कॅप्चा म्हणजे काय? आणि कॅप्चा कशासाठी असतो? । CAPTCHA Meaning in Marathi

CAPTCHA Meaning in Marathi नमस्कार मित्रांनो, तुम्ही कधी ना कधी आणि कोठे ना कोठे त्याच्याबद्दल ऐकले असेल किंवा प्रत्यक्ष स्वरूपाने कॅप्चा कोड पाहिला देखील असेल. जर तुम्ही इंटरनेटच्या साह्याने ऑनलाइन काही वेबसाइट किंवा ॲप साइन इन करणे अगोदर तुम्हाला कॅप्चा कोड विचारला जातो. आणि आपण तो व्यवस्थितरीत्या भरतो देखील परंतु तुम्ही कधी विचार केलाय का CAPTCHA code नक्की असतं तरी काय? किंवा कॅप्चा म्हणजे काय?

मित्रांनो, जर तुम्हाला कॅप्चा म्हणजे काय? आणि कशासाठी वापरतात हे माहिती नसेल तर आजच्या या लेखांच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला CAPTCHA संबंधित संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत.
हा तर माग पाहूया, CAPTCHA Mhanje Kay? Ani Kasha Sathi Vaprtat । कॅप्चा म्हणजे काय?

कॅप्चा म्हणजे काय? आणि कॅप्चा कशा साठी असतो? Captcha Meaning in Marathi

मित्रांनो, आपण एखाद्या वेबसाईटवर किंवा ॲप वर नवीन अकाउंट चालू करत असताना सगळी माहिती भरून झाल्यावर तो फार्म किंवा माहिती सबमिट करायच्या आधी एक कॅप्चा (CAPTCHA) भरावा लागतो. CAPTCHA हा काहीही असू शकतो. Captcha code मध्ये वेगवेगळे आकडे, अक्षरे किंवा विशिष्ट प्रकारच्या इमेजेस असतात. जेव्हा आपण फॉर्म सबमिट करत असतो तेव्हा त्याच्या कोड मध्ये दिलेली वेगवेगळे आकडे अक्षरे किंवा सांगितलेल्या इमेजेस सिलेक्ट करावा लागतात. जेव्हा आपण ही प्रोसेस पूर्ण करतो तेव्हा आपला फॉर्म सबमिट होतो.

पण हे सगळं आपल्याकडून कशासाठी करून घेतलं जातं? याचा कोणी विचार केला आहे का? जरी नसेल तर आजच्या या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला कॅप्चा कोड बद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहोत.
चला तर मग जाणून घेऊया CAPTCHA Mhanje Kay? Ani Kasha Sathi Vaprtat यापाठीमागचं रहस्य.

कॅप्चा चा फुल फॉर्म मराठी । Captcha full form in Marathi

मित्रानो CAPTCHA कोड म्हणजे काय आणि कशासाठी वापरतात हे जाणून घ्यायच्या अगोदर आपण CAPTCHA फुलफॉर्म पाहूया.

CAPTCHA म्हणजे ” Completely Automated Public Turing test to tell Computers and Human Apart “ हे CAPTCHA संक्षिप्त रूप आहे.

तर कॅप्चा चा मराठी मध्ये अर्थ ” कॉम्प्युटर आणि मानव वेगळे सांगण्यासाठी पूर्णपणे स्वयंचलित सार्वजनिक ट्यूरिंग चाचणी “ असा होतो.

कॅप्चा म्हणजे काय?

मित्रांनो, CAPTCHA म्हणजे ” Completely Automated Public Turing test to tell Computers and Human Apart “ हे CAPTCHA संक्षिप्त रूप आहे.

CAPTCHA वापर करण्यामागचे खास कारण म्हणजे मनुष्य आणि यंत्रमानव ( Humans and Robots ) यातील फरक ओळखता यावा म्हणून.

Captcha Meaning in Marathi

जेव्हा एखादा व्यक्ती कॉम्प्युटरवर बसून एखादी वेबसाइट किंवा साइन इन करत असेल किंवा एखादा फॉर्म सबमिट करत असेल तेव्हा तो फॉर्म स्वतः व्यक्ती भरत आहे का यंत्रमानव हे ओळखणे कम्प्युटर मला खूप अवघड जाते. म्हणून कॅप्चा चा वापर केला जातो.

जेव्हा आपण त्या CAPTCHA च्या माध्यमातून वेडीवाकडी अक्षरे अंक किंवा इमेजेस सिलेक्ट करतो, जसे कि खालील Image दिलेली आहे.

तेव्हा कॉम्प्युटरला ते ओळखणे खूपच सोपे जाते परंतु कॅप्चा येण्याआधी हे ओळखणं खूप कठीण होत कि कॉम्पुटर हा मनुष्य स्वतः चालवतो आहे कि एका विशिष्ट कोड देऊन तो चालविला जात आहे. कारण यात धोका असा होता कि तुम्ही कॉम्पुटरला एक विशिष्ट कोड किंवा स्क्रिप्ट कोणतेही काम करायला लावू शकत होता अन तेही वेबसाईटला न कळवता.

समजा तुम्हाला एखाद्या परीक्षेचा फॉर्म भरायचा आहे पण साईट ओपन झाल्यावर आपल्याला तो फॉर्म भरण्यासाठी २-३ मिनटं लागतात. पण जर का आपण तसे कॉम्पुटर कोडिंग दिले तर ते १०-१५ सेकांदामध्ये होऊ शकते. म्हणजेच तुम्ही काही क्षणात सगळेच फॉर्म भरून सीट्स एकदम बुक करू शकता त्यामुळे दुसऱ्या विद्यार्थ्यांना त्या सीट्स मिळतच नाहीत. मग या अशा प्रकाराला आळा घालण्यासाठी CAPTCHA ची निर्मितीकरण्यात आली.

CAPTCHA मध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे फोटो, निरनिराळे शब्द, संख्या इत्यादी दाखवण्यात येतं जे फक्त आपणच वाचू शकतो किंवा समजू शकतो. कॉम्पुटरला या गोष्टी समजत नाहीत. कालांतराने गुगलने I’m Not a Robot नावाचा कॅप्चा आणला ज्यामध्ये आपल्या फक्त एक टिकमार्क करावी लागते, यामुळे आपण रोबोट नाही असं सिद्ध होतं.

I’m Not a Robot

सध्या मार्केट अशा बऱ्याचशा कम्पन्या आहेत ज्या कॅप्चाची सुविधा पुरवतात. गुगल, फेसबुक यासारख्या कम्पन्या मात्र स्वतःचे कॅप्चा वापरतात.

मित्रांनो आता तुम्हाला CAPTCHA म्हणजे काय आहे? कळालेच असेलच आता आपण त्याचा इतिहास पाहू या.

CAPTCHA चं इतिहास । History of CAPTCHA Code in Marathi

सगळ्यात पहिल्यांदा कॅप्चाचा वापर अल्टाव्हिस्टा या वेबसाईटने १९९७ साली केला. कॅप्चाच्या वापरामुळे अल्टाव्हिस्टा वेबसाईटचा स्पॅमचा ९५ टक्के त्रास कमी झाला. या वेड्यावाकड्या अक्षरांना कॅप्चा हे नावसुद्धा २००० साली मिळाले.

कॅप्चा हा एक प्रोग्राम आहे. तो आॅनलाईन टेस्ट घेत असतो. म्हणजे जो यूजर एखाद्या वेबसाईटवर साईन अप किंवा रजिस्ट्रेशन करतो, त्यावेळी हा प्रोग्राम त्याला काही वेडीवाकडी अक्षरे दाखवतो आणि ती अक्षरे दुसऱ्या बॉक्समध्ये ओळखून लिहावे लागतात.

CAPTCHA कशासाठी वापरतात?

मित्रानो आता तुम्हाला CAPTCHA म्हणजे काय आणि त्याचा इतिहास देखील काळला आहे. आता आपण captcha कशासाठी वापरतात हे पाहूया.

CAPTCHA ला एक सुरक्षित कोड म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. कॅप्चा हा एक प्रोग्राम आहे. CAPTCHA Online टेस्ट घेत असतो. म्हणजे जो यूजर एखाद्या वेबसाईटवर साईन अप किंवा रजिस्ट्रेशन करतो, त्यावेळी हा प्रोग्राम त्याला काही वेडीवाकडी अक्षरे, अंक किंवा विशिष्ट इमेजेस दाखवतो आणि ती अक्षरे किंवा अंक दुसऱ्या बॉक्समध्ये ओळखून लिहावे लागतात. तर captcha कोडा हा इमेजेस च्या स्वरूपात असेल तर सांगितलेली इमेजेस आपल्याला सिलेक्ट करावे लागतात. कॅप्चा ही वेबसाईट सिक्युरिटीसाठी वापरली जाते.  म्हणजेच सिक्युरिटी च्या दृष्टिकोनातून कॅप्चा कोड हा अतिशय महत्त्वाचा मानला जातो.

1. डिक्शनरी अ‍ॅटॅक टाळण्यासाठी :

डिक्शनरी अ‍ॅटॅक हा पासवर्ड हॅक करण्याचा एक प्रकार असतो, त्यामुळे जेव्हा तुम्ही एखाद्या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करता किंवा पासवर्ड बदलता त्यावेळी कॅप्चाचा वापर केला जातो; जेणेकरून तुमचा पासवर्ड सुरक्षित राहतो.

2. सुरक्षिततेसाठी कॅप्चा कोड वापरतात :

जर तुम्ही एखाद्या वेबसाईटमध्ये रजिस्ट्रेशन करता किंवा पासवर्ड बदलता त्यावेळी कम्प्युटरला कळण्यासाठी की हे Work स्वतः मनुष्य करत आहे, म्हणून CAPTCHA चा कोड वापरतात.

3. वेबसाईटवर बोगस रजिस्ट्रेशन टाळण्यासाठी :

अनेक वेबसाईटवर मोफत रजिस्ट्रेशन उपलब्ध असते. अशा वेळी बॉटस् या व्हायरसचा वापर करून बोगस रजिस्ट्रेशन अशा वेबसाईट्सवर केल्या जाऊ शकते. तेव्हा हे बोगस रजिस्ट्रेशन टाळण्यासाठी कॅप्चाचा वापर केला जातो; कारण अजून तरी कॅप्चा वाचता येईल असा प्रोग्राम किंवा व्हायरस बनविण्यात फारसे यश आलेले नाही. त्यामुळे बॉटससारख्या व्हायरसला कॅप्चा वाचता येत नसल्यामुळे बोगस रजिस्ट्रेशन बऱ्यापैकी थांबविणे शक्य झाले आहे.

CAPTCHA चे फायदे । Advantages of Captcha in Marathi

  1. सुरक्षा वाढवते.
  2. स्पॅम कमी करते.
  3. ऑनलाइन क्रियाकलाप अधिक सुरक्षित बनवते.
  4. मानवी आणि संगणकांमध्ये फरक करते.

मित्रांनो! आजच्या या आर्टिकल ला तुमच्या इतर मित्रांशी अवश्य शेअर करा जेणे करून त्यांना हि खूप सोप्या पद्धतीने हे माहिती वाचायला मदत होईल… आणि मित्रांनो हा लिखाण ” कॅप्चा म्हणजे काय? आणि कॅप्चा कशा साठी असतो? CAPTCHA Meaning in Marathi “ तुम्हाला कस वाटलं हे नक्की Comment द्यारे आम्हाला कळवा…

हे हि अवश्य वाचा :

Leave a Comment