जर शिक्षक नसते तर मराठी निबंध । Jar Shikshak Naste Tar Essay in Marathi

जर शिक्षक नसते तर मराठी निबंध । Jar Shikshak Naste Tar Essay in Marathi

मित्रांनो प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये शिक्षणाला अनन्यसाधारण स्थान आहे. शिक्षणाच्या जोरावर आज मनुष्य एवढी प्रगती करत आहे. अशी प्रगतशिल शिक्षण देण्याचे काम आपले शिक्षक करत असतात. म्हणून मित्रांनो आपल्या जीवनामध्ये शिक्षणासोबतच आपल्या शिक्षकाचे स्थान देखील खूप महत्त्वाचे आणि आगळेवेगळे आहे.

परंतु मित्रांनो, जर शिक्षक नसते तर आपल्या देशाची काय स्थिती झाली असती? आणि एवढी प्रगती झाली ती देखील कशी झाली असती? याचा विचार कोणी केला का?

म्हणून आजच्या “जर शिक्षक नसते तर मराठी निबंध । Jar Shikshak Naste Tar Essay in Marathi” या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासाठी जर शिक्षक नसते तर या विषयावर कल्पनाविस्तार मराठी निबंध घेऊन आलो होतो.

जर शिक्षक नसते तर मराठी निबंध । Jar Shikshak Naste Tar Essay in Marathi

शिक्षक ही प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील अशी व्यक्ती आहे जी आपल्या ज्ञानाने श, संयमाने, प्रेमाने आणि काळजीने त्यांच्या संपूर्ण आयुष्याला मजबूत आकार देते. म्हणून शिक्षकी पेशा हा जगातील सर्वात उत्तम आणि आदर्श व्यवसाय मानला जातो. कारण शिक्षक निस्वार्थीपणा ने एखाद्याचे जीवन घडवण्यासाठी सेवा करत असतात. शिक्षक समर्पित करत असलेल्या कार्याची तुलना ही इतर कोणत्याही कार्याशी होऊ शकत नाही. शिक्षक हे असे व्यक्ती असतात जे आपल्या सर्व विद्यार्थ्यांना ज्ञान देऊन त्यांना उत्तम व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी आणि भविष्यामध्ये चांगली पदवी प्राप्त करून देण्यासाठी ज्ञान देत असतात.

परंतु मित्रांनो ज्ञानाचा अपार भांडार असणारे आणि विद्यार्थ्याला प्रगतीपथावर घेऊन जाणारे जर शिक्षक नसते तर….. काय झाले असते?

खरोखरच मित्रांनो!!! जर शिक्षक नसते तर आपल्या देशाची नव्हे तर संपूर्ण जगाचे चित्रच बदलले असते.

जर शिक्षक नसते तर… संपूर्ण जगभरामध्ये शाळा- महाविद्यालय देखील उभारली नसती. कोणताही विद्यार्थी शाळेमध्ये गेला नसता. त्यामुळे संपूर्ण जगातील व्यक्ती हे अज्ञानी राहिले असते कोणालाही अनमोल असा ज्ञानाचा भांडार मिळाला नसता.

येवढेच नसून जर शिक्षक नसते तर…. वर्तमान काळाने जी काही प्रगती केलेली आहे ती प्रगतीच झाली नसती.

शिक्षक विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांमधील ज्ञान देत असतात त्यामुळे विद्यार्थी मोठे होऊन इंजिनियर, वकील, शिक्षक, वैज्ञानिक, डॉक्टर होतात परंतु जर शिक्षक नसेल तर विद्यार्थ्यांना प्रत्येक क्षेत्रातील ज्ञान कोण देणार?

जर शिक्षक नसेल तर विद्यार्थी इंजिनियर, वकील, शिक्षक, वैज्ञानिक, डॉक्टर अशा मोठमोठ्या पदावर देखील जाऊ शकणार नाहीत त्यामुळे आपला संपूर्ण समाजाचा अज्ञानी राहील आणि याचे वेगवेगळे परिणाम आपल्याला भोगावे लागतील. आपण आजारी पडलो तर दवाखान्यामध्ये जाण्यासाठी डॉक्टर नसतील, विविध शोध लावण्यासाठी वैज्ञानिक नसतील, विज्ञानाचा भांडार देणारे शिक्षक नसतील, घर बांधण्यासाठी इंजिनियर नसतील आणि योग्य मार्गदर्शन देण्यासाठी वकील देखील नसतील अशा प्रकारे जर शिक्षक नसतील तर सर्व काही अंधारामध्ये जाईल . ज्ञानाचा प्रकाश देणारे आणि ज्ञानातून ज्ञानाकडे घेऊन जाणारा मार्गच बंद होईल.

आजच्या काळामध्ये आपल्याला नवनवीन शोध, नवनवीन गोष्टींचा लाभ घ्यायला मिळतो त्या कोणत्याही गोष्टी आपल्याला मिळाल्या नसत्या. आपला देश आज देखील अश्मयुगात असल्याप्रमाणे राहिला असता. कोणत्या सुख-सुविधा, सेवा आपल्याला मिळाल्या नसत्या. जगातील प्रत्येक व्यक्ती हा अज्ञानी राहिला असता. त्यामुळे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिक्षणाची ज्योती लावणाऱ्या सावित्रीबाई फुले यांसारखे महान लोक देखील या पृथ्वीवर राहिले नसते.

जर शिक्षक नसते तर ( जर शिक्षक नसते तर मराठी निबंध | Jar Shikshak Naste Tar Marathi Nibandh) आपल्याला गणित, मराठी , विज्ञान, भूगोल, इंग्रजी अशा कोणत्याही विषयाचे ज्ञान मिळाले नसते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या भारताचा इतिहास हा संपूर्ण जगभरामध्ये ओळखला जातो. जर शिक्षक नसते तर आपल्याला असा हा महत्वपूर्ण इतिहास शिकवणारे कोणीही राहिले नसते त्यामुळे आपल्याला आपल्या भारताचा इतिहास देखील कळाला नसता.

शिक्षकांमुळे आपल्याला चांगल्या वाईट गोष्टीचे ज्ञान मिळते. शिक्षकांमुळे समाजामध्ये चांगले व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी मदत होते. जर शिक्षक नसतील तर

आपण एक सुसज्ज आणि सुशिक्षित व्यक्ती झालोच नसतो. ज्ञानाच्या जोरावर आपण कोणतीही असाध्य गोष्ट सहजपणे साध्य करू शकतो, परंतु असे ज्ञान देणारे शिक्षक नसते तर आपण जीवनामध्ये यशस्वी झालो नसतो. आज जे व्यक्ती शिक्षण घेऊन नोकरी करतात किंवा मोठमोठ्या पदावर जातात ते सर्वजण काही तरी काम करताना दिसले असते किंवा शेती करताना दिसले असते.

परंतू आजची परिस्थिती ही खूप वेगळी आहे शिक्षकांनी दिलेल्या ज्ञानाचा जोरावर व्यक्ती जीवनामध्ये कोणतीही गोष्ट साध्य करू शकतो, यशस्वी होऊ शकतो. म्हणून प्रत्येक व्यक्तीचे जीवनामध्ये शिक्षकाचे स्थान हे खूप महत्त्वाचे आहे, आणि शिक्षकाचे महत्त्व हे सांगावे तेवढे कमी आहे..

शिक्षक हे आपल्याला योग्य मार्गावर जाण्यासाठी प्रेरित करत असतात. शिक्षक हे त्यांच्या जवळ असलेले ज्ञान आपल्याला देण्याचा प्रयत्न करतात मग ते ज्ञान कोणत्याही क्षेत्रातील असो शिक्षक आपल्याला देतात. शिक्षकांचे केवळ हीच इच्छा असते की त्यांचा प्रत्येक विद्यार्थी हा जीवनामध्ये यशस्वी व्हावा यासाठी शिक्षक प्रयत्न करत असतात.

त्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात साठी आवश्यक यसणारे जर हे शिक्षक नसते तर…. आजची परिस्थिती ही खूप वेगळी दिसली असती.

त्यामुळे शिक्षक नसते तर ही कल्पना करणे देखील थरकापवाने आहे.

शेवटी एवढेच सांगायचे की, प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्वाचे स्थान आहे प्रत्येकाने शिक्षकांचा मान सन्मान करायला हवा व शिक्षक देत आहेत ते ज्ञान ग्रहण करून त्या ज्ञानाच्या जोरावर जीवनामध्ये यशस्वी होणे गरजेचे आहे.

कारण जर शिक्षक नसते तर… जी परिस्थिती उद्भवेल त्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी वर्तमान काळातील एकही माणूस सक्षम नाही.

मित्रांनो! आजच्या या आर्टिकल ला तुमच्या इतर मित्रांशी अवश्य शेअर करा जेणे करून त्यांना हि खूप सोप्या पद्धतीने हे माहिती वाचायला मदत होईल… आणि मित्रांनो हा लिखाण ” जर शिक्षक नसते तर मराठी निबंध । Jar Shikshak Naste Tar Essay in Marathi “ तुम्हाला कस वाटलं हे नक्की Comment द्यारे आम्हाला कळवा…

हे हि अवश्य वाचा :

Leave a Comment