माझा परिचय मराठी निबंध । Maza Parichay in Marathi

माझा परिचय मराठी निबंध । Maza Parichay in Marathi

मित्रांनो आजच्या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासाठी माझा परिचय मराठी निबंध घेऊन आलो बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये माझा परिचय या विषयावर मराठी निबंध विचारला जातो.

माझा परिचय मराठी निबंध । Maza Parichay in Marathi

मित्रांनो मनुष्याला सर्वात बुद्धिमान प्राणी म्हंटले म्हटले जाते. कारण मनुष्या सारखे विचार करण्याची क्षमता, बोलण्याची क्षमता, एकमेकांची भावना समजून घेण्याची क्षमता ही दुसर्या कोणत्याही प्राण्यांमध्ये नाही. मनुष्य हा अद्वितीय प्राणी आहे या पृथ्वीवर मनुष्यांची संख्या किती कोट्यावधी मध्ये आहे. प्रत्येक मनुष्य हा वेगवेगळा आहे. प्रत्येकाच्या आवडीनिवडी विचार करण्याची क्षमता ही वेगवेगळी आहेत. तसेच प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावावरून आणि करतोस वरून त्या व्यक्तीची ओळख केली जाते.

Essay on myself in Marathi

स्वतःचा परिचय देणे ही सोपी गोष्ट नव्हे. कारण प्रत्येक व्यक्ती हा स्वतःबद्दल सकारात्मक विचार करत असतो परंतु आपण काय आहोत हे केवळ आपल्या कुटुंबाला , समाजाला माहिती असते तरीदेखील आजच्या लेखाच्या माध्यमातून मी तुम्हाला माझा परिचय मराठी निबंध | Essay on myself in Marathi घेऊन आलो.

नमस्कार मित्रांनो माझे नाव काया आहे. मी सध्या 12 वर्षाची असून इयत्ता सातवी या वर्गामध्ये शिक्षण घेत आहे.

माझे संपूर्ण नाव काया श्रीपाद देशमुख असे आहे. मी सांगली जिल्ह्यामध्ये राहते. माझ्यासोबत माझे आई-बाबा लहान भाऊ आणि आजी आजोबा देखील राहतात. आमच्या परिवार हा छोटा असला तरी सुखी परिवार आहे.

माझ्या वडिलांचे नाव श्रीपाद देशमुख असे आहे तर आईचे नाव सविता देशमुख असे आहे.

लहानपणापासूनच मला माझ्या कुटुंबाकडून खूप प्रेम मिळाले. चांगल्या वाईट गोष्टीची शिकवण मिळाली. कुटुंब व्यतिरिक्त या जगामध्ये आपल्याला समजून घेणारी दुसरी कोणतीही व्यक्ती नाही. म्हणून मी माझ्या कुटुंबावर खूप प्रेम करते.

मी रोज सकाळी लवकर उठून आंघोळ नाश्ता करून शाळेला जाण्यासाठी तयार होतो. माझी शाळा आणि सकाळी अकरा वाजेपासून चार वाजेपर्यंत असते. या वेळेमध्ये मी पूर्णतः लक्ष देते.

मला शाळेमध्ये माझ्या मैत्रिणींना मदत करायला फार आवडते. एखाद्या मैत्रिणीला कशाचीही अडचण आल्यास मी तिची अडचण सोडवण्यासाठी उभी असते.

माझे बाबा हे एक शिक्षक आहेत आणि माझी आई ऑफिसमध्ये कामाला जाते. त्यामुळे घरी फक्त आजी आजोबा असतात आणि माझा लहान भाऊ देखील इयत्ता चौथी मध्ये आहे.

माझ्या घरांमधून मला सर्व प्रकारचे संस्कार देण्यात आलेले आहे. बाबा नेहमी मला इतरांची मदत करण्यासाठी सांगतात, त्याप्रमाणे मी वागते सुद्धा. त्यामुळे मी माझ्या मैत्रिणीला नेहमी मदत करत असते.

मी नेहमी हसतमुखाने इतरांशी खूप आनंदाने बोलते. माझ्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या लोकांचा मी आदर करते. माझ्या सर्व शिक्षकांना मी गुरु मानून त्यांच्या आज्ञेचे पालन करते.

मी रोजचा अभ्यास रोज पुर्ण करते. माझा अभ्यास झाल्यानंतर मी काही वेळ आईला घर कामांमध्ये मदत करते. त्यानंतर माझ्या घराशेजारी मैत्रिणींसोबत खेळायला जाते. रात्रीचे जेवण आम्ही सगळेजण मिळून करतो.

त्यानंतर मी माझ्या आजी आजोबा सोबत झोपते. आजी-आजोबा झोपताना मला रोज पौराणिक आणि धार्मिक कथा सांगतात.

त्यामुळे मला पौराणिक आणि धार्मिक ग्रंथ वाचायला खूप आवडते. मोठे होऊन शिक्षण घेऊन माझी डॉक्टर होण्याची इच्छा आहे. डॉक्टर होऊन मला गरीब लोकांची सेवा करायची आहे.

मी डॉक्टर व्हावे अशी माझ्या बाबांची इच्छा आहे व बाबांची इच्छा मला पूर्ण करायचे आहे त्यासाठी मी पूर्णता प्रयत्न करीन.

माझा परिचय मराठी निबंध । Essay on myself in Marathi

आपल्या पृथ्वीवरील लोकसंख्या हे दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. परंतु पृथ्वीवर असलेल्या प्रत्येक लोकांचे वैशिष्ट्य हे वेगवेगळे आहे. प्रत्येक व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व आवडीनिवडी छंद सर्व काही वेगवेगळे आहे एवढेच नसून प्रत्येक व्यक्ती दिसायला सुद्धा वेगळा दिसतो.

म्हणून मला वाटते की मी सुद्धा सर्वसामान्य व्यक्ती पेक्षा काहीतरी वेगळा आहे माझ्यामध्ये देखील वेगळी वैशिष्ट्ये आहेत वेगळे व्यक्तिमत्व आहे. मी सर्वोत्तम व्यक्ती आहे एक चांगले व्यक्तिमत्व साठी आवश्यक असणारे सर्व गुण माझ्या मध्ये आहेत.

मला माहिती आहे की कोणताही व्यक्ती हा परिपूर्ण नसतो, प्रत्येकामध्ये काही ना काही कमतरता असते परंतु मी स्वतःला असे न समजता परिपूर्ण समजतो कारण मी माझ्यातल्या कमतरता ला पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो.

माझे नाव आनंद सदाचारी आहे. मी एक जबाबदार नागरिक आहे. मी सोलापूर जिल्ह्यामध्ये राहतो. मी माझ्या पालकांचा द्वितीय पुत्र आहे. मला एक मोठा भाऊ आहे. मी सोलापूर जिल्ह्यातील एका ग्रामीण भागामध्ये राहतो.

माझ्या कुटुंबा मध्ये मी माझा मोठा भाऊ आई आणि बाबा असे चार जण राहतो. माझ्या बाबांचे नाव आनंद सदाचारी आणि आईचे नाव कल्पना सदाचारी आहे. माझे बाबा शेतकरी आहेत आणि आई ही लोकांच्या शेतामध्ये कामाला जाते. माझ्या घरची परिस्थिती जी अत्यंत हलाखीची आहे. अशा परिस्थिती मध्ये देखील माझी आई बाबा हार न मानता रात्रंदिवस लोकांच्या शेतामध्ये काम करतात आणि आम्हा मुलांना शिक्षणासाठी पैसे पुरवतात.

मी सोलापूर जिल्ह्यामधील एका कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून काम करत आहे. सोबतच मी यूपीएससी परीक्षेचा देखील अभ्यास करत आहे.

मला मोठे होऊन कलेक्टर व्हायचे आहे. मला माझ्या घरच्या परिस्थितीवर मात द्यायची आहे आणि माझे आई-बाबा आमच्यासाठी जे कष्ट करत आहे तर त्याची परतफेड करायची आहे.

माझा मोठा भाऊ तो इंजिनिअर चे शिक्षण घेण्यासाठी पुणे शहरामध्ये स्थानांतरित झाला आहे. घराची संपूर्ण जबाबदारी माझ्यावर पडलेली असताना देखील माझ्या आई बाबांनी मला कधी याची जाणीव होऊ दिली नाही. मोठ्या भावाप्रमाणे मला देखील शिकवण्यासाठी आणि मोठे कळण्यासाठी माझी आई बाबा स्वतःची लढत आहेत.

लहानपणापासूनच माझी परिस्थिती खूप हलाखीची होती लहान असताना मला कधी पोटभर जेवण मिळाले नाही ना अंगावरती घालायला कपडे मिळाले नाही अशा परिस्थितीमध्ये देखील मी कधी हार मानली नाही. कारण बाबा लहानपणापासून आम्हाला सांगायची की आपल्याला परिस्थितीला घाबरायचे नाही तर परिस्थितीला घाबरवायचे आहे. त्यासाठी मी प्रयत्नदेखील केले. दहावी मध्ये मी नव्वद टक्के मार्क मिळविले. माझ्यामधील अभ्यासाची जिद्द पाहून बाबांनी मला पुढे शिकवायचे विचार केला. त्यासाठी बाबांनी माझे ऍडमिशन देखीला करून दिले. अशा परिस्थिती मध्ये देखील बाबा मला शिकवत आहेत हे पाहून मला आनंद झाला. व मी खूप अभ्यास करायचा निश्चय केला.

बारावी मध्ये देखील मला 75 टक्के मार्क मिळाले. त्यानंतर मी पुढचे शिक्षण घेऊन लेक्चरर म्हणून काम करू लागले. यातून मला थोडेफार पैसे मिळू लागले. व घरची परिस्थिती फिर होईल अशी मला खात्री होती.

मी आता घरची आई-बाबांची जबाबदारी घ्यायला सक्षम झालो, परंतु आई बाबाचे जे माझ्यावर ऋण आहेत मी ते कधीही फेडू शकणार नाही.

मी एक जबाबदार नागरिक आहे परिस्थितीशी लढून मी इथपर्यंत पोहोचलो आहे. त्यामुळे भविष्यामध्ये जर मी जास्त पैसे कमवू लागलो तर गरीब मुलांची नक्कीच सेवा करीन असा निर्णय घेतला आहे. आतादेखील मी माझ्याकडून जेवढी काही मदत होईल तेवढी मदत करतो.

मला नाही माहिती की माझे व्यक्तिमत्व कसे आहे परंतु आपल्या समाजामध्ये वावरण्यासाठी चांगले व्यक्तिमत्व आणि नाव कमावण्यासाठी, माझ्या आई बाबांच्या चेहऱ्यावर सुखाचे हस्य आणण्यासाठी मी सध्या प्रयत्न करेन. मला जास्त बाहेर फिरायला आवडत नाही तसेच जास्त मित्रांमध्ये राहायला देखील आवडत नाही मी माझा वेळ वाया जाऊ देत नाही.

नोकरीवरून घरी आल्यानंतर मी थोडावेळ माझ्या आई-बाबांसोबत घालवतो. त्यानंतर पुन्हा अभ्यासाला लागतो. मला भविष्यामध्ये कलेक्टर व्हायचे आहे. लहानपणापासूनच मला कलेक्टर होण्याची इच्छा होती परंतु घरची परिस्थिती आणि जबाबदारी असल्यामुळे माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला थोडा उशीर लागला. परंतु आता मी स्वतःच्या पायावर उभा आहे व घरची जबाबदारी घेण्यासाठी देखील सक्षम आहे त्यामुळे मी अभ्यासाला सुरुवात केली आहे व एक दिवस माझी कलेक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करून दाखवणार आहे.

1. माझा परिचय १० ओळीत मराठी निबंध 10 Lines on Myself Essay in Marathi

( This essay is Helpful for Students of Classes 1, 2, 3 and 4.)

  1. माझे नाव महेश जाधव आहे आणि मी ७ वर्षांचा आहे.
  2. मी न्यू इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये इयत्ता चौथीत शिकतो.
  3. माझ्या वडिलांचे नाव श्री. रमेश जाधव आणि माझ्या आईचे नाव विजया जाधव आहे.
  4. मला एक लहान बहीण आहे तिचे नाव साक्षी आहे. ती देखील माझ्याच शाळेमध्ये म्हणजेच न्यू इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये इयत्ता पहिली मध्ये शिकते.
  5. मी माझ्या परिवारा वर खुप प्रेम करतो.
  6. मला कार्टून बघायला आवडते आणि माझे आवडते कार्टून पात्र छोटा भीम आहे.
  7. मला माझ्या बहिणीसोबत इनडोअर गेम्स खेळायलाही आवडते. आणि, मला माझ्या मित्रांसोबत क्रिकेट खेळायला आवडते.
  8. मी एक अतिशय प्रामाणिक आणि सभ्य मुलगा आहे आणि माझ्या पालकांच्या आणि शिक्षकांच्या सर्व सूचनांचे पालन करतो.
  9. मी शाळेमध्ये दिलेला अभ्यास वेळेवर पूर्ण करतो. मी माझ्या पेक्षा मोठ्या आणि थोर व्यक्तींचा आदर करतो व त्यांच्या आज्ञांचे पालन करतो.
  10. मी रोज रात्री माझ्या आई-बाबांसोबत व मिळून जेवण करतो.
  11. मी सकाळी लवकर उठून आंघोळ करून, नाश्ता करून शाळेला जाण्यासाठी तयार होतो.
  12. मी माझ्या आईला घर कामांमध्ये मदत करतो.

मित्रांनो! आजच्या या आर्टिकल ला तुमच्या इतर मित्रांशी अवश्य शेअर करा जेणे करून त्यांना हि खूप सोप्या पद्धतीने हे माहिती वाचायला मदत होईल… आणि मित्रांनो हा लिखाण ” माझा परिचय मराठी निबंध । Maza Parichay in Marathi “ तुम्हाला कस वाटलं हे नक्की Comment द्यारे आम्हाला कळवा…

हे हि अवश्य वाचा :

Leave a Comment