क्रियापद : क्रियापद म्हणजे काय? क्रियापदाचे प्रकार । Kriyapad in Marathi

Kriyapad in Marathi मित्रांनो मराठी व्याकरण मध्ये क्रियापदाला खूप महत्त्वाचे स्थान दिले जाते. एखादे वाक्य पूर्ण होण्यासाठी क्रियापद खूप महत्त्वाची भूमिका बजावते. क्रियापदा शिवाय वाक्य पूर्ण होतच नाही तसेच वाक्याचा अर्थ देखील पूर्ण होत नाही त्यामुळे वाक्यामध्ये क्रियापद महत्त्वाचे असते. आजच्या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासाठी क्रियापद आणि त्यांचे प्रकार सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत जे प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी फायद्याचे ठरेल.

चला तर मग पाहूया, क्रियापद व त्याचे प्रकार । Kriyapad in Marathi

क्रियापद : क्रियापद म्हणजे काय? क्रियापदाचे प्रकार । Kriyapad in Marathi

वाक्य पूर्ण करण्यासाठी आणि त्याला अर्थपूर्ण करण्यासाठी क्रियापदे खूप महत्वाचे ठरतात.

क्रियापद म्हणजे काय?

वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात.

सोप्या भाषेमध्ये सांगायचं म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला क्रियापद असे म्हणतात.

क्रियापद हा वाक्यातील मुख्य असतो वाक्यामध्ये क्रियापदं नसेल तर ते वाक्य अर्थपूर्ण होत नाही.

क्रियापद उदाहरण मराठी :

  1. श्याम आईस्क्रीम खातो. – या वाक्यांमध्ये श्याम खाण्याची क्रिया करत आहे.
  2. घोडा पळत आहे. – या वाक्यामध्ये घोडा पळण्याची क्रिया करत आहे.
  3. गाय दुध देते. -या वाक्यामध्ये गाय देण्याची क्रिया करत आहे.
  4. राधा शाळेत जाते. – या वाक्या मध्ये राधा जाण्याची क्रिया करत आहे.
  5. नेहमी खरे बोलावे. – या वाक्यामध्ये क्रिया बोलण्याची क्रिया होत आहे.
  6. राम कविता लिहीत आहे. – या वाक्यामध्ये लिहिण्याची क्रिया होत आहे.

मित्रांनो आता तुम्हाला कळलेच असेल की क्रियापद म्हणजे काय असते.

क्रियापद :

आपण क्रियापदाचे प्रकार जाण्याअगोदर क्रियापद कसे तयार होते क्रियापद आतील धातू काय असतो, अधातू, कर्ता आणि कर्म जाणून घेऊया.

धातु :

क्रियापदातील प्रत्यय रहित मूळ शब्दाला ‘धातु’ असे म्हणतात.” सोप्या भाषेत समजायचे झाल्यास “क्रियापदाच्या मूळ स्वरूपाला ‘धातू’ म्हणतात.” – ‘धातु’ हा क्रियापदाचा भाग आहे, जो क्रियापदाच्या जवळजवळ सर्व प्रकारांमध्ये आढळतो.

याचा अर्थ असा होतो की ज्या मूळ अक्षरामधून क्रियापद तयार होतात त्यांना ‘धातु’ असे म्हणतात.

  • उदाहरणार्थ =

दे, कर, बोल, जिंक, ये, जा, उठ, बस, खा, पी, खेळ, लिह, गा, वाचा, झोप, बघं सर्व धातूंची उदाहरणे आहेत.

  1. श्याम आंबा खातो. या वाक्यांमध्ये खातो हे क्रियापद आहे व “खा (धातु) + तो (प्रत्यय) = खातो ( क्रियापद)
  2. धोनी क्रिकेट खेळतो. या वाक्यामध्ये खेळतोय हे क्रियापद आहे व ” खेळ (धातु) + तो (प्रत्यय) = खेळतो ( क्रियापद)

धातुसाधित :

धातूला प्रत्यय लागून क्रियापदाची विविध रूपे तयार होत असतात परंतु त्या तयार होणाऱ्या तुपापासून वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही किंवा ती रूपे क्रिया अपूर्ण दाखवतात त्यांना धातुसाधित असे म्हंटले जाते.
प्रत्यय त्यांना धातू जोडल्यामुळे संस्कृत मध्ये त्यांना कृदंत असे म्हणतात.

धातु + प्रत्यय= धातुसाधित
उठ + ऊन = उठून
कर + ता = करता
बस + णे = बसणे
हस + ऊ = हसून
ठेव + ली = ठेवली

  • उदाहरणे :
  1. धोनी क्रिकेट खेळत होता.
  2. आशा गाणे गाऊ लागली.
  3. बाळ आईकडे बघून हसत आहे.
  4. सुधाच्या घरात मांसाहार खाणारी माणसे भरपूर आहेत.
  5. जहाज समुद्रात बुडताना पाहीले.

कर्ता :

वाक्यात कोणतीही क्रिया किंवा कार्य करणाऱ्यास ‘कर्ता‘ असे म्हणतात. क्रियापदाला विशिष्ठ क्रिया करण्यास सांगणाऱ्याला कर्ता म्हणतात.

वाक्यात क्रिया करणारा हा कर्ता असतो कर्त्या शिवाय कोणतेही वाक्य पूर्ण होत नाही.

  • उदाहरणार्थ :
  1. राम पेरू खातो. – कर्ता = राम, क्रियापद = खातो
  2. गीता रोज नाचते. – कर्ता = गीता, क्रियापद = नाचते
  3. मी पत्र लिहितो. – करता= पत्र , क्रियापद = लिहतो
    4.बाळ शांत झोपतो. – कर्ता = बाळ, क्रियापद = झोपते
  4. रामाने बाण मारला.- कर्ता= बाण, क्रियापद= मारला

कर्म :

वाक्यात कर्ता ज्याच्यावर क्रिया करतो त्यास ‘कर्म‘ असे म्हणतात. सोप्या भाषेत समजायचे झाल्यास क्रिया सोसणारे किंवा ज्याच्यावर क्रिया केली जाते त्यास कर्म असे म्हणतात.

याव्यतिरिक्त सोप्या भाषेमध्ये सांगायचे म्हणजे वाक्यातील क्रिया करणारा जो कोणी असतो त्याला कर्म असे म्हणतात.

  • उदाहरणार्थ :
  1. ताई चित्र काढते. – कर्ता= ताई, कर्म = चित्र, काढते = क्रियापद.
  2. राम पेरू खातो. – कर्ता = राम, कर्म = पेरू, क्रियापद = खातो
  3. गीता रोज नाचते. – कर्ता = गीता, कर्म= रोज, क्रियापद = नाचते
  4. बाळ शांत झोपतो. – कर्ता = बाळ, कर्म = शांत क्रियापद = झोपते
  5. रामाने बाण मारला.- कर्ता= बाण, कर्म = राम क्रियापद= मारला

मित्रांनो आता तुम्हाला क्रियापद म्हणजे काय आणि क्रिया पदासाठी कोणकोणत्या गोष्टी आवशक्य असतात, क्रियापद कसे ओळखले जाते हे सर्व कळालेच असेल आता आपण क्रियापदाचे प्रकार पाहूया.

क्रियापदाचे प्रकार :

क्रियापदाचे मुख्य प्रकार किती? : क्रियापदाचे मुख्य चौदा प्रकार पडतात.

क्रियापदाचे मुख्य चौदा प्रकार पडतात ते पुढीलप्रमाणे :

  1. सकर्मक क्रियापद
  2. अकर्मक क्रियापद
  3. द्विकर्मक क्रियापद
  4. उभयविध क्रियापद
  5. संयुक्त क्रियापद
  6. सहाय्यक क्रियापद
  7. प्रायोजक क्रियापद
  8. शक्य क्रियापद
  9. सिध्द क्रियापद
  10. साधित क्रियापद
  11. अनियमित क्रियापद
  12. भावकर्तृक क्रियापद / अर्कर्तृक क्रियापद
  13. करणरुप क्रियापद
  14. अकरणरुप क्रियापद

1. सकर्मक क्रियापद Sakarmak Kriyapad in Marathi :

मराठी व्याकरण मध्ये ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची आवश्यकता असते त्यांना सकर्मक क्रियापद असे म्हणतात.

वाक्यामध्ये क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची आवश्यकता असते किंवा कर्म वापरले जाते त्याला सकर्मक क्रियापद असे म्हणतात.

  1. राधा नृत्य करते.
  2. कृष्ण बासरी वाजवतो.
  3. धोनी क्रिकेट खेळतो.
  4. लता गाणे म्हणते.
  5. मी चित्र काढतो.
  6. मी निबंध लिहिला.
  7. राजू पेरू खातो.
  8. शंकराने विष पिले.
  9. राम रावणास मारतो.
  10. लक्ष्मणने रेखा ओलांडली.

वरील प्रत्येक क्रियापदाचे ( करतो, वाजवतो, खेळतो, म्हणते, काढतो, लिहिला, खातो, पीतो, मारतो, ओलांडली) वाक्य पूर्ण होण्यासाठी कर्माची ( राधा, कृष्ण, धोनी, लय, मी, मी, राजू, शंकर, राम, लक्ष्मण) आवश्यकता आहे म्हणून वरील सर्व वाक्य ही सकर्मक क्रियापदाचे वाक्य आहेत.

2. अकर्मक क्रियापद Akarmak Kriyapad in Marathi

मराठी व्याकरण मध्ये जा क्रियापदाला वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची अवशक्यता भासत नाही त्यांना अकर्मक क्रियापद असे म्हणतात.

कर्त्या पासून निघालेली क्रिया कर्ता वरच येऊन थांबत असेल तर त्यांना अकर्मक क्रियापद असे म्हणतात.

  • उदाहरणार्थ :
  1. राम निघून गेला.

===> या वाक्यांमध्ये वाक्य पूर्ण करण्यासाठी करणाची आवश्यकता भासत नाहीत म्हणून या वाक्याला अकर्मक क्रियापद असे म्हणतात.

3. द्विकर्मक क्रियापद Dwikarmak Kriyapad in Marathi

ज्या क्रियापदाला दोन कर्म असतात त्याला द्विकर्मक क्रियापद असे म्हणतात.

  • उदाहरणार्थ :

1. प्रशिक्षक रामला क्रिकेट शिकवतात.

==> या वाक्यात ‘क्रिकेट’ हे प्रत्यक्षकर्म आहे व ‘राम’ हे अप्रत्यक्षकर्म आहे म्हणून ‘शिकवतात’ हे द्वि कर्म क्रियापद आहे.

2. मी विजयला पुस्तक दिले.

==> या वाक्यात ‘पुस्तक’ हे प्रत्यक्ष कर्म आहे व ‘विजय’ हे अप्रत्यक्ष कर्म आहे म्हणूनच दिले हे द्वी कर्म क्रियापद आहे.

3. शिक्षक विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात.

==> या वाक्याचा ‘व्याकरण’ हे प्रत्यक्ष कर्म आहे आणि ‘विद्यार्थी’ हे अप्रत्यक्ष कर्म आहेत म्हणून शिकवतात हे द्वी कर्म क्रियापद आहे.

4. उभयविध क्रियापद Ubhayvidhi Kriyapad in Marathi

जे क्रियापद सकर्मक व अकर्मक अशा दोन्ही प्रकारांमध्ये मोडले जाते अशा क्रियापदाला उभयविध क्रियापद म्हणतात.

  • उदाहरणार्थ :

1. रामच्या घराचे छप्पर उडाले : सकर्मक
त्याच्या घराचे छप्पर उडाले : अकर्मक
या दोनही वाक्यात ‘उडाले’ हे क्रियापद सकर्मक व अकर्मक अशा दोन्ही भूमिका निभावते म्हणून या क्रियापदाला उभयविध क्रियापद म्हणतात.

2. रामने पक्षाला बंदुकीने मारले: सकर्मक
त्याने पक्षाला बंदुकीने मारले: अकर्माक
या दोन्ही वाक्यात ‘मारले’ हे क्रियापद सकर्मक व अकर्मक अशा दोन्ही भूमिका निभावते म्हणून या क्रियापदाला उभयविधी क्रियापद म्हणतात.

5. संयुक्त क्रियापद Sanyukt Kriyapad in Marathi

काही वाक्यात धातुसाधित व सहाय्यक क्रियापद एकत्रितरीत्या क्रिया दर्शवतात म्हणून धातुसाधित व सहाय्यक क्रियापद यांना एकत्रितरीत्या संयुक्त क्रियापद असे म्हणतात.

  • उदाहरणार्थ :

1. मुले मैदानावर खेळू लागली.

==> यामध्ये ‘खेळू’ हे धातुसाधित आहे व ‘लागली’ हे सहाय्यक क्रियापद आहे त्यामुळे खेळू लागली हे एकत्रितपणे संयुक्त क्रियापद होते.

6. सहाय्यक क्रियापद Sahayyak Kriyapad in Marathi :

काही वाक्यात धातुसाधित व सहाय्यक क्रियापद एकत्रितरीत्या क्रिया दर्शवतात म्हणून धातुसाधित व सहाय्यक क्रियापद यांना एकत्रितरीत्या संयुक्त क्रियापद असे म्हणतात.

उदाहरणार्थ :

1. मी आंबा खाणार होतो.

==> यामध्ये ‘खाणार’ हे धातुसाधित आहे व ‘होतो’ हे सहाय्यक क्रियापद आहे त्यामुळे ‘खाणार होतो’ हे एकत्रितपणे संयुक्त क्रियापद आहे.

2. राम क्रिकेट खेळणार आहे.

==> यामध्ये ‘खेळणार’ हे धातुसाधित आहे व ‘आहे’ हे सहाय्यक क्रियापद आहे त्यामुळे ‘खेळणार आहे’ हे एकत्रितपणे संयुक्त क्रियापद आहे.

7. प्रायोजक क्रियापद Prayojak Kriyapad in Marathi

जे क्रियापद वापरल्यास मुख्य कर्ता दुसर्‍या कर्त्यास कर्म करण्यास प्रवृत्त करत असेल तर त्या क्रियापदास प्रयोजक क्रियापद म्हणतात.

उदाहरणार्थ :

1. शिक्षक विद्यार्थ्यांना खेळ शिकवतात.

==> या वाक्यांमध्ये शिक्षक हे मुख्य कर्ता आहे व ते विद्यार्थ्यांना कर्म करायला म्हणजे खेळ शिकवतात.

2. आई मुलांना काम सांगते.

==> या वाक्यामध्ये आई हे मुख्य कर्ता मुलांना काम सांगते म्हणजेच कर्म करण्यास प्रवृत्त करीत आहे. म्हणून सांगते हे प्रयोजक क्रियापद आहे.

8. शक्य क्रियापद shakya kriyapad in Marathi

ज्या क्रियापदाचा वापर वाक्यातील क्रियेची शक्यता दर्शवण्यासाठी केला जातो त्या क्रियापदास शक्य क्रियापद असे म्हणतात.

उदाहरणार्थ :

1. मला इतकेच उडता येईल.

==> या वाक्यांमध्ये येईल हे क्रियापद शक्यता दर्शवत आहे मग त्याला शक्य क्रियापद असे म्हणतात.

9. सिध्द क्रियापद Sidha Kriyapad in Marathi

जी मूळ क्रियापदे आहेत व ते कोणत्याही नामापासून तयार झाली नाहीत अशा क्रियापदांना सिद्ध क्रियापद असे म्हणतात.

उदाहरणार्थ : येणे, जाणे, उठणे इत्यादी.

  1. ती लवकर परत येते.
  2. मी उद्या लवकर जाणार
  3. मी उद्या पाच वाजता उठणार

10. साधित क्रियापद Sadhit kriyapad in Marathi

जी क्रियापदे मूळ नसून ती इतर शब्दांपासून म्हणजेच धातूपासून तयार होतात अशा क्रियापदांना साधित क्रियापद म्हणतात.

उदाहरणार्थ :

  1. झोपतो ( मूळ धातु- झोप)
  2. पानावले (मूळ धातू- पाणी)

11. अनियमित क्रियापद Aniyamit kriyapad in Marathi

नियमित क्रियापदे देखील मूळ क्रियापद येत असतात परंतु यामधील धातु आपण स्पष्टपणे सांगू शकत नाहीत त्यामुळे अशा क्रिया पदांना आणि नियमित क्रियापदे म्हणतात.

उदाहरणार्थ :

  1. नेहमी खरे बोलावे.
  2. सकाळी नियमितपणे व्यायाम करतो.
  3. सुवर्णा शाळेत जाते.
  4. सूर्य पूर्वेकडे उगवत असतो.
  5. सूर्य पश्चिमेकडे मावळत असतो.

12. भावकर्तृक क्रियापद / अर्कर्तृक क्रियापद Bhavktruk kriyapad in Marathi

जे क्रियापद वापरले असल्यास वाक्यात प्रत्यक्ष कर्ता नसतो तसेच क्रियापदातील भाव हाच कर्ता असतो अशा क्रियापदास अकर्तूक किंवा भावकर्तूक क्रियापद असे म्हणतात.

उदाहरणार्थ :

1. आज लवकर मावळले.

==> या वाक्यात करता नसून मावळले हा भावच करण्याची भूमिका बजावली.

2. आज लवकर उजाडले.

==> या वाक्यात कर्ता नसून उजाडणे हा भावच कर्त्याची भूमिका बजावतो.

13. करणरुप क्रियापद Karunrup Kriyapad in Marathi

काही क्रियापद हे वाक्यामधील होकारार्थी भाव दर्शवतात अशा क्रियापदांना करणरुपी क्रियापद असे म्हणतात.

उदाहरणार्थ : असावे, आहे, करावे इत्यादी.

14. अकरणरुप क्रियापद Akarunrup kriyapad in Marathi

जे क्रियापद वापरल्यामुळे वाक्यामध्ये नकारार्थी भाव उत्पन्न होतो अशा क्रियापदांना अकरणरुपी क्रियापद असे म्हणतात.

उदाहरणार्थ : नाही, नसावे, इत्यादी.

मित्रांनो! आजच्या या आर्टिकल ला तुमच्या इतर मित्रांशी अवश्य शेअर करा जेणे करून त्यांना हि खूप सोप्या पद्धतीने हे माहिती वाचायला मदत होईल… आणि मित्रांनो हा लिखाण ” ” क्रियापद : क्रियापद म्हणजे काय? क्रियापदाचे प्रकार । Kriyapad in Marathi क्रियापद आणि त्याचे प्रकार ” “ तुम्हाला कस वाटलं हे नक्की Comment द्यारे आम्हाला कळवा…

हे हि अवश्य वाचा :

Leave a Comment