15 ऑगस्ट भाषण मराठी । 15 August Speech in Marathi

15 August Speech in Marathi मित्रांनो 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन म्हणजे त्या दिवशी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले व आपला भारत देश स्वतंत्र झाला. सुमारे दीडशे वर्षापासून इंग्रजांच्या गुलामगिरीत खाली दबलेला आपला देश 15 ऑगस्ट या दिवशी स्वतंत्र झाला, म्हणून आज देखील 15 ऑगस्ट हा दिवस भारतामध्ये स्वतंत्र दिन म्हणून साजरा केला जातो.

या दिवशी सर्व सरकारी कार्यालये, शाळे, महाविद्यालयांमध्ये आपल्या देशाचा तिरंगा झेंडा फडकवला जातो झेंडावंदन करून आपल्या देशासाठी बलिदान दिलेल्या सर्वांचे आभार व्यक्त केले जाते व त्यांच्या कर्तृत्वाची जाणीव सर्वांना करून दिली जाते.

या दिवशी सर्व शाळा-महाविद्यालयांमध्ये 15 ऑगस्ट च्या निमित्ताने सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते व सर्वजण 15 ऑगस्ट या दिवसावर भाषण करतात. आजच्या या लेखाच्या माध्यमातून आम्ही 15 ऑगस्ट भाषण मराठी घेऊन आलो जे प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी खूपच फायद्याचे ठरेल.

चला तर मग पाहूया, 15 August speech in Marathi 15 ऑगस्ट भाषण मराठी

15 ऑगस्ट भाषण मराठी । 15 August Speech in Marathi

माझे सर्व आदरणीय अध्यापक व अध्यापिका, सर्व पालकवर्ग आणि माझे प्रिय विदयार्थी बंधू भगिनींनो माझ्या कडून सर्वांना स्वतंत्रता दिवसाच्या शुभेच्छा!!!!

जसे की आपण सर्वच जाणतो की स्वतंत्रता दिवस आपल्यासाठी किती अमुल्य आहे. आपण हे कधीच विसरू शकत नाही की आजच्या दिवशी आपला देश अन्याय कारी ब्रिटीश सरकारच्या गुलामगिरीतून मुक्त होवून स्वतंत्र राष्ट्राचे नागरिक बनलो होतो. आज आपण येथे स्वतंत्रता दिवसास साजरा करण्यास एकत्र आलो आहोत.

15 August Marathi Bhashan

मित्रांनो 15 ऑगस्ट चे नाव घेताच आपल्यासमोर आपल्या देशाचे स्वातंत्र्य दिन अडवाण येतो. या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक महान पुरुषांनी आपले प्राण गमावले व भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. 150 वर्षापेक्षा अधिक काळ आपल्या देशावर राज्य करणाऱ्या इंग्रजांच्या तावडीतून आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी मुक्त झाला. म्हणून पंधरा ऑगस्ट हा दिवस सर्व भारतीयांसाठी खूप महत्त्वपूर्ण आणि आनंदाचा दिवस आहे.

आज आपल्या देशाला स्वतंत्र होऊन 75 वर्षे पूर्ण व्हायला आली. आपल्या देशातील प्रत्येक व्यक्ती स्वतंत्रपणे आपल्या जीवनात जगू शकत आहे. पंधरा ऑगस्ट हा दिवस आनंदाचा गर्वाचा असा दिवस आहे. संपूर्ण देशा मध्ये पंधरा ऑगस्ट हा दिवस मोठ्या आनंदाने, उत्साहाने आणि जल्लोषात साजरा केला जातो.
आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आणि महान क्रांतिकारी शूरवीर आणि महान पुरुषांनी आपल्या प्राणाची पर्वा न करता इंग्रजांविरुद्ध लढा देऊन भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. आपला आजचा स्वतंत्र भारत देश हा अशा महान क्रांतीकारांची देण आहे.

सुभाषचंद्र बोस, भगतसिंग , राजगुरू ,सुखदेव, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस, चंद्रशेखर आझाद ,लाला लजपत राय, बाळ गंगाधर टिळक, सरदार वल्लभाई पटेल , डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा महान क्रांतीकारांनी भारताच्या स्वतंत्र लढाईमध्ये महत्त्वाची आणि प्रेरणादायी भूमिका बजावली. या सर्वांच्या बहुमूल्य योगदानामुळे आज आपला भारत देश स्वतंत्र भारत इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला.

” तिरंगी झेंडा फडफडे,
जय जय कार बोला
आज आहे 15 ऑगस्ट,
या दिवशी माझा भारत देश स्वतंत्र झाला”

15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले या दिवशी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दिल्ली येथील लाल किल्ला या ठिकाणी आपला भारताचा तिरंगा झेंडा फडकवला. या दिवशी आपलं संपूर्ण आयुष्य खूप आनंदामध्ये होता कारण आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाले होते. सर्व ठिकाणी आनंदाचे व उत्साहाचे वातावरण असून सर्वजण ध्वजारोहण करू लागले.

जबरदस्त तेव्हापासून आज पर्यंत दरवर्षी 15 ऑगस्ट या दिवशी संपूर्ण देशभरामध्ये स्वतंत्र दिन साजरा केला जातो.

परंतु आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला त्या संघर्षाचा विचार केला असता आपल्या शरीरातील रक्त संचारते. परंतु आपल्या देशातील महान पुरुषांच्या बलिदानामुळेच आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे.

आज स्वातंत्र्यतेनंतर भारत सर्वात मोठा लोकतांत्रिक देश आहे. या देशात विविधतेमधे एकता आहे. सर्व जाती, धर्म, पंथ, भाषा, वेश यांची विविधता असतानाही सर्व भारतीय आम्ही एक आहोत, हे मोठया उत्साहाने सांगतात. पारतंत्र्यात सामान्य माणसास सुंदर जिवन जगण्याचा शिक्षणाचा आणि आपल्या स्वातंत्र्यास उपभोगण्यास मनाई होती. ब्रिटीशांची वागणूक अत्यंत अमानुषतेची होती. ज्या वीर देशपुत्रांनी स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची आहूती दिली त्या विरपूत्रांना मी नमन करतो. त्यांच्या बलीदानासाठी आपण सर्व त्यांचे ऋणी आहोत. त्यांच्या कार्याची आठवण व्हावी यासाठी आपण दरवर्षी स्वतंत्रता दिन साजरा करतो.

देशभरातील सर्व शाळा, महाविद्यालय, कॉलेज आणि सार्वजनिक ठिकाण तसेच सरकारी कार्यालयांमध्ये स्वतंत्र दिन साजरा करून ध्वजारोहण करून आपल्या देशासाठी बलिदान देणाऱ्या महान पुरुषांच्या आठवण करून दिली जाते, त्यांच्यासमोर सर्वजण नतमस्तक होतात.

भारताचे स्वातंत्र्यतेचे स्वप्नं साकार झाले ते फक्त सर्व देशवासीयांच्या एक होवून इंग्रजांविरूध्द लढण्यामुळेच आपण आपला हक्क मिळवू शकलो. त्यामुळे आपणही आपले सर्व हेवेदावे विसरून एकतेच्या सूराने आपल्या देशांस विकासाच्या दिशेने जलद गतीने वाटचाल करावयास समर्थ असावे. धर्म, जातिभेद भावना मनातून काढून आपण सर्व भारतीय आहोत भारतात राहणारे सर्व एकमेकांचे बंधू आणि भगिनी आहोत असा विचार आमनामध्ये ठेवून सर्वांनी वाटचाल केली तर आपला भारत देश आज जगातील सर्वात शक्तिशाली देश होईल.

भारत माता आपणां सर्वांची मातृभूमी आहे. आपण या विशाल स्वतंत्र भारताचे नागरिक आहोत. आपल्या देशासमोर अनेक बिकट समस्या आहेत जसे की लोकसंख्या वाढ, जागतिक तापमान वाढ , वाढते प्रदूषण, वृक्षतोड, जातीभेद, कमी पर्जन्यमान. त्यामुळे त्या समस्यांना गंभीरपणे आणि एकतेच्या सूत्राने आपणांस समर्थपणे तोंड दयावे लागेल. सर्वजण मिळून अशा समस्यांना तोंड द्यावे लागेल तर नक्कीच एक दिवस आपल्या भारतातील सर्व समस्या नष्ट होतील व आपला भारत देश सुखी समाधानी होईल.

आपणां सर्वांना स्वातंत्र्यतेच्या खुप खुप शुभकामना. आशा करतो की आपला देश प्रत्येक क्षेत्रात आपला विकास साधून जगात आपला एक आदर्श स्थापीत करेल . . . जयहिन्द ! जयभारत !

मित्रांनो! आजच्या या आर्टिकल ला तुमच्या इतर मित्रांशी अवश्य शेअर करा जेणे करून त्यांना हि खूप सोप्या पद्धतीने हे माहिती वाचायला मदत होईल… आणि मित्रांनो हा लिखाण ” 15 ऑगस्ट भाषण मराठी । 15 August Speech in Marathi “ तुम्हाला कस वाटलं हे नक्की Comment द्यारे आम्हाला कळवा…

हे हि अवश्य वाचा :

Leave a Comment