परीक्षा रद्द झाल्या तर निबंध मराठी Pariksha Radda Zalya Tar Marathi Nibandh

Pariksha Radda Zalya Tar Marathi Nibandh मित्रांनो कोणतेही लवकर कोणत्याही क्षेत्रातील शिक्षण घ्यायचे असेल तेव्हा परत मिळवायचे असेल तर आपल्याला त्या क्षेत्रातील परीक्षा पास होणे गरजेचे आहे. एखादे पद किंवा नोकरी यांच्यामध्ये सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट असते ती म्हणजे परीक्षा होय.

त्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये परीक्षेला महत्वाचे स्थान दिले जाते. मग या परीक्षा रद्द झाल्या तर काय होईल…?

मित्रांनो आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी या परीक्षा रद्द झाल्या तर…. ? निबंध मराठी घेऊन आलो हा निबंध प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वपूर्ण ठरेल.

परीक्षा रद्द झाल्या तर निबंध मराठी Pariksha Radda Zalya Tar Marathi Nibandh

“संपली सारी शिक्षा,

कारण, रद्द झाली परीक्षा

फक्त आनंदाचीच प्रतीक्षा

जगी कोण सुखी आंम्हापेक्षा?”

हे प्रत्येक विद्यार्थ्यांचे स्वप्न असते. परीक्षा हे नाव घेताच प्रत्येक विद्यार्थ्याच्या च्या पोटामध्ये धास्ती गोळाच निर्माण होतो. प्रत्येक विद्यार्थ्यांची स्वप्न असते की परीक्षा नसला पाहिजे. शाळेमध्ये जायचे शिक्षण घ्यायच्या आणि परीक्षा न देताच पुढच्या वर्गांमध्ये प्रवेश घ्यायचा असतं तर किती बरं असतं ना!!!

विद्यार्थ्यांना आहे का बर का तुम्ही दुसऱ्या वर्गामध्ये प्रवेश घ्यायचा म्हटलं की परीक्षा नावाच्या एका टप्प्याला पार करावा लागतो नुसतं पार न करता यामध्ये चांगली टक्केवारी देखील मिळवावी लागते. चुकून एखाद्या विद्यार्थ्याला चांगली टक्केवारी नेहमी येतात विद्यार्थी नापास झाला तर त्याचे एक वर्षाची नुकसान होते किमान घरच्यांकडून सुद्धा त्या विद्यार्थ्यांना खूप रागवले जाते.

काही वेळेस तर एखाद्या परीक्षा मध्ये नापास झाले असताना पालक त्या विद्यार्थ्यांची प्रशिक्षणाचा बंद करतात त्यामुळे परीक्षेमध्ये पास व्हायचे असे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये भीती बसलेली आहेत या भीतीपोटी विद्यार्थी एकमेकांचे बघून लिहिणे कॉपी करणे यांसारखी गैरवर्तणूक करत आहे.

केवळ परीक्षा पुरताच पास होण्याच्या दृष्टिकोनातून विद्यार्थी अभ्यासाचा रट्टा मारत आहेत आणि जे काही रट्टा मारला आहे ते परीक्षेमध्ये येत आहे यामुळे विद्यार्थ्यांना शाळेमध्ये योग्य ज्ञान न घेता केवळ परीक्षेच्या दृष्टिकोनातून ज्ञान मिळत आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून अभ्यास करायचा असेल तर मग या परीक्षा नसत्या तर किती बरे झाले असते ना!!

जर परीक्षा नसत्या तर कोणताही विद्यार्थी नापास झाला नसता सर्व विद्यार्थी पुढच्या वर्गामध्ये प्रवेश करत जात स्वतःचे शिक्षण पूर्ण करू लागले असते. मग या परीक्षा नसत्या तर सर्व विद्यार्थी खूपच खूश राहिले असते ना अभ्यासाचे ताण, परीक्षेचे टेन्शन , ना तोंडी परीक्षेचा ताण सर्व विद्यार्थी मजे मध्ये शिक्षण घेत राहिले असते.

एकदा का अंगणवाडी मध्ये जरी प्रवेश घेतला तेव्हा मुलांना परीक्षेची सुरुवात होत असते अवघ्या तीन-चार वर्षे वयाच्या मुलांनाही परीक्षा आहेच.वाढत्या वयाबरोबर हे परीक्षेचे भूत प्रचंड होत जाते. तोंडी परीक्षा, लेखी परीक्षा, चाचणी परीक्षा, सत्र परीक्षा, स्पर्धा परीक्षा …… बापरे! मग आपोआप बंधने सुरू….. टि.व्ही. पाहु नकोस, जास्त वेळ खेळू नकोस, आजारी पडशील आईस्क्रीम खाऊ नकोस परीक्षा जवळ आली आहे. क्रिकेट बंद, सिनेमा बंद…. इ.

या सर्वांमुळे विद्यार्थी केवळ परीक्षा पुरताच राहून जातो विद्यार्थ्यांना ना खेळणे माहित असते ना बागडणे माहीत असतील विद्यार्थी केवळ परीक्षा पुरताच मर्यादित राहतो. लहान वयामध्ये विद्यार्थ्यांचा खेळण्याच्या वयामध्ये विद्यार्थी परीक्षेच्या आहारी जातात आणि दिवसेन रात्र अभ्यास करत असतो. असे करत असताना विद्यार्थ्यांना अन्नपाण्याची देखील गरज भासत नाही. अशा वेळी विद्यार्थ्यांच्या डोक्यात मध्ये केवळ अभ्यास आणि परीक्षेची भीती असते त्यामुळे विद्यार्थी कमी वयामध्ये चिडचिड वाने बनतात. मग या परीक्षा नसता तर या सगळ्या गोष्टींचे टेन्शनच राहिले नसते ना!!

मग अशा या परिस्थितीमध्ये जर परीक्षा नसत्या तर मुले तर सर्वच ‘आनंदी आनंद गडे….. जिकडे तिकडे चोहीकडे…. च्या तालात बेभान नाचू लागली. तो गृहपाठ, ते पाठांतर, ती गणिते , ते निबंध …. सारे पाश आता सुटलेले. मन कसे मुक्त पाखरासारखे……. गुरूजींच्या छड्या नाही, आईचे लाटणे नाही.  एकदाचे सर्व विद्यार्थ्यांचे अभ्यासाच्या ताणातून आणि परीक्षेच्या वेळी त्यातून सुटका होईन.

परीक्षाच नाही तर गुणांची चिंता नाही. शिक्षक व पालकांचे ताशेरे नाहीत, शिकवण्या नाहीत, परीक्षा केंद्रे नाहीत, तिथला गोंधळ नाही, पेपरफुटी नाही, वशिला नाही, भ्रष्टाचार नाही.एकंदरीत ‘परीक्षा बंद’ चे बरेच फायदे आम्हां विद्यार्थ्यांच्या डोळ्यासमोर फेर धरून नाचू लागले.

कधि ना भूगोल एवढेच समजले की आहे पृथ्वी गोल….. ती इंग्रजी भाषा कसली, ती डोक्यावरूनच गेली.. माथी जाऊन बसली, ‘सॉरी’ मात्र शिकवून गेली.

परीक्षा नसत्या तर अजून एक फायदा झाला असतो तो म्हणजे शाळेमधल्या सर्व विद्यार्थी समाना राहिली असती शिक्षक ना कुणाला हुशार म्हणालेला ना कोणाला ढ म्हणाले नसते सर्व विद्यार्थी शिक्षकांना एक समान राहिले असते. परीक्षा नसत्या तर सर्व विद्यार्थ्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण राहिले असते.

परंतु मित्रांनो ज्या प्रमाणे नाण्याला दोन बाजू असतात त्याप्रमाणे परीक्षा नसत्या तर विद्यार्थ्यांसाठी खूप काही चांगले घडले असतात त्यांच्या मनासारखे झाले असते. परंतु नाण्याच्या दुसर्‍या बाजू प्रमाणे परीक्षा नसत्या तर त्याचे काही नुकसान देखील झाले असते.

प्रत्येक व्यक्तीच्या जेवणामध्ये परीक्षा नसेल तर तो व्यक्ती प्रगती करू शकत नाही परीक्षा नसत्या तर स्वतःच्या गुणांची ओळख आपल्याला होत नाही. आपण कितपत प्रगती करत आहोत याचे मूल्यमापन परीक्षा वरून आपल्याला कळतात त्यामुळे परीक्षा नसत्या तर सर्व विद्यार्थ्यी समानच राहिले असते. आणि या गोष्टीचा परिणाम विद्यार्थ्यांना नोकरी च्या वेळेस जाणवला असता सर्व विद्यार्थी समान असल्यास नोकरी नेमके कोणत्या विद्यार्थ्याला द्यायची हा प्रश्न सर्व जगासमोर उभा राहिला असता.

आयुष्य ही चैन नसून ते एक कर्तव्य आहे.चढाओढ नाही तर प्रगती नाही.परीक्षा नाही तर योग्यतेचे मूल्यमापनच नाही.वाचन व लिखाण नाही. पुस्तकासारखां सच्चा मित्र दुरावेल. विद्यार्जन हे ज्याचे कर्तव्य तो विद्यार्थीच विलासी होईल. रिकामा वेळ कुसंगती किंवा व्यसने याकडे ओढून नेईल. हुशार विद्यार्थी नाराज होतील.अभ्यासाची आवड नसणारे मात्र सिनेमा, फॅशन यांच्या आहारी जाऊन संस्कृती विसरून विकृतीकडे वाटचाल करतील.

या सर्व गोष्टीमुळे परीक्षा आहेत म्हणून आजचा विद्यार्थी विद्यार्थी राहिला आहे. जर या परीक्षा रद्द झाल्या तर जीवनाची रद्दी व्हायला वेळ लागणार नाही.

मित्रांनो! आजच्या या आर्टिकल ला तुमच्या इतर मित्रांशी अवश्य शेअर करा जेणे करून त्यांना हि खूप सोप्या पद्धतीने हे माहिती वाचायला मदत होईल… आणि मित्रांनो हा लिखाण ” परीक्षा रद्द झाल्या तर निबंध मराठी Pariksha Radda Zalya Tar Marathi Nibandh “ तुम्हाला कस वाटलं हे नक्की Comment द्यारे आम्हाला कळवा…

हे हि अवश्य वाचा :

Leave a Comment