्यासाठी या मंत्राचा जप केला जातो. या मंत्राचा जप केल्याने प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील सर्व संकट आणि समस्या दूर होतात असे मानले जाते.

कारण देवी-देवतांचा संकटांमध्ये बटुक अवतार घेऊन महादेवाने देवी-देवतांना संकटातून मुक्त केले होते. त्यामुळे हा मंत्र सर्व संकटांचे आणि विघ्नांचा नाश करतो.

मित्रांनो! आजच्या या आर्टिकल ला तुमच्या इतर मित्रांशी अवश्य शेअर करा जेणे करून त्यांना हि खूप सोप्या पद्धतीने हे माहिती वाचायला मदत होईल… आणि मित्रांनो हा लिखाण ” महादेवाने बटुक अवतार का घेतले? बटूक अवतार घेण्यामागचे उद्देश? Mahadev Batuk Avatar Ka getle? Avatar genya magache udhesh ”  तुम्हाला कस वाटलं हे नक्की Comment द्यारे आम्हाला कळवा…

हे हि अवश्य वाचा :

Leave a Comment