शेती विषयक माहिती मराठी । Information About Agriculture in Marathi

Information About Agriculture in Marathi मित्रांनो आपण सर्वांना माहितीच आहे की आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. म्हणजेच आपल्या देशातील 70 टक्के जनता ही शेती व्यवसायावर अवलंबून आहे. त्यामुळे शेती हा भारताचा प्राथमिक व्यवसाय समजला जातो.

शेती विषयक माहिती मराठी । Information About Agriculture in Marathi

भारतामध्ये शेती ही केवळ ग्रामीण भागांमध्ये केली जाते, त्यामुळे शहरी भागांमध्ये राहणाऱ्या बहुतांश जणांना शेतीविषयक माहिती मराठीमध्ये माहित नाही, म्हणून आजच या लेखाच्या माध्यमातून आम्ही सर्वांसाठी शेतीविषयक माहिती मराठीमध्ये घेऊन आलो.

शेती विषयक माहिती मराठी :

मित्रांनो शेती सर्वांनाच माहिती आहे कारण आपल्या देशातील 70 टक्के जनता शेतीवर अवलंबून आहे. तसेच शाळा आणि महाविद्यालय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना लहान वयामध्ये शेतीबद्दल शिकवले जातात त्यामुळे शेती सर्वांच्याच परिचयाचे आहेत. मानवाच्या मूलभूत गरजा अन्न, वस्त्र आणि निवारा या आहेत. या मूलभूत गरजा मधील अन्नाची गरज शेती मार्फत पूर्ण होते. त्यामुळे मनुष्याला जगण्यासाठी शेती खूप महत्वाची आहे.

त्यामुळे शेती बद्दल सर्वांना माहिती असणे आवश्यक आहे.

शेती म्हणजे काय?

शेतकऱ्याने उदरनिर्वाहासाठी किंवा धंदा म्हणून शेत जमिनीवर वेगवेगळ्या पिकांची केलेली लागवड म्हणजे शेती होय.

शेती हा व्यवसाय प्राचीन काळापासून चालत आलेला आहे आणि अद्याप देखील वेगवेगळ्या प्रकारची शेती केली जाते. जसे की मळा शेती, भात शेती, मत्स्य शेती.

त्याप्रमाणेच पाण्याच्या व सिंचनाच्या उपलब्धतेनुसार बागायती शेती व जिरायती शेती असेदेखील शेतीचे प्रकार पडतात. व खतांच्या वापराने नुसार सेंद्रिय शेती व रासायनिक शेती हे प्रकार पडतात. स्थूल मानाने आणि नैसर्गिक व आर्थिक घटकांमुळे शेतीच्या प्रकारांमध्ये विभिन्नता आढळते.

आपल्या भारत देशामध्ये तोच एक तीन ऋतू आहेत. जसे की उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा या तीनही त्यांच्या बदलत्या हवामानानुसार भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारची शेती केली जाते.

जर एखाद्या भागामध्ये पावसाचे प्रमाण कमी असेल तर या ठिकाणी सिंचनाच्या सहाय्याने कापूस शेती, ऊस म्हणजे दीर्घ मुदतीच्या पिकांची लागवड केली जाते. तर एखाद्या ठिकाणी पावसाचे प्रमाण जास्त असेल तर अशा ठिकाणी बागायती शेती केली जाते.

भारताच्या कोकण भागामध्ये पावसाचे प्रमाण जास्त असल्याने अशा ठिकाणी भात शेती , आंब्याची लागवड ,काजू, सुपारी अशा पिकांची शेती केली जाते.

तसेच जमिनीची भूरचना नुसार देखील वेगवेगळ्या प्रकारची शेती केली जाते. म्हणजे हॉल सुपीक आणि सपाट जमीन असेल तर अशा ठिकाणी पिकांची लागवड चांगली होते व पिकांची भरभराट देखे वेगात होती तर डोंगराळ भागांमध्ये चहाची शेती केली जाते.

तसेच डोंगराळ भागात आणि पुरेशा पर्जन्यमान असलेल्या प्रदेशात गवताळ राने, कुरण, वनशेती,गवत शेती किंवा पशुधन प्रधान शेती करणे फायदेशीर ठरू शकते.

भारतातील व्यापारी पिके कोणती?

मित्रांनो आपल्याला माहितीच आहे कि आपल्या भारत देशामध्ये वेगवेगळ्या पिकांची लागवड करून त्यातून आर्थिक फायदा मिळवला जातो. शेतकऱ्याच्या दृष्टीने व्यापारी पिके ही आर्थिक दृष्ट्या खूप महत्त्वाची ठरतात कारण व्यापारावर आधारित शेती मध्ये, मोठ्या प्रमाणात लागवड करून व्यावसायिक शेती केली जाते.

जास्त पैसे कमावण्याच्या दृष्टिकोनातून आणि इतर देशांमध्ये निर्यात केल्या जाणाऱ्या सर्व पिकांना व्यापारी पिक असे म्हटले जाते.

गहू , कापूस, ऊस , मका इत्यादी भारतातील व्यापारी पिके म्हणून ओळखले जातात.

शेतीचे महत्व :

मित्रांनो शेतीचे महत्त्व सांगावे तितके कमीच आहे कारण भारत हा कृषीप्रधान देश आहे भारतातील 70 टक्के जनता ही शेती व्यवसायावर अवलंबून आहेत तर 30 टक्के जनता ही अप्रत्यक्ष स्वरूपाने शेतीवर अवलंबून आहे. भारत देशाच्या राष्ट्रीय उत्पादनामध्ये शेती व्यवसायाचा वाटा हा सुमारे 18 ते 20 टक्के एवढा आहे. सुमारे 30 टक्के जनता ही अप्रत्यक्षरीत्या त्यांच्या अन्न वस्त्र आणि निवारा या गरजा पूर्ण करण्यासाठी शेती व्यवसायावर अवलंबून आहेत.

शेतीच्या एकूण उत्पादनामध्ये जगभरामध्ये भारताचा दुसरा क्रमांक लागतो तर अर्थव्यवस्था मध्ये देखील शेतीचा खूप मोठा वाटा आहे. भारताच्या आर्थिक आणि सामाजिक विकासामध्ये शेती या क्षेत्राची खुप मोठी भूमिका आहे. त्यामुळे भारताच्या पंचवार्षिक योजनांमध्ये शेतीला खूप महत्त्वाचे स्थान दिले जाते.

  1. शेती कच्च्या मालाचा मुख्य स्त्रोत आहे :

शेतीमधून पिकवला जाणारा कच्चामाल म्हणजेच कापूस, ऊस, लाकूड अशा विविध कच्च्या मालाचे उत्पादन केले जाते यावर प्रक्रिया करून कापसापासुन वस्त्र निर्मिती केली जाते तर उसावर प्रक्रिया या करून साखर, गूळ तयार केला जातो. त्यामुळे कच्च्या मालाच्या दृष्टीने शेतीचे महत्त्व खूप अनन्यसाधारण आहे.

  1. शेतीतून रोजगार उपलब्ध होतो :

कृषी उद्योग आहा आज देखील रोजगाराच्या सर्वात मोठी संधी उपलब्ध करून देणाऱ्या क्षेत्रांमध्ये गणला जातो. विकसनशील देशांमध्ये कृषी नोकऱ्या बेरोजगारीचे उच्च दर कमी करण्यास मदत करते. जेव्हा जेव्हा गरिबी कमी करण्याचा विचार येतो तेव्हा तेव्हा शेती क्षेत्राकडे लक्ष केंद्रित करणे हे इतर क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करण्यापेक्षा अधिक प्रभावशाली दिसून येते.

  1. शेती हा अन्नपुरवठा याचा महत्त्वाचा स्त्रोत आहे :

शेतीचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे संपूर्ण जगाला अन्न प्रदान करणे होय. शेती या क्षेत्रातील संपूर्ण जगभरामध्ये अन्न उपलब्ध होत आहे. आपण जे अन्न खातो जसे की, गहू, तांदूळ ,कडधान्ये, मका ,बाजरी, तांदूळ हे सर्व पिकांची लागवडही शेतीतूनच केली जाते.

  1. पर्यावरण संतुलित करण्याचा शेती मदत करते :

जेव्हा जेव्हा शेतकरी त्यांच्या शेत जमिनीवर जैवविविधतेला प्राधान्य देतात तेव्हा तेव्हा त्याचा फायदा आपल्या पर्यावरणाला होत असतो. जैवविविधतेमुळे मातीची धूप होत नाही जलसंधारण होते आणि निरोगी पर्यावरण उपलब्ध होतो.

अशा प्रकारे शेतीचे विविध गोष्टींसाठी महत्व आहे.

शेतीचे प्रकार :

मित्रांनो शेती चे वेगवेगळे प्रकार पडले जातात मुख्यता हवामान, भूरचना आणि पर्जन्यमान यानुसार शेती चे वेगवेगळे प्रकार पडतात. आजच्या शेती विषयक माहिती मराठी या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासाठी शेतीच्या प्रकारांची माहिती सांगणार आहोत जी पुढील प्रमाणे आहे-

  1. जिरायती शेती :

शेतीच्या या प्रकारांमध्ये 50 ते 100 सेंटीमीटर पाऊस असणाऱ्या प्रदेशात मध्ये जिरायती ही शेती केली जाते. जिरायती शेतीमध्ये खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामातील पिके घेतली जातात. तसेच आच्छादनाचा वापर करून बहुतांश विभागांमध्ये जिरायती शेती केली जाते. भारत देशातील बहुतांश राज्यामध्ये जिरायती शेती केली जाते.

  1. दुर्जल शेती :

शेतीच्या या प्रकारामध्ये 50 सेंटिमीटर केव्हा त्यापेक्षाही कमी निश्चित पर्जन्यमान असलेल्या भागात दुर्जल शेती केली जाते.

जमिनीमध्ये ओलावा टिकवणे, आणि भूसंरक्षण करणे या समस्यांवर आधारित ही दुर्जल शेती केली जाते.

दुर्जल म्हणजेच पाण्याची कमतरता असलेली शेती. मुख्यता पावसाळी महिन्यात होणारी हंगामी शेती असते. या शेतीमध्ये होणाऱ्या पिकांची निवड ही सुद्धा मर्यादित असते. भू संरक्षण करण्यासाठी आणि ओलावा टिकविण्यासाठी शेतीच्या मशागतीच्या काही खास शिफारसींचा वापर करून या शेतीमध्ये पिके काढली जातात.

उदाहरणार्थ: समपातळीत बांध घालून पिकांची समांतर लागवड करणे, कमी बी पेरणे, शेतातील रोपांची संख्या मर्यादित ठेवणे, पट्टा पेर पद्धतीने पीक पिकवणे, आच्छादनाचा वापर करणे आणि खतांचा माफक वापर करणे. इत्यादी शिफारशींचा वापर करून दुर्जल शेती केली जाते.

  1. बागायती शेती :

बागायती शेती हा शेतीचा प्रकार असून हे पीक काढण्याची एक पद्धत आहे. यामध्ये शेतीतील पीक हे मुख्य स्वरूपाने पावसावर अवलंबून असते त्यामुळे बागायती शेती मधील पिकाचे उत्पादन हे जिरायती शेतीमध्ये होणाऱ्या पिकाच्या उत्पन्नापेक्षा अधिक असते.

तसेच बागायती शेतीसाठी पाण्याचा इतर स्त्रोत देखील उपलब्ध असतात त्यामुळे बागायती शेतीही वर्षभर केली जाते.

  1. फुलं शेती :

फुल शेती हा देखील बागायती शेतीचा एक प्रकार आहे. फुल शेती हेदेखील वर्षभरामध्ये पावसाच्या पाण्यावर तसेच पाण्याच्या इतर स्त्रोतांवर अवलंबून केले जाते.

बाजारपेठेमध्ये फुलांची वाढती मागणी पाहून फुल शेती ही अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात केली जात आहे.फुलांचे उत्पादन हे अल्पकाळ टिकणारे आणि जलद वाहतुकीची सोय असल्याने फुल शेतीपासून खूप फायदा होतो.

अलीकडच्या काळात हरितगृहांचा वापर हा मुख्यत फुलशेतीसाठी केला जातो.

  1. फळबाग शेती :

शेतीच्या प्रकारामध्ये विविध प्रकारची फळ हे मुख्य उत्पादन असते. कोकणातील हवामान आणि पर्जन्यमानला अनुसरून आंबा, नारळ, काजू, सुपारी इत्यादी फळपिकांना पोषक आहे.

तर महाराष्ट्रातील पठारी भागात लिंबू, संत्रे, मोसंबी यांसारखी फळांची शेती केली जाते. कोरड्या हवामानाचा पाण्याची उपलब्धता असेल काय तर द्राक्ष शेती केली जाते.

जमिनी चांगली सुपीक असेल आणि सिंचन उपलब्ध असेल तर केळीची बाग उत्तम रीत्या होऊ शकते. बहुवर्षीय फळबाग मोठी झाल्यानंतर त्यांना पाण्याची गरज भासत नाही.

  1. भाजीपाला शेती :

भाजीपाला हा मानवाचे मुख्य गरज असल्याने बाजारपेठेमध्ये भाजीपाल्याला खूप मागणी आहे म्हणून बहुतांश शेतकरी भाजीपाला शेती करत असतात. निश्चित प्रजन्यमान किंवा सिंचनाचे सुविधा असलेल्या भागांमध्ये भाजीपाला शेती केली जाते.

भाजीपाला शेती या शेतीच्या प्रकारात उत्पन्न होणारा भाजीपाला हा नाशवंत स्वरूपाचा असल्याने वाहतुकीची जलद सोय असलेल्या भागांमध्ये भाजीपाला शेती केल्याने खूप फायदा होतो.

  1. पशुधन आणि दुग्धव्यवसाय प्रधान शेती :

मित्रांनो आपण पहात असतो की बहुतांश शेतकरी हे शेतीसोबत पशूपालन आणि दुग्धव्यवसाय देखील करत असतात या स्वरूपाच्या शेतीला पशुधन आणि दुग्धव्यवसाय प्रधान शेती असे म्हटले जाते.

या व्यवसायासाठी जनावरांना चरण्यासाठी चराऊ राणे व जनावरांना वैरण, चारा,धान्यादी खाद्य इत्यादींसारख्या उत्पादन करता येण्यासारख्या सिंचन सुविधा उपलब्ध असलेल्या जमिनीची आवश्यकता असते.

  1. मत्स्य शेती :

मत्स्यशेती हा शेतीचा प्रकार अलीकडच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये केला जात आहे यामध्ये शेती मध्ये एका भागामध्ये अळी खोदून मध्ये पाणी सोडले जाते. व त्यामध्ये मत्स्यबीज सोडून त्यांचे संगोपन केले जाते.

  1. सेंद्रिय शेती :

सेंद्रिय शेती म्हणजे जमिनीमध्ये रासायनिक खतांचा वापर न करता सेंद्रिय खतांचा वापर करून त्यातून शिकवल्या जाणाऱ्या पिकांना सेंद्रिय शेती असे म्हणतात.

पालापाचोळा जमिनीत कुजवून ताग किंवा धैंचा यांसारखे हिरवळीची पिके जमिनीत गाडून, शेणखत आणि कंपोस्ट खत पिकांसाठी वापरतात. तसेच इतर सर्व प्रकारचे वनस्पतीजन्य सेंद्रिय पदार्थ जमिनीत मिसळून आणि कुजवून वापरलेल्या अन्नद्रव्यांचे पुनर्भरण करतात.

अशाप्रकारे अन्नद्रव्यांनी समृद्ध केलेल्या जमिनीत पिके घेतली जातात.

  1. रासायनिक शेती :

फक्त रासायनिक पदार्थाचा वापर करून केल्या जाणाऱ्या शेतीला रासायनिक शेती असे म्हणतात. अधिक उत्पादन मिळवण्याच्या दृष्टिकोनातून रासायनिक शेती केली जाते. रासायनिक कीटकनाशके आणि रोगनाशके वापरून रासायनिक शेती केली जाते.

मित्रांनो! आजच्या या आर्टिकल ला तुमच्या इतर मित्रांशी अवश्य शेअर करा जेणे करून त्यांना हि खूप सोप्या पद्धतीने हे माहिती वाचायला मदत होईल… आणि मित्रांनो हा लिखाण ” शेती विषयक माहिती मराठी । Information About Agriculture in Marathi “ तुम्हाला कस वाटलं हे नक्की Comment द्यारे आम्हाला कळवा…

हे हि अवश्य वाचा :

Leave a Comment