Sainikachi Atmakatha Marathi Essay आम्ही तुमच्यासाठी सैनिकाचे आत्मवृत्त मराठी मध्ये घेऊन आलोत.एका सैनिकाचे जीवन हे किती कष्टाने आणि परिश्रमाने हे घडलेले असते या मागची कथा मी या लेखाच्या माध्यमातून तुमच्या पर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करणार आहेत. सैनिक केवळ आपल्या देशाचे रक्षण करतातच सोबत स्वतः च्या परीवारा पासुन दुर स्वतःच्या प्राणाची आहुती देखील देतात. सैनिका हा आपल्या देशाचा अविभाज्य आणि सर्वात महत्त्वाचा घटक आहे.
सीमेवर सैनिक आहेत म्हणून म्हणून आज आपण आपल्या घरामध्ये कशाचीही चिंता न करता सुखी समाधानाने राहत आहोत.
एका सैनिकाचे आत्मवृत्त मराठी निबंध । Sainikachi Atmakatha Marathi Essay
मित्रांनो या लेखाच्या माध्यमातून आणखी एका सैनिकाचे आत्मवृत्त मराठी मध्ये घेऊन आलो या लेखामध्ये दिलेल्या सैनिकाचे आत्मवृत्त तुम्ही परीक्षे मध्ये देखील वापरू शकता.
चला तर मित्रानो पाहूया, Sainik chi Atmakatha in Marathi एका सैनिकाचे आत्मवृत्त मराठी
Sainikachi Atmakatha Marathi Essay एका सैनिकाचे आत्मवृत्त मराठी
मित्रानो मी एक सैनिक आहे आजच्या लेखाच्या माध्यमातून मी तुमच्यासमोर माझे आत्मकथा प्रस्तुत करत आहे.
कोणतेही पद किंवा पदवी प्राप्त करण्यासाठी खूप परिश्रम करावे लागतात त्याप्रमाणेच सैनिक हे पद प्राप्त करण्यासाठी मला देखील खूप कष्ट आणि परिश्रम करावे लागले.
यामध्ये लहान मुले खेळण्याचा विचार करतात त्या वयात मध्ये माझे स्वप्न होते की मी मोठे होऊन सैनिक होऊन आपल्या देशाला शत्रु देशां पासून वाचवावे. म्हणून मी रात्रंदिवस मेहनत सुरू केली. मोठे होऊन सैनिक व्हायचे हे माझे स्वप्न मनामध्ये ठेवून अभ्यास करण्यास सुरुवात केली.
सुरुवातीच्या काळामध्ये मला खूप त्रास सहन करावा लागला कारण घरची परिस्थिती हलाखीची असल्याने माझे शिक्षण करणे हे माझ्या आई बाबांच्या ऐपतीचे नव्हते त्यामुळे मी स्वतः शेजारी असलेल्या हॉटेलमध्ये काम करून स्वतःच्या शिक्षणाचा खर्च करू लागले.
घराची परिस्थिती हलाखीची असतांनाही मी हार स्वीकारली नाही. माझे ध्येय ठरलेले होते की मला सैनिक बनायचे आहे. व यासाठी मी सर्व प्रकारच्या परिस्थितीवर मात करण्याचे ठरवले होते.
जेव्हा मी दहावीची परीक्षा चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झाले तेव्हा मी आई-बाबांना माझ्या सैनिक होणाच्या स्वप्नाबद्दल सांगितले. आई-बाबाही माझी साथ द्यायला सुरुवातीला नकार दिला. परंतु खूप दिवस समजून सांगितल्याने शेवटी आई बाबांचा नकार होकार मध्ये बदलला.
सकाळी उठून अभ्यासासोबत मी व्यायाम करणे, दौंड करणे, मित्रांसोबत मैदानावर जाऊन कसरती करणे यांसारखी कामे करू लागला जेणेकरून लवकरात लवकर माझी सैन्यामध्ये भरती व्हावी.
एक दिवस मी माझ्या मित्राच्या घरी बसून टीव्ही पहात असतांना अचानक टीव्हीवर सैन्य भरतीची बातमी पाहिली. बातमी पहाताच माझ्या चेहऱ्यावर आनंद मावेनासा झाला व मी तुरंत सैन्य भरतीसाठी फॉर्म भरला.
पहिल्याच प्रयत्नामध्ये सैन्याच्या परीक्षेत मला सैन्यात भरती करण्यात आले. अशा प्रकारे सैन्यात भरती होण्याचै माझे स्वप्न पूर्ण झाले परंतु माझ्या आई-वडिलांच्या डोळ्यांमध्ये अश्रू होते. कारण आई बाबांचा मी एकटाच मुलगा होता आणि तोही लाडका त्यांच्यापासून दूर सैन्यामध्ये जाऊन सीमेवर लढणे म्हणजे कोणत्याही आईबाबांसाठी दुःखाची बातमी ना!
कारण माझ्या आई-बाबांना वाटायचे की, सैनिक म्हणजे मृत्यू. कधी युद्ध होईल तर कधी माझ्या मुलाचा मृत्यू होईल असे त्यांना वाटायचे. त्यांनी माझी मेहनत आणि कठीण परिश्रमाचे कौतुक तर केले पण त्यांना या गोष्टीची भीती लागलेली होती. परंतु शेवटी त्यांनीही होकार दिला.
सैन्यात भरती झाल्यावर सुरुवातीला मला सहा महिन्याची ट्रेनिंग देण्याचा निर्णय झाला , मी ट्रेनिंग घेऊ लागलो. मी या प्रशिक्षणादरम्यान खूप कठीण परिश्रम घेतले. माझ्या मेहनती मुळे 4 महिन्यात ट्रेनिंग संपवून माझी पोस्टिंग काश्मीर बॉर्डर वर करण्याल आली. भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये कश्मीरच्या भागासाठी सतत आतंकवादी हल्ले होत होते. काश्मीर खूप अशांत भाग आहे.
येथील आतंकवादी सैन्यासाठी डोकेदुखी बनलेले आहेत. अशा भागामध्ये माझी पोस्टिंग झालेले माझे आई-वडील अधिकच घाबरले. पण तुम्ही माझ्या आईवडिलांना त्यांनी समजून सांगितले की देशाच्या संरक्षण करण्यासाठी आणि देशासाठी काहीतरी करून दाखवण्याची ही मला उत्तम संधी मिळालेली आहे. ती संधी गमावण्याची इच्छा माझी मुळीच नव्हती. मी कश्मीर सीमेवर जाण्यास तयार झालो.
लहानपणीचे आठवी मध्ये बातम्यांमध्ये आतंकवादी हल्ले पाहायचं तेव्हा माझी इच्छा व्हायची की मी देखील शत्रू देशांविरुद्ध लढावे. आपल्या देशाच्या संरक्षणामध्ये हात पायाला आम्हाला आम्ही हे स्वप्न माझे अखेर पूर्ण होण्यास आले होते. कारण आता मी सैन्यामध्ये भरती झालो होतो आणि कश्मीर सीमेवर मला पोस्टिंग देखी मिळालेली होती.
अखेर तो दिवस उजाडला या दिवशी देशाच्या संरक्षणासाठी माझ्या मी येणार होतो माझ्या भारतमातेसाठी मी प्राण द्यायलाही तयार होतो.
26 नोव्हेंबर 2019 ला आम्हाला आदेश मिळाले की काही आतंकवादी आपल्या सीमेत घुसून आले आहेत. आम्ही 20 सैनिकांची तुकडी या आतंकवाद्यांना प्रतिउत्तर देण्यासाठी निघालो. आतंकवादी एका घरात लपून आमच्यावर गोळीबार करत होते. आमच्या तुकडी प्रमुखांच्या आदेशावर मी पुढे गेलो. एका झाडाच्या मागे लपून मी गोळ्या मारू लागलो. माझ्या या गोळीबारात 4 आतंकवाद्यांचा बळी गेला. नंतर माझ्या सोबतींनी 3 आतंकवाद्यांना मारून मिशन पूर्ण केले.
त्यानंतर आम्ही आमच्या तुकडीच्या ठिकाणी परत आलो अशाप्रकारे आणि मिशन पूर्ण केले माझ्या या कारकीर्ती मुळे मला सुभेदार साहेबांच्या हातून पदक देऊन सन्मानित करण्यात आले.
माझ्या आई वडिलांना जेव्हा माझ्या या पराक्रमाबद्दल कळाले तेव्हा त्यांना खूप आनंद आणि अभिमान वाटू लागला. नंतर माझी पोस्टिंग झारखंड बॉर्डर वर करण्यात आली. आता मी देशाच्या सेवेसाठी अधिक मुस्तेद आहे. नेहमी सजग राहून मी देशाच्या सीमेचे रक्षण करीत आहे.
मित्रांनो शेवटी एवढेच सांगायचे आहे की एका सैनिकाचे जीवन हे खूप कठीण असते एका सैनिकांच्या जीवनामध्ये युद्ध कधी येईल आणि कधी प्राण जाईल या गोष्टी सांगता येत नाही. परंतु एक सैनिक आपल्या कुटुंबापासून दुर राहून पूर्ण मनापासून देशाच्या रक्षणासाठी स्वतःचे प्राण देखील द्यायला तयार असतो.
सैनिकाला नेहमीं युद्धासाठी तयार राहावे लागते. सैनिक फक्त शत्रूला मारण्याचे काम करीत नाही तर ते बिकट परिस्थितीत आपल्या देशाचे नागरिक आणि मित्र सैनिकांचे प्राण देखील वाचवतात. डोक्यावर नेहमी मृत्यू असतानाही या गोष्टीचे समाधान असते की आपल्या रक्षणाने देशातील नागरिक सुखरूप आहेत. व देश सेवा हीच मला आणि माझ्या सैनिकांसाठी अभिमानाची गोष्ट असते.
मित्रांनो! आजच्या या आर्टिकल ला तुमच्या इतर मित्रांशी अवश्य शेअर करा जेणे करून त्यांना हि खूप सोप्या पद्धतीने हे माहिती वाचायला मदत होईल… आणि मित्रांनो हा लिखाण ” एका सैनिकाचे आत्मवृत्त मराठी निबंध । Sainikachi Atmakatha Marathi Essay “ तुम्हाला कस वाटलं हे नक्की Comment द्यारे आम्हाला कळवा…
हे हि अवश्य वाचा :
- भगवान श्रीकृष्ण बद्दल संपूर्ण माहिती मराठी मध्ये । Shri Krishna information in Marathi
- सिबिल स्कोर म्हणजे काय? । Cibil Mhanje Kay? Cibil Information in Marathi
- डेबिट कार्ड म्हणजे काय? । Debit Card Information in Marathi
- व्याकरण : समास व समासाचे प्रकार । Samas in Marathi
- गोपाल हरी देशमुख माहिती मराठी । Gopal Hari Deshmukh Information in Marathi