गोपाल हरी देशमुख माहिती मराठी । Gopal Hari Deshmukh Information in Marathi

Gopal Hari Deshmukh Information in Marathi मला भारत देशाचा विकास करण्यासाठी आणि भारत देशाच्या दरी तिला आळा घालण्यासाठी अनेक समाजसुधारकांनी महत्वाचे कार्य केले. गोपाळ हारी देशमुख हे देखील एक थोर समाज वंत आणि उत्कृष्ट व्यक्तिमत्त्वाचे समाजसुधारक होते. गोपाळ हरी देशमुख इसवीसन एकोणिविसाव्या शतकात  होऊन गेलेले मराठी पत्रकार, समाजसुधारक आणि इतिहास लेखक होते. आजच्या लेखामध्ये आपण गोपाल हरी देशमुख या महान समाजसुधारका बद्दल माहिती पाहणार आहोत.

गोपाल हरी देशमुख माहिती मराठी । Gopal Hari Deshmukh Information in Marathi

 19 व्या शतकातील थोर विचारवंत समाजसुधारक आणि लेखकाची भूमिका बजावणारे गोपाल हरे कृष्ण हे एक महानपुरूष होते. प्रभावकार नावाच्या साप्तहायिकातून  लोकहितवादी या टोपण नावाने त्यांनी  समाज सुधारणा करण्यासाठी यांनी अनेक शतपत्रे लिहिली. वर्तमानपत्रांमध्ये लिहिलेल्या एका “शतपत्रचा इत्यर्थ”  त्यातून त्यांनी सुधारक विचारांच्या त्यांच्या लेखनाचा हेतू स्पष्ट केला होता.

 तसेच गोपाळ हरी देशमुख यांनी लोकहितवादींनी समाजहिताला प्राधान्य देऊन सर्वांगिन सामाजिक सुधारणा घडवून आणण्याचा आग्रह त्यांनी धरला होता. आपल्या समाजातील दृढ अशा  दोषांवर गोपाल हरी देशमुख सतत टीका करीत असे. समाजातील अनिष्ट रूढी व परंपरा यांना दूर करून सर्वांगीन सामाजिक प्रगती केली पाहिजे याकडे त्यांचा विशेष कल होता.

समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन प्रगती साधावी असे त्यांचे मत होते. ते नेहमी त्यांच्या विचारांतून अंधश्रद्धा भोळ्या समजुती आणि अनिष्ट चालीरिती त्यांचा त्याग करावा असे सांगत. कडूनच गोपाल हरे कृष्ण यांचा जातीव्यवस्था हे समाजाच्या अधोगतीला  कारणीभूत ठरत आहे असे त्यांचे ठाम मत होते. म्हणून गोपाल हरि देशमुख यांचा जातीव्यवस्था आणि वर्णव्यवस्था याला विरोध होता.

  उच्चवर्गीय लोकांनी आपल्या वर्ण  श्रेष्ठत्वाचा त्याग करून देशवासियांसाठी काहीतरी चांगलं कृत्य करावे हे ते नेहमी सांगत. लोकशाहीवादी मे बालविवाह, हुंडा पद्धती, बहुपत्नी या पद्धती आणि समाजातील इतर अनिष्ट प्रथांवर आळा घालविण्यासाठी प्रबंध केले. समाजातील स्त्रियांना पुरुषांच्या बरोबर सर्व हक्क मिळावे त्यांना शिक्षण व विवाह याबाबत स्वातंत्र्य असावे तसेच विधवांना पुनर्विवाह करण्याचा अधिकार असावा असे त्यांचे विचार होते.

 समाज सुधारणेचा विचार मांडणारे आणि स्वकीयांवर प्रखरपणे टीका करणारे  समाजातील लोकांचे त्यांचे दोष त्यांना लक्षात आणून देणारे. काल सुधारक आणि मध्ये महत्त्वाचे सुधारक गोपाल  हरी देशमुख हे होते.

 तसेच गोपाल हरी देशमुख यांनी त्यांच्या लेखनातून समाजाचा विकास व्हावा यासाठी प्रयत्न केला.

गोपाल हरी देशमुख यांचा जन्म :

 एकोणिसाव्या शतकातील मराठी पत्रकार, लेखक आणि  थोर समाज सुधारक रावबहादूर गोपाळ हरि देशमुख म्हणजेच लोकहितवादी यांचा जन्म 18 फेब्रुवारी अठराशे 23 रोजी कोकणातील वतनदार या घराण्यामध्ये झाला. यांच्या घराण्याचे मूळ आडनाव हे सिद्धये असे होते. त्यांच्या देशमुखी  वागणुकी त्याने चे देशमुख हे आडनाव रूढ झाले.

 गोपाळ हरी देशमुख यांचे वडील हरिपंत देशमुख हे पुण्यातील दुसरे बाजीराव पेशव्यांचे सेनापती बापू गोखले त्यांचे फडणवीस होते. गोपाळ हरी कृष्णा यांना लहानपणापासूनच वाचनाची आणि  ग्रंथसंग्रह करण्याची अत्यंत आवड होती. त्यातल्या त्यात इतिहास हा त्यांच्या आवडीचा विषय होता. म्हणूनच इतिहास यावर गोपाळ हरिकृष्ण यांनी त्यांच्या जीवनामध्ये दहा पुस्तके लिहिली.

 गोपाळ हरी देशमुख यांचे शिक्षण :

 एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस इंग्रजी शिक्षणामुळे घडलेल्या पहिल्या काही  नवशिक्षित यांमध्ये गोपाळ हरी देशमुख हे एक होते. मराठी शाळेमध्ये प्राथमिक शिक्षण सुरू असतानाच गोपाळ हरी देशमुख यांनी इंग्रजीचे धडे रंगविले. गोपाळ हरी देशमुख वयाच्या 21व्या वर्षी न्यायालयात भाषांतरकार म्हणून काम करू लागले. त्यानंतर ते अदालत ची मुंन्साफी ची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर 1962 मध्ये गोपाळ हरी  देशमुख मुंबई सरकारच्या न्याय खात्यात न्यायाधीश झाले.

 गोपाळ हरी देशमुख यांचे लेखन :

 गोपाळ हरी देशमुख यांनी त्यांच्या लेखनातून समाज सुधारण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण कार्य केली. रेव्हरंड जी आर ग्लीन यांच्या ” हिस्ट्री ऑफ द ब्रिटिश  एम्पायर इंन इंडिया” या पुस्तकाच्या आधारावर गोपाळ हरी देशमुख यांनी 1842 मध्ये वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी ” हिंदुस्थानचा इतिहास” हे पुस्तक रचले. पण या पुस्तकाचे प्रकाशन 1878 मध्ये करण्यात आले. 1848 पासून गोपाळ हरी देशमुख यांनी मुंबई तून निघणाऱ्या प्रभाकर या साप्ताहिकात लोकहितवादी  या नावाने लेखन करण्यास सुरुवात केली. या साप्ताहिकाच्या माध्यमातून गोपाळ हरी देशमुख यांनी समाजातील अनेक समस्यांवर, चालीरीती बाबत विविध विषयांवर पत्राद्वारे लेखन केले.

 अशाप्रकारे गोपाळ हरी देशमुख यांनी 1848 ते 1850  या दोन वर्षाच्या काळामध्ये एक व 108 छोटे निबंध लिहिलेले. हेच निबंध लोकहितवादींची शतपत्रे या नावाने ओळखले जातात. या शत पत्रांच्या माध्यमातून गोपाळ हरी देशमुख यांनी समाज सुधारणा विषयक आनेक महत्त्वाचे विचार समाजासमोर मांडले आहेत. आणि हीच ती शतपत्रे प्रभाकर या साहित्यातून प्रसिद्ध झालेली आहेत. धार्मिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय,  सांस्कृतिक, ऐतिहासिक इत्यादी विषयांवर गोपाळ हरी देशमुख यांनी लहान-मोठे असे सर्व मिळून एकूण सुमारे 39 ग्रंथांचे लेखन केले. तसेच गोपाळ हरी देशमुख यांनी दोन नियतकालिके देखील चालवली. ज्ञान प्रकाश व इंदुप्रकाश या नियतकालिके प्रकाश करण्यामध्ये देखील गोपाळ हरी देशमुख यांचा महत्त्वाचा वाटा होता.

 आशा प्रकारे गोपाळ हरी देशमुख यांनी त्यांच्या लेखनातून समाजप्रबोधनाचे आणि समाजाच्या प्रगतीसाठी महत्वपूर्ण अशी भूमिका बजावली. आज ही गोपाल हरी देशमुख यांनी लिहिलेले ग्रंथ हे आपल्या साठी खूप प्रेरणादायी ठरतात.

मित्रांनो! आजच्या या आर्टिकल ला तुमच्या इतर मित्रांशी अवश्य शेअर करा जेणे करून त्यांना हि खूप सोप्या पद्धतीने हे माहिती वाचायला मदत होईल… आणि मित्रांनो हा लिखाण ” गोपाल हरी देशमुख माहिती मराठी । Gopal Hari Deshmukh Information in Marathi “ तुम्हाला कस वाटलं हे नक्की Comment द्यारे आम्हाला कळवा…

हे हि अवश्य वाचा :

Leave a Comment