Quinoa in Marathi मित्रांनो आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे धान्य खात असतो प्रत्येक धान्यांमध्ये काही विशिष्ट पौष्टिक तत्व असतात जे आपल्या आरोग्यासाठी खूप फायद्याचे ठरतात.
क्विनोआ हा एक प्रकार आहे आपल्यातील बर्याच जणांना याबद्दल माहिती नसेल तरी देखील क्विनोआ हा एक धाण्याचा प्रकार आहे. Quinoa मुख्यता दक्षिण अमेरिकेतील मुख्य धान्य आहे. दक्षिण अमेरिका मध्ये याची खूप मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते.
Mountain biking, bodybuilding and rugby for the FCG in Val d’Isère 30 minute chest workout (video) threatened, goorjigen pape mbaye gets weightlifting and warns.Quinoa ची लोकप्रियता हे भारत देशांमध्ये सर्वाधिक प्रमाणात पाहायला मिळत असल्याने अलीकडच्या काळामध्ये भारतामध्ये देखील या पिकाची शेती केली जाते.
असे म्हणतात की Quinoa हा इतर पदार्थं पेक्षा अधिक पौष्टिक आणि रुचकर असतो त्यामुळे बहुतांश लोक Quinoa चा आहारामध्ये उपयोग करतात. यामध्ये अनेक पौष्टिक तत्वे असतात हा अंटी कॅन्सर, हृदयरोग, वजन कमी करणे अशा विविध प्रकारे आपल्यासाठी खूप फायद्याचा ठरतो.
क्विनोआ आपल्याला मार्केटमध्ये सुपर मार्केट मध्ये किंवा ऑनलाईन सहजरीत्या उपलब्ध मिळतो आज का लेखांमध्ये आपण Quinoa in Marathi क्विनोआ संपूर्ण मराठी माहिती जाणून घेणार आहोत.
क्विनोआ म्हणजे काय? । What is Quinoa in Marathi
क्विनोआ म्हणजे ज्याला आपण मराठी भाषेमध्ये राजगिरा असे म्हणतात. क्विनोआ अतिशय पौष्टिक धान्य आहे. यामध्ये प्रथिने युक्त ग्लुकोन आढळतात. आणि यामध्ये फायबरचे प्रमाण देखील खूप अधिक असते त्यामुळेच यामध्ये उपलब्ध असलेले फायबर याला सुपर फुड चा दर्जा देण्यासाठी मदत करतात. तसेच यामध्ये अमिनो आम्लं असते आणि मुख्यता लायझीन समृद्ध हे धान्य आहे.
सर्वच दृष्टीने क्विनोआ हे आपल्या आरोग्यासाठी खूपच फायद्याची ठरते.
Quinoa Meaning in Marathi
क्विनोआ हे एक धान्य आहे जे दिसायला बाजरी आणि ज्वारी च्या दाण्यांन सारखे दिसते. क्विनोआ या पिकाची शेती दक्षिण अमेरिका मध्ये येथे जाते. Quinoa ला मराठी भाषेमध्ये ” राजगिरा “ असे म्हणतात.
भारतामध्ये राजगिरा हा मुख्यता उपवासाच्या वेळी खाल्ला जातो. इतर वेळी देखील राजगिरा खाल्ला जातो.
क्विनोआ चे प्रकार । Types of Quinoa in Marathi
क्विनोआ चे त्याच्या वाणीच्या हंगामानुसार आणि इतर गुणधर्मा नुसार पडतात. क्विनोआ चे विविध प्रकार आहेत त्यातील काही मुख्य प्रकार आपण आजच्या लेखामध्ये पाहणार आहोत.
1. पांढरा क्विनोआ White Quinoa in Marathi :
पांढरा क्विनोआ जगभरामध्ये सर्वाधिक लोकप्रिय quinoa म्हणून ओळखला जातो कारण या प्रकाराचा Quinoa हा सर्वाधिक प्रमाणात खाल्ला जातो. पांढरा क्विनो वाहा हस्तिदंत किंवा हस्तीदंत क्विनोआ या नावाने देखील ओळखला जातो. बाजारामध्ये पांढरा क्वीनोआ हा आपल्याला विविध प्रकारांमध्ये उपलब्ध मिळतो जसे की, इडली डोसा कोशिंबीर लाडू इत्यादी विविध पदार्थांत मार्फत पांढरा Quinoa वापरला जातो.
2. रेड क्विनोआ Red Quinoa in Marathi :
रेड क्विनोआ खूप अल्प प्रमाणामध्ये पिकवला जातो म्हणूनच हा काही विशिष्ट दुकानांमध्ये उपलब्ध आहे. या प्रकाराच्या बियाणांचा रंग अगदी गडद लाल असल्याने त्याला रेड क्विनोआ म्हणून ओळखले जाते. तसेच हा राजगिरा शिजवल्यानंतर आणखीन लाल होतो म्हणून त्याचा वापर मुख्यता कोशिंबीर मध्ये केला जातो.
3. ब्लॅक क्विनोआ Black Quinoa in Marathi :
ब्लॅक क्विनोआ हा पांढरा क्विनोआ आणि रेड क्विनोआ तुलनेमध्ये खूपच कमी प्रमाणात पिकविला जातो. या प्रकारच्या बियांचा रंग हलका काळा असल्याने याला ब्लॅक क्विनोआ म्हणून ओळखले जाते. क्विनोआ चर्या इतर सर्व प्रकाराच्या तुलनेमध्ये ब्लॅक क्विनोआ हा शिजण्यासाठी अधिक वेळ घेतो.
क्विनोआ मध्ये असलेले महत्त्वपूर्ण पौष्टिक तत्व | Important Nutrients in Quinoa in Marathi
Quinoa हा आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असल्याने बहुतांशी लोक दैनंदिन जीवनामध्ये याचा वापर आपल्या आहारामध्ये करतात. क्विनोआ मध्ये असलेले महत्त्वपूर्ण पौष्टिक तत्व Important Nutrients in Quinoa in Marathi आपल्या आरोग्यासाठी खूप फायद्याचे ठरतात.
म्हणून आजच्या लेखामध्ये Quinoa in Marathi आम्ही क्विनोआ मध्ये असलेले महत्त्वपूर्ण पौष्टिक तत्व Important Nutrients in Quinoa in Marathi घेऊन आलोतं.
- प्रथिने – 4.4 ग्रॅम
- चरबी – 1.92 ग्रॅम
- कार्बोहायड्रेट – 21.3 ग्रॅम
- फायबर – 2.8 ग्रॅम
- साखर – 0.87 ग्रॅम
- व्हिटॅमिन बी 6 – 0.123 मिलीग्राम
- व्हिटॅमिन ई – 0.63 मिलीग्राम
- थायमिन – 0.107 मिलीग्राम
- कॅल्शियम – 17 मिलीग्राम
- लोह – 1.49 मिलीग्राम
- मॅग्नेशियम – 64 मिलीग्राम
- फॉस्फरस – 152 मिलीग्राम
- पोटॅशियम – 172 मिलीग्राम
- सोडियम – 07 मिलीग्राम
- जस्त – 1.09 मिग्रॅ
- तांबे – 0.192 मिलीग्राम
- मॅंगनीज – 0.631 मिलीग्राम
- फॅटी एसिडस् 0.231 मिलीग्राम
क्विनोआ झाडाची माहिती Information About Quinoa Plant in Marathi :
क्विनोआ आकाराने बाजरी आणि ज्वारीच्या दाण्यासारखे असतात यांना विशिष्ट चव आणि वास नसतो. क्विनोआ एक वार्षिक वनस्पती आहे सुमारे चार ते पाच मीटर उंच वाढून या वनस्पतीला पानांची संख्या अधिक प्रमाणात असते.
क्विनोआ प्लांटचे खोड लाल, जांभळे किंवा हिरव्या रंगाचे आसत. विशेष गोष्ट अशी आहे की, क्विनोआ वनस्पतीतील फुले गंधहीन आहेत परंतु अतिशय आकर्षक दिसतात.
तसेच क्विनोआ वनस्पतीला संवेदनशील वनस्पती म्हणून ओळखले जाते. या वनस्पतींमध्ये कीड आणि रोग आणि विरुद्ध लढण्याची शक्ती असते. क्विनोआ वनस्पतीचे बियाणे ओट्स प्रमाणे भूगोल आणि बारीक असतात ज्यांना आपण राजगिरा म्हणून ओळखतो.
क्विनोआ खाण्याचे फायदे Benefits of Quinoa in Marathi :
क्विनोआ चा आकार जरी लहान असला तरी देखील यामध्ये अनेक पौष्टिक तत्व आहेत जे आपल्या शरीरासाठी खूप फायद्याचे ठरतात त्यामुळेच क्विनोआ खाण्याचे फायदे भरपूर आहे तर त्यातील काही महत्त्वाचे फायदे आम्ही आजच्या Quinoa in Marathi लेखा मध्ये घेऊन आलो.
1. हृदय रोगावर फायदेशीर :
क्विनोआ मध्ये फॅनो एसिडस्, ओलिक एसिड आणि फायबर आढळतात जे हृदय निरोगी करण्यासाठी खूप फायद्याचे ठरतात. तर आपण आपल्या नियमित त्याच्या आहारामध्ये क्विनोआ चा समावेश केला तर हृदयासंबंधी च्या सर्व समस्यांपासून आपल्याला मुक्तता मिळेल.
2. वजन कमी करण्याचा फायदेशीर :
क्विनोआ मध्ये फायबरचे प्रमाण विपुल आढळते त्यामुळे वजन कमी करण्यासाठी क्विनोआ खूप फायद्याचा ठरतो. क्विनोआ चे थोडेसे सेवन केल्यास पोट भरल्यासारखे वाटते त्यामुळे वजन कमी करण्यासाठी क्विनोआ खूपच फायद्याचा ठरतो.
3. कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी फायदेशीर :
कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी क्विनोआ खूप फायद्याचा ठरतो. मानवी शरीरात कोलेस्ट्रॉल 200 मिलि पर्यंत योग्य पातळी समजला जाते. जर कोलेस्ट्रॉलची पातळी 200 मिली पेक्षा जास्त आढळल्यास मानवी शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढला असे समजले जाते. क्विनोआ मधील फायबर आणि प्रतिनिधी शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी फायद्याचे ठरतात.
4. रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी फायदेशीर :
काही रोग हे दीर्घ काळासाठी असतात म्हणजे एकदा लागले की ते शरीरातून सुटका मिळणे खूप कठीण असते.अशा वेळी अशा रोगांना लढण्यासाठी मानवी शरीराला गरज असते ती म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती ची. परंतु नियमित क्विनोआ चे सेवन केल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढते.
5. केसांना निरोगी बनविण्यासाठी फायदेशीर :
आजच्या काळामध्ये केस गळणे, टक्कल पडणे, केसांची वाढ खुंटणो या सामान्य समस्या आहेत परंतु अशा समस्यांपासून मुक्ती मिळण्यासाठी क्विनोआ खूप फायद्याचा ठरतो. केसा संबंधित कोणत्याही समस्या असल्यास तुम्ही नियमित क्विनोआ चे सेवन केल्यास तुम्हाला केसांना निरोगी बनविण्यासाठी फायदेशीर ठरेल.
6. रक्त वाढवण्यासाठी फायदेशीर :
नेमीया हा अशक्तपणा चा आजार आहे या आजारांमध्ये शरीरातील रक्ताचे पातळी कमी होते. या आजारांमध्ये चक्कर येणे, अशक्तपणा, थकवा आणि तणाव यांसारख्या समस्या दिसून येतो. या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी क्विनोआ फायद्याचा ठरतो.
7. मधुमेहावर फायदेशीर :
शरीरातील साखरेचे पातळी नियंत्रित करण्यासाठी क्विनोआ फायद्याचा ठरतो. क्विनोआमध्ये प्रोटीन, अमीनो एसिडस्, फायबरचे गुणधर्म आढळतात, जे रक्तातील साखरेचा प्रवाह कमी करतात. मधुमेह नियंत्रित करण्यासाठी आपल्या सकाळच्या नाश्त्यात क्विनोआ बिया किंवा त्यातून बनवलेल्या इतर खाद्यपदार्थाचा वापर करणे फायदेशीर ठरते.
क्विनोआचे नुकसान | Disadvantages of Quinoa in Marathi :
ज्याप्रमाणे क्विनोआचे फायदे आहेत त्याप्रमाणेच क्विनोआचे नुकसान देखील आहेत.
1.क्विनोआचे सेवन वजन कमी करण्यासाठी केला जातो मात्र एखाद्या व्यक्तीचे वजन कमी झाल्यास त्याने क्विनोआचू सेवन करणे टाळावे.
2. क्विनोआ रक्तातील साखर कमी करण्यासाठी मदत करते त्यामुळे एखादा व्यक्ती रक्तातील साखर कमी करण्याचे गोळ्या औषधे किंवा डॉक्टरांचा उपचार करीत असेल त्यांनी क्विनोआचे सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
- तसेच काही व्यक्तींना ऍलर्जी असते अशा व्यक्तीने क्विनोआचे सेवन करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्यावा.
क्विनोआ कुठे आणि कसे उगवले जाते?
क्विनोआ धान्य आहे तुझे दिसायला बाजरी आणि ज्वारी प्रमाणे असतात हे धान्य मुख्यतः दक्षिण अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणात पिकवले जाते.
पीक संशोधन नेटवर्कशी संबंधित शास्त्रज्ञांच्या मते, क्विनोआ हे एक वर्षाचे रब्बी पीक आहे आणि ते शरद ऋतुमध्ये घेतले जाते.
क्विनोआ उपयोग कसा करावा ? How To Use Quinoa in Kitchen Or Recipes
क्विनोआचा उपयोग आपण वेगवेगळ्या प्रकारे करू शकतो आणि क्विनोआ वेगवेगळ्या प्रकारे अन्नामध्ये वापरू शकतो.
क्विनोआ मुख्यता आपण कोशिंबिरीचा रूपाने खाऊ शकतो. आणि क्विनोआ कोशिंबीर बनवण्याची रेसिपी पुढीलप्रमाणे आहे.
क्विनोआ कोशिंबीर :
साहित्य :
दोन कप पाणी, क्विनोआचा एक कप, 10 कोबी पाने बारीक चिरून, तीन चमचे ऑलिव तेल, दोन चमचे लिंबाचा रस, 1 चमचे डिजॉन मोहरी, एक लसूण बारीक चिरून, दोन किंवा तीन काळी मिरचीचा मसाला, अर्धा चमचे मीठ, 1 कप पेकान, मनुका एक कप, चीज अर्धा कप.
कसे बनवावे कृती –
10-15 मिनिटे पाण्यात क्विनोआ उकळा आणि थंड होऊ द्या.
आता एका मोठ्या भांड्यात कोबीची पाने घाला आणि ऑलिव्ह तेल, लिंबाचा रस, मिरपूड, मीठ, डिजॉन मोहरी आणि लसूण घाला आणि चांगले ढवळा.
आता क्विनोआ, पेकान, मनुका आणि चीज घालून मिक्स करावे.
या व्यतिरिक्त आपण आपण न्याहारीसाठी 1 कप आणि दुपारच्या जेवणासाठी रात्री 3 कप शिजवू शकता. त्याच वेळी, हे सॅलड्स, सूप्स, पोर्रिज, बर्गर, मफिन आणि पॅनकेक्समध्ये देखील वापरले जाऊ शकते. आपण आपल्या आवडीनुसार पांढरा, काळा किंवा लाल कोनोआ निवडू शकता.
मित्रांनो! आजच्या या आर्टिकल ला तुमच्या इतर मित्रांशी अवश्य शेअर करा जेणे करून त्यांना हि खूप सोप्या पद्धतीने हे माहिती वाचायला मदत होईल… आणि मित्रांनो हा लिखाण ” क्वोनोआ म्हणजे काय? त्याचा फायदा आणि तोटा । Quinoa in Marathi “ तुम्हाला कस वाटलं हे नक्की Comment द्यारे आम्हाला कळवा…
हे हि अवश्य वाचा :
- घरी चॉकलेट कसे बनवतात । Chocolate Recipe In Marathi Language
- महादेवाने बटुक अवतार का घेतले? Mahadev Batuk Avatar Ka getle?
- टूना फिश वर संपूर्ण माहिती मराठी – टूना फिश खाण्याचे 5 फायदे । Tuna Fish In Marathi
धन्यवाद!!!