सकाळी नाश्ता करण्याचे फायदे, सकाळी नाश्ता मध्ये काय खावे! । Benefits of Morning Breakfast in Marathi

Benefits of Morning Breakfast in Marathi आपण दिवसभरातून तीन वेळेस जेवत असतो परंतु यामधील सकाळी केलेले जेवण म्हणजे सकाळचा नाश्ता हा आपल्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरतो. सकाळी केलेला नाष्टा आपल्याला दिवसभरातील कामे करण्यासाठी ऊर्जा प्रदान करतो त्यामुळे सकाळचा नाश्ता हा आपल्या शरीराला योग्य प्रकारे निरोगी ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण असतो म्हणून म्हणतात सकाळी नाश्ता करावा!!!

परंतु आजच्या धावपळीच्या काळामध्ये कामाच्या ओझ्यापोटी व्यक्ती नाष्टा करायचे टाळतो, तर काहीजण वजन नियंत्रित करण्यासाठी सकाळचा नाष्टा टाळतात.

परंतु तसे करणे चुकीचे आहेत जर तुम्ही देखील तसे वागत असेल तर तुम्ही खूप मोठ्या आजारांना निमंत्रण देत आहात.

कारण सकाळचा नाष्टा आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. सकाळचा नाष्टाचे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदे आहेत आणि हेच फायदे आम्ही तुम्हाला आजच्या “Breakfast in the morning; सकाळी नाश्ता करण्याचे फायदे, सकाळी नाश्ता मध्ये काय खावे!” या लेखामध्ये सांगण्याचा प्रयत्न करत आहोत, या सोबतच सकाळचा नाश्ता मध्ये आपण काय खावे हे देखील सांगणार आहोत.

सकाळी नाश्ता करण्याचे फायदे, सकाळी नाश्ता मध्ये काय खावे! । Benefits of Morning Breakfast in Marathi

निरोगी राहण्यासाठी सकाळचा नाश्ता हा महत्त्वाचा असतो. सकाळच्या नाश्त्याची प्रत्येकाला फार गरज असते. कारण यातूनच तुम्हाला संपूर्ण दिवसभर काम करण्याची ऊर्जा मिळते.

त्यामुळे सकाळच्या नाश्त्याची प्रत्येकाला फार गरज असते. कारण यातूनच तुम्हाला संपूर्ण दिवसभर काम करण्याची ऊर्जा मिळते. त्यामुळे तुमचे शरीर दिवसभर ताजेतवाने राहते. सकाळच्या नाश्त्याला न्याहारी किंवा ब्रेकफास्टही म्हटले जाते. तज्ज्ञांच्या मते सकाळचा नाश्ता अधिक पौष्टिक असावा. यामुळे वजन नियंत्रित ठेवण्यासोबत शरीराला पर्याप्त प्रमाणात ऊर्जा मिळते.

सकाळी नाश्ता करण्याचे फायदे Benefits of Breakfast in Marathi

  1. तज्ञांच्या मते सकाळी केलेला नाश्ता हा मानवी शरीरासाठी खूप महत्वपूर्ण ठरतं.
  2. सकाळची न्याहारी आपल्याला दिवसभर काम करण्यासाठी ऊर्जा देते.
  3. सकाळी ब्रेकफास्ट केल्याने तुमच्या हृदयाचं आरोग्यही चांगलं राहतं. यामुळे तुमचं आयुष्यही वाढतं.
  4. जे लोक दररोज ब्रेकफास्ट करत नाहीत, त्यांचं वजन अधिक वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे वजन नियंत्रित ठेवण्याचे असेल तर सकाळचा नाष्टा जरूर करावा.
  5. शरिराला एनर्जी देण्यासाठी आणि अधिक एनर्जेटीक राहण्यासाठी ब्रेकफास्ट अत्यंत आवश्यक आहे.

सकाळचा नाश्ता मध्ये कोणत्या घटकांचा समावेश करावा?

सकाळचा नाश्ता हा आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे सकाळचा नाष्टा मध्ये पोस्टीक तत्त्व असलेल्या पदार्थांचा समावेश करावा.

सकाळच्या नाश्त्यात प्रथिने, खनिजे, जीवनसत्त्वे, तंतुमय पदार्थ, कबरेदके इत्यादी घटकांचा समावेश असावा.

– आपल्या आहारात तंतू असणं हे फक्त आरोग्यासाठीच नव्हे तर आजारांना लांब ठेवण्यासाठीही गरजेचं आहे. त्यामुळे सकाळचा नाश्ता मध्ये तंतूमय पदार्थांचा समावेश करावा.

– अंडी, मासे, दूध इत्यादी पदार्थात प्रथिनं असतात. उकडलेलं अंड किंवा अंडयातील चरबी नसलेले पदार्थ तुम्ही नाश्ता म्हणून खाऊ शकता.धान्यातून आणि संपूर्ण धान्याच्या ब्रेडमधूनही संमिश्र कार्बोदके मिळतात. त्यातून शरीराला आवश्यक पोषण मिळते. त्यामुळे सकाळच्या नेहाच्या मध्ये कडधान्याचा सामावेश करावा. जास्त करून मोड आलेले कडधान्य खावी.

– आपल्या शरीरासाठी पाणी फार गरजेचे आहेत. पाणी योग्य प्रमाणात, योग्य पद्धतीने, योग्य वेळी पिण्याचे फार महत्त्व आहेत. त्यामुळे दिवसभर भरपूर प्रमाणात पाणी घेतलं पाहिजे.

या सर्व घटनांचा सकाळचा नाश्ता मध्ये समाविष्ट केल्यास निरोगी जास्त मिळण्यास मदत होते.

सकाळी नाश्ता काय खावे?

मित्रांनो तुम्ही वर सांगितलेल्या सर्व घटकांचा समावेश सकाळचा नाश्ता मध्ये करू शकता. या व्यतिरिक्त आपल्या भारतीय संस्कृती मध्ये विविध प्रकारचा नाश्ता रेसिपी बटाट्याचे पराठे खाण्याची प्रथा आहे. बटाटा मध्ये देखील पौष्टिक घटक असतात तसेच गव्हाच्या पिठामध्ये हे पराठे बनवले जातात गहू देखील आपल्या आरोग्यासाठी उत्तम आहेत त्यामुळे सकाळचा नाश्ता मध्ये तुम्ही बटाटे पराठे खाऊ शकता.

इडली ही दक्षिण भारतातला आवडता पदार्थ आहे. आपल्या दिवसाच्या निरोगी सुरुवात करण्यासाठी तांदूळ किंवा रव्याऐवजी ओट्स वापरुन गरमागरम इडली बनवू शकता.

रवा उपमा हा एक लोकप्रिय दक्षिण भारतीय पदार्थ आहे. नाश्त्यामध्ये हे हलका आणि अतिशय चवदार डिश चांगला पर्याय आहे. जो आपल्या आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर आहे. हे रवा उपमा हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, चिरलेली कांदे किसलेले आले, मोहरी, जिरे आणि चणा डाळ घालून तयार केले जाते.

होय हा एक भारतीय लोकप्रिय पदार्थ आहे. पोहे नाष्टा मध्ये थोडे जड असते पण चवीला अतिशय स्वादिष्ट असते. पोहे मध्ये हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, चिरलेले कांदे, जिरे , मोहरी, शेंगदाणे या सर्व पदार्थांचा समावेश केला जातो त्यामुळे पोहे देखील नाश्त्यामध्ये खाऊ शकता.

मित्रांनो! आजच्या या आर्टिकल ला तुमच्या इतर मित्रांशी अवश्य शेअर करा जेणे करून त्यांना हि खूप सोप्या पद्धतीने हे माहिती वाचायला मदत होईल… आणि मित्रांनो हा लिखाण ” सकाळी नाश्ता करण्याचे फायदे, सकाळी नाश्ता मध्ये काय खावे! । Benefits of Morning Breakfast in Marathi “ तुम्हाला कस वाटलं हे नक्की Comment द्यारे आम्हाला कळवा…

हे हि अवश्य वाचा :

Leave a Comment