उन्हाळी सुट्टी मराठी निबंध । Marathi Essay on Summer Vacation

उन्हाळी सुट्टी मराठी निबंध Marathi Essay on Summer Vacation

नमस्कार मित्रांनो आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्या साठी उन्हाळी सुट्टी या विषयावर मराठी निबंध घेऊन आलो. वर्षांमध्ये तीन ऋतू असतात त्यातील सर्वात उष्ण आणि गरम ऋतू म्हणून उन्हाळा या ऋतूला ओळखले जात. उन्हाळा या ऋतूमध्ये कडाक्याचे दोन असते त्यामुळे सर्व शाळा महाविद्यालय कॉलेज तसेच ऑफिस मध्ये काम करणाऱ्या सर्व व्यक्तींना सुट्ट्या दिल्या जातात त्यामुळे लहान मुलांच्या सर्वात आवडता ऋतू देखील उन्हाळा ऋतू असतो.

या ऋतूमध्ये उन्हाळी सुट्ट्यांमध्ये सर्व लहान मुले तसेच त्यांचे पालक व फिरण्यासाठी बाहेर गावी जातात. मामाच्या गावी जातात संपूर्ण उन्हाळी सुट्टी मज्जा करत जाते.

उन्हाळी सुट्टी मराठी निबंध । Marathi Essay on Summer Vacation

आजच्या लेखामध्ये आम्ही तुम्हाला मुले उन्हाळी सुट्टीमध्ये कशाप्रकारे आनंदाने घालवतात. असेच उन्हाळ्या सुट्टीचा अनुभव आणि उन्हाळ्यामध्ये ऊना मुळे होणारा त्रास या सर्वांचा अनुभव सांगणार आहोत.

उन्हाळी सुट्टी मराठी निबंध

उन्हाळी सुट्ट्या म्हटले की सर्व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एकच स्मितहास्य पाहायला मिळेल. कारणं हाच तो कालावधी असतो यामध्ये विद्यार्थ्यांना शाळेच्या अभ्यासापासून परीक्षेच्या त्रासापासून स्वतःला मुक्त करता येते. हाच तो दीड महिन्याचा कालावधी ज्यामध्ये मुले मनसोक्त स्वत:चे जीवन जगू शकतात. वर्षभरातील आठ महिने शाळेच्या ओझ्याखाली दडलेले विद्यार्थी, सतत अभ्यासात गुंतलेले विद्यार्थी, परीक्षेच्या आणि वेळापत्रक यांच्या दडपणाला मध्ये लपलेले विद्यार्थी अखेर या उन्हाळी सुट्टीमध्ये मुक्त होतात. म्हणून सर्व विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी सुट्ट्या हा खूप आनंददायी आणि मजेचा कालावधीत असतो.

एक मे पासून एक ते 16 जून पर्यंत चा हा दीड महिन्याचा कालावधी विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी सुट्टी म्हणून दिला जातो या महिन्यामध्ये अभ्यासाची पेपरचे कशाचेही टेन्शन नसते. महिलांमध्ये विद्यार्थी हा विद्यार्थी नसून तो पालकांचा मुलगा, आजी-आजोबांचा नातू किंवा नाती, मित्रांचा मित्र, बहिणीचा भाऊ म्हणूनच जगतो.

उन्हाळी सुट्टी हा माझ्या जीवनातील सर्वात आनंदाचा काळ असतो. वर्षभरामध्ये दीड महिन्याचा काळा माझ्यासाठी जणू वर्षभराची आठवण ठेवून जातो. अभ्यासापासून मला सुटका तर मिळतेच सोबतच पूर्ण परिवारासोबत वेळ देखील घालयाला मिळतो.

उन्हाळा सुट्ट्या मध्ये सूर्याचा उणाचा पारा अगदीच चडलेला असतो बरोबर परंतु आपल्या कुटुंबासोबत घालवत असताना मला उन्हाच्या चटकांची जरादेखील जाणीव होत नाही.

मी माझ्या प्रेमळ पालक आणि भावासोबत संपूर्ण उन्हाळी सुट्टीचा आनंद घेतो. उन्हाच्या असह्य वेदनांपासून स्वतःला वाचवण्यासाठी आम्ही दरवर्षी माझ्या कोकण मध्ये राहणाऱ्या मामाच्या गावाला जातो. कोकणचा भाग हा हिरवागार सतत वाऱ्याची झुळूक त्यामुळे तेथे उणाची जराही जाणीव होत नाही. म्हणून मी माझ्या आई-बाबांसोबत आणि लहान भावासोबत दरवर्षी उन्हाळ्याची सुट्टी माझ्या आजी आजोबांच्या गावी जातो.
संपूर्ण एक वर्ष ओलांडल्यानंतर आजी-आजोबांच्या गावाला जाण्याचा आनंद देखील आगळा वेगळाच असतो आणि वर्षभर आणि मला पाहण्याची आजी आणि आजोबांची उत्सुकता अगदी गगनाला भिडलेली असते.

आजीचे गाव आहे अगदी डोंगराखाली वसलेले काशी नगर नावाचे गाव अगदी निसर्गाच्या सानिध्यात मध्ये या गावाचा वास्तव्य असल्याने येथे उन्हाची जरादेखील जाणीव होत नाही.

माझ्या मामाची मुले देखील माझ्या वर्गात असल्याने आम्ही खेळा सोबत नवीन नवीन कौशल्य शिकण्याकडे विशेष भर देतो. जसे की, अभ्यासामध्ये मला अवघड जाणारा विषय मी माझ्या मामाच्या मुली कडून शिकून घेतो आणि माझ्या मामाच्या मुलीला अवघड जाणारा विषय तिला समजावून सांगतो अश्याने आम्हा दोघांचा अभ्यास होतो. सोबतच गमतीजमती देखील होतात.

उन्हाळ्याच्या सुट्ट्या मध्ये माझा नवीन उपक्रम म्हणजे रोज सकाळी लवकर उठून मामाच्या गावातूध वाहात असलेल्या नदी मध्ये जाऊन पोहायला शिकणे आणि मासे पकडणे. तसेच माझ्या मामाच्या मुलीला टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू बनवणे फार आवडते त्यामुळे मी तिला नेहमी मदत करत असतो.

उन्हाळा सुट्टी मध्ये घरामध्ये फार गरम होत असल्याने आणि रात्रीच्या वेळी घराचा छातावर झोपतो त्यामध्ये चंद्र, ताऱ्यांचा गप्पा-गोष्टी करत कधी झोप लागते याचे भानच राहत नाही. माझ्या आजी पौराणिक कथा आणि भरलेली आहे माझ्या आजीला प्रत्येक गोष्टीवर पौराणिक कथा सांगता येतात आजी मला दर उन्हाळा सुट्टी मध्ये पौराणिक कथा सांगत असते. आतापर्यंत आजीने मला रामायण-महाभारत यातील सर्व महत्त्वपूर्ण कथा सांगितल्या आहेत. या उन्हाळा सुट्टीला आजी मला भगवद्गीता मधील काही महत्त्वपूर्ण गोष्टी सांगणार आहे.

मोठ्या शहरांमध्ये जाऊन लहानशा छोट्याशा आणि निसर्गाच्या सानिध्यात मध्ये असणाऱ्या गावांमध्ये राहण्याचा अनुभव हा शब्दांमध्ये व्यक्त करता येणार नाही एवढा आगळा वेगळा असतो. खरंच या उन्हाळा सुट्ट्यांमध्ये मला जो आनंद मिळतो तो संपूर्ण वर्षभरामध्ये कधीही मिळणार नाही एवढा मोठा असतो.

तसेच या उन्हाळा सुट्टी ची सर्वात मोठी विशेषता म्हणजे फळांचा राजा आंबा हा एवढा उन्हाळा सुट्ट्यांमध्ये च मिळतो. त्यामुळे उन्हाळा सुट्टी मला फार आवडतात कारण आंबा हा माझा आवडता फळ आहे आणि या फळाचा स्वाद मला केवळ उन्हाळी सुट्ट्यांमध्येच घेता येतो. म्हणून उन्हाळी सुट्टी मला खूप खूप आवडते!!!!

निष्कर्ष :

उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये सूर्य खूप तापलेला असतो त्यामुळे संपूर्ण वातावरणामध्ये उष्णताचा पारा चढलेला असतो अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना विश्रांती मिळावी, उन्हाळ्याच्या असाह्य वेदनांपासून बचावासाठी विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या दिल्या जातात.

या उन्हाळ्याच्या सुट्ट्या मध्ये विद्यार्थ्यांचा कमकुवत विषयावर अधिक भर देऊन सराव करते तसेच उन्हाळ्याच्या सुट्टीचा त्यांना आनंद घेता येईल या हेतूने उन्हाळ्याच्या सुट्ट्या देण्यात येतात.

उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये विद्यार्थ्यांना नवीन ठिकाणांना भेट देण्याची संधी मिळते, त्यांचे सामान्य ज्ञान वाढते, शालेय प्रकल्प कामासाठी वेळ मिळतो. एकूणच आपण असे म्हणू शकतो की उन्हाळ्याच्या सुट्ट्या आमच्या पूर्ण विकासासाठी अत्यंत आवश्यक आहेत.

मित्रांनो! आजच्या या आर्टिकल ला तुमच्या इतर मित्रांशी अवश्य शेअर करा जेणे करून त्यांना हि खूप सोप्या पद्धतीने हे माहिती वाचायला मदत होईल… आणि मित्रांनो हा लिखाण ” उन्हाळी सुट्टी मराठी निबंध । Marathi Essay on Summer Vacation “ तुम्हाला कस वाटलं हे नक्की Comment द्यारे आम्हाला कळवा…

हे हि अवश्य वाचा :

Leave a Comment