जात वैधता प्रमाणपत्र माहिती । Caste Validity Documents in Marathi

Caste Validity Documents in Marathi कास्ट व्हॅलेडीटी म्हणजे काय जात वैधता प्रमाणपत्र. हे प्रमाणपत्र प्रत्येक विद्यार्थ्यांकडे असणे खूप आवश्यक आहे. शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना post graduation डिग्री करण्यासाठी या प्रमाणपत्राची आवश्यकता भासते. त्यासाठी कास्ट व्हॅलेडीटी प्रत्येकाकडे असणे आवश्यक आहे तसेच कास्ट व्हॅलेडीटी या प्रमाणपत्राची आपले जातीचे पडताळणी देखील होत असते.

त्यामुळे कास्ट validity हे डॉक्युमेंट अतिशय अशक्य आहे. आजच्या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला कास्ट व्हॅलिडीटी डॉक्युमेंट काढण्यासाठी आवश्यक असणारे कागदपत्रांची यादी घेऊन आलोय.
आम्हाला आशा आहे की, जात वैधता प्रमाणपत्र माहिती । Caste Validity Documents in Marathi हा लेख तुम्हाला कास्ट व्हॅलिडीटी काढण्यासाठी नक्कीच फायद्याचा ठरू शकतो.

जात वैधता प्रमाणपत्र माहिती । Caste Validity Documents in Marathi

मित्रांनो कास्ट व्हॅलिडीटी या प्रमाणपत्र विषयी सर्वांनी ऐकली असेल परंतु या टाकण्याची शक्यता का पडते आणि हे डॉक्युमेंट कोणत्या जातीसाठी आवशक्य आहे हेदेखील माहिती असणे गरजेचे आहे.

जात वैधता प्रमाणपत्राची आवश्यकता :

अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी आरक्षित असलेल्या जागेवर प्रवेश घेण्यासाठी, जातीच्या दाखल्याबरोबरच जात वैधता प्रमाणपत्राची मागणी विविध शैक्षणिक संस्थांकडून करण्यात येत आहे. त्या अनुरोधाने मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी प्रवेशापासून वंचित राहू नये म्हणून, त्यांनी जातीचा दाखला प्राप्त झाल्याबरोबर जात वैधता प्रमाणपत्र ( Caste Validity Certificate ) प्राप्त करुन घेणे आवश्यक आहे.

जात पडताळणी प्रमाणपत्र/जात वैधता प्रमाणपत्र ( Caste Validity Certificate ) प्राप्त करुन घेण्यासाठी महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांची स्थापना करण्यात आलेली आहे. देखील तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी जात प्रमाणपत्र पडताळणी समित्या कडे जाऊन सहजरीत्या तुमची कास्ट व्हॅलेडीटी हे डॉक्युमेंट्स काढू शकता.

या समितीकडे अर्जदाराने आरक्षणाचा/ मागासवर्गींयांसाठी राखीव असलेल्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आपल्या जातीच्या दाखल्याची पडताळणी करुन, तसे पडताळणी प्रमाणपत्र/वैधता प्रमाणपत्र संबंधित जिल्ह्याच्या समितीकडून प्राप्त करुन घेण्यासाठी, आपला प्रस्ताव जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे सादर करण्याची आवश्यकता आहे.

मित्रांनो आता तुम्हाला कळाले असेलच की, जात वैधता प्रमाणपत्राची आवश्यकता काय आहे आता आपण जात वैधता प्रमाणपत्र काढण्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची यादी पाहूया.

जात वैधता प्रमाणपत्र काढण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची यादी :

कास्ट व्हॅलेडीटी म्हणजे जातवैधता प्रमाणपत्र हे एक खूप आवशक्य डॉक्युमेंट आहे म्हणजे प्रत्येक अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास वर्ग च्या विद्यार्थ्यांन कडे असणे आवश्यक आहे.

जात वैधता प्रमाणपत्र काढण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्राची यादी पुढील प्रमाणे-

अ) जात वैधता प्रमाणपत्र काढण्यासाठी प्राथमिक आवश्यक पुरावे :

 1. स्पोर्ट साईज फोटो एक (बोनाफाईट करिता)
 2. अर्जदाराच्या प्रवेशाचे DTE यांचे Allotment/ Inst. Confirmation letter
 3. अर्जदाराचे प्राथमिक शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र
 4. अर्जदाराच्या जन्माचा दाखला
 5. अर्जदाराच्या जातीचा दाखला
 6. अर्जदाराचे वडील चुलते, आत्या, आजोबा, पंजोबा, खापर पणजोबा, त्यांचे प्राथमिक शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र.
 7. अर्जदाराचे वडील चुलते, आत्या, आजोबा, पंजोबा, खापर पणजोबा, यांच्यापैकी एकाचे जरी जाचक प्रमाणपत्र असल्यास त्याची प्रत जोडावी.
 8. जर अर्जदाराच्या रक्ताच्या नातेवाईकांची जात वैधता प्रमाणपत्राची पडताळणी झाली असेल तर त्यांच्या जात वैधता प्रमाणपत्राची प्रत अवश्य जोडावी.
 9. वंशावळीचे शपथपत्र मूळ प्रत ( रु 100 च्या बॉंडपेपरवर )
 10. नाव व जातीचा उल्लेख असलेले गाव नोंदवही नमुना क्र.14 चा उतारा.

ब) जात वैधता प्रमाणपत्र काढण्यासाठी दूय्यम आवश्यक ते पुरावे :

मित्रांनो जर तुमच्याकडे जात प्रमाणपत्र काढण्यासाठी प्राथमिक आवश्यक ते पुरावे असतील तर तुम्ही दुय्यम फक्त पुरावेदेखील जोडू शकता.

 1. वडील /काका /आत्या/ आजोबा शिक्षित असल्यास त्यांचा जन्म मृत्यू नोंदवही चा उतारा ( त्यालाच गाव नमुना 14 असे म्हणतात.) व हा दाखला तुम्हाला तहसिलदारांकडून सहजरीत्या प्राप्त होते. जर हा लागला तुमच्याकडे नसेल तर इतर कोणताही दाखला तुम्ही देऊ शकता जा म्हणजे तुमच्या जातीचा उल्लेख केलेला असेल.
 2. अर्जदाराच्या जात प्रमाणपत्राच्या दाव्या पुष्ट्यर्थ अन्य कोणतेही संबंधित पुरावे /दस्तावेज चालतील. पुरावे जोडण्या संबंधित महत्वाची सूचना :
 3. इतर मागास (OBC) प्रवर्गासाठी सन 1967 पूर्वीचे पुरावे जोडावे.
 4. कोणती जाती साठी सन 1920 पूर्वीचे आणि सन 1967 च्या आतले पुरावे जोडावेत.
 5. अनुसूचित (SC) जाती साठी सन 1950 पूर्वीचे पुरावे जोडावे.
 6. विमुक्त जाती भटक्या जमाती (Ch/NT) संबंधित 1961 पूर्वीचे पुरावे जोडावे.
 7. विशेष मागास (SBC) प्रवर्गासाठी सन 1995 पूर्वीचे पुरावे जोडावे.

अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्गासाठी शैक्षणिक, सेवा विषयक व इतर लाभासाठी विहीत केलेल्या आरक्षणाचा लाभ घेण्याकरिता उमेदवारानी वरीलप्रमाणै आवश्यक पुरावे प्राप्त करुन आपल्या प्रस्तावासोबत सादर करावेत.

मित्रांनो! आजच्या या आर्टिकल ला तुमच्या इतर मित्रांशी अवश्य शेअर करा जेणे करून त्यांना हि खूप सोप्या पद्धतीने हे माहिती वाचायला मदत होईल… आणि मित्रांनो हा लिखाण ” जात वैधता प्रमाणपत्र माहिती । Caste Validity Documents in Marathi “ तुम्हाला कस वाटलं हे नक्की Comment द्यारे आम्हाला कळवा…

हे हि अवश्य वाचा :

Leave a Comment