मानवी जीवनातील विनोदाचे स्थान । Manavi Jivnatil Vinodache Sthan in Marathi

Manavi Jivnatil Vinodache Sthan in Marathi मित्रांनो शालेय विद्यार्थ्यांना मानवी जीवनातील विनोदाचे स्थान या विषयावर परीक्षेमध्ये किंवा शाळेमध्ये निबंध विचारला जातो. म्हणून या लेखाच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांसाठी मानवी जीवनातील विनोदाचे स्थान मराठी निबंध घेऊन आलोत.

जेणेकरून विद्यार्थ्यांना मदत होईल तसेच आपल्या जीवनात विनोदाचे काय स्थान आहे? विनोद आपल्यासाठी किती महत्त्वपूर्ण आहे हे देखील समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

चला तर मग पाहूया, मानवी जीवनातील विनोदाचे स्थान Manavi Jivnatil vinodache Stan

मानवी जीवनातील विनोदाचे स्थान । Manavi Jivnatil Vinodache Sthan in Marathi

देवाने माणसाला ज्या देणग्या दिल्या आहेत त्यातील हास्य एक मौल्यवान देणगी आहे. प्रत्येक व्यक्ती हा विनोदा शिवाय अपूर्ण आहे कारण कदाचित श्रेष्ठता ही केवळ शब्दात सांगता येणार नाही. हास्य ही माणसाची एक प्रकारची प्रवृत्ती आहे. हासून माणूस आपले विचार आणि भावना तसेच व्यक्त करतो. माणसाला आपल्या दुःखाचा निचरा करण्यासाठी हस्य हा रामबाण उपाय सापडला आहे.

पृथ्वीतलावरील सर्वात बुद्धिमान प्राणी माणसाला म्हटले जाते कारण माणसाकडे अशा काही भावना आहेत ज्या इतर कोणत्याही प्राण्याकडे नाहीत त्यामध्ये हास्य देखील शामील झाले आहे. म्हणून माणसाची व्याख्या” हासणारा प्राणी” म्हणून केली तरी देखील चूकीची ठरणार नाही. आणि हे हास्य निर्माण होते ते केवळ विनोद मुळेच त्यामुळे मानवी जीवनातील विनोदाचे स्थान हे खूप महत्वपूर्ण आहे. मानवी जीवनात विनोदाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले.

ज्याप्रमाणे माशाला जगण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते त्या प्रामाणेच माणसाला आपले जीवन जगण्यासाठी कोठे ना कोठे विनोद खूप खूप गरजेचा आहे. म्हणूनच आचार्य अत्रे म्हणतात की, “विनोद हा जीवनातील असंख्य दुःखांवरचा जालीम इलाज आहे ”, “’ विनोद ही साहित्यातील अहिंसा आहे, ” 

मानवी जीवन म्हणजे सुद्धा एक तारेवरची कसरत असते. ‘ सुख पाहता जीवा पडे। दुःख पर्वताएवढे।। संत तुकारामांनी मानवी जीवनात वर्णन केले आहे. या पर्वताएवढे दुःखा खाली चिरडून जाताना विनोदाचा आधार आवश्यक ठरतो. दुःख कितीही मोठे तसं ठेवायचा तालुका चा विषय आपल्याला क्षणभर का होईना पडतोच. विनोदाने क्षणभर का होईना, पण दुःखाचा विसर पडतो. पण हा क्षणच माणसाचा हुरूप वाढून त्याचे आयुष्य सुसह्य करतो.

हसल्याने आयुष्य वाढते असे म्हटले जाते, मग आपलं आयुष्य वाढण्यास आपल्याला दीर्घ आयुष्य देण्यासाठी विनोद सकारात्मक भूमिका बजावतो.

मानवी जीवनामध्ये आढळून येणारा वेगळेपणा हा देखिल एक विनोदाचा भाग आहे. प्रत्येक व्यक्तीच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या असतात एखाद्या व्यक्तीला गुलाबाचेफुल करत असेल तर त्या व्यक्तीला मोगऱ्याची फुलं आवडते हा झाला मानवी जीवनातील विसंगत पणा. विसंगत पणा किंवा वेगवेगळे पण हा विनोदाचा उगमस्थान ठरतो. कारण वेगवेगळेपणा तून एखाद्या विनोदाची निर्मिती होत असते.

प्रत्येक माणसाला अगदी लहानपणापासून विनोदाचा परिचय असतो. विनोदाची ओळख हे कोणालाही करून देण्याची गरज नाही एखादा विनोद किंवा चिटकुला झाल्यास आपल्याला लगेच हसू येते, व आपल्या चटकन लक्षात येते की हा एक विनोद होता. लहान मुलांना सगळे प्राणी आवडतात; त्यांना माकड जास्त प्रिय असते, ते त्याच्या माकडचेष्टा मुळेच!

म्हणजे विनोदी स्वभावाचे व्यक्ती आपल्याला चटकन लक्षात येतात. जीवनाकडे विनोदी दृष्टीने बघणारे किंवा कोळेकर दृष्टीने बघणारे विनोदकार, व्यंगचित्रकार साहित्यिक आपल्या विनोदातून , व्यंगचित्रातून आणि साहित्यातून लोकांना हसवण्याचे काम करतात.

लोकांना हसवण्याचा आणि त्यांना दीर्घ आयुष्य प्रदान करण्यामागे सर्व लोकांचा खूप मोठा वाटा असतो.
लोक आपल्या आयुष्यातील दुखाचा विसर पडावा म्हणून विनोद वाचतात. शिवाय विनोदी साहित्याला कारुण्याची झालर असते. त्यामुळे वाचकही अंतर्मुख होतो आत्मपरीक्षण करण्यास प्रवृत्त होतो. अनेकदा विनोदाच्या मदतीने जीवनातील दुःखाची तीव्रता कमी करता येते. खळखळून हसल्यानी आमन शांत होतो, ताण तणावकमी होतो आणि मेंदूला आराम मिळतो.

त्यामुळे मानवी जीवनात विनोदाचे स्थान खूप महत्वपूर्ण आहे निरोगी आरोग्य प्रदान करण्यासाठी सोबत मानसि.क आरोग्य स्वस्थ ठेवण्यासाठी विनोदी महत्वपूर्ण भूमिका बजावतात.

बालकांच्या निरागस जीवनात विनोदाला व हास्याला आगळे स्थान असते. म्हणून तर सर्कशीतील विदूषकांच्या नुसत्या हातवाऱ्यांनीही ती खुदूखुदू हसू लागतात आणि विदूषकांच्या “मर्कटलीला’ सुरू झाल्या म्हणजे तर त्यांचा आनंद अगदी उतू जातो ! टॉम व जेरी यांच्या माकडचेष्टा त्यांना हसून हसून लोळायला लावतात. अशा वेळी स्वत:ला “प्रौढ व मोठ्ठी ‘ समजणाऱ्या माणसांनाही हसू आवरत नाही. जीवन सुसह्य होण्यासाठी खेळकरपणा अत्यंत आवश्यक असतो , हैच येथे दिसून येते. मोठ्या व्यक्तींना देखील लहान मुलांप्रमाणे हसवान्या मागे विनोदाचा खूप महत्त्वपूर्ण वाटा आहे.

काही विनोद सूचक पण चावट असतात. ते सांगनाऱ्याच्या तोंडापेक्षा ऐकणाऱ्याच्या कानात अधिक फुलतात. ज्यांना विनोदबुद्धी नाही त्यांच्यात ती उत्पन्न करणे आणि ज्यांच्याकडे थोड्याप्रमाणात आहे त्याची वाढ करणे असे काम काही विनोदवीर करत असतात. ‘विनोद’ हे अमर असे साहित्य आहे, त्यामुळे ते सर्वांच्या मालकीचे आहे. स्थळ, काळ व वेळ न पाहता केलेला कोणताही विनोद कितीही चांगला असला तरी दाद मिळवू शकत नाही कारण त्याला ‘वाईड जोक’ म्हणतात.

काही विनोदही हसवण्या सोबतच चांगला असा उद्देश देखील देऊन जातात फक्त ते समजण्याची दृष्टिकोन असावा लागतो. काशी विनोद हे एखाद्या व्यक्तीवर, ठिकाणावर, स्थानावर देखील केलेले असतात त्यांना व्यंग विनोद देखील म्हटले जाते.

आजच्या काळामध्ये प्रत्येक व्यक्ती आपापल्या कामांमध्ये व्यस्त आहे. अशा व्यक्ती हसणे आहे तर त्यावर उपाय म्हणजे विनोद होत. विनोदाचा उद्देश केवळ लोकांना हासवणे हाच असतो. आयुष्यातील दुखाचे हसून विस्मरण करणे हा खरा विनोदाचा उद्देश आहे. ज्या विनोदात हास्य आणि अश्रू एकत्र येतात तो विनोद म्हणजे ‘सर्वश्रेष्ठ विनोद’.

जिथे जिथे तणाव आहे, तिथे विनोदाची गरज आहे. विनोदामुळे रक्ताला उसळी मिळते. नसानसातून वीज सळसळते मेंदू तल्लख बनते आणि शरीर व्यवस्था ठीकठाक बनते.  विनोद केवळ माणसाला हसवत नाही तर तो माणसाला निरोगी देखील ठेवतो मानसिकदृष्ट्या आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी विनोद महत्त्वपूर्ण आहे म्हणून मानवी जीवनातील विनोदाचे स्थान महत्त्वपूर्ण आणि गरजेचे आहे.

मानवी जीवन हे धकाधकीचे आणि सुखदुःखाने भरलेले आहे. आजच्या काळामध्ये तर व्यक्तीला एकमेकांना आणि नातेवाईकांना, आणि आपल्या कुटुंबाला भ देण्यासाठी देखील वेळ नाही मग विनोद तर लांबची गोष्ट, तरीदेखील अशा या जीवनात विनोदामुळे काही क्षण का होईना हास्य अनुभवायला मिळणे गरजेचे आहे. जीवनात सुखापेक्षा दु:खाचे क्षण जास्त असतात. दु:ख आहे त्या तीव्रतेने माणसाला भोगावे लागले, तर तो दु:खाच्या ओझ्याखाली एवढा दबून जाईल की, त्याला जीवनातील उपलब्ध सुख उपभोगताही येणार नाही. अशावेळी विनोदाचे वरदान माणसाचे जीवन सुसह्य करते.

विनोदामुळे कोणाचे मन न दुखवता त्याला त्याचे दोष सांगता येतात. तसेच गुणही सांगता येतात. विनोदामुळे ताणतणाव कमी होतात. तसेच विनोदातून लोकांना शिक्षण सुद्धा देता येते. म्हणून विनोद हा मानवी सुख आणि दु:ख यांच्यात सुवर्णमध्य साधतो.

यामुळेच मानवी जीवनात महत्त्वाचे स्थान हे केवळ शब्दांमध्ये सांगता येणार नाही.

मित्रांनो! आजच्या या आर्टिकल ला तुमच्या इतर मित्रांशी अवश्य शेअर करा जेणे करून त्यांना हि खूप सोप्या पद्धतीने हे माहिती वाचायला मदत होईल… आणि मित्रांनो हा लिखाण ” मानवी जीवनातील विनोदाचे स्थान । Manavi Jivnatil Vinodache Sthan in Marathi “ तुम्हाला कस वाटलं हे नक्की Comment द्यारे आम्हाला कळवा…

हे हि अवश्य वाचा :

Leave a Comment