पाऊस पडला नाही तर निबंध । Paus Padla Nahi Tar Marathi Nibandh
नमस्कार मित्रांनो आजच्या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासाठी पाऊस पडला नाही तर निबंध मराठी घेऊन आलोत.
पाऊस पडला नाही तर निबंध । Paus Padla Nahi Tar Marathi Nibandh
मानवी जीवनासाठी पाणी हे अत्यंत महत्त्वाचे आहे याची व्याख्या पृथ्वीवर कोणताही सजीव जिवंत राहू शकत नाही आणि हे पाणी मिळवण्याचा केवळ एकच स्त्रोत आहे तो म्हणजे पाऊस…
जून महिना सुरू होताच सर्वजण आतुरतेने वाट पाहतात तो म्हणजे पावसाची… परंतु या वर्षी मात्र असे घडले नाही. जून महिना सरत आला तरीदेखील पावसाचा काही पत्ताच नव्हता. त्यामुळे सर्व जण चिंतेमध्ये होते शेतकरी बांधव तर अधिकच चिंता करू लागले की, पाऊस पडला नाही तर शेतामध्ये पीक घ्यायचे कसे?
अशा परिस्थितीमध्ये माझ्या डोक्यामध्ये कल्पना आली की खरंच पाऊस पडला नाही तर…( पाऊस पडला नाही तर निबंध । Paus Padla Nahi Tar Marathi Nibandh)
खरोखरच मित्रांनो पाऊस पडला नाही तर आपल्या आजूबाजूची परिस्थिती काय होईल याचा कोणी विचार केला आहे का?
पाऊस आहे म्हणून आपण आहोत हे म्हणणे देखील चुकीचे ठरणार नाही, कारण पावसाचे आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्वाचे स्थान आहे. पावसावर मनुष्याचे जीवन अवलंबून आहे केवळ मनुष्यच नव्हे तर या पृथ्वीवरील सर्व पशुपक्ष्यांचे जेवण देखील पावसावर अवलंबून आहेत.
आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण वेगवेगळ्या स्वरूपाने पाण्याचा वापर करत असतो जर पाऊस पडला नाही तर…हे पाणी येणार कुठून?
आपल्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याला पाण्याची आवश्यकता असते दिवस घरामध्ये आपण जे काही कामे करतो त्यामुळे सर्वात महत्त्वाची भूमिका पाण्याची असते सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत वेगवेगळ्या कामासाठी आपल्याला पाण्याची आवश्यकता भासते. अंघोळीसाठी, स्वयंपाकासाठी, भांडी धुण्यासाठी, कपडे धुण्यासाठी, महत्वाचे म्हणजे पिण्यासाठी आपल्याला पाण्याची आवश्यकता असते.
जर पाऊस पडला नाही तर आपल्या दैनंदिन जीवनातील मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याला समस्या येतील शिवाय पिण्यासाठी पाणी मिळाले नाही तर आपला प्राण देखील जाऊ शकतो.
पाऊस पडला नाही तर…. नदी, नाले, तलाव आणि समुद्र यामध्ये देखील पाणी येणार नाही त्यामुळे पाण्यामध्ये राहणाऱ्या जीवांचे अस्तित्व धोक्यामध्ये येईल. या शिवाय पाण्याच्या अभावामुळे नदी, नाले ,तलाव, समुद्र सर्व कोरडे पडतील त्यामुळे यामध्ये राहणारे सर्व सजीव मृत्यू पावतील.
आपल्या आजूबाजूला असलेली हिरवळ आणि दिसणारा सुंदर निसर्ग हा देखील पाण्यामुळेच शक्य आहे. मग पाऊस पडला नाही तर… आपली संपूर्ण पृथ्वी ही नष्ट होईल पृथ्वी मधील हिरवा नष्ट होईल. झाडे वाढायला लागतील, जर झाडे वाळून गेली तर आपल्याला ऑक्सिजन कोठून मिळणार, तसेच फुले, फळे, खायला अन्न मिळणार कसे?
पाऊस पडला नाही तर… संपूर्ण सृष्टीवरील हिरवळ जळून जाईल झाडेझुडपे जळून जातील, त्यामुळे आपल्या पृथ्वीचे रूपांतर हे दगडधोंड्यांच्या वाळवंटामध्ये होईल.
याशिवाय आपल्या देशाला जगभरामध्ये कृषिप्रधान देश म्हणून ओळखले जाते. आपल्या देशातील निम्म्यापेक्षा अधिक लोकसंख्या ही शेती व्यवसायावर अवलंबून आहे, परंतु शेती व्यवसाय करण्यासाठी आवश्यकता असते ती म्हणजे पावसाची आणि पाण्याची…..
शेती मध्ये धान्य पिकते ते केवळ पावसाच्या पाण्यावर जर पाऊस पडला नाही तर शेतीमध्ये पिक टिकणार नाही व शेतीमध्ये धान्य पिकले नाही तर देशातील लोकांना खाण्यासाठी अन्नधान्य मिळणार नाही. त्यामुळे देशातील सर्व जण अन्नाविना आणि भुकेने मरतील.
याव्यतिरिक्त शेत जमिनीचे रूपांतर हे वाळवंटामध्ये होईल. त्यामुळे आपल्या देशाची आर्थिक व्यवस्था ढासळत आहे त्यामुळे सर्वत्र महागाई वाढेल व बेरोजगारी देखील वाढेल.
जर पाऊस पडला नाही तर…. (पाऊस पडला नाही तर निबंध मराठी । Paus Padlach Nahi Tar Marathi Nibandh) लहान मुलांना पावसात भिजण्याचा आनंद घेता येणार नाही. पाऊस येऊन गेल्यानंतर सुखद वातावरण असते आणि आकाशामध्ये जो इंद्रधनुष्य दिसतो त्याचा देखील आनंद घेता येणार नाही. तसेच पावसामुळे आपल्या निसर्गाचे सुंदर असे रूप पाहायला मिळणार नाही.
पाऊस पडला नाही तर… झाडे-झुडपे येणार नाही त्यामुळे आपल्या पृथ्वीचे तापमान वाढेल व संपूर्ण पृथ्वीवर केवळ सूर्याचे राज्य नसेल. अशा परिस्थितीमध्ये पृथ्वीवर एकही सजीव जिवंत राहणे अशक्य होईल.
पावसामुळे आपले बरेचसे नुकसान होईल.विशेष म्हणजे पाऊस पडलाच नाही तर शाळेत जाणारी लहान मुलांना आपले पावसाचे गाणे कसे गाता येईल. पाऊस पडला नाही तर निसर्गाचे रौद्र रूप आपल्याला पाहायला मिळेल सर्वत्र केवळ तापमान आणि ज्वालामुखीचा उद्रेक पहायला मी जर पाऊस पडला नाही तर आज आपल्या पृथ्वीवर सजीव जीव आनंदाने नांदत आहेत ते मरणा पावतील. थोडक्यात जर पाऊस पडला नाही तर संपूर्ण सजीव सृष्टी आणि पृथ्वी नष्ट होईल.
त्यामुळे मनुष्याच्या जीवनासाठी आणि या सजीव सृष्टी साठी पाऊस हा खूपच महत्त्वाचा आहे. पाऊस पडला नाही तर या पृथ्वीवर एकही जीव जीवित राहणे शक्य नाही त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यामध्ये पाऊस पडलाच पाहिजे परंतु अलीकडच्या काळामध्ये वाढती लोकसंख्या, वाढते प्रदूषण, वृक्षतोड आणि जागतिक तापमान वाढ यांसारख्या समस्यांमुळे पावसाचे प्रमाण खूपच कमी झाले आहेत.
काही भागामध्ये पाऊस पडतच नाही तर काही बागांमध्ये पावसाचे रौद्र रूप पाहायला मिळते. पावसाचे समान स्वरूप हे पाहायला मिळत नाही. पाऊस हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे त्यामुळे पाऊस आपल्या निसर्गासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम वृक्षतोड आणि प्रदूषण थांबवणे आवश्यक आहे जर या दोन गोष्टी थांबल्या तर पाऊस हा पूर्वीप्रमाणे समान रूपामध्ये पडेल पाऊस पडला नाही तर या कल्पनेचा विचार करण्याची गरज भासणार नाही.
परंतु आपण निसर्गचक्राचा उलट दिशेने वागलो तर एक दिवस नक्कीच असा उगवेल ज्या दिवशी पाऊस पडला नाही तर….ही कल्पना खरी होईल!!
मित्रांनो! आजच्या या आर्टिकल ला तुमच्या इतर मित्रांशी अवश्य शेअर करा जेणे करून त्यांना हि खूप सोप्या पद्धतीने हे माहिती वाचायला मदत होईल… आणि मित्रांनो हा लिखाण ” पाऊस पडला नाही तर निबंध । Paus Padla Nahi Tar Marathi Nibandh “ तुम्हाला कस वाटलं हे नक्की Comment द्यारे आम्हाला कळवा…