Cibil Information in Marathi मित्रांनो जर तुम्ही क्रेडीट कार्ड वापरत असाल तर तुम्ही CIBIL बद्दल नक्कीच ऐकले असेल. याव्यतिरिक्त काही व्यक्ती बँकेमध्ये लोन मागण्यासाठी जात असतील तर त्यांनी देखील सिबिल बद्दल लेक हीच ऐकले असेल. चांगला क्रेडिट स्कोर मिळवण्यासाठी सिबिल खूप महत्त्वपूर्ण ठरतो.
क्रेडिट रेटिंग एजन्सी अनुसार भारतामध्ये 2000 सालापासून CIBIL vची सुरुवात करण्यात आली. सिबिल स्कोर हा कोणत्याही बँकेच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा असतो. तसेच आर्थिक व्यवहार करणारे क्रेडिट कार्ड चा वापर करणारे प्रत्येक सामान्य व्यक्ती साठी देखील सिबिल स्कोर खूप महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला सिबिल स्कोर म्हणजे काय माहिती असणे खूप आवश्यक आहे.
सिबिल स्कोर म्हणजे काय? । Cibil Mhanje Kay? Cibil Information in Marathi
मित्रांनो तुम्हाला देखील कधीनाकधी भविष्यामध्ये लोनची आवशक्यता भासू शकते किंवा क्रेडिट कार्ड ची गरज भासू शकते त्यामुळे सिबिल बद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला माहिती असून खूप गरजेचे आहे. म्हणून आजच्या लेखाच्या माध्यमातून आम्ही सिबिल स्कोर म्हणजे काय? घेऊन आलो जेणेकरून करून सर्वसामान्य जनतेला देखील सिबिल म्हणजे काय हे समजले जाईल.
चला तर मित्रानो मग पाहूया, Cibil Score म्हणजे काय? । Cibil Information in Marathi
सिबिल म्हणजे काय । Cibil Score Mhanje Kay
मित्रांनो सिबिल स्कोर म्हणजे काय? हे जाणून घेण्यापूर्वी आपण सिविल चा फुल फॉर्म किंवा सिबिल ला मराठी मध्ये काय म्हणतात हे पाहूया.
सिबिल ला मराठी मध्ये काय म्हणतात । CIBIL full form in Marathi
मित्रांनो सिबिल चा फुल फॉर्म ” credit information bureau of Indian limited” असा होतो. म्हणजे मराठीमध्ये CIBIL ला ” क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो ऑफ इंडिया लिमिटेड” असे म्हणतात.
सिबिल स्कोर म्हणजे काय? What is CIBIL score in Marathi
मित्रांनो सिबिल स्कोर हा तुमच्या क्रेडिट कार्डशी संबंधित असतात सिबिल स्कोअर द्वारे आपल्या क्रेडिट कार्डची हिस्टरी दर्शवते. सिबिल स्कोर हा 300 ते 900 च्या दरम्यान गणला जातो.
300 हा सर्वात कमी सिबिल स्कोर असतो तर 900 हा सर्वात जास्त CIBIL स्कोर असतो.
CIBIL स्कोर हा 3 डिजिट नंबर असतो जो आपल्या क्रेडिट कार्डची हिस्टरी दर्शवतो जर आपल्या क्रेडिट कार्ड ची हिस्ट्री चांगली आणि आणि तुम्ही कर्जाची (Loan) परतफेड किंवा क्रेडिट कार्ड (Credit Card) पेमेंट योग्य वेळेत करत आहात. बँकिंग किंवा वित्तीय संस्थांमध्ये सिबिल स्कोअरला खूपच महत्व आहे.
थोडक्यात सांगायचे म्हणजे, सिबिल स्कोरमुळे बँकेला कळते कि आपण जे लोन मागत आहोत ते परत करण्याची आपली योग्यता आहे कि नाही. बँक लोन देण्या अगोदर आपला सिबिल स्कोर बघते आणि मग आपल्या सिबिल स्कोरच्या आधारावर लोन द्यायचे कि नाही हे ठरवते. लोनच्या दृष्टिकोनातून सिबिल स्कोर ला अत्यंत महत्त्वाचे स्थान दिले जाते जर आपल्याला सिबिल स्कोअर चांगला असेल तरच आपल्याला लोन दिले जाते.
चांगला सिबिल स्कोर किती असायला हवा?
आता तुम्हालाच सिबिल स्कोर म्हणजे काय? हे कळाले असेल परंतु सिबिल स्कोर हा किती असायला हवा? किंवा चांगला सिबिल स्कोर किती असायला हवा? हा प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये पडला असेल. त्याचे उत्तर आता आम्ही तुम्हाला देणार आहोत.
सरासरी ७५० इतका सिबिल स्कोअर हा चांगला असल्याचं मानलं जातं आणि वैयक्तिक कर्ज किंवा क्रेडिट कार्डसाठी पात्र ठरवण्यास आपली मदत करतो. जर आपला सिबिल स्कोअर ७५० पेक्षा कमी असेल तर आपल्याला बँका किंवा एनबीएफसी यांच्याकडून कर्ज घेण्यास अडचणी येतात. तुम्ही कर्ज घेत असताना बँका किंवा वित्तीय संस्था तुमचा सिबिल स्कोअर आधी तपासतात.
तरीदेखील जाणून घ्या सिबिल स्कोअर कसा असायला हवा आणि कमी सिबिल स्कोर असेल तर काय नुकसान होऊ शकते.
1. 300 च्या खाली सिबिल स्कोर असल्यास :
जर तुमचा सिबिल स्कोर तीनशे पेक्षा कमी असेल तर बँकांकडून तुम्हाला लोन मिळणार नाही. तुम्ही लोन देण्यास पात्र नाही असे समजले जाते.
2. 300 आणि 450 च्या दरम्यान सिबिल स्कोर असल्यास :
जर तुमचा सिबिल स्कोर 300 आणि 450 च्या दरम्यान असेल तर तो अगोदर पेक्षा जरा ठीक किंवा योग्य समजला जातो. तरी देखील तुम्ही लोन देण्यास काही प्रमाणात पात्र ठरले जात नाही. त्यामुळे तुम्हाला तुमचा सिबिल स्कोर सुधारावा लागेल त्याकरिता तुमची ईएमआय वेळेत देत चला जेणेकरून तुमचा सिबिल स्कोर सुधारेल.
3. 450 ते 600 च्या दरम्यान सिबिल स्कोर असल्यास :
जर तुमचा सिबिल स्कोर साडेचारशे ते सहाशे च्या दरम्यान असेल तर तो सर्वसामान्य सिबिल स्कोर असा समजला जातो. अशा सिबिल स्कोर असलेल्या व्यक्तींना बँकांकडून लोन दिले जाते किंवा काही वेळा दिले देखील जात नाही. जर तुम्हाला क्रेडिट कार्ड मिळाले तर त्याचे लिमिट फार कमी असते.
4. 600 ते 750 च्या दरम्यान सिबिल स्कोर असल्यास :
जर तुमचा सिबिल स्कोर 600 ते 750 च्या दरम्यान असेल तर तो चांगला सिबिल स्कोर समजला जातो. असा सिबिल स्कोर असणाऱ्या व्यक्तींना जवळजवळ सर्वच बँका कर्ज देखील देतील आणि क्रेडिट कार्ड देखील देते. परंतु तुम्हाला खूप मोठ्या अमाऊंट मध्ये कर्ज पाहिजे असेल अशा वेळी बँक खाते कर्ज देतीलच हे शक्य नाही.
5. 750 ते 900 च्या दरम्यान सिबिल स्कोर असल्यास :
जर तुमचा सिबिल स्कोर साडेसातशे ते 900 च्या दरम्यान असे याचा अर्थ तुम्ही तुमचा Financial ट्रॅक रेकॉर्ड चांगल्या प्रकारे maintain केला आहे. अशा वेळेस तुम्हाला कोणती हि बँक मोठ्या प्रमाणात लोन द्यायला तयार होते.
तुम्हाला क्रेडिट कार्डची जास्त लिमिट देखील मिळेल या सोबत चांगले कॅशबॅक आणि ऑफर्स देखील मिळतील.
Online CIBIL स्कोर कसा चेक करायचा ?
मित्रांनो जर तुम्हाला तुमचा सिबिल स्कोर ऑनलाईन पद्धतीने चेक करायचा असेल तर तुम्ही खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा.
1. सर्वप्रथम तुम्हाला Free CIBIL Score चेक करायचा असे तर www.cibil.com/freecibilscore या वेबसाईट वर जावे लागेल.
2. वेबसाईट वर आल्या नंतर तुम्हाला तिथे एक फॉर्म दिसेल तो फॉर्म तुम्हाला भरायचा आहे. फॉर्ममध्ये तुम्हाला साधारण माहिती म्हणजेच नाव, पत्ता, फोन नंबर, आयडी प्रूफ या सारखी माहिती भरायची आहे. जी माहिती भराल ती योग्य भरा अन्यथा तुमचा सिबिल स्कोर दिसणार नाही.
3. त्यानंतर तुम्हाला काही प्रश्न विचारले जातील त्या प्रश्नांची योग्य उत्तरे देणे अनिवार्य आहे. हे प्रश्न तुमच्या लोन विषयी किंवा क्रेडिट कार्डशी रिलेटेड असू शकतात. मग तुमचा सिबिल स्कोर मोजला जाईल आणि त्याची रिपोर्ट तयार केली जाईल.
4. तुम्ही तुमची सर्व माहिती नीट भरल्यास तुम्हाला सिबिल स्कोर व सिबिल रिपोर्ट मिळेल.
सिबिल स्कोर मिळाला म्हणजे झाले असे नाही. तुम्हाला तुमच्या सिबिल रिपोर्टमध्ये येणारे Up आणि Down पाहावे लागतात. कारण क्रेडिट एजेन्सी, बँक आणि वित्तीय संस्था प्रत्येक महिन्याला रिपोर्ट Renew करत असतात. म्हणून सिबिल स्कोर कायम चेक करणे गरजेचे आहे.
सिबिलची वेबसाईट आपल्याला केवळ एकदाच फ्री मध्ये सिबिल स्कोर चेक करण्याची परवानगी देते. सिबिल स्कोर विषयी नेहमी रिपोर्ट पाहायचा असल्यास तुम्हाला याचे Paid Subscription घ्यावे लागेल.
सिबिल स्कोअर कसा सुधारावा किंवा सिबिल स्कोर सुधारण्यासाठी काही टिप्स :
मित्रांनो जर तुमचा सिबिल स्कोर खूप कमी आहे किंवा सर्वसामान्य आहे व तुम्हाला तुमचा सिबिल स्कोअर सुधरवायचा आहे तर तो मी खालील काही टिप्स फॉलो करू शकता.
1. आपल्या सिबिल स्कोअरचे परीक्षण करा :
सर्वप्रथम तुम्ही तुमच्या सिबिल स्कोर चे परिक्षण करा जर तुमचा सिबिल स्कोअर हा चांगला असल्यास तुम्हाला आवश्यक असलेले कर्ज मंजुर होण्यास मदत होते. सिबिल स्कोअर हा तुमच्या क्रेडिट स्थितीबद्दल माहिती दर्शवतो. तुम्हाला आपल्या सिबिल स्कोअरे परीक्षण करु इच्छित असल्यास तुम्ही तो तपासून घेऊ शकता.
2. आपल्या क्रेडिट स्कोअरचे पुनरावलोकन करा :
आपल्या क्रेडिट अहवालात त्रुटी मुक्त राहण्यासाठी नियमित स्कोअरचे परीक्षण केले पाहिजे. जर आपल्याला रिपोर्टमध्ये काही चूक आढळली तर त्याचे पुनरावलोकन वेळेत दुरुस्त करावे.
3. मर्यादित वापर :
आपल्या क्रेडिट मर्यादेपेक्षा जास्त खर्च करु नये आणि त्याची खात्री करुन घ्यावी. जर तुम्हाला सिबिल स्कोअर ७५० पर्यंत ठेवायचा असेल तर आपल्या क्रेडिट कार्ड मर्यादेच्या ५० टक्क्यांहून अधिक खर्च करणे टाळा.
4. वेळेवर देयके :
चांगला सिबिल स्कोअर ठेवण्यासाठी वेळेवर कर्जाचे किंवा क्रेडिट कार्डचे हफ्ते भरा. उशीरा पेमेंट टाळा. अन्यथा त्याचा परिणाम तुमच्या सिबिल स्कोअरवर होतो.
मित्रांनो! आजच्या या आर्टिकल ला तुमच्या इतर मित्रांशी अवश्य शेअर करा जेणे करून त्यांना हि खूप सोप्या पद्धतीने हे माहिती वाचायला मदत होईल… आणि मित्रांनो हा लिखाण ” सिबिल स्कोर म्हणजे काय? । Cibil Mhanje Kay? Cibil Information in Marathi “ तुम्हाला कस वाटलं हे नक्की Comment द्यारे आम्हाला कळवा…
हे हि अवश्य वाचा :
- डेबिट कार्ड म्हणजे काय? । Debit Card Information in Marathi
- व्याकरण : समास व समासाचे प्रकार । Samas in Marathi
- गोपाल हरी देशमुख माहिती मराठी । Gopal Hari Deshmukh Information in Marathi
- जात वैधता प्रमाणपत्र माहिती । Caste Validity Documents in Marathi
- कॅप्चा म्हणजे काय? आणि कॅप्चा कशासाठी असतो? । CAPTCHA Meaning in Marathi