जैवविविधता निबंध मराठी । Jaiv Vividhata in Marathi

Jaiv Vividhata in Marathi आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी जैवविविधता मराठी निबंध घेऊन आलो हा निबंध प्रत्येक विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये तसेच शाळेमध्ये विचारला जातो. विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये मार्क मिळवून देण्यासाठी हा निबंध अत्यंत उपयुक्त ठरेल जैवविविधतेवर निबंध लिहीत असताना आपण कशाप्रकारे निबंध लिहावा याचे देखील वर्णन आजच्या लेखातून तुमच्यासमोर मांडत आहोत. चला तर मग पाहूया, जैवविविधता निबंध मराठी । Jaiv Vividhata in Marathi.

जैवविविधता निबंध मराठी । Jaiv Vividhata in Marathi

आपल्या पृथ्वीचे पर्यावरण संतुलन ठेवण्यासाठी पृथ्वीवर वनस्पती, प्राणी आणि पक्षी यांचे अस्तित्व असणे गरजेचे आहे. जैवविविधता एका विशिष्ट क्षेत्रात एकत्र राहणाऱ्या वनस्पती आणि प्राण्यांचा संदर्भ देत असते. जैव म्हणजेच म्हणजे सजीव किंवा प्राणी वनस्पती पक्षी आणि विविधता म्हणजे वेगळेपणा म्हणजेच प्राणी पक्षी वनस्पती हे सर्व प्राणी एकत्र ज्याठिकाणी राहतात त्यांचे अस्तित्व असते अशा क्षेत्राला जैवविविधता म्हटले जाते. म्हणजेच आपण थोडक्यात म्हणतो की, भीमाशंकर अभयारण्यात विविध प्रकारचे जैवविविधता आढळते.

जैवविविधतेचा सुसंवाद राखण्यासाठी आपल्याला आपल्या पृथ्वीच्या पर्यावरणीय स्थितीशी सुसंगत राहणे महत्वाचे आहे. जैवविविधता, ज्याला आपण जैविक विविधता देखील म्हणू शकतो, जैवविविधता प्रामुख्याने पृथ्वीवर विविध प्रकारच्या वनस्पती, प्राणी आणि पक्षी यांच्या अस्तित्वाशी संबंधित आहे. आपल्या पृथ्वीवर जैवविविधतेची उच्च पातळी असणे अत्यंत महत्वाचे आहे. आणि ही जैवविविधता टिकवण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने प्रयत्न करायला हवा कारण जैवविविधता आहे म्हणूनच आपल्या पृथ्वीवरील पर्यावरण संतुलित आहे

जैवविविधता म्हणजे काय?

जैवविविधता म्हणजे पृथ्वीवर आढळून येणाऱ्या वनस्पती, प्राणी आणि पक्ष्यांचे अस्तित्व होय. याव्यतिरिक्त पृथ्वीवर वनस्पती प्राणी आणि पक्षांच्या विविध प्रजाती आढळून येतात त्यामुळे जैवविविधतेला जैविक विविधता देखील म्हटले जाते. पृथ्वीच्या समतोल राखण्यासाठी पृथ्वीचे वातावरण संतुलित ठेवण्यासाठी जैवविविधता महत्त्वाची ठरते.

सर्व प्रकारच्या वनस्पती आणि प्राण्यांच्या प्रजाती त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करतात यामुळेच पृथ्वीवर समृद्ध जैवविविधता निर्माण होते.

परंतु अलीकडच्या काही काळामध्ये पृथ्वीवरील ही जैवविविधता धोक्यात आली आहे आणि जैवविविधतेचे प्रमाण देखील कमी होत चालले आहे.

जैवविविधता कमी होण्याची कारणे :

मित्रांनो आपल्याला माहिती आहे पृथ्वी वरील जैवविविधता दिवसेंदिवस घटत चालली आहे त्यामागे बरीच कारणे आहेत. जैवविविधता कमी होत गेली तर पृथ्वीवरील सजीव सृष्टी नष्ट होईल.

जैवविविधता कमी होण्याचे मुख्य कारण आहे प्रदूषण. औद्योगिक कारखान्यांमधून सातत्याने होणारे प्रदूषण हे जैवविविधतेला धोका पोहोचवण्याचे मुख्य कारण आहे.

प्रदूषणामुळे वनस्पती आणि प्राण्यांच्या अनेक प्रजाती नामशेष झाल्या आहेत आणि अनेक नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.  सोलापूर जिल्ह्यामध्ये आढळणारा माळढोक हा पक्षी पूर्णता नामशेष झाला आहे यामागचे एकमेव कारण म्हणजे प्रदूषण आणि औद्योगिकीकरण होय.

अशाप्रकारे जैवविविधता नष्ट होण्याचे थांबवले नाही तर एक दिवस पृथ्वीवरील संपूर्ण जैवविविधता नष्ट होईल यामुळे माणसांच्या अस्तित्वा सोबतच वनस्पती, प्राणी आणि पक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात येईल.

जैवविविधता कशा प्रकारे वाढवता येईल?

विविध मार्गाचा अवलंब करून आपण जैवविविधता वाढवू शकतो तर आपल्या पृथ्वीवरील वातावरण संतुलित राहील त्यासोबत अनेक समस्यांना देखील आळा बसेल.

1. प्रदूषण रोखणे :

सर्वप्रथम जैवविविधता वाढवण्यासाठी आपल्याला प्रदूषण रोखणे खूप गरजेचे आहे. प्रदूषणामुळे आणि औद्योगिकीकरणामुळे जैवविविधता कमी होत चालली आहे त्यामुळे प्रथम आपल्याला प्रदूषण रोखणे अत्यंत गरजेचे आहे.

प्रदूषण रोखणे आणि जैवविविधता वाढेल सोबतच आपले पर्यावरण स्वच्छ होईल.

2. वृक्षतोड थांबवणे :

जैवविविधता वाढवण्यासाठी तापलेला वृक्षतोड थांबवून वृक्षारोपण करणे खूप गरजेचे आहे वृक्षतोड केल्याने वृक्षांची संख्या दर कमी होते सोबतच या प्रदेशांमध्ये राहणाऱ्या प्राण्यांची आणि पक्ष्यांची संख्या देखील कमी होते त्यामुळे वाढवण्यासाठी वृक्षतोड थांबवणे गरजेचे आहे.

3. संरक्षित क्षेत्र वाढवणे :

जैवविविधता वाढवण्यासाठी संरक्षित क्षेत्र वाढवणे देखील आवशक्य आहे. संरक्षित क्षेत्र जसे की वन्य जीव अभयारण्य आणि प्राणी संग्रहालय इत्यादींद्वारे जैवविविधतेचे संरक्षण होत असते. म्हणजेच प्राणिसंग्रहालय आणि वन्यजीव अभयारण्यामध्ये प्राण्यांचे व वनस्पतींचे संरक्षण केले जाते अशा ठिकाणी यामधून जैवविविधता वाढविणे सहज शक्य होते. काही ठिकाणी नामशेष होणारे प्राणी , पक्ष्यांना प्राणी संग्रहालय मध्ये त्यांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न केला जातो यामधूनच जैवविविधतेला वाढवण्यास फायदा होतो.

तसेच संरक्षण क्षेत्र वाढल्याने प्राण्यांचे प्रजनन ना देखे वाढते आणि प्राणी नामशेष होत नाहीत त्यांची संख्या वाढण्यास मदत होते.

4. जंगले वाढवणे :

जैवविविधता वाढवण्यासाठी आपल्याला जंगले वाढवणे देखील आवशक्य आहे. अलीकडच्या काळामध्ये औद्योगिकरणामुळे मोठमोठी जंगले तोडून त्या ठिकाणी इमारती बांधल्या आहेत, त्यामुळे जंगलांची संख्या कमी झाली त्या सोबत त्या क्षेत्रामध्ये राहणाऱ्या प्राणी, पक्षी आणि वनस्पती देखील नामशेष झाल्या, त्यामुळे आपल्याला जमले वाढवणे अत्यंत गरजेचे आहे.

जंगलामध्ये प्राण्यांना, पक्ष्यांना राहण्यासाठी आसरा मिळतो. झाडे, झुडपे,‌वेली यादेखील चांगल्या प्रकारे वाढतात त्यामुळे जैवविविधतेचा वाढवण्यासाठी जंगले वाढवणे उत्तम पर्याय ठरू शकतो.

जैवविविधतेचे महत्त्व मराठी :

जैवविविधता आपल्यासाठी खूप महत्त्वाची ठरते या मागचे कारण म्हणजे जैवविविधता पर्यावरण प्रणालीचे संतुलन राखत असते. विविध प्रकारचे प्राणी, पक्षी आणि वनस्पती एकमेकांच्या गरजा पूर्ण करतात आणि त्याच वेळी ते एकमेकांवर अवलंबून असतात.  यामुळे पर्यावरणीय व्यवस्था राखण्यासाठी जैवविविधता अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.

ज्याप्रमाणे अन्नसाखळीमध्ये एक सजीव दुसऱ्याच्या जीवावर अवलंबून असतो त्याप्रमाणे जैवविविधतेमध्ये देखील एक जैविक शृंखला असते यामध्ये एखादा जीव नामशेष झाला तर इतर जीवाचे अस्तित्व देखील धोक्यात येते. शिवाय मनुष्याला देखील पृथ्वीवर आपले जीवन जगण्यासाठी जैवविविधता अत्यंत महत्वाचे आहे मनुष्याला अन्न , पाणी आणि वस्त्र येतात ते वनस्पती मुळे थोडक्‍यात माणसाच्या मूलभूत गरजा पूर्ण होतात त्या निसर्गामुळे आणि वनस्पती, प्राणी पक्षी हे निसर्गाचा मूलभूत घटक आहेत त्यामुळे आपण मनुष्याचे अस्तित्व देखील जैवविविधतेवर अवलंबून आहे.

जर पृथ्वीने आपल्याला अनुकूल असे वातावरण दिले नाही तर आपण पृथ्वीवर कुठल्याही प्रकारचे पिक पिकऊ शकत नाही. आणि याचा परिणाम असा होईल की पृथ्वी या ग्रहावर कोणताही सजीव जिवंत राहणे शक्य राहणार नाही.

त्यामुळे पृथ्वीवर वनस्पती आणि प्राण्यांची जैवविविधता टिकून राहणे, त्यांच्या प्रजाती टिकून राहणे ही काळाची गरज आहे. जैव विविधता नष्ट होण्यापासून रोखण्यासाठी उपाययोजना करायला हवी, आणि प्राण्यांच्या प्रजाती नामशेष होऊ नयेत यासाठी उपाययोजना करायला हवी. शिवाय, पृथ्वीवर होणारे सर्व प्रकारचे प्रदूषण थांबवायला हवे. असे केल्याने प्राण्यांना पक्षांना श्वास घेण्यासाठी ताजी हवा मिळेल व त्यांची जैवविविधता टिकून राहील.

जैवविविधता निष्कर्ष मराठी :

जैवविविधता आपल्या पर्यावरणाचा खूप महत्त्वाचा घटक आहे आणि जैवविविधतेमुळे पर्यावरण संतुलित राहते त्यामुळे जैवविविधतेला टिकून ठेवायचे प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे आपल्यापासून कसल्याही प्रकारचा धोका निर्माण होऊ नये याकडे प्रत्येकाने लक्ष द्यायला हवे.

प्रत्येक वनस्पती आणि प्राण्यांचा पर्यावरणाला राहण्यासाठी योग्य बनवण्याचा एक वेगळा हेतू आहे. म्हणूनच, जर आपल्याला आपल्या पर्यावरणाच्या शुद्धतेच्या उच्च स्तरावर पोहोचायचे असेल तर जैवविविधतेचे संतुलन राखण्यावर आपले लक्ष केंद्रित करावे लागेल.

मित्रांनो! आजच्या या आर्टिकल ला तुमच्या इतर मित्रांशी अवश्य शेअर करा जेणे करून त्यांना हि खूप सोप्या पद्धतीने हे माहिती वाचायला मदत होईल… आणि मित्रांनो हा लिखाण ” जैवविविधता निबंध मराठी । Jaiv Vividhata in Marathi “ तुम्हाला कस वाटलं हे नक्की Comment द्यारे आम्हाला कळवा…

हे हि अवश्य वाचा :

Leave a Comment