महात्मा ज्योतिबा फुले यांच्या बद्दल संपूर्ण माहिती । Mahatma Jyotiba Phule Information in Marathi

Mahatma Jyotiba Phule Information in Marathi : आपल्या भारत देशाला अनेक समाजसुधारकांचा वारसा लाभलेला आहे. महात्मा ज्योतिबा फुले हे देखील थोर समाजसुधारक आणि विचारवंत होते. महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांना महात्मा फुले या नावाने देखील ओळखले जाते. महात्मा ज्योतिराव फुले हे भारतातील एक सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, जाती विरोधी समाज सुधारक आणि महाराष्ट्रातील एक लेखक होते.

 समाज कार्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी अस्पृश्यता निर्मूलन, जातीव्यवस्था आणि महिलांसाठी शिक्षण अशी आणिक समाजसुधारणेचे कार्य पार पाडली.

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या बद्दल संपूर्ण माहिती । Mahatma Jyotiba Phule Information in Marathi

महात्मा फुले यांच्या प्रत्येक कार्यामध्ये त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले या त्यांच्यासोबत होत्या आणि या सामाजिक कार्यामध्ये त्यांचा देखील महत्त्वाचा वाटा आहे. सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षणाच्या जनक होत्या.

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या बद्दल संपूर्ण माहिती । Mahatma Jyotiba Phule Information in Marathi

संपूर्ण नाव महात्मा जोतीराव गोविंदराव फुले
जन्म ( Birthday )११ एप्रिल १८२७
जन्म ठिकाण कटगुण, सातारा
धर्म हिंदू
आई चिमणाबाई फुले
वडील गोविंदराव शेरीबा फुले
पत्नी सावित्रीबाई फुले
मृत्यू२८ नोव्हेंबर, १८९० (वय ६३)
मृत्यू स्थळ पुणे, महाराष्ट्र

महात्मा फुले यांचा जन्म आणि बालपण :

महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्म 17 एप्रिल 1827 रोजी सातारा जिल्ह्यातील कटगुन या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते. पुढे ज्योतिबा फुले आणि त्यांचा संपूर्ण परिवार कुटगुणहून पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे स्थलांतरित झाला.

महात्मा ज्योतिराव फुले हे केवळ नऊ महिन्याच होते तेव्हा त्यांच्या आईचे निधन झाले. महात्मा ज्योतीबा फुले हे अवघ्या तेरा वर्षाचे होते तेव्हा त्यांचा विवाह सावित्रीबाई फुले यांच्याशी झाला. ज्योतिबा फुले यांचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या गावीच झाले. प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर त्यांनी काही काळ भाजी विक्रेत्या चे काम केले.

त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले माध्यमिक शिक्षणासाठी पुण्यातील स्कॉटिश मिशन हायस्कूल मध्ये प्रवेश घेतला. महात्मा ज्योतिराव फुले हे अभ्यासामध्ये खूप हुशार असल्याने त्यांनी पाच ते सहा वर्षांमध्ये संपूर्ण शिक्षण पूर्ण केले. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या मनामध्ये वडीलधार्‍या माणसांन बद्दल आणि गुरुजनांन बद्दल नेहमी आदर होता. ग्रामची या प्रसिद्ध तत्वज्ञाने महात्मा ज्योतिराव फुले यांना “सेंद्रिय बुद्धिवंत” असे संबोधले आहे. महात्मा ज्योतिराव फुले शाळेमध्ये त्यांचा सर्व अभ्यास मन लावून करात. म्हणून त्यांना शाळेमध्ये नेहमी प्रथम श्रेणीचे गुण प्राप्त होत होते. शाळेची शिस्त प्रिय, हुशार आणि बुद्धिमान व आज्ञाकारी विद्यार्थ्यांचा सन्मान महात्मा ज्योतिराव फुले यांनी मिळविला होता.

महात्मा फुले त्यांचे शैक्षणिक वर्ष पूर्ण करत होते तेव्हा पुण्या मध्ये बरेच फकीर पंत येत होते. चांगले लिहायला व वाचायला येत असणाऱ्या ज्योतिबा फुले यांच्याकडून हे कबीर पंथ नेहमी ” बीज मती” हा ग्रंथ वाचून घेत होते. या ग्रंथातील ज्ञानामुळे महात्मा फुले यांच्या मनावर कबीर यांच्या शिकवणीची बीज ही चांगलीच रुजली होती. महात्मा फुले यांना तर या ग्रंथातील अनेक कबीरांचे दोहे देखील पाठ झाले होते.

महात्मा फुले यांचे कार्य :

महात्मा ज्योतिबा फुले यांनी समाजप्रबोधनासाठी आणि समाज कार्यासाठी काय महत्वाचे योगदान दिले. त्यांनी केलेली आपल्या समाजासाठी जातीव्यवस्था नष्ट करण्यासाठी आणि महिलांसाठी शिक्षण व्यवस्था सुरू करण्यासाठी केलेली कार्य पुढीलप्रमाणे;

शैक्षणिक कार्य :

शिक्षण क्षेत्रामध्ये आमुलाग्र बदल आणि महत्वाचे कार्य करण्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांचा खूपच महत्त्वाचा भाग आहे. महात्मा फुले यांच्या शिक्षणाचे महत्त्व पटवून देणाऱ्या काही महत्त्वाच्या ओळी पुढीलप्रमाणे आहेत.

विद्येविना मती गेली |

मतीविना नीती गेली |

नीतीविना गती गेली |

गतीविना वित्त गेले |

वित्ताविना शूद्र खचले |

इतके अनर्थ एका अविद्येने केले |

बहुजन समाजातील अज्ञान, दारिद्रय आणि समाजातील जातिभेद पाहून महात्मा ज्योतिराव फुले यांनी सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा निश्चय केला. महात्मा ज्योतिराव फुले यांनी इसवीसन 1848 साली पुणे येथील भिडे यांच्या वाड्यामध्ये महाराष्ट्रातील मुलींची पहिली शाळा काढली यापूर्वी मुलींना शिक्षणाचा हक्क दिला जात नव्हता. त्यांनी मुलींच्या शाळेची जबाबदारी आपल्या पत्नी सावित्रीबाई यांच्यावर स्वप्नाली त्यांनी प्रथमता सावित्रीबाई यांना शिक्षण दिले व त्यांना शिक्षिका म्हणून मुलींच्या शाळेमध्ये काम करण्यास सुरुवात केली यानंतर ज्योतिराव आणि अस्पृश्यांसाठी शाळा सुरू केली.

हे देखील अवश्य वाचा : ऑनलाइन शिक्षण निबंध मराठी 

महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिक्षणाची प्रेरणा अहमदनगर मधील मिस फरार यांच्याकडून घेतली होती. तर महात्मा फुले यांनी मुलींच्या शिक्षणाची प्रेरणा त्यांची मावस बहीण सगळा बाई क्षीरसागर यांच्याकडून घेतली. त्यांनीं मुलींच्या शिक्षणासाठी अतोनात प्रयत्न केले त्याचबरोबर अस्पृश्यांची शाळा सुरू करण्यासाठी त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागेल. समाजातील लोकांकडून त्यांच्यावर भयंकर अत्याचार झाला तरीदेखील त्यांनी माघार न घेता मुलींच्या शिक्षणासाठी व अस्पृश्यांच्या शाळांसाठी लढत राहिले.

ज्योतिराव फुले सार्वजनिक ठिकाणी उपदेशपर भाषणे करून लोकांमध्ये जागृती करण्याचा प्रयत्न करीत. तसेच शाळेतील शिक्षकांना आदर्श पाठ देऊन शिक्षकांनी मुलांच्या हिताच्या दृष्टीने योग्य ती साधने आणि उपकरणे उपलब्ध करून द्यावीत म्हणून महात्मा फुले शिक्षकांनाही उत्तेजित करत होते.

महात्मा फुले यांनी एकदा स्थापत्यशास्त्रातील महाविद्यालयातील प्रचाराला कडे सत्यशोधक एक अर्ज केला. या अर्जानुसार, महाविद्यालयामध्ये शिकत असणाऱ्या काही गरीब ब्राह्मण विद्यार्थ्यांना निशुल्क शिक्षण द्यावे अशी विनंती करण्यात आली. आणि या अर्जाचा हेतू देखिल सफल झाला.

समाज कार्य :

महात्मा फुले यांचा समाज कार्यामध्ये महत्त्वाचा वाटा आहे. इसवी सन 1791 मध्ये महात्मा फुले यांनी थॉमस पेन यांनी लिहिलेले मानवी हक्कावर आधारित पुस्तक वाचले आणि या पुस्तकातील ज्ञानाचा त्यांच्या मनावर खोल परिणाम झाला. त्यानंतर सामाजिक न्याय याबाबत त्यांच्या मनामध्ये विविध विचार येऊ लागले. त्यामुळे विषमता दूर करण्यासाठी स्त्री शिक्षण आणि मागासलेल्या जातीतील मुला मुलींच्या शिक्षण यावर त्यांनी लक्ष केंद्रित केले. शिक्षणामुळे समाजातील जातिभेद कमी होईल हा त्यांचा ठाम निश्चय होता.

” कोणताही धर्म ईश्वराने तयार केला नाही आणि चतुर वर्ण आणि जाती भेद ही सर्व निर्मिती मानवाचीच आहे.”

हे वाक्य महात्मा ज्योतिबा फुले रोखठोकपणे बोलत मात्र या विश्वाची निर्मिती करणारी कोणती तरी शक्ती आहे अशी त्यांची विचार साधना होती. सर्व मानवाने मिळून गुण्यागोविंदाने रहावे असे त्यांचे मत होते. महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेल्या ” शेतकऱ्याचा असूड” या पुस्तकातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची विदारक दुर्दशा आणि दारिद्रयाची वास्तवता व्यक्त केली आहे. या पुस्तकाद्वारे विशाल दृष्टिकोनाचा क्रांतीकारक म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांचे दर्शन होते.

” निती हाच मानवी जीवनाचा आधार आहे” विचार मांडणारे ज्योतिबा फुले एक महान व्यक्तिमत्व होते.

महात्मा ज्योतिबा फुले यांनी समाज प्रबोधन करण्यासाठी शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ लिहून सामाजिक प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला.

जातिभेद दूर करण्यासाठी प्रयत्न :

रूढीवादी ब्राह्मण आणि इतर उच्चवर्गीय यांवर ज्योतिरावांनी हल्ला केला, आणि त्यांना “ढोंगी” अशी उपमा दिली. महात्मा ज्योतिबा फुले यांनी उच्च जातीच्या लोकांविरुद्ध तसेच त्यांच्या हुकुमशाही विरुद्ध मोहीम राबवली आणि शेतकरी पाणी सर्वहारा यांना त्यांच्यावरील निर्बंधांचे उल्लंघन करण्याचे आवाहन केले.

महात्मा ज्योतिबा फुले यांनी समाजातील सर्व जातीच्या लोकांसाठी आपले घर उघडले. महात्मा ज्योतिराव फुले हे लैंगिक समानतेवर विश्वास ठेवणारे होते यासाठी त्यांनी आपल्या पत्नी सावित्रीबाई फुले यांना आपल्या प्रत्येक कार्यामध्ये समान सहभाग नोंदवला. यातून त्यांनी स्त्री पुरुष तुलना दूर केली.

ब्राम्हणांना महात्मा ज्योतिराव फुले यांच्या या जातीभेद दूर करण्याच्या प्रयत्नाचा राग आला. त्यांनी फुलेना समाजातील निकष नियमाचे उल्लंघन केले. अनेकांनी त्यांच्यावर ख्रिश्चन मिशनरी च्या वतीने काम केल्याचा आरोप घातला. महात्मा ज्योतिबा फुले त्यांच्या निश्चयावर ठाम उभे राहिले. त्यांनी समाजातील जातिभेद दूर करण्यासाठी आंदोलन केले आणि त्यांचा आंदोलन सफल देखील झाले.

सत्यशोधक समाज :

1873 मध्ये ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. त्यांनी विद्यमान विश्वासाची आणि इतिहासाची पद्धतशीर हाताळणी केली. केवल समानता प्रसारण करणाऱ्या आवृत्तीची त्यांनी पुनर्रचना केली. ज्योतिरावांनी हिंदूचे प्राचीन ग्रंथ वेदांचा तीव्र निषेध केला. महात्मा ज्योतिराव फुले यांनी इतर अनेक प्राचीन ग्रंथाद्वारे ब्राह्मण वादाचा इतिहास शोधून काढला आणि त्याची “शूद्र” आणि “अशुद्र” दडपून त्याचे सामाजिक श्रेष्ठता टिकवून ठेवण्यासाठी शोषक आणि अमानुष कायदे शोधून काढण्याची जबाबदारी घेतली.

महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाचा मुख्य हेतू “समाजाला जातिभेदतून परावृत्त करणे आणि उत्पीडित निम्न जातीच्या लोकांना ब्राह्मण लोकांनी केलेल्या कलंका पासून मुक्त करणे” हा होता.

हे पण अवश्य वाचा : वृक्षारोपण काळाची गरज मराठी निबंध

ब्राह्मणां द्वारे खालच्या जातीचे आणि अस्पृश्य मानल्या जाणाऱ्या सर्व लोकांना “दलित” या शब्दाची नाणी जोडणारे महात्मा ज्योतिराव फुले हे पहिले व्यक्ती होते.

महात्मा ज्योतिराव फुले यांचा शेवट :

संपूर्ण जीवन ब्राह्मणांच्या शोषणापासून अस्पृश्यांना मुक्त करण्यासाठी खर्च करणारे महात्मा ज्योतिबा फुले हे पहिले समाजसुधारक होते. सामाजिक कार्यकर्ते आणि समाज सुधारक होऊन याव्यतिरिक्त महात्मा फुले एक व्यावसायिक देखील होते. अशा या महान समाजसुधारक आला आणि शिक्षणाचे देवता मानल्या जाणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले यांना अठराशे 88 मध्ये झटका आला. आणि 28 नोव्हेंबर 1890 रोजी अशा या महान समाजसुधारकांचे निधन झाले.

मित्रांनो! आजच्या या आर्टिकल ला तुमच्या इतर मित्रांशी अवश्य शेअर करा जेणे करून त्यांना हि खूप सोप्या पद्धतीने हे माहिती वाचायला मदत होईल… आणि मित्रांनो हा लिखाण ” महात्मा ज्योतिबा फुले यांच्या बद्दल संपूर्ण माहिती । Mahatma Jyotiba Phule Information in Marathi “ तुम्हाला कस वाटलं हे नक्की Comment द्यारे आम्हाला कळवा…

Leave a Comment