व्याकरण : समास व समासाचे प्रकार । Samas in Marathi

Samas in Marathi मित्रांनो मराठी व्याकरण मध्ये समाज आणि समस्यांच्या प्रकारांना अधिक महत्व दिले जाते. भाषा की शब्दांत पासून बनलेली असते ही भाषा बोलत असताना आपण शब्दांचा काटकसरीने वापर करत असतो. एखादे वाक्य बोलण्याची ते वाक्य लेखन शब्दांमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे दोन किंवा अधिक शब्दांचा प्रयोग करण्यात ऐवजी आपण एकच शब्द वापरते जसे की “नऊ रात्रींचा समूह” म्हणण्याऐवजी आपण “नवरात्र” असे म्हणतो.

व्याकरण : समास व समासाचे प्रकार । Samas in Marathi

चंद्राचा उदय असे न म्हणता “चंद्रोदय” असे म्हणतो. सात दिवसांचा समूह म्हणता “सप्ताह” असे म्हणतो. 30 दिवस असे न म्हणता “एक महिना” असे म्हणतो. म्हणजे नवरात्र चंद्रोदय, सप्ताह आणि महीना हे शब्द सामासिक शब्द आहे.

यावरून थोडक्यात आपल्याला कळते की या शब्दाचा अर्थ एकत्रित करणे असा होतो.

त्यामुळे मराठी व्याकरण शिकत असताना समाज व त्याचे प्रकार आपल्याला माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे मंगेश आधीच या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासाठी समास व त्याचे प्रकार घेऊन आलोत.
चला तर मग पाहूया, samas in marathi समास आणि समासाचे प्रकार व उदाहरणे.

Samas in Marathi : समाज म्हणजे काय?

समास म्हणजे काय: जेव्हा दोन किंवा अधिक शब्दांमधील परस्पर संबंध दाखवणारे प्रत्यय किंवा शब्द यांचा लोप होऊन त्यांचा क जोडशब्द तयार होतो, तेव्हा शब्दांच्या या एकीकरणाला समास – Samas in Marathi असे म्हणतात. अशा रीतीनेतयार झालेल्या ह्या जोडशब्दाला सामासिक शब्द असे म्हणतात.

उदाहरणार्थ :

 1. रात्र आणि दिवस- रात्रंदिवस
 2. बटाटे घालून केलेला वडा- बटाटेवडा
 3. अज्ञा चे पालन करणारा- अज्ञाकारी
 4. राजाचा वाडा- राजवाडा

वरील उदाहरणातील रात्रंदिवस, बटाटेवडा, आज्ञाकारी, राजवाडा हे सामासिक शब्द आहेत.

मित्रांनो आता तुम्हाला समाज म्हणजे काय हे कळाले असेल आता आपण समासाचे प्रकार पाहूयात.

समासाचे प्रकार Types of Samas in Marathi :

मित्रांनो मराठी व्याकरण मध्ये समाजाचे मुख्य चार प्रकार पडतात ते पुढीलप्रमाणे-

 1. अव्ययीभाव समास
 2. तत्पुरुष समास
 3. द्वंद्व समास
 4. बहुव्रीही समास.

1. अव्ययीभाव समास Avyayibhav samas in Marathi :

मराठी व्याकरण मध्ये ज्या समासाचे पहिले पद हे महत्त्वाचे असते त्या समाजाला अव्ययीभाव समास असे म्हणतात.

अव्ययीभाव समासातील  पहिले पद प्रधान (महव्वाचे) असून असते किंवा अव्यय असते आणि संपूर्ण सामासिक शब्द हा बहुधा क्रियाविशेषण अव्यय असतो.

उदाहरणात :

 1. क्षणोक्षणी- प्रत्येक क्षणाला
 2. प्रतिवर्ष- प्रत्येक वर्षाला किंवा दर वर्षाला
 3. गावोगावी- प्रत्येक गावी
 4. अमरण- मरेपर्यंत
 5. बिनचूक -कोणतीही चूक न करता
 6. दिवसेंदिवस -प्रत्येक दिवसाला
 7. गैरहजर -हजार नसलेला
 8. पावलोपावली- प्रत्येक पावलाला
 9. पदोपदी- प्रत्येक पदाला
 10. दारोदारी- प्रत्येक दाराला

2. तत्पुरुष समास Tatpurush samas in Marathi

ज्या समासात दुसरे पद महत्वाचे असून समासाचा विग्रह करतांना गाळलेला शब्द, विभक्तीप्रत्यय लिहावा लागतो, त्यास तत्पुरुषसमास असे म्हणतात.

ज्या समासात दूसरा शब्द प्रधान / महत्वाचा असतो त्यास तत्पुरुष समास असे म्हणतात.
तत्पुरुष समासाचे सात उपप्रकार पडतात ते पुढीलप्रमाणे-

1. विभक्ती तत्पुरुष समास vibhakti Tatpurush samas in Marathi

विभक्ती तत्पुरुष समासात विभक्ती चा अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दयोगी अव्यया चा लोप करून दोन्हीकडे जोडला जातो.

समासाचा विग्रह करतांना गाळलेला विभक्तिप्रत्यय किंवा गाळलेले शब्द विग्रहामध्ये घालावे लागतात.
उदाहरणार्थ :

 1. सुखप्राप्ती -सुखाला प्राप्त- द्वितीय समास
 2. तोंडपाठ- तोंडाने पाठ – तृतीय समास
 3. भक्तीवश- भक्तीने वश- तृतीय समास
 4. गायरान -गाईसाठी रान- चतुर्थी
 5. ऋणमुक्त – ऋणातून मुक्त- पंचमी तत्पुरुष
 6. स्वर्गवास- स्वर्गातील वास- सप्तमी तत्पुरुष समास
 7. राजवाडा- राजाचा वाडा – षष्टी तत्पुरुष समास
2. कर्मधारय तत्पुरुष समास karmdharay Tatpurush samas in Marathi

कर्मधारय हा तत्पुरुष समासाचाच मूळ प्रकार असून त्यात दोन्ही पदांची विभक्ती प्रथमा असते. त्यात एक पद दुसऱ्या पदाचे विशेषण असते.

कर्मधराया समास मध्ये काहीवेळा दोन्हीकडे विशेषण देखील असू शकतात.

उदाहरणार्थ :

 1. रक्तचंदन – रक्तासारखे चंदन
 2. नीलकमल – निळ्या रंगाचे कमळ
 3. महादेव – महा असा देव
 4. सुवासना – सु अशी वासना
 5. पुरुषोत्तम – पुरुष असा उत्तम
3. द्विगु समास Dwigu samas in Marathi

Dwigu समाजात पहिले पद हे संख्यावाचक विशेषण असून संपूर्ण सामासिक शब्दाला समुदाय वाचक अर्थ प्राप्त होतो.

उदाहरणार्थ :

 1. नवरात्र – नऊ रात्रींचा समूह
 2. त्रिभुवन – तीन भुवनांचा समूह
 3. पंचपाळे – पाच पाळ्यांचा समूह
 4. सप्ताह- सात दिवसांचा समूह
4. मध्यमपदलोपी समास madhyampad lopi samas in Marathi

मध्यमपदलोपी समास विग्रह करतांना दोन पदांतील संबंध दाखवणारे शब्द स्पष्ट लिहून दाखवावे लागतात.

उदाहरणार्थ :

 1. बटाटावडा – बटाटा घालून केलेला वडा
 2. पुरणपोळी- पुरण घालून केलेली पोळी
 3. कांदे पोहे – कांदे घालून केलेले पोहे
5. नत्र तत्पुरूष समास Natra Tatpurush samas in Marathi

नत्र तत्पुरुष समासातील पहिले पद अ, अन् किंवा न असून त्यातून नकार किंवा निषेध व्यक्त होतो. दुसरे पद जर स्वरादी असेल तर पहिले पद अन् हे असते. थोडक्यात नत्र पुरुषा समासातील पहिले पद नकारार्थी करत असते.

उदाहरणार्थ :

 1. अयोग्य- योग्य नसलेला
 2. अनादर -आदर होत नसलेला
 3. नापसंत -पसंत नसलेला
 4. अनाचार- आचार नसलेला
 5. नगण्य – गंण्य नसलेला
6. उपपद तत्पुरुष समास Uppad Tatpurush samas in Marathi

उपपद तत्पुरुष समासातील समासातील दुसरे पद हे धातूपासून तयार झालेले कृदन्ताचे रूप असते. म्हणजे एखाद्या धातूचा एखादा या शिल्लक राहिलेला अर्थपूर्ण शब्द किंवा अक्षर यात असते.

या समाजातील एक दुसरे पद महत्त्वाचे असते, व ते धातुसाधित असते.

उदाहरणार्थ :

 1. हर्षद-हर्ष देणारा,
 2. नाटककार-नाटक लिहिणारा,
 3. पंकज – पंकात जन्मलेले,
 4. जलद-जल देणारा
7. अलोक तत्पुरुष समास Aluk Tatpurush samas in Marathi

ज्या विभक्ती तत्पुरुषात पहिल्या पदाच्या विभक्ती प्रत्ययाचा लोप होत नाही त्या समासाला ‘अलुक् तत्पुरुष समास’ म्हणतात.

उदाहरणार्थ :

 1. युधिष्ठिर अग्रेसर,
 2. पंकेरूह,
 3. कर्तरिप्रयोग,
 4. कर्मणिप्रयोग,
 5. सरसिज.

वरील शब्दाचा पहिला पदांतील अग्रे, युधि, पंके, कर्तरि, कर्मणि सरसि ही त्या त्या शब्दांची संस्कृतमधील सप्तमीची रूपे न गाळता तशीच राहिली आहेत.

3. द्वंद्व समास Dwand samas in Marathi

द्वंद्व समासातील दोन्ही पदे महत्त्वाची असतात व समासामध्ये उभयान्वयी अव्ययांचा वापर केला जातो. थोडक्यात सांगायचे म्हणजे ज्या समासातील दोन्ही पद अर्थदृष्टया समान दर्जाचे असतात. त्यास ‘व्दंव्द समास’ – Dwand Samas in Marathi असे म्हणतात. या समासातील पदे आणि, अथवा, व, किंवा या उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात.

उदाहरणार्थ-

 1. आईबाबा- आई आणि बाबा
 2. राम-लक्ष्मण- राम आणि लक्ष्मण
 3. विटीदांडू- विटी आणि दांडू
 4. पापपुण्य- पाप आणि पुण्य
 5. स्त्रीपुरुष -स्त्री आणि पुरुष

द्वंद्व समासाची तीन उपप्रकार पडतात तुझे पुढील प्रमाणे आहेत :

1. इतरेतर द्वंद्व समास Etretar Dwand samas in Marathi

ज्या समासाचा विग्रह करताना समुच्चयबोधक उभयान्वयी अव्ययांचा उपयोग केला जातो त्यांना इतरेतर द्वंद्व समास असे म्हटले जाते.

उदाहरणार्थ :

 1. आईबाबा- आई आणि बाबा
 2. राम-लक्ष्मण- राम आणि लक्ष्मण
 3. विटीदांडू- विटी आणि दांडू
 4. पापपुण्य- पाप आणि पुण्य
 5. स्त्रीपुरुष -स्त्री आणि पुरुष
2. वैकल्पिक द्वंद्व समास vaikalpik Dwand samas in Marathi

विकल्प म्हणजे दोघांपैकी एकाची निवड करणे त्याचप्रमाणे वैकल्पिक द्वंद्व समास म्हणजे समासाचा विग्रह करत असताना अथवा, किंवा या उभयान्वयी अव्ययांचा वापर केला जातो त्यांना वैकल्पिक द्वंद्व समास असे म्हटले जाते.

उदाहरणार्थ :

 1. तीनचार- तीन किंवा चार
 2. बरेवाईट- बरे किंवा वाईट
 3. खरेखोटे -खरे किंवा खोटे
 4. मागेपुढे -मागे किंवा पुढे
 5. पासनापास- पास किंवा नापास
3. समाहार द्वन्द्व समास samahar Dwand samas in Marathi

ज्या समासातील पदांचा विग्रह करतांना त्यातील पदांचा अर्थशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थाचाही त्यात समावेश म्हणजेच समहार केलेला असतो त्यास समाहार व्दंव्द समास असे म्हणतात

उदाहरणार्थ :

 1. खाणे पिणे- खाणे आणि पिणे ठाणे खाण्याच्या आणि पिण्याच्या अन्य वस्तू
 2. केरकचरा- केलं, कचरा व इतर टाकाऊ पदार्थ
 3. अंथरूणपांघरूण- अंथरण्यासाठी पांघरण्यासाठी लागणारे वस्तू कपडे आणि इतर कपडे
 4. जीवजंतू- जीव, जंतू आणि इतर कीटक
 5. भाजीपाला- भाजी, पाला आणि इतर भाजी चे प्रकार

4. बहुव्रीहि समास Bahuvrihi Samas in Marathi

ज्या समासामध्ये सामासिक शब्दातील दोन्ही पदे महत्त्वाची नसून तिसऱ्या पदाचा उल्लेख होतो त्याच बहुव्रीहि समास असे म्हणतात.

उदाहरणार्थ :

 1. नीलकंठ – ज्याचा कंठ निळा आहे असा (शंकर)
 2. वक्रतुंड – ज्याचे तोंड वक्र आहे असा (गणपती)
 3. दशमुख – ज्याला दहा तोंड आहे असा (रावण)
 4. गजमुख- ज्याचे हत्तीचे तोंड आहे असा (गणपती)

बहुव्रीही समासाचे चार प्रकार पडतात ते पुढीलप्रमाणे :

1. विभक्ती बहुव्रीहि समास vibhakti Bahuvrihi Samas in Marathi :

ज्या समासाचा विग्रह करतांना शेवटी एक संबंधी सर्वनाम येते. अशा सर्वनामाची जी विभक्ती असेल त्या विभक्तीचे नाव समासाला दिले जाते त्याला विभक्ती बहुव्रीही समास असे म्हणतात.

उदाहरणार्थ :

 1. निर्धन- गेले आहेत धडनज्याच्यापासून असा – चतुर्थी विभक्ती
 2. त्रिकोण- तीन कोन असलेला- चतुर्थी विभक्ती
 3. दशमुख – दश आहे मुख ज्याला तो- पंचमी विभक्ती
 4. प्राप्तधन- प्राप्त आहे धन्यवाद ज्यास तो -द्वितीया विभक्ती
2. नत्र बहुव्रीहि समास Natra Bahuvrihi Samas in Marathi

महार समासाचे पहिले पद नकारार्थिक बोध करते त्याला नत्र बहुव्रीहि समास म्हणतात. या समासातील पहिल्या पदात  अ, न, अन, नि अशा नकारदर्शक शब्दांचा वापर केला जातो.

उदाहरणार्थ :

 1. अनन्यसाधारण- साधारण नसलेला‌ तो
 2. अनंत – नाही अंत ज्याला तो
 3. निर्धन – नाही धन ज्याच्याकडे तो
 4. अनियमित – नियमित नाही असे ते
 5. अनाथ- ज्याला नाथ नाही असा तो
3. सह बहुव्रीहि समास sahBahuvrihi Samas in Marathi

ज्या बहुव्रीही समासाचे पहिले पद सह किंवा स अशी अव्यये असून हा सामासिक शब्द एखादा विशेषणाचे कार्य करतो त्यास सहबहुव्रीही समास म्हणतात.

उदाहरणार्थ :

 1. सहकुटुंब- कुटुंबासहित असा जो
 2. सहपरिवार- परिवारा सहित असा जो
 3. सबल- बला सहित असा जो
 4. सफल- फलाने सहित असां जो
 5. सदानंद- आनंदाने सहित असा जो
4. प्रादी बहुव्रीहि समास pradi Bahuvrihi Samas in Marathi

ज्या बहुव्रीही समासाचे पहिले पद प्र, परा, अप, दूर, सु, वि अशा उपसर्गानी युक्त असेल तर त्याला प्रादिबहुव्रीही समास असे म्हणतात.

उदाहरणे :

 1. सुमंगल – पवित्र आहे असे ते
 2. सुवास- चांगला वास आहे असे ते
 3. दुर्वासना- वाईट अशी वासना
 4. सुनयना – सु-नयन असलेली स्त्री
 5. दुर्गुण – वाईट गुण असलेली व्यक्ती
 6. प्रबळ -अधिक बलवान असा तो
 7. प्रगती – चांगली असी गती
 8. विख्यात – विशेष ख्याती असलेला
 9. प्रज्ञावंत – बुद्धी असलेला.

मित्रांनो! आजच्या या आर्टिकल ला तुमच्या इतर मित्रांशी अवश्य शेअर करा जेणे करून त्यांना हि खूप सोप्या पद्धतीने हे माहिती वाचायला मदत होईल… आणि मित्रांनो हा लिखाण ” व्याकरण : समास व समासाचे प्रकार । Samas in Marathi “ तुम्हाला कस वाटलं हे नक्की Comment द्यारे आम्हाला कळवा…

हे हि अवश्य वाचा :

Leave a Comment