Haripath in Marathi मित्रांनो आपल्याला तर माहिती आहे की महाराष्ट्राच्या भूमीला संतांची भूमी म्हटले जाते महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आणि एकच संत होऊन गेले जसे की संत नामदेव, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर यासारख्या संताने नेहमी समाजप्रबोधन करण्यासाठी प्रयत्न केला. मानवी जीवनामध्ये सुख-शांती-समाधान कसे येईल यांसाठी त्यांनी लोकांना योग्य मार्ग दाखवण्याचा प्रयत्न केला.
Haripath in Marathi । संपूर्ण हरिपाठ मराठी मधून । हरिपाठ संपूर्ण मराठी
त्याप्रमाणेच हरिपाठ आतून देखील आणि संतांनी ईश्वर भक्तीचा महिमा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. आजच्या लेखामध्ये आपण मानवी जीवनाचा अर्थ सांगणारा ‘हरिपाठ’ बद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
चला तर मग पाहूया, ” Sampurn Haripath in Marathi Lyrics And Haripat in Marathi | संपूर्ण हरिपाठ मराठी मधून । हरिपाठ संपूर्ण मराठी “
हरिपाठ म्हणजे काय?
हरिपाठ म्हणजे नेहमी ईश्वराचे नामस्मरण करण्यासाठी केलेली अभंगाची एक रचना आहे. मुख्यता वारकरी संप्रदायामध्ये हरिपाठ आला खूप महत्त्वाचे स्थान आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ आणि संत निवृत्तीनाथ यांनी हरिपाठाच्या अभंगाची रचना केलेली आहे. हरिपाठामध्ये जास्तीत जास्त अभंग हे संत ज्ञानेश्वर यांनी रचलेले आहेत.
Myth: Strength training stops growth MYPROTEIN ™ kettlebell hamstring exercises lnutrition / sports & bodybuilding nutrition shop.हरिपाठाने आपल्या मनावर चांगले परिणाम होतात त्यासोबतच संस्कृतीची जाणीव होते. परंतु आजच्या आधुनिक काळातील तरूण पिढीला हरिपाठा बद्दल पुरेसे ज्ञान आहे आणि हरिपाठ म्हणजे काय हे देखील माहिती नाही.
त्यामुळे आजच्या लेखांमधून काम हे हरिपाठ म्हणजे काय व त्याबद्दल पुरेसी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आजचा काळ देखील आधुनिक, डिजिटल असला तरी देखील आपल्या संस्कृतीची जाणीव करून देणारा आपल्या संस्कृतीला जोपासणारा हरिपाठाचा सर्वांनाच माहिती असते खूप गरजेचे आहे.
संतांनी लिहून ठेवलेल्या आनेक हरिपाठाचे वाचन करून आपण मानवी जीवनाचा खरा अर्थ समजून घेऊ शकतो म्हणूनच हरिपाठाला ” मानवी जीवनाचा अर्थ सांगणारा मंत्र” देखील म्हटले जाते.
त्यामुळे आजच्या लेखामध्ये आम्ही दिलेला हरिपाठ वाचून तुम्ही देखील तुमच्या जीवनाला समर्थन करा व मानवी जीवनाचा खरा अर्थ जाणून घ्या व इतरांना देखील हरिपाठ म्हणजे काय? हे जाणून घेण्यासाठी मदत करा.
हरिपाठ बद्दलची अख्यायिका :
हरिपाठ बद्दल एक आख्यायिका प्रसिद्ध आहे. असे म्हणतात की, एकदा संत ज्ञानेश्वर महाराज समाधिस्त झाल्यानंतर 300 वर्षांनी संत एकनाथ महाराज संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचे दर्शन करण्यासाठी आळंदीला गेले असता संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीस्थळी संत एकनाथ महाराजांना ज्ञानेश्वर महाराजांचे दर्शन झाले. तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी प्रसाद म्हणून किंवा आशीर्वाद म्हणून संत एकनाथ महाराजांचा हरिपाठ दिला.
असे म्हणतात की, हरिपाठाचे रोजच्या जीवनामध्ये पठण केल्यास तुमच्या जीवनात सुख- शांती आहे समाधान प्राप्त होते.
आम्हीदेखील आजच्या लेखात आपण सर्वांसाठी 18 दिवाना रे आम्हाला आशा आहे की, या लेखातील हरिपाठ वाचून तुमच्या जीवनामध्ये देखील सुख – शांती आणि समाधान येईल.
Haripath in Marathi । संपूर्ण हरिपाठ मराठी मधून । हरिपाठ संपूर्ण मराठी
Sampurn Haripath in Marathi Lyrics
— १ —
देवाचिये द्वारी उभा क्षणभरी ।
तेणे मुक्ती चारी साधियेल्या ॥ १ ॥
हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा ।
पुण्याची गणना कोण करी ॥ २ ॥
असोनि संसारी जिव्हे वेगु करी ।
वेदशास्त्र उभारी बाह्य सदा ॥ ३ ॥
ज्ञानदेव म्हणे व्यासाचिये खुणे ।
द्वारकेचा राणा पांडवा घरी ॥ ४ ॥
— २ —
चहू वेदी जाण साही(षट्)शास्त्री कारण ।अठराही पुराणे हरिसी गाती ॥ १ ॥
मंथुनी नवनीता तैसे घे अनंता ।
वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग ॥ २ ॥
एक हरि आत्मा जीवशिवसमा ।
वाया तू दुर्गमा न घाली मन ॥ ३ ॥
ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ ।
भरला घनदाट हरि दिसे ॥ ४ ॥
— ३ —
त्रिगुण असार निर्गुण हे सार ।
सारासार विचार हरिपाठ ॥ १ ॥
सगुण निर्गुण गुणाचे अगुण ।
हरिविण मन व्यर्थ जाय ॥ २ ॥
अव्यक्त निराकार नाही ज्या आकार ।
जेथुनि चराचर हरिसी भजे ॥ ३ ॥
ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी ।
अनंत जन्मानी पुण्य होय ॥ ४ ॥
— ४ —
भावेविण भक्ति भक्तिविण मुक्ति ।
बळेविण शक्ति बोलू नये ॥ १ ॥
कैसेनि दैवत प्रसन्न त्वरीत ।
उगा राहे निवांत शिणसी वाया ॥ २ ॥
सायासे करिसी प्रपंच दिननिशी ।
हरिसी न भजसी कोण्या गुणे ॥ ३ ॥
ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे ।तुटेल धरणे प्रपंचाचे ॥ ४ ॥
— ५ —
योगयागविधी येणे नोहे सिद्धी ।
वायाची उपाधी दंभ धर्म ॥ १ ॥
भावेविण देव न कळे नि:संदेह ।
गुरुविण अनुभव कैसा कळे ॥ २ ॥
तपेविण दैवत दिधल्याविण प्राप्त ।
गुजेविण हित कोण सांगे ॥ ३ ॥ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात ।
साधूचे संगती तरणोपाय ॥ ४ ॥
— ६ —
साधुबोध झाला नुरोनिया ठेला ।
ठायीच मुराला अनुभवे ॥ १ ॥
कापुराची वाती उजळली ज्योति ।
ठायीच समाप्ती झाली जैसी ॥ २ ॥
मोक्षरेखे आला भाग्ये विनटला ।साधूंचा अंकिला हरिभक्त ॥ ३ ॥
ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी ।
हरि दिसे जनी वनी आत्मतत्त्वी ॥ ४ ॥
— ७ —
पर्वताप्रमाणे पातक करणे ।
वज्रलेप होणे अभक्तांसी ॥ १ ॥
नाही ज्यासी भक्ति ते पतित अभक्त ।
हरिसी न भजत दैवहत ॥ २ ॥अनंत वाचाळ बरळती बरळ ।
त्या कैसा दयाळ पावेल हरि ॥ ३ ॥
ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान ।
सर्वाघटी पुर्ण एक नांदे ॥ ४ ॥
— ८ —
संतांचे संगती मनोमार्ग गती ।
आकळावा श्रीपती येणे पंथे ॥ १ ॥
रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा । आत्मा जो शिवाचा रामजप ॥ २ ॥
एकतत्त्व नाम साधिती साधन ।
द्वैताचे बंधन न बाधिजे ॥ ३ ॥
नामामृत गोडी वैष्णवा लाधली ।
योगिया साधली जीवनकळा ॥ ४ ॥
सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला ।
उद्धवा लाधला कृष्ण दाता ॥ ५ ॥
ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ ।सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे ॥ ६ ॥
— ९ —
विष्णुविण जप व्यर्थ त्याचे ज्ञान ।
रामकृष्णी मन नाही ज्याचे ॥ १ ॥
उपजोनि करंटा नेणे अद्वैत वाटा ।
रामकृष्णी पैठा कैसेनि होय ॥ २ ॥
द्वैताची झाडणी गुरुविण ज्ञान ।
तया कैसे कीर्तन घडे नामी ॥ ३ ॥ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान ।
नामपाठे मौन प्रपंचाचे ॥ ४ ॥
— १० —
त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी ।
चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ ॥ १ ॥
नामासी विन्मुख तो नर पापीया ।
हरिविण धावया न पावे कोणी ॥ २ ॥
पुराणप्रसिद्ध बोलिले वाल्मिक ।
नामे तिन्ही लोक उद्धरती ॥ ३ ॥
ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरिचे ।
परंपरा त्याचे कुळ शुद्ध ॥ ४ ॥
— ११ —
हरिउच्चारणी अनंत पापराशी ।जातील लयासी क्षणमात्रे ॥ १ ॥
तृण अग्निमेळे समरस झाले ।
तैसे नामे केले जपता हरि ॥ २ ॥
हरिउच्चारण मंत्र हा अगाध ।
पळे भूतबाधा भेणे याचे ॥ ३ ॥
ज्ञानदेव म्हणे हरि माझा समर्थ ।
न करवे अर्थ उपनिषदा ॥ ४ ॥
— १२ —
तीर्थ व्रत नेम भावेविण सिद्धी ।
वायाची उपाधी करिसी जना ॥ १ ॥
भावबळे आकळे एरव्ही नाकळे ।
करतळी आवळे जैसा हरि ॥ २ ॥
पारियाचा रवा घेता भूमीवरी ।
यत्न परोपरी साधन तैसे ॥ ३ ॥
ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण ।
दिधले संपूर्ण माझे हाती ॥ ४ ॥
— १३ —
समाधी हरिची समसुखेविण ।
न साधेल जाण द्वैतबुद्धी ॥ १ ॥
बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे ।
एका केशवराजे सकळ सिद्धी ॥ २ ॥
ऋद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी ।
जव त्या परमानंदी मन नाही ॥ ३ ॥
ज्ञानदेवी रम्य रमले समाधान ।हरिचे चिंतन सर्वकाळ ॥ ४ ॥
— १४ —
नित्य सत्यामित हरिपाठ ज्यासी ।
कळिकाळी त्यासी न पाहे दृष्टी ॥ १ ॥
रामकृष्ण उच्चार अनंतराशी तप ।
पापाचे कळप पळती पुढे ॥ २ ॥
हरि हरि हरि मंत्र हा शिवाचा ।
म्हणती जे वाचा तया मोक्ष ॥ ३ ॥ज्ञानदेवा पाठ नारायण नाम ।
पाविजे उत्तम निजस्थान ॥ ४ ॥
— १५ —
एक नाम हरि द्वैत नाम दुरी ।
अद्वैत कुसरी विरळा जाणे ॥ १ ॥
समबुद्धी घेता समान श्रीहरि ।
शमदमा वरी हरि झाला ॥ २ ॥
सर्वाघटी राम देहादेही एक ।सूर्यप्रकाशक सहस्त्ररश्मी ॥ ३ ॥
ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नेमा ।
मागिलिया जन्मा मुक्त झालो ॥ ४ ॥
— १६ —
हरिनाम जपे तो नर दुर्लभ ।
वाचेसी सुलभ रामकृष्ण ॥ १ ॥
रामकृष्ण नामी उन्मनी साधिली ।
तयासी लाधली सकळ सिद्धी ॥ २ ॥सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले ।
प्रपंची निवाले साधुसंगे ॥ ३ ॥
ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा ।
येणे दशदिशा आत्माराम ॥ ४ ॥
— १७ —
हरिपाठ कीर्ति मुखे जरी गाय ।
पवित्रचि होय देह त्याचा ॥ १ ॥
तपाचे सामर्थ्य तपिन्नला अमूप ।चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे ॥ २ ॥
मातृ पितृ भ्राता सगोत्र अपार ।
चतुर्भुज नर होऊनी ठेले ॥ ३ ॥
ज्ञानगूढ गम्य ज्ञानदेवा लाधले ।
निवृत्तीने दिधले माझे हाती ॥ ४ ॥
— १८ —
हरिवंश पुराण हरिनाम संकीर्तन ।
हरिविण सौजन्य नेणे काही ॥ १ ॥तया नरा लाधले वैकुंठ जोडले ।
सकळही घडले तीर्थाटन ॥ २ ॥
मनोमार्गे गेला तो तेथे मुकला ।
हरिपाठी स्थिरावला तोचि धन्य ॥ ३ ॥
ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी ।
रामकृष्णी आवडी सर्वकाळ ॥ ४ ॥
— १९ —
नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी ।
पापे अनंत कोटी गेली त्यांची ॥ १ ॥
अनंत जन्मांचे तप एक नाम ।
सर्व मार्ग सुगम हरिपाठ ॥ २ ॥
योग याग क्रिया धर्माधर्म माया ।
गेले ते विलया हरिपाठी ॥ ३ ॥
ज्ञानदेवी यज्ञ याग क्रिया धर्म ।
हरिविण नेम नाही दुजा ॥ ४ ॥
— २० —
वेद शास्त्र पुराण श्रुतीचे वचन ।एक नारायण सार जप ॥ १ ॥
जप तप कर्म हरिविण धर्म ।
वाउगाचि श्रम व्यर्थ जाय ॥ २ ॥
हरिपाठी गेले ते निवांतचि ठेले ।
भ्रमर गुंतले सुमन कळिके ॥ ३ ॥
ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र ।
यमे कुळगोत्र वर्जियेले ॥ ४ ॥
— २१ —
काळ वेळ नाम उच्चारिता नाही ।
दोन्ही पक्ष पाही उद्धरती ॥ १ ॥
रामकृष्ण नाम सर्व दोषा हरण ।
जडजीवा तारण हरि एक ॥ २ ॥
नाम हरि सार जिव्हा या नामाची ।
उपमा त्या दैवाची कोण वानी ॥ ३ ॥
ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ ।
पुर्वजा वैकुंठ मार्ग सोपा ॥ ४ ॥
— २२ —
नित्यनेमनामी ते प्राणी दुर्लभ ।
लक्ष्मीवल्लभ तया जवळी ॥ १ ॥
नारायण हरि नारायण हरि ।
भक्ति मुक्ति चारी घरी त्यांच्या ॥ २ ॥
हरिविण जन्म तो नर्कचि पै जाणा ।
यमाचा पाहुणा प्राणी होय ॥ ३ ॥
ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड ।गगनाहूनि वाड नाम आहे ॥ ४ ॥
— २३ —
सात पाच तीन दशकांचा मेळा ।
एकतत्त्वी कळा दावी हरि ॥ १ ॥
तैसे नव्हे नाम सर्व मार्गा वरिष्ठ ।
येथे काही कष्ट न लागती ॥ २ ॥
अजपा जपणे उलट प्राणाचा ।
तेथेही मनाचा निर्धारु असे ॥ ३ ॥ज्ञानदेवा जिणे नामेविण व्यर्थ ।
रामकृष्णी पंथ क्रमीयेला ॥ ४ ॥
— २४ —
जप तप कर्म क्रिया नेम धर्म ।
सर्वाघटी राम भाव शुद्ध ॥ १ ॥
न सोडी हा भावो टाकी रे संदेहो ।
रामकृष्णी टाहो नित्य फोडी ॥ २ ॥
जात वित्त गोत कुळ शीळ मात ।भजे का त्वरित भावनायुक्त ॥ ३ ॥
ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी ।
वैकुंठ भुवनी घर केले ॥ ४ ॥
— २५ —
जाणीव नेणीव भगवंती नाही ।
हरि उच्चारणी पाही मोक्ष सदा ॥ १ ॥
नारायण हरि उच्चार नामाचा ।
तेथे कळिकाळाचा रीघ नाही ॥ २ ॥तेथील प्रमाण नेणवे वेदांसी ।
ते जीव जंतूसी केवि कळे ॥ ३ ॥
ज्ञानदेवा फळ नारायण पाठ ।
सर्वत्र वैकुंठ केले असे ॥ ४ ॥
— २६ —
एक तत्त्व नाम दृढ धरी मना ।
हरिसी करुणा येईल तूझी ॥ १ ॥
ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद ।वाचेसी सद्गद् जपे आधी ॥ २ ॥
नामापरते तत्त्व नाही रे अन्यथा ।
वाया आणिका पंथा जाशी झणी ॥ ३ ॥
ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी ।
धरोनी श्रीहरि जपे सदा ॥ ४ ॥
— २७ —
सर्व सुख गोडी सर्व शास्त्रे निवडी ।
रिकामा अर्धघडी राहू नको ॥ १ ॥लटिका व्यवहार सर्व हा संसार ।
वाया येरझार हरिविण ॥ २ ॥
नाममंत्र जप कोटी जाईल पाप ।
रामकृष्णी संकल्प धरूनी राहे ॥ ३ ॥
निजवृत्ति काढी सर्व माया तोडी ।
इंद्रियांसवडी लपू नको ॥ ४ ॥
तीर्थ व्रती भाव धरी रे करुणा ।
शांति दया पाहुणा हरि करी ॥ ५ ॥ज्ञानदेवा प्रमाण निवृत्तीदेवी ज्ञान ।
समाधि संजीवन हरिपाठ ॥ ६ ॥
मित्रांनो! आजच्या या आर्टिकल ला तुमच्या इतर मित्रांशी अवश्य शेअर करा जेणे करून त्यांना हि खूप सोप्या पद्धतीने हे माहिती वाचायला मदत होईल… आणि मित्रांनो हा लिखाण ” Haripath in Marathi । संपूर्ण हरिपाठ मराठी मधून । हरिपाठ संपूर्ण मराठी “ तुम्हाला कस वाटलं हे नक्की Comment द्यारे आम्हाला कळवा…
हे हि अवश्य वाचा :
- माणूस हसणे विसरला तर…..? । Manus Hasne Visarla Tar Nibandh Marathi
- लाला लाजपत राय यांची माहिती मराठी । Lala Lajpat Rai information in Marathi
- MS-CIT म्हणजे काय? MS-CIT बद्दल संपूर्ण माहिती आणि । MSCIT Full Form in Marathi
- { 200+ } मराठी समानार्थी शब्द । Samanarthi Shabd in Marathi । समानार्थी शब्द
- मराठी व्यंजन आणि वर्णमाला । Vyanjan in Marath
nice , thank you for this