एवोकॅडो म्हणजे काय? एवोकॅडो खाण्याचे फायदे आणि नुकसान । Avocado in Marathi

Avocado in Marathi मित्रांनो आजच्या धावपळीच्या काळात निरोगी शरीर आणि चांगल्या आरोग्यासाठी पोषक आहार खाने खूप आवश्यकता आहे शरीराला पोषण मिळण्यासाठी फळे खूप फायद्याचे ठरतात कारण फळांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पोषकतत्व आपल्याला मिळतात. सुपर फूड म्हणून ओळखले जाणारे एवोकाडो हे एक अशाच प्रकारचे फळ आहे याच्या सेवनाने निरोगी शरीर आणि चांगले आरोग्य मिळण्यास मदत होते.

एवोकॅडो म्हणजे काय? एवोकॅडो खाण्याचे फायदे आणि नुकसान । Avocado in Marathi

जगभरातील लोकप्रिय फळांमध्ये एवोकाडो फळांचा समावेश केला जातो. तसेच या फळांचा सामावेश औषधी मध्ये देखील केला जातो म्हणून आजच्या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला Avocado फळा बद्दल संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत चला तर मग पाहूया, Avocado in Marathi | एवोकॅडो काय आहे आणि फायदे.

Avocado in Marathi । एवोकॅडो काय आहे आणि फायदे

मित्रांनो आपण बऱ्याच वेळा एवोकाडो फळाबद्दल माहिती असेल किंवा त्या पाड्याला चित्रांमध्ये किंवा प्रत्यक्ष रूपाने देखील पाहिले असेल तरीदेखील

बहुतेक लोकांचा एवोकॅडो बद्दल गोंधळ होतो, म्हणजे confused होतात की हे फळ आहे की भाजी आहे?
तर, आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, आशिकीएवोकॅडो हे एक फळ आहे.

Avocado फळाच्या चवीबद्दल सांगायचे झाले तर एवोकॅडो खारट आणि गोड या दोन्ही स्वरूपात उपलब्ध आहे. एवोकॅडोमध्ये उच्च प्रमाणात फॅटी ऍसिड्स असतात आणि त्यात कोलेस्टेरॉलची पातळी खूप कमी असते. 

बरेचशे लोक जास्त कॅलरीमुळे एवोकॅडो खाणे टाळत असतात कारण त्यांना असे वाटते की avocado खाल्ल्याने त्यांचे वजन वाढू शकते, परंतु हे खरं नाही, एवोकाडोमध्ये कॅलरीचे प्रमाण लोणी आणि इतर उच्च-कॅलरीयुक्त आहारापेक्षा खूपच कमी असते.

तुम्हाला Avocado या फळा बद्दल थोडीशी माहिती झालीच असेल आता आपण या फळाला मराठी भाषेमध्ये काय म्हणतात जाणून घेऊया.

Avocado Meaning in Marathi । Avocado फळाचे मराठी नाव

Avocado in Marathi: एवोकॅडो या फळाला एलीगेटर नाशपाती (Alligator Pears) म्हणूनही ओळखले जाते, म्हणजे मराठीमध्ये या फळाला ॲलिगेटर नासपती या नावाने ओळखले जाते.
Avocado फळ दिसायला प्रामुख्याने मगरीच्या त्वचेसारखे असते. एवोकॅडो हे फळ एवोकॅडो नावाच्या झाडापासून मिळते जे सुमारे 65 फूट उंच असू शकते.

पूर्वी एवोकॅडो उत्पादन केवळ पूएब्ला (Puebla) आणि मेक्सिको (Mexico) या दोन्ही देशांमध्ये चं मधेच घेतले जात होते, परंतु आरोग्यासाठी मिळणाऱ्या विविध फायद्यांमुळे, आज बर्‍याच देशांमध्ये या फळाचे उत्पादन घेतले जाते.

या फळाची त्वचा खूप जाड असल्यामुळे यावर कीटकनाशकांचा प्रभाव पडत नाही त्यामुळे तुम्हाला कधीही सेंद्रिय एवोकॅडो खरेदी करण्याची गरज नाही, कारण कीटकनाशकांच्या फवारणीचा या फळावर परिणाम फार कमी होतो.

एवोकॉडो फळ कसे असते?

Avocado हे फक्त दिसायला नासपती प्रमाणे असते परंतु हे फळ नासपती नसते केवळ दिसायला नासपती सारखे असते.या फळाच्या आत एक मोठी बी असते. फळाच्या वरच्या भागावरील साल टणक असते. एवोकॅडो चा रंग पिवळा व हिरवा असतो. या फळाचा स्वाद हलका मेवेदार असतो, म्हणून सॅंडविच, सलाद आणि मिल्क शेक म्हणून याला वापरले जाते.

Avocado फळांमधले पोषकतत्व Nutrition in Avocado in Marathi

एवोकाडोमध्ये monounsaturated फॅटी ऍसिड्स चा एक चांगला स्त्रोत आहे व यात साखर अगदी कमी प्रमाणात असते. याव्यतिरिक्त, हा नैसर्गिक ऊर्जेचा एक चांगला स्रोत आहे व यात बरेच आवश्यक जीवनसत्त्वे आणि विटामिन आहेत.

अ‍व्होकाडोमध्ये कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम, तांबे, मॅंगनीज, फॉस्फरस आणि झिंक असते

एवोकॉडो फळाचे फायदे Benefits of Avocado in Marathi

Avocado फळांमध्ये आढळणाऱ्या पौष्टिक तत्वां मुळे हे फळ आरोग्यासाठी खूपच फायद्याचे ठरते. म्हणून आजचा लेखाच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासाठी एवोकाडो फळाचे फायदे – Benefits of Avocado in Marathi घेऊन आलो पुढील प्रमाणे आहेत.

1. हृदयासाठी एवोकॅडो चे फायदे

मित्रानो आजच्या धावपळीच्या काळामध्ये बऱ्याच लोकांना आपण ह्रद्य संबंधीच्या गंभीर समस्या उद्भवतात पहात असतो त्यामुळे अशा समस्यांवर मात करण्यासाठी आणि हृदयाचे स्वास्थ कायम ठेवण्यासाठी आणि हृदय रोग संबंधित जोखीम दूर करण्यासाठी एवोकॅडो चे सेवन उपयुक्त आहे. . एवोकॅडो मध्ये वाढलेले कोलेस्ट्रॉल आणि ब्लडप्रेशर कमी करणारे गुणधर्म असतात. जे हृदयाच्या आरोग्यासाठी देखील उपयुक्त ठरतात.

2. पचन सुधारण्याकरिता एवोकॅडो चे फायदे

एवोकॅडो हे आतड्यासाठी खूप गुणकारी आहे. म्हणून पचन सुधारण्यासाठी ह्याचे अनेक लाभ आहेत. यामध्ये असलेले फायबर आतड्यांमध्ये असलेले चांगले बॅक्टेरिया वाढवते. त्यामुळे पचन सुधारते व आरोग्य चांगले राहते.

3. तोंडाचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी एवोकाडो चे फायदे

Avocado फळाचे सेवन केल्यास तोंडाचे आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत होते म्हणजेच तोंडाची दुर्गंधी टाळता येते जी अपचन आणि पोट दुखी च्या समस्यांमुळे येत असते.

एवोकॅडोमध्ये आढळणारे अँटीबैक्टीरियल आणि अँटीऑक्सिडंट फ्लेव्होनॉइड्स आपल्या तोंडातील बॅक्टेरिया नष्ट करतात ज्यामुळे श्वास घेतांना दुर्गंधी येऊ येत नहीं याव्यतिरिक्त, एवोकॅडो तोंडाचा कर्करोग देखील रोखू शकतो.

4. डोळ्याचे विकार दूर करण्यासाठी avocado फळाचे फायदे

एवोकॅडो तुमचे डोळे निरोगी ठेवण्यात मदत करतात. यामध्ये लेटेन आणि झेक्सॅन्थिन सारख्या कॅरोटीनोइड्स आहेत, जे डोळ्यांचे मोतीबिंदू, वया-संबंधित डोळ्यांचे रोग आणि मॅक्युलर डीजेनेरेशनपासून आपले डोळे संरक्षित करण्यात मदत करतात.

त्यामुळे avocado चे सेवन डोळ्या संबंधित विकार दूर करण्यास फायद्याचे ठरते.

5. त्वचेचे आरोग्य आणि केसांसाठी एवोकाडो फळाचे फायदे.

एवोकाडो फळांमध्ये खनिजांचा आणि विटामिन चा साठा विपुल प्रमाणात असतो त्यामुळे त्वचेचे आरोग्य आणि केसांचे आरोग्य निरोगी साठी avocado खूप फायद्याचे ठरतात. तुम्ही नियमितपणे avocado फळाचे सेवन केल्यास किंवा खाल्ल्याने तुमची कोरडी आणि क्षतिग्रस्त त्वचा सुधारेल. एवोकॅडो च्या या गुणधर्मामुळे याचा उपयोग अनेक सौंदर्य प्रसाधनात केला जातो.

याव्यतिरिक्त एवोकाॅडो फळांमध्ये विटामिन ए, बी, बी 1, बी 2 आणि सी इत्यादी असतात. या सर्व तत्वांच्या असल्याने केसांचा विकास जलद होतो. म्हणून केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी देखील एवोकॅडो उपयोगी ठरू शकते.

6. यकृत संबंधित आरोग्य सुधारण्यासाठी Avocado फळाचे फायदे

Avocado हे फळ सर्वच दृष्टीने आपल्या आरोग्यासाठी खूप फायद्याचे असते त्यातल्या त्यात यकृत उत्तम संबंधित आरोग्य सुधारण्यासाठी या फळाचे फायदे अधिकच आहे.

यकृताची होणारी हानी कमी करण्यास हे फळ खूप चांगले आहे. यात काही सेंद्रिय संयुगे आहेत जे यकृताचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. यकृताचे नुकसान सामान्यत: हेपेटायटीस- सी मुळे होते.

7. वजन कमी करण्यास मदत

मित्रांनो जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल किंवा लठ्ठपणा अति वजन वाढते यांसारख्या समस्यांना तोंड देत असाल तर यावर avocado फळ रामबाण उपाय ठरेल.

नियमित व्यायामासह निरोगी व सकस आहार घेतल्यास वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते. त्याच बरोबर जर आहारात तुम्ही एवोकॅडो चा समावेश केला तर त्याचे परिणाम लगेच दिसून येतात.

एवोकॅडो हे फळ शरीराला पौष्टिक मूल्य प्रदान करतात आणि वजन नियंत्रणास मदत करतात.

8. कॅन्सर सारख्या समस्यावर Avocado हे फळ फायदेशीर

एवोकाडो या फळांमध्ये अंटीकँसर गुणधर्म असतात जे तुम्हाला कॅन्सर सारख्या गंभीर समस्या पासून वाचवण्यास मदत करतात. विशेषता स्तन कर्करोग आणि प्रोस्टेट कर्करोगाचा धोका कमी होतो.एवोकॅडोमध्ये कॅरोटीनोईड्स आणि मोनोअनसॅच्युरेटेड फॅट असतात, हे दोन्हीही कर्करोगाच्या धोका कमी करण्यास महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.

अ‍ॅव्होकॅडोमध्ये ग्लूटाथिओन देखील आहे, जो अँटीऑक्सिडेंट आहे जो कर्करोगाच्या पेशी आणि मुक्त रॅडिकल्सच्या धोकादायक प्रभावांपासून रक्षण करतो.

Avocado फळाचे दुष्परिणाम side effects of avocado in Marathi

मित्रांनो ज्याप्रमाणे avocado फळाचे फायदे आहेत त्याप्रमाणे त्याचे काही दुष्परिणाम देखील आहेत.

  1. जर अति प्रमाणामध्ये या फळाचे सेवन केले असल्यास तुम्हाला उलट्या येण्याची शक्यता आहे.
  2. जर एखाद्या व्यक्तीला या फळाची इंग्रजी असतात आणि या फळाचे सेवन केले असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
  3. मळमळणे, मायग्रेन यांसारख्या समस्यादेखील होण्याची शक्यता आहे.

उत्तम एवोकॅडो फळ कसे निवडावे?

एव्होकॅडो फळ निवडत असताना डाग नसलेले वजनदार फळ निवडावेत. जे चारही बाजूंनी टणक असावेत.

डाग नसलेले व हलके धब्बे असलेले एवोकॅडो फळ खरेदी करावे व नरम असलेले फळ घेऊ नये.
योग्य निवड करण्यासाठी एवोकॅडो चे फळ हलवून पहावे. जर आतील भाग हलत असेल तर ते फळ घेऊ नये.

मित्रांनो! आजच्या या आर्टिकल ला तुमच्या इतर मित्रांशी अवश्य शेअर करा जेणे करून त्यांना हि खूप सोप्या पद्धतीने हे माहिती वाचायला मदत होईल… आणि मित्रांनो हा लिखाण ” एवोकॅडो म्हणजे काय? एवोकॅडो खाण्याचे फायदे आणि नुकसान । Avocado in Marathi “ तुम्हाला कस वाटलं हे नक्की Comment द्यारे आम्हाला कळवा…

हे हि अवश्य वाचा :

Leave a Comment