माणूस हसणे विसरला तर…..? । Manus Hasne Visarla Tar Nibandh Marathi

Manus Hasne Visarla Tar हसणे ही ईश्वराने दिलेली आपल्या आयुष्यातील सर्वात महत्वाची गोष्ट आहे हसल्याने आयुष्य वाढते असे मानले जाते. हासल्याने आपण आपले विचार व्यक्त करतो असे मानले जाते एखाद्या विनोदावर हसणे ही एक प्रकारची प्रतिक्रिया आहे. असले आणि मनातील दुःख कमी होतात आणि आयुष्य वाढले जाते त्यामुळे मन मुक्तपणाने माणसाने हासावेत असे मानले जाते.

परंतु मित्रांनो माणूस हसणे विसरला तर काय होईल? आजच्या या लेखामध्ये आम्ही ” माणूस हसणे विसरला तर निबंध मराठी Manus Hasane Visarala Tar Nibandh Marathi “ घेऊन आलोत.

माणूस हसणे विसरला तर…..? । Manus Hasne Visarla Tar Nibandh Marathi

माणूस हसणे विसरला तर निबंध मराठी Manus Hasne Visarla Tar in Marathi मित्रांनो हास्यही ईश्वराने आपल्या सर्व मनुष्यांना दिलेली मौल्यवान देणगी आहे कारण हासल्याने माणूस निरोगी राहतो मनाचे आरोग्य उत्तम राहते ताणतणाव कमी करण्यास मदत होते खळखळून हासल्यास दीर्घायुष्य देखील लागते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये हसण्याला खूप महत्व आहे.

जगात कुठेही नाही एवढा हास्याचा प्रचंड साठा तुमच्या आमच्या जीवनात आणि सभोवताली असतो;परंतु तो बघण्याची दृष्टी आपणाजवळ नाही ती निर्माण झाल्यास आपले जीवन एकदम बदलून जाईल.
मित्रांनो विचार करा माणसाची जीवन बदलून टाकणारे हे हसणे जर माणूस विसरला तर काय होईल…?

जर माणूस हसणे विसरला तर आपल्या सभोवतालचे संपूर्ण वातावरण शांत, सतत दुखी असलेल्या सबसे कारण हास्य ही अशी शक्ती आहे त्यातून माणूस त्याच्या भावना व्यक्त करत असतो जर हसण्याच नसेल तर माणूस स्वतःच्या भावना व्यक्त तरी करणार कसे?

जेव्हा एखादा व्यक्ती खूप खुश असतो सुखी असतो एखाद्या गोष्टीचा त्याला आनंद झाला असेल तर तो स्वतःच्या चेहर्‍यावर स्मितहास्य आणतो यातून समोरच्याला कळते की तो व्यक्ती आनंदी आहे त्याला एखाद्या गोष्टीचे सुख आहे मग जर हसले नसते किंवा माणूस हसणे विसरला तर एकमेकांच्या भावना समजणार कशा?

हसणे ही एक प्रकारची प्रतिक्रिया आहे जर आपण एखाद्या व्यक्तीकडे बघून हसत असेल किंवा स्मितहास्य देत असेल तर आपण त्या व्यक्तीला पसंत करतो त्याचा अर्थ होतो. आपल्या मनामध्ये समोरच्या व्यक्तीबद्दल काहीतरी चांगले विचार आहेत असे वाटते परंतु माणूस हसणे विसरला तर नेहमी एकमेकांकडे रागाने बघतील. त्यामुळे बरेच गैरसमज देखील होती एकमेकांमध्ये भांडणतंटे यांसारख्या समस्या वारंवार वाढतील.

माणूस हसणे विसरला तर काय होईल ? त्या बाळाचे काय होईल ? लहान वयातील ते बाल ज्याला भावना व्यक्त करण्यासाठी अजून नित बोलताही येत नाही. त्या बाळाकडे स्वताच्या भावना व्यक्त करण्यासाठी फक्त दोनच मार्ग आहेत. हसणे आणि रडणे . जर एखादे बाळ असून आपले भावना व्यक्त करत असत तर त्या बाळाची आई देखील आपल्या बाळाला बघून खुश होते कारण आपले बाळ सुखात आहे की बाळाच्या हसण्याचा वरुन कळते.

माणूस त्याच्याकडे असणारे हसणेच विसरला तर, तो स्वच्या भावना कशा प्रकारे व्यक्त करेल? हसण्यातून ते बाल आईशी संवादच साधत असते. हसणे संपले तर हा संवादाच नष्ट होईल आई बाळाच्या नात्यात खूप मोठे अंतर पडेल. त्या लहानग्या बाळाचा मोठा कोंडमारा होईल.

याप्रमाणे एखादे लहान बाळाचा कोंडमारा होते त्याप्रमाणेच या पृथ्वीवरील संपूर्ण मानव जातीचा देखील कोंडमारा होईल कारण माणूस हसणे विसरला तर तो आपल्या भावना व्यक्त करू शकणार नाही.

हसणे ही एक खूप अनमोल देणगी आहे. आपण कोणत्याही कामात यशस्वी झालो तर आपल्याला अत्यंत आनंद होतो. एखाद्या स्पर्धेमध्ये आपला विजय झला की आपण आनंदित होतो. आपल्या मनासारख्या गोष्ठी घडत गेल्या की आपण त्या आनंदात हरवून जातो. आवडती माणसे भेटली आपले मन प्रफुल्लित होते.  मनाला खूष करण्यासाठी आपण हाच असतो आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी आपण स्मित हास्य देतो हसण्यातून बरेच काही स्पष्ट होते.

माणूस आपल्या भावना व्यक्त करणारे हसणे विसरला तर , प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये आनंदाला किंवा एखाद्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी भावनाच राहणार नाहीत.

हासणे ही भावना व्यक्त करण्यासाठी आपल्याला केवळ यश मिळवणे, मनासारख्या गोष्टी होणे किंवा आवडत्या माणसाला भेटणे गरजेचे नाही बसण्यासाठी आपण एखादा छोटासा विनोद चिटकुला कविता वर देखील वाचून त्यातून आनंद व्यक्त करू शकतो.

म्हणूनच मानवी जीवनामध्ये विनोदाला फार मोठे महत्व प्राप्त झाले आहे.विनोदी नात, विनोदी लेखक, कवी यांना लोकप्रियता मिळते. अपघात, खून मारामाऱ्या, भ्रष्टाचार यांच्या बातम्यांनी भरलेल्या वर्तमानपत्रांमध्ये व्यंगचित्राना मानाचे स्थान मिळते. एक तरी विनोद चुटका छापला जातोच. चार्ली चाप्लिन याने माची जीवनातील सगळी व्यंगे विद्रूपता घालवण्यासाठी विनोदाचा आश्रय घेतला. हसणे नसेल तर विनोदच नष्ट होईल.

विनोदाला कोणी बाप नसतो पण ते सर्व औरस असतात.काही विनोद सहजस्फुर्तीचे आणि काही समयसुचकतेचे द्योतक असतात.अगदी एका शब्दानेही हास्याचे फुलोरे उडताना आपण कित्येकदा अनुभवले असेल.

माणूस हसणे विसरला तर माणसाच्या जीवनातील आनंद सुख शांती समाधान या सर्व भावना देखील नाश पावतील. हास्या शिवाय प्रत्येक व्यक्ती हा शांत आणि रागिष्ट वाटलं म्हणून हास्य हे सुखाचे आनंदाचे प्रतीक आहे. माणूस जगतो तो केवळ सुखासाठी . सुख हाच साऱ्या मानवजातीच्या जगण्याचा आधार असतो. अशा स्थितीत माणूस हसणेच विसरला तर त्याच्या जगण्याचा आधारच नष्ट होईल. त्याचे जीवन कोरडे आणि रसहीन होऊन जाईल.

या जगात आलेल्या प्रत्येक व्यक्ती हासणे हे गरजेचे आहे. त्यामुळे माणूस हसणे विसरला तर हा विचार करण्यातून आपल्याला माणसाच्या जीवनातील हास्याचे महत्त्व कळाले.

जिथे जिथे तणाव आहे तिथे विनोदाची गरज आहे, हास्याची गरज आहे. हास्या मुळे रक्ताला उसळी मिळते.नसानसातून वीज सळसळते मेंदू तल्लख बनते आणि शरीर व्यवस्था ठीकठाक बनते. देवाने माणसाला ज्या देणग्या दिल्या आहेत त्यातील हास्य एक मौल्यवान देणगी आहे.

आणि या देणगीचा उपयोग प्रत्येक व्यक्तीने परिपूर्ण कराला च पाहिजे म्हणजेच जीवनात खळखळून आणि मन भरून हसले पाहिजे.

मित्रांनो! आजच्या या आर्टिकल ला तुमच्या इतर मित्रांशी अवश्य शेअर करा जेणे करून त्यांना हि खूप सोप्या पद्धतीने हे माहिती वाचायला मदत होईल… आणि मित्रांनो हा लिखाण ” माणूस हसणे विसरला तर…..? । Manus Hasne Visarla Tar “ तुम्हाला कस वाटलं हे नक्की Comment द्यारे आम्हाला कळवा…

हे हि अवश्य वाचा :

Leave a Comment