Debit Card Information in Marathi मित्रांनो जर तुम्ही तुमच्या स्वतःचे बँक अकाऊंट वापरत असाल तर तुम्हाला एटीएम किंवा डेबिट कार्ड बद्दल नक्कीच माहिती असेल. परंतु जर तुम्ही स्वतःचे नवीन बँक अकाउंट उघडत असाल किंवा यापूर्वी कधीही बँक अकाऊंट वापरले नसेल तर तुम्हाला एटीएम किंवा डेबिट कार्ड बद्दल माहिती असणे खूप गरजेचे आहे.
तसेच तुम्ही बऱ्याच वेळा प्लास्टिकचे छोटेसे कार्ड काही व्यक्तींच्या हातामध्ये नक्कीच पाहिले असेल त्याचा वापर करून आपण आपले पैसे संबंधित सर्व देवाणघेवाण करत असतो त्यामुळे तुमच्या मनामध्ये नक्कीच प्रश्न पडला असेल की हे प्लास्टीकचे कार्ड असते तरी काय?
डेबिट कार्ड म्हणजे काय? । Debit Card Information in Marathi
मित्रांनो आजच्या या लेखांमध्ये आणि तुमच्या मनामध्ये पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तसेच डेबिट कार्ड म्हणजे काय? आणि डेबिट कार्ड ची संपूर्ण माहिती देखील सांगणार आहोत.
Debit Card Information in Marathi
मित्रांनो सध्याच्या युगाला डिजिटल युग म्हटले जाते या युगामध्ये सर्व व्यवहार हे डिजिटल स्वरूपाने ऑनलाईन स्वरूपाने आणि मोबाइल नेट बँकिंगच्या माध्यमातून केले जात आहे.
आजच्या काळामध्ये 90 टक्के कॅश व्यवहार बंद झाले आहेत सर्व ठिकाणी ऑनलाइन व्यवहार सुरू असल्याचे दिसत आहे. त्याचा फायदा म्हणजे देशभरामध्ये ब्लॅक मनी आणि काळाबाजार कमी झाला. बँकेचे सर्व व्यवहार आणि पैशाची देवाणघेवाण काही सेकंदांमध्ये शक्य झाले.
या शिवाय transaction नेट बँकिंग किंवा मोबाइल बँकिंग ने अगदी सेकंदात व्हायला लागले ते सुद्धा एका क्लिक वर.
Online व्यवहारांमुळेमुळे लोकांची वेळ वाचली बँकेमध्ये जाऊन रांगेमध्ये उभारण्याची गरज भासत नाही. त्यातल्या त्यात ATM card, debit card आणि credit card मुळे लोकांना आणखीनच मदत झाली.
परंतु मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड दोन वेगवेगळे आहेत आणि आजच्या या लेखांमध्ये आणि तुम्हाला डेबिट कार्ड ची माहिती सांगणार आहोत.
डेबिट कार्ड म्हणजे काय? । Debit Card Information in Marathi
मित्रांनो, डेबिट कार्ड हे प्लास्टिक मनी कार्ड आहे, ज्याचा वापर आपण एटीएम मशीनमधून पैसे काढण्यासाठी आणि ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी करू शकतो. डेबिट कार्ड थेट आपल्या बचत किंवा चालू bank खात्याशी जोडलेले आहे. ज्याद्वारे आपण बँकेत न जाता आपले पैसे काढू शकतो किंवा ऑनलाईन काही पण खरेदी करू शकतो.
डेबिट कार्ड हे एक पेमेंट कार्ड आहे. डेबिट कार्ड च्या मदतीने आपण ऑनलाइन पेमेंट करू शकतो.जर वापरकर्त्याने काहीपण खरेदी करण्यासाठी या डेबिट कार्ड चा वापर केला, तर त्या कार्डाशी जोडलेल्या खात्यातून(बँक अकाउंट) मधून थेट पैसे कापले जातात किंवा Deduct होतात. जर आपल्याकडे डेबिट कार्ड असेल तर आपल्याला पैसे काढण्यासाठी किंवा बँकेत पैसे घालण्यासाठी प्रत्यक्ष बँकेला जाण्याची आवश्यकता भासणार नाही.
हे डेबिट कार्ड आपल्या bank account सोबत जोडलेले असल्या कारणाने, जेव्हा जेव्हा आपण हे कार्ड वापरून पैसे काढू किंवा एखादे Bill pay करू तेव्हा तेव्हा आपल्या बँकेच्या खात्यातून पैसे कमी होत असतात. यामळे सर्व व्यवहार अगदी लवकर होतात. नेहेमी नेहेमी बँकेत जाऊन line मध्ये उभं राहून, स्लिप भरून पैसे काढण्याचा ताण या डेबिट कार्ड मुळे कमी झाला. ऑनलाईन काही खरेदी केल्यास या कार्ड वर असलेले details भरून आपण ताबडतोब कोणतेही payment अगदी सेकंदात करू शकतो.
डेबिट कार्ड चे प्रकार । Types of Debit Card in Marathi
काढायचे देखील बरेचसे प्रकार पडतात जर तुम्ही बारकाईने निरीक्षण केले असेल तर तुम्हाला कळेल की एखाद्या ठिकाणी ऑनलाइन पेमेंट करत असताना तेथे warning दिलेली असते की येथे पेमेंट केवळ मास्टर कार्ड नेच करावे किंवा विजा card ने करावे त्यामुळे हे देखील डेबिट कार्ड चे प्रकार आहेत चला तर मग जाणून घेऊया डेबिट कार्ड चे प्रकार कोणते?
डेबिट कार्ड चे मुख्य स्वरूपाने पाच प्रकार पडतात ते पुढीलप्रमाणे
- रुपे डेबिट कार्ड
- मास्टर कार्ड
- वीजा डेबिट कार्ड
- मैस्ट्रो डेबिट कार्ड
- कॉन्टैक्टलेस डेबिट कार्ड
1. रुपे डेबिट कार्ड :
Rupay हा डेबिट कार्डचा एक सर्वसामान्य प्रकार आहे बहुतांश व्यक्ती हे रुपये प्रकारचेच डेबिट कार्ड वापरत असतात.
RUPAY CARD हा शब्द Rupay आणि Payment दोन्ही शब्द जोडून तयार करण्यात आला आहे, जेणेकरून त्याचे महत्त्व कळू शकेल की रुपे कार्ड हे पेमेंटशी संबंधित सर्व व्यवहारांच्या क्षेत्रात उपयुक्त असणारे कार्ड आहे. त्याचा उद्देश चेक आणि रोख व्यवहार कमी करणे हा आहे.
2. मास्टर कार्ड :
मास्टर कार्ड हा डेबिट कार्ड चा दुसरा सर्वात महत्वपूर्ण प्रकार आहे ऑनलाइन पेमेंट करण्याच्या दृष्टिकोनातून मास्टर कार्ड खूप महत्त्वाचे समजले जाते. मास्टर कार्ड हे परदेशांमध्ये देखील वापरता येते जगभरातील 210 देशांमध्ये मास्टर कार्ड वापरले जाते म्हणून मास्तर काढला अधिक महत्त्वपूर्ण मानले जाते.
3. वीजा डेबिट कार्ड :
वीजा डेबिट कार्ड डेबिट कार्ड चा एक प्रकार आहे जो आंतरराष्ट्रीय व्यवहारांमध्ये वापरला जातो.
4. मैस्ट्रो डेबिट कार्ड :
मैस्ट्रो डेबिट कार्ड ही आंतरराष्ट्रीय संस्थेद्वारे चालवली जाणारी डेबिट कार्ड सेवा देखील आहे.
5. कॉन्टैक्टलेस डेबिट :
मित्रांनो आपल्यातील बऱ्याच जणांनी या डेबिट कार्ड बद्दल ऐकले देखील नसेल परंतु हा देखील डेबिट कार्डचा एक प्रकार आहे जे बहुतांश व्यक्ती प्रकारचे कॉन्टैक्टलेस डेबिट कार्ड वापरतात.
पीओएस टर्मिनल वर कॉन्टॅक्टलेस डेबिट कार्डचा वापर केला जाऊ शकतो. यामुळे डिजिटल पेमेंट सुरक्षित आणि कॅशलेस पेमेंटसाठी योग्य बनते. हे मुख्यतः लहान पेमेंट करण्यासाठी वापरले जाते.
डेबिट कार्ड चे फायदे । Benefits of Debit Card in Marathi :
डेबिट कार्ड के आजच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वापरले जाणारे कार्ड आहे ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी डेबिट कार्डचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो तसेच डेबिट कार्डचे विविध फायदे आहेत ते पुढीलप्रमाणे :
- डेबिट कार्ड मुळे आपण सर्व व्यवहार ऑनलाइन सर्व पाणी करू शकतो ऑनलाइन पेमेंट करणे सहज शक्य झाले आहे.
- डेबिट कार्ड च्या मदतीने आपण जगात कुठेही असल्यास खात्यातून पैसे काढू शकतो.
- डेबिट कार्डची सुरक्षितता देखील अधिक कडक आहे जर एखाद्या वेळेस आपले कार्ड हरवल्यास असल्यास देखील आपल्याला घाबरण्याची भीती नाही काय आपला पासवर्ड आपल्यालाच माहिती असतो त्यामुळे आपल्या अकाउंट मधून कोणीही पैसे काढण्याची भीती राहात नाही.
- आपल्या खिशात डेबिट कार्ड असल्यास खिशामध्ये भरपूर पैसे न ठेवता चोरीच्या भीतीपासून बिनधास्त राहू शकतो.
- समजा आपण बाहेर आहोत आणि आपण पैसे घरीच विसरला आहात आणि आपल्या कडे जर डेबिट कार्ड असल्यास आपण बाहेर असतानाही हवी ती वस्तू विकत घेऊ शकतो आणि डेबिट कार्डच्या मदतीने बिल देऊ शकतो.
- डेबिट कार्ड मार्फत आपल्याला ईएमआय पर्याय देखील मिळतो ज्याच्या मदतीने कोणतीही वस्तू खरेदी केल्यास पूर्ण पैसे एकत्र न भरता आल्यास, दुकानदार आपल्या आर्थिक गुणवत्तेनुसार ग्राहकाला डेबिट कार्ड वर loan म्हणजेच EMI चा एक पर्याय देऊ शकतो. म्हणजे दरमहा तुमच्या कार्ड मधून आपोआप पैसे कापले जातील.
- डेबिट कार्डच्या मदतीने बिल ( Payment ) भरणे अगदी जलद व सोपे असते.
- आपण डेबिट कार्डच्या मदतीने वीज बिल भरणा लांबलचक रांगेत उभे न राहता घरीच बसून भरू शकतो.
डेबिट कार्ड चे तोटे । Disadvantages of Debit Card in Marathi :
मित्रांनो ज्याप्रमाणे डेबिट कार्डचे फायदे आहेत त्याप्रमाणेच डेबिट कार्ड चे काही तोटे देखील आहेत.
डेबिट कार्ड चे तोटे पुढीलप्रमाणे :
- मित्रांनो जर एखाद्या वेळेस आपले डेबिट कार्ड चोरीला गेले व आपला पासवर्ड चोराला कळाला तर तो आपल्या खात्यातून सहजरीत्या पैसे काढू शकतो.
- प्रत्येक दिवशी डेबिट कार्ड चा वापर करून पैसे काढण्याची किंवा डेबिट कार्ड वापरण्याची मर्यादा असते जर तुम्ही त्याहून जास्त डेबिट कार्ड चा वापर केल्यास काही बँकांकडून यासाठीचे अधिक शुल्क खात्यातून वजा केले जाते.
- जर आपला डेबिट कार्ड चोरीला गेल्यास लवकरात लवकर आपण ते कार्ड ला ब्लॉक करायला हवं. जर तो डेबिट कार्ड आपण ब्लॉक नाही केला तर तो चोर आपला सर्व पैसे काढून घेता येतात. त्यामुळे सावध राहा लगेच बँक ला संपर्क साधून तो डेबिट कार्ड ब्लॉक करा.
- प्रत्येक बँक चा ATM जो असतो तेच बँकेचा ATM चा वापर करावा जर तुमचं खाते SBI मध्ये आणि तुम्ही Axis बँकच्या ATM मधून पैसे काढत असाल तर तुम्हाला एक्सट्रा चार्जेस बसेल.
- ATM मध्ये गरजे पेक्षा जास्त Account Balance चेक करू नये. जर गरजे पेक्षा जास्त Amount चेक करत असाल तर तुम्हाला Charges बसेल.
डेबिट कार्ड कसे काढावे?
मित्रांनो जर तुम्ही बँकेमध्ये स्वतःचे नुकतेच अकाउंट उघडले आहे आणि तुम्हाला डेबिट कार्ड काढायचे आहे तर तुम्ही दोन प्रकारे डेबिट कार्ड काढू शकता एक म्हणजे ऑनलाइन प्रकारे डेबिट कार्ड काढू शकता आणि दुसरे म्हणजे बँकेला प्रत्यक्षरीत्या भेट देऊन डेबिट कार्ड काढू शकत.
1. ऑनलाइन डेबिट कार्ड कसे काढावे?
ऑनलाइन डेबिट कार्ड काढण्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलचा किंवा संगणकाचा वापर करून घरूनच बँकेच्या संकेतस्थळावर ( Bank website ) भेट देऊन अर्ज करावा लागतो. अर्ज केल्यानंतर काही दिवसानंतर आपल्याला आपले डेबिट कार्ड घरपोच मिळते.
2. बँकेला जाऊन किंवा ऑफलाइन पद्धतीने डेबिट कार्ड कसे काढावे?
ऑनलाइन पद्धतीने डेबिट कार्ड काढण्यासाठी आपल्याला बँकेला भेट देऊन एक अर्ज भरून त्याला आधार कार्डची प्रत जोडून बँकेत जमा करावी लागते.
वरील दिलेल्या कोणत्याही पद्धतीचा वापर करून डेबिट कार्ड साठी अर्ज केल्यानंतर काही दिवसानंतर आपण अर्ज करताना दिलेल्या पत्त्यावर डेबिट कार्ड पत्राने येते. या पत्रात आपल्या डेबिट कार्ड बरोबर एक गोपनीय अंक ( Pin code ) असतो. हा गोपनीय अंक आपल्याला डेबिट कार्ड वापरताना लागतो.
मित्रांनो! आजच्या या आर्टिकल ला तुमच्या इतर मित्रांशी अवश्य शेअर करा जेणे करून त्यांना हि खूप सोप्या पद्धतीने हे माहिती वाचायला मदत होईल… आणि मित्रांनो हा लिखाण ” डेबिट कार्ड म्हणजे काय? । Debit Card Information in Marathi “ तुम्हाला कस वाटलं हे नक्की Comment द्यारे आम्हाला कळवा…
हे हि अवश्य वाचा :
- व्याकरण : समास व समासाचे प्रकार । Samas in Marathi
- गोपाल हरी देशमुख माहिती मराठी । Gopal Hari Deshmukh Information in Marathi
- जात वैधता प्रमाणपत्र माहिती । Caste Validity Documents in Marathi
- कॅप्चा म्हणजे काय? आणि कॅप्चा कशासाठी असतो? । CAPTCHA Meaning in Marathi
- क्रियापद : क्रियापद म्हणजे काय? क्रियापदाचे प्रकार । Kriyapad in Marathi