राष्ट्रीय एकात्मता निबंध मराठी । Rashtriya Ekatmata Essay In Marathi

Rashtriya Ekatmata Essay In Marathi नमस्कार मित्रांनो ! आपले मराठी मित्र या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे. या वेबसाईटवर तुम्हाला विविध निबंध वाचायला मिळतील.

आजच्या पोस्ट मध्ये आम्ही ” राष्ट्रीय एकात्मता निबंध मराठी | Rashtriya Ekatmata Essay In Marathi “ या विषयावर माहिती घेऊन आलोत.

आम्हाला खात्री आहे की, आपणास या वेबसाईट वरील सर्व निबंध वाचून नक्कीच आनंद मिळेल.

राष्ट्रीय एकात्मता निबंध मराठी | Rashtriya Ekatmata Essay In Marathi

आपला भारत देश विविध संस्कृतीने नटलेला देश आहे. संपूर्ण जगभरात भारताची संस्कृती लोकप्रिय आहे.

भारतामध्ये विविध जातीचे, धर्माचे लोक गुणा- गोविंदाने राहतात. त्यामुळे आपल्या देशात राष्ट्रीय एकात्मता टिकवून राहणे गरजेचे आहे. त्यासाठी गरजेचे असणारे महत्त्वाचे मुद्दे आम्ही ” राष्ट्रीय एकात्मता मराठी निबंध ” या निबंधामध्ये घेऊन आलोत.

राष्ट्रीय एकात्मता म्हणजे काय ?

राष्ट्रीय एकात्मता म्हणजे राष्ट्रातील सर्व नागरिकांमध्ये असलेली समानतेची भावना होय. राष्ट्राच्या समाज घटकांमध्ये सर्वांच्या सुख दुःखाची समान भावना, आपण सर्व भारतीय नागरिक एकमेकांचे बांधव आहोत. हे आपल्या वागण्यातून दिसणे म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेची जोपासना करणे होय. ” आपल्या देशाविषयी व आपल्यातील एकजुटी विषयी वाटणारी आपली आपुलकी म्हणजे राष्ट्रीय एकात्मता होय.”

तसेच देशाच्या नागरिकांमध्ये आपण सर्वजण आपल्या राष्ट्राचा एक महत्त्वाचा घटक आहोत होणे म्हणजे राष्ट्रीय एकात्मता होय.

त्यासाठी आपल्या प्रत्येकाच्या मनात आपले राष्ट्र, आपल्या राष्ट्राचा इतिहास, राष्ट्रीय प्रतीके याबाबत प्रेम आणि निष्ठा या भावना निर्माण व्हायला हव्यात. तेव्हा आपल्याही दिसत राष्ट्रीय एकात्मता निर्माण होईल.

भारतातील राष्ट्रीय एकात्मता :

भारत हा विविधतेत एकता असलेला सर्व देशांपैकी अनोखा देश आहे. विविध धर्म, जात, भाषा, पंथ असूनही भारताच्या संस्कृतीत कधीही कमतरता जाणवलेली नाही. भारतातील सर्वजण मिळून मिसळून विविध सण, उत्सव साजरी करून देशाची एकात्मता टिकवण्यासाठी प्रयत्न करीत असतात.

देशाची भौगोलिक स्थिती सुद्धा एक राष्ट्र ठेवण्यात मोठी मदत करते. आज भारतात लोकशाही शासन पद्धती वापरली जाते. देशाचा विकास आणि इतर सर्व निर्णय देशातील नागरिकांच्या मते घेतले जातात. जेव्हा सर्व जनतेचा विचार एक होईल तेव्हा एखाद्या गोष्टींचा निर्णय घेतला जातो. आमच्याकडे एक राष्ट्र, एक राष्ट्रध्वज, एक राष्ट्रीय गीत, एक राष्ट्रीय चलन आणि एकच केंद्र सरकार आहे.

त्यामुळे संपूर्ण जगात भारताला स्वतंत्र आणि सर्वत्रिक राष्ट्र म्हणून ओळखले जाते.

राष्ट्रीय एकात्मतेचे महत्त्व :

एकता ही राष्ट्राची सर्वात मोठी आणि महान शक्ती आहे. त्यामुळे एकात्मता जोपासणे हे राष्ट्रातील प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.

एकता ही राष्ट्राची खरी शक्ती आहे, आणि हीच खरी देशभक्ती आहे. एकता हाच राष्ट्राचा आत्मा आहे. जर देशात एकात्मता असेल तर आपण देशाच्या सर्व योजना पूर्ण करू शकतो. एकात्मता मुळे केवळ एकताच नव्हे तर, उद्योग, कृषी, विज्ञान अशा विविध क्षेत्रांत प्रगतीची दारे उघडू शकतो. देशातील ऐक्याचे सामर्थ्य पाहून शत्रु आपल्यावर हल्ला करू शकणार नाहीत व आपल्या देशातील नागरिकांचे फूट पडणार नाही. म्हणून एकात्मता असणे गरजेचे आहे.

एकात्मता विषयी देशवासीयांचे बुद्धिमत्ता कशी असावे ?

देशात सर्व नागरिकांमध्ये एकात्मता असायलाच हवी त्यासाठी देशातील नागरिकांनी ऐक्य हेच देशाचा पाया आहे, आणि आपल्या भारत मातेचा अभिमान आहे हा विचार करून सर्वांनी सहकार्य करायला हवे.

भारतीयांनी लक्षात ठेवले पाहिजे की, आपण सर्व एकत्र उभे राहायला पाहिजे, आपल्या मध्ये विभाजन होता कामा नये,

भारतात असलेले सर्व धर्म, जात, भाषा विसरून आपण सर्वजण भारतीय आहोत ही भावना ठेवली पाहिजे.

सहिष्णुता आणि सहकार्याच्या भावनेने एकत्र येऊन देशाची एकात्मता व वाढवली पाहिजे.

आपल्या देशात जरी अनेक धर्म असले, अनेक जाती असल्या व विविध राज्यात वेगवेगळी बोलली जाते, तरीसुद्धा आपण सर्वजण एकच आहोत एकाच सुत्राने बांधलेले आहे. एका विचाराशी एकरुप झालेले आहोत आणि एकाच विचाराशी एकरूप राहणार आहोत हे सूत्र लक्षात ठेवावे.

आणि ह्या सूत्राची जोपासना करणे म्हणजे एकात्मता. जर भारतातील सर्व राज्ये स्वतःला राष्ट्रीय संघटनेचा एक भाग मानत असतील तर राष्ट्रीय एकात्मतेचा आदर्श साध्य होऊ शकतो.

भारत हा भारतात राहणाऱ्या सर्व भारतीयांचे देश आहे.

राष्ट्रीय एकात्मता काळाची गरज निबंध :

भारत हे राष्ट्रामध्ये एकात्मता होण्याची गरज आहे. परंतु भारतातील काही अशी माणसे आहेत जे स्वतःच्या स्वार्थासाठी देशाला नुकसान पोचवायला सुद्धा विचार करत नाहीत. आणि अश्याच काही स्वार्थी घटकांना देशाची एकता मोडायची आहे. धर्म, जात, पंथ आणि भाषा यांच्या नावाखाली देश तोडण्याचा प्रयत्न करीत आहेत.

यानी याच गद्दार लोकांमुळे पंजाबमध्ये दहशतवादी पसरविला आहे. आणि याच लोकांमुळे कश्मीर मध्ये आमच्या बंधूतेचे नुकसान झाले. हे लोक देशातील पूर्वेकडील भागाचे शत्रू आहेत.

देशाने पुढे जावे आणि सुखी, समृद्ध व्हावे अशी त्यांची इच्छा नसते.

त्यामुळे असे लोक वारंवार देशात दहशत पसरवत असतात. देशातील नागरिकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतात आणि यामुळेच देशाची एकात्मता नष्ट होते.

राष्ट्रीय एकात्मता नसल्यास होणारे नुकसान :

जर देशात एकात्मता नसेल तर देशाचे बरेच नुकसान होते. जर देशात ऐक्य नसेल तर भारत एक राष्ट्र असल्याच्या अभिमानापासून वंचित राहील.

ऐक्य नसल्यामुळे आपण अनेक वर्ष परदेशी लोकांच्या अधिपत्याखाली राहिलो. आणि ती वेळ पुन्हा आपल्या देशावर येऊ शकते. ऐक्य नसल्याने मुघल, ब्रिटिश, फ्रेंच या सारख्या परदेशी देशांनी आपल्या धर्मभेदाचा भरपूर फायदा घेतली व त्यांची राज्ये स्थापन केली. आणि त्यांमुळे आपला देश पोकळ झाला. देशात जर एकात्मता नसेल तर सर्व देशभरात जात, धर्म आणि भाषा यामुळे दहशत निर्माण होईल. देशा- देशातील नागरिकांमध्ये भांडणे होतील. व देशात सर्वत्र अशांतता पसरेल.

राष्ट्रीय एकात्मता कायम राखण्यासाठी उपाय :

देशातील एकात्मता कायम ठेवण्यासाठी आपण देशातील शुल्लक भांडणे विसरली पाहिजेत. धर्म, जात, भाषा सर्वांचा विचार सोडून देशातील सर्व नागरिक एकच आहोत असा विचार करायला हवा.

राष्ट्रीय हितासाठी प्रादेशिक हितसंबंधांचा त्याग करावा लागतो.

भाषावाद, संप्रदाय वाद आणि जातीयवाद कायमचा दफन करावा लागतो. आणि देशातील एकात्मता वाढविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.

अशा प्रकारे आपण भारतातील राष्ट्रीय एकात्मता वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

” राष्ट्रीय एकात्मता मराठी निबंध । Essay On Rashtriya Ekatmata In Marathi ” यामध्ये आमच्या कडून काही मुद्दे राहिले असतील तर कमेंट करून नक्की कळवा.

मित्रांनो! आजच्या या आर्टिकल ला तुमच्या इतर मित्रांशी अवश्य शेअर करा जेणे करून त्यांना हि खूप सोप्या पद्धतीने हे माहिती वाचायला मदत होईल… आणि मित्रांनो हा लिखाण ” राष्ट्रीय एकात्मता निबंध मराठी । Rashtriya Ekatmata Essay In Marathi “ तुम्हाला कस वाटलं हे नक्की Comment द्यारे आम्हाला कळवा…

हे हि अवश्य वाचा :

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment