ऑनलाइन शिक्षण निबंध मराठी | Online Shikshan Nibandh in Marathi

Online Shikshan Nibandh in Marathi : मित्रांनो प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. परंतु अलीकडच्या काळामध्ये वाढत चाललेली गंभीर परिस्थिती म्हणजेच Corona सारख्या गंभीर महामारी सर्व जग ठप्प झाले आहे. अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांचे शिक्षण देखील ठप्प झालेले आहे. काही काळ विद्यार्थी घरीच बसून होते.

महामारी चा धोका दिवसेंदिवस वाढत चालला होता. विद्यार्थ्यांचे नुकसान होत चालले होते आणि महामारी किती दिवस राहणार याचा कोणालाही कल्पना नव्हती. अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण बंद करुन त्यांची जबाबदारी गेला कोण? हा प्रश्न संपूर्ण जगापुढे पडला होता.

ऑनलाइन शिक्षण निबंध मराठी | Online Shikshan Nibandh in Marathi

परंतु ऑनलाईन शिक्षण प्रणाली विद्यार्थ्यांच्या सर्व प्रश्न सोडवले म्हणजेच विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेऊन ऑनलाईन शिक्षण प्रणाली अस्तित्वात आणली. त्याप्रमाणे विद्यार्थी शाळेमध्ये जाऊन प्रत्यक्ष स्वरूप आणि त्यांना घेत होते पण ते कोरोनाचे परिस्थितीला शक्य नसल्याने ऑनलाइन शिक्षण प्रणाली मुळे सर्व काही शक्य झाले.

विद्यार्थी घरबसल्या मोबाईल, कॉम्प्युटर अशा साधनांचा वापर करून घरबसल्या शिक्षण घेऊ लागले. आजच्या ह्या लेख मध्ये आपण ऑनलाइन शिक्षण मराठी निबंध | Online Education Essay in Marathi पाहणार आहोत.

ऑनलाइन शिक्षण निबंध मराठी | Online Shikshan Nibandh in Marathi

2020 मध्ये आलेल्या Corona महामार्गामुळे सर्व जण जागीच थांबली अशा परिस्थितीमध्ये ऑनलाइन शिक्षण प्रणाली प्रसारित झालेले विद्यार्थी गर्दीतला आपला अभ्यास करू लागले मोबाईल, लॅपटॉप, कम्प्युटर, टॅब यासारख्या साधनांचा वापर करून विद्यार्थी घर बसल्या शिक्षण घेऊ लागले. या प्रकारच्या शिक्षणालाच ऑनलाइन शिक्षण तेव्हा डिजिटल शिक्षण असे म्हटले जाते.

आज प्रत्येक विद्यार्थी मोबाईल आणि संगणकावर शिकू लागलेला आहे तेही ऑनलाईन क्लासच्या निमित्ताने! शिक्षक देखील विद्यार्थ्यासोबत मोबाईल लॅपटॉप आणि इतर सॉफ्टवेअर च्या माध्यमाने एकमेकांशी जोडत आहेत, आणि विद्यार्थी देखील शिक्षकांना सर्व प्रश्न विचारत आहेत आणि शिक्षक देखील अतिशय सोयीस्कर रित्या विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देत आहेत.

जसे शाळेत शिकवले जाते त्या पद्धतीतच ऑनलाईन देखील शिकवता येऊ शकते, याचा परिचय सर्वांना येऊ लागला आहे. त्यामुळे आजच्या काळाच्या विद्यार्थ्यांना वर्गामध्ये जाऊन शिकण्यापेक्षा घर बसल्या शिक्षण घेणे अधिकच पसंत येत आहे.

ऑनलाईन शिक्षण हे असे माध्यम आहे ज्याद्वारे देशातील आणि जगाच्या कोणत्याही कोपर्यातून शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांसह ऑनलाइन संपर्क साधू शकतात. इयत्ता पहिली पासून ते पदवी पर्यंतचे सर्वच विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणाचा अनुभव घेऊ शकतात.

शिक्षक सॉंग गुगल मॅप आणि इतर माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत संपर्क साधतात व विद्यार्थी लॅपटॉप, संगणक या सारख्या साधनांचा वापर करून ऑनलाइन पद्धतीचे शिक्षण घेतात. आजच्या इंटरनेट जन्मले जातात त्याप्रमाणेच ऑनलाइन किंवा डिजिटल शिक्षण घेण्यासाठी इंटरनेट आणि एखादी माध्यम म्हणजे कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप केवळ इत्यादी गोष्टींची आवशक्यता भासते. शिक्षक मुलांना शिकविण्यासाठी आपल्या संगणकावरील स्क्रीन शेयर करतात जेणेकरुन मुलांना उत्तम प्रकारे समजू शकेल.

Online Shikshan Nibandh in Marathi

लॉकडाउनच्या क्षणी असे वाटले की, आता सर्व काही बंद झाले कित्येक वर्षे विद्यार्थ्यांचे असेच नुकसान होईल परंतु ऑनलाईन शिक्षकांनी सर्वांना आश्चर्य चकित करून टाकले. ऑनलाईन शिक्षणामुळे आज मूल घर बसल्या शिकू शकत आहेत, आज जगभरातील मुले ऑनलाइन शिक्षणाद्वारे सहजपणे अभ्यास करण्यास सक्षम आहेत. ऑनलाइन शिक्षण मिळविण्यासाठी चांगल्या आणि जलद इंटरनेट कनेक्टिव्हिटीची आवश्यकता असते. आजच्या कोरुना काळामध्ये विद्यार्थी जरी महाविद्यालयामध्ये शाळेमध्ये जाऊन शिक्षण घेऊ शकत नसले तरी देखील विद्यार्थी घर बसल्या विद्यार्थी शिक्षण घेऊ शकत आहेत.

ऑनलाईन शिक्षण म्हणजे नक्की काय?

पूर्वीच्या काळामध्ये ऑनलाइन शिक्षण किंवा डिजिटल शिक्षण हे केवळ एक कल्पना च होती. परंतु सध्याच्या काळामध्ये ऑनलाइन शिक्षण हेच सत्यात उतरले आहे. ज्या प्रमाणे विद्यार्थी शाळेमध्ये जाऊन प्रत्यक्ष रूपाने शिक्षकां समोर बसून ब्लॅक बोर्ड वर पुस्तकाच्या माध्यमाने शिक्षण घेत होता तेच शिक्षण आत्ता इंटरनेटच्या माध्यमाने घरबसल्या लॅपटॉप, कॉम्प्युटर, मोबाईल यांसारख्या साधनांवर होत आहे यालाच ऑनलाइन शिक्षण किंवा शिक्षण प्रणाली असे म्हटले जाते.

कोरोना कालावधीत लॉकडाऊन लागले होते म्हणून सर्व शाळा आणि महाविद्यालय बंद होते या परिस्थितीत विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाईन शिक्षण ची खूप गरज वाढली होती.

ऑनलाईन शिक्षण घेण्याकरिता तुम्हाला कोणत्या साधनांची गरज भासेल?

ऑनलाईन शिक्षण घेण्याकरिता आपल्याला कोणत्याही जास्त साधनांची गरज भासणार नाही. ऑनलाईन शिकण्यासाठी आपल्याला केवळ जलद इंटरनेट कनेक्शन,   मोबाईल, लॅपटॉप, टॅब किंवा संगणक  इत्यादी साधनांची आवश्यकता भासते. याशिवाय, ऑनलाइन लेक्चर मध्ये स्वतःची प्रेझेंटी लावण्यासाठी किंवा ऑनलाईन लेक्चर चा अनुभव घेण्यासाठी तुम्हाला झूम, गुगल मेट यांसारखे ॲप्स ची गरज लागते.

ऑनलाईन शिक्षण काळाची गरज :

मित्रांनो आजच्या काळामध्ये ऑनलाईन शिक्षणाला काळाची गरज म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही कारण कोरोना व्हायरस ने संपूर्ण जगाची जीवनशैली बदलून ठेवलेली आहे. जागोजागी लोक डाऊन होऊन संपूर्ण जग तर बंद झाले त्यासोबत शाळा, महाविद्यालय देखील बंद झाली.

आशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेऊन ऑनलाईन शिक्षण प्रणाली अस्तित्वात आणली. विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम थांबवता येणार आहे व विद्यार्थ्यांचे नुकसान करून चालणार नाही या सर्वांचा विचार करून ऑनलाईन शिक्षण हाच पर्याय सर्वांच्या समोर उरला.

ज्या विद्यार्थ्यांनी कधी मोबाईल, कम्प्युटर, लॅपटॉप अशा गोष्टी हाताळला नव्हता ते विद्यार्थी आज घर बसल्या अशा माध्यमांचा वापर करून शिक्षण घेत आहेत. त्यामुळे अलीकडच्या पिढीला अधिक ज्ञान मिळाले त्यासोबत त्यांच्या शिक्षणाचे नुकसान देखील झाले नाही.

वेगवेगळ्या माध्यमातून शिक्षण घेत असल्याने विद्यार्थ्यांना त्या माध्यमातून भरपूर माहिती मिळते.

ऑनलाईन माहितीचा फायदा म्हणजे एखादी गोष्ट समजली नाही तर ती आपण परत परत पाहून ऐकून समजून घेऊ शकतो.

कोरोना चा प्रसार जरी वाढला तरी देखील विद्यार्थ्यांच्या शिक्षण थांबवता येणार नाही व त्यांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ नये त्यामुळे ऑनलाईन शिक्षण काळाची गरज होत चालले आहे.

ऑनलाईन शिक्षणाचे फायदे :

ऑनलाइन शिक्षणाचे महत्त्व फायदे आहेत ते पुढील प्रमाणे-

1. देशभरात पसरलेल्या कोरोनाच्या संकटामध्ये विद्यार्थ्यांना घराच्या बाहेर न पडता घरबसल्या शिक्षणाचा लाभ घेता येत आहे. या शिक्षणामुळे दूर शाळा असलेल्या विद्यार्थ्यांचा बसा प्रवासाचा खर्च वाचत आहे. याशिवाय विद्यार्थ्याची ऊर्जा आणि वेळ देखील वाचत आहे.

2. ऑनलाइन शिक्षण घेताना आपल्याला इतर कोणत्याही गोष्टींची गरज भासत नाही. जसे की, स्कूल बॅग, पेन, वही त्यामुळे आपला आपला आर्थिक खर्च वाचतो.

3. ऑनलाईन शिक्षण प्रणाली मध्ये आपला वेळ वाचला जातो. विदेशात जावून शिक्षण पूर्ण करणारी इच्छा असणारे विद्यार्थी पण आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने ते पूर्ण न करणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षकांचा पुरेपूर लाभ होत आहे.

4. तसेच या महाविद्यालयापासून दूर राहणारे विद्यार्थी किंवा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण आणि खूपच मदत झालेली आहे. त्या विद्यार्थ्यांच्या वेळेची बचत, पैशाची बचत आणि त्यांची शारीरिक ऊर्जेची बचत देखिला होत आहे.

5. जर ऑनलाईन वर्गाच्या वेळी विद्यार्थ्याला एखादा मुद्दा स्पष्टपणे समजला नसेल तर तो शिक्षकांना पुन्हा तो मुद्दा सांगण्यास सांगू शकतो. याशिवाय विद्यार्थ्याला कोणताही टॉपिक जर समजत नसेल तर तो रेकॉर्ड केलेल्या लेक्चर ला पुन्हा पाहू शकतो.

6. ऑनलाईन शिक्षणाद्वारेच विद्यार्थ्यांनी घरीच अभ्यास पूर्ण केला. घरातच शिक्षण मिळवून ती कोरोनाच्या धोक्यातून हि वाचली आणि शाळा व महाविद्यालयात जाण्याच्या त्रास व खर्च वाचला.

ऑनलाईन शिक्षणाचे तोटे :

ज्याप्रमाणे ऑनलाईन शिक्षणाचे फायदे आपण वर पाहिले आहे त्याप्रमाणे ऑनलाईन शिक्षणाच्या तोटे देखील आहेत ते पुढीलप्रमाणे-

1. ऑनलाइन शिक्षण घेण्यासाठी आपल्याला जलद इंटरनेट कनेक्टिव्हिटी, मोबाइल लॅपटॉप यासारख्या साधनाची आवश्यकता भासते. ती साधने खूपच खर्चिक आहेत व गरीब विद्यार्थ्यांना ते घेणे शक्य नाही.

2. मोबाईल, लॅपटॉप समोर कित्येक तास ऑनलाईन अभ्यास करताना विद्यार्थ्यांना डोळ्यावर ताण निर्माण होत आहे यातून डोळ्यांचे विकार यासारख्या समस्या समोर येत आहे.

3. ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्तपणा राहिला नाही.

4. तसेच विद्यार्थी अभ्यासाकडे योग्य लक्ष देतात का नाही हे शिक्षकांना बघणे शक्य नाही. त्यामुळे विद्यार्थी भे कित्येकदा ऑनलाइन तास चालू ठेवून खेळ खेळणे, जेवण करणे असे कृत्य करताना पाहायला दिसते.

5. ग्रामीण भागामध्ये ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कित्येकदा नेटवर्क प्रॉब्लेम येतो. त्यामुळे व्यवस्थित आवाज न येणे, चित्र व्यवस्थित न दिसणे अशा समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

मित्रांनो! आजच्या या आर्टिकल ला तुमच्या इतर मित्रांशी अवश्य शेअर करा जेणे करून त्यांना हि खूप सोप्या पद्धतीने निबंध लिहायला मदत होईल… आणि मित्रांनो हा निबंध ” ऑनलाइन शिक्षण निबंध मराठी । Online Shikshan Nibandh in Marathi । ऑनलाइन शिक्षण फायदे व तोटे मराठी निबंध “ तुम्हाला कस वाटलं हे नक्की Comment द्यारे आम्हाला कळवा…

Leave a Comment