Bird Information in Marathi मित्रांनो आपल्या आजूबाजूला निसर्गाने दिलेल्या खूप अशा देणगी आहे त्यामध्ये पक्षांचा देखिल सामावेश होतो. पक्षी हे निसर्गाने दिलेली सर्वात सुंदर आणि आकर्षक अशी देणगी आहे. आपल्या आजूबाजूला विविध जातीचे आणि रंगाचे आकाराने आगळेवेगळे पक्षी आपण पाहत असतो. पक्षी हे दिसायला खूपच सुंदर असतात तसेच निसर्गाची सुंदरता वाढविण्यामध्ये पक्षांचा खूप मोठा वाटा आहे.
म्हणून आजच्या या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासाठी आपल्या आजूबाजूला आढळणाऱ्या विविध पक्षांची माहिती घेऊन आलोत. ही माहिती तुम्ही तुमच्या प्रोजेक्टमध्ये वापरू शकता किंवा एखाद्या पक्षाची माहिती लिहित असताना देखील वापरू शकता.
मित्रांनो, चला तर मग पाहूया, Bird information in Marathi विविध पक्षांची माहिती मराठी मध्ये
विविध पक्षांची माहिती मराठी मध्ये । Bird Information in Marathi
आपल्या पृथ्वीवर सजीवांचे अस्तित्व हे फार वर्षापासून टिकून आहे यातील जे जीव पंखा च्या साह्याने आकाशात उडू शकतात त्यांना पक्षी असे म्हटले जाते.
मित्रानो तुम्हाला माहिती आहे का आपल्या पृथ्वीवर जवळपास सर्वच पक्षांच्या 10,000 विविध प्रजाती आढळतात यातील बाराशे प्रजाती या केवळ भारतात आढळल्या जातात.
आजच्या Bird information in Marathi विविध पक्षांची माहिती मराठी मध्ये या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासाठी आपल्या आजूबाजूला आणि आपल्या ओळखीच्या अशा काही पक्षांची माहिती मराठीमध्ये घेऊन आलोत.
Bird information in Marathi विविध पक्षांची माहिती मराठी मध्ये
1. मोर पक्षाची माहिती मराठी मध्ये Peacock information in Marathi
मित्रांनो , मोर असा पक्षी आहे ज्याला लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच माहिती आहे मी त्याला अतिशय सुंदर आणि सर्व पक्षांमध्ये रूबाबदार असणारा मोर आपल्या भारताचा राष्ट्रीय पक्षी म्हणून देखील ओळखला जातो. इंग्रजी भाषेमध्ये मोराला पिकॉक असे म्हणतात.
मोर हा दिसायला खूपच सुंदर असतो त्यामुळे बहुतांश जणांचा आवडता पक्षी हा मोरच असतो. मोर हा हिरवट निळ्या आणि विविधरंगी असतो. मोराला सुंदर असा सप्तरंगी पिसारा असतो ज्याप्रमाणे इंद्रधनुष्य आकाशामध्ये सुंदर दिसतो त्या प्रमाणे मोर हा पृथ्वीवर असलेल्या त्यांच्या इ़द्र धनुचा प्रमाणे दिसतो.
मोराच्या डोक्यावर असणारा तुरा आणि पिसारा हा कडे सर्वांचे लक्ष वेधून घेते.
प्राचीन काळापासूनच मोराच्या प्रतिमा आपल्याला पाहायला मिळते. भगवान श्रीकृष्णाच्या डोके वर असलेले पीस देखील मोराचे च असते. याशिवाय विद्येची देवता सरस्वतीचे वाहन देखील मोरच आहे तसेच कार्तिक स्वामीचे वाहन देखील मोरच आहे त्यावरून आपल्याला कळते की, मोराने केवळ युद्धांचे नव्हे तर देवतांचे देखील लक्ष वेधून घेतले.
मोराला पावसाळा ऋतु हा खूप आवडतो त्यातल्या त्यात श्रावण महिना हा मोरा़चा पसंदीदा महिना म्हणून ओळखला जातो, कारण या महिन्यांमध्ये पडणाऱ्या रिमझिम पावसामध्ये मोराला आपला पिसारा फुलवून नृत्य करण्यास खूप आवडते आणि मोराचे हे नृत्य आपले देखील मन वेधून घेते.
मोर कोठे आढळतात? :
मित्रांनो बहुतांश जणांनी मोराला केवळ प्राणी संग्रहालयामध्ये पाहिले असेल किंवा चित्रांमध्ये पाहिले असता परंतु प्रत्यक्ष स्वरूपाने मोर हे झाडाझुडुपांमध्ये, शेतांमध्ये अढळतात. तसेच दाट झाडीच्या ठिकाणी मोर नर आणि मादी स्वरूपाने राहतात. मोराच्या मादीला लांडोर म्हणून ओळखले जाते.
मोराचा आहार :
मोरांना धान्य, कीटक, साप, सरडे, किडे, पिकांवरील आळ्या तसेच कवळी पाणी आणि अन्य किडेमकोडे खायला आवडते. मोर पिकांवरील पडलेले किड्यांना, आळ्यांना खातात त्यामुळे त्यांना शेतकऱ्यांचा मित्र देखील म्हटले जाते.
मोराचा जीवन कालावधी :
मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का मोराचा जीवन कालावधी हा साधारणता 12 ते 20 वर्षाचा असतो.
2. पोपट्या पक्षाची माहिती मराठी मध्ये । Parrot Information in Marathi
मिठू मिठू अशा आवाजामध्ये बोलणारा आणि सर्वांच्या ओळखीचा पक्षी म्हणजे पोपटी होय. पोपट हा दिसायला हिरव्या रंगाचा असून पोपटाची चोच लाल रंगाची असते. पोपटाच्या या रंगामुळे पोपट दिसायला अतिशय आकर्षक आणि सुंदर असतात. इंग्रजी भाषेमध्ये पोपटाला प्यारोट असे म्हणतात.
मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का पोपट हा सॅटीसीडी कुळातील पक्षी आहे. जगभरामध्ये पोपटाच्या एकूण 75 प्रजाती आढळतात तर 600 पेक्षा विविध जातीचे रूपात आपल्या आजूबाजूला पाहायला मिळतात पोपट हा वेगवेगळ्या रंगाचा असतो त्यामध्ये पांढरा, पिवळा, हिरवा, निळा, केशरी अशा विविध रंगांमध्ये पोपट पाहायला मिळतात परंतु सर्वसामान्य व सर्वांच्या परिचयाचा पोपट म्हणजे हिरव्या आणि लाल रंगाचा होय.
पोपट एक पाळीव पक्षी आहे. त्याचा स्वभावच पाळीव असतो. पोपटाला वाचणे, बोलणे शिकवले जाऊ शकते. जगातील सर्वात लहान व कमी वजनाचे पोपट पिग्मी प्रजातीचे आहे. त्याचे वजन दहा ग्राम असते. पोपट एका पायावर उभे राहून झोपू शकतात. मिठू मिठू आवाजामुळे पोपटाला प्रेमाने मिठू म्हटले जाते.
पोपट प्रामुख्याने कोठे आढळतात?
पोपट पक्षांना उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये राहायला आवडते. पोपट् पक्षी प्रामुख्याने समूहाने पाहायला मिळतो तसेच पोपटाला ऊंचा आणि हिरव्या झाडावर राहायला खूप आवडते.
पोपटाचा आहार :
मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का पोपट हा शहाकारी प्रकारचे आहे. पोपटाला प्रामुख्याने फळे, धान्य खातो. पोपटाला कलिंगड, पेरू, डाळिंब व मिरची यांसारखे पदार्थ खायला खूप आवडतात.
पोपटाचा जीवन कालावधी :
मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का पोपट पक्षी चा जीवन कालावधी पंचवीस ते तीस वर्षाचा आहे.
3. चिमणी पक्षाची माहिती मराठी मध्ये Sparrow Information in Marathi
आपल्या आजूबाजूला आढळणाऱ्या पक्षांमध्ये विशेषतः मानवी वस्तीच्या आसपास आढळणारा पक्षी म्हणजे चिमणी. चिमणी पक्षी हा दिसायला अतिशय लहान असला तरी हा पक्षी स्वभावाने खूप चंचल असतो.
पूर्वीच्या काळी चिमणी पक्षी हा केवळ आशिया आणि युरोप खंडामध्ये आढळत होता परंतु आजच्या काळामध्ये चिमणी हा पक्षी सर्व जगभरामध्ये आढळतो. विशेषता ग्रामीण भागांमध्ये चिमणी पक्षी खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो.
चिमणी हा पक्षी दिसायला करड्या रंगाचा असतो तसेच चिमणीच्या पंखावर तांबड्या रंगाचे लहान ठिपके देखील असतात. चिमणी पक्षी देखील इतर पक्षांप्रमाणे नर आणि मादा स्वरुपामध्ये असतो. नर मादीपेक्षा आकारमानाने थोडा मोठा असतो व नार चिमणी हा रंगाने देखील चिमणीपेक्षा वेगळा असतो नर हा तपकिरी रंगाचा असतो नर चिमणी च्या माने कडील भाग काळा असतो.
चिमणी चे शरीर 14 ते 16 सेंटिमीटर असेत. ती 35 ते 40 किमी प्रति तास च्या वेगाने उडू शकते.
मादी चिमणी एका वेळेला 3 ते 5 अंडी देते. चिमणी बिहार आणि दिल्ली ची राजकीय पक्षी आहे.
आधुनिकीकरणामुळे आज शहरी भागातील चिमण्या जवळपास विलुप्त झाल्या आहेत. ग्रामीण भागात थोड्या प्रमाणात त्या अस्तित्वात आहेत.
चिमणी पक्षी कोठे आढळतो? :
किराणा तुम्हाला माहितीच आहे की चिमणी पक्षी हा समाजप्रिय पक्षी आहे त्यामुळे चिमणी पक्षी हा मुख्य स्वरूपाने मानवी वस्तीच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो तसेच झाडांवर घरटी करून हे पक्षी राहतात. मानवी घरांमध्ये देखील चिमणी स्वतःची घरे बांधून राहतात.
चिमणी पक्षी चा आहार :
चिमणी पक्षी धान्य, आळ्या, कीटक, मानव वस्तीतून शिल्लक राहिलेले हे खाद्यपदार्थ आणि फळे मुख्य स्वरूपाने खातात.
चिमणी पक्षी चा जीवन कालावधी :
मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का चिमणी पक्षी चा जीवन कालावधी हा सहसा तीन ते चार वर्ष इतकाच असतो.
4. कबूतर पक्षाची माहिती मराठी मध्ये Pigeon Information in Marathi
कबूतर हा एक शांत निसर्ग प्रिय पक्षी आहे, प्राचीन काळापासूनच कबूतर हा पक्षी मानवाच्या विशेष रूपाने कामाला येत असल्याचे पाहायला मिळते तसेच मानवाने कबुतराच्या नात्याचे हे खूप जुने नाते आहे पूर्वीच्या काळी संविधानाची साधने उपलब्ध नसताना लोक एकमेकांना बोलण्यासाठी पत्रे वापरत असत आणि हे पत्रे देवान-घेवान चे साधन म्हणजे कबूतर असे म्हणून कबूतर कबुतर ला मानवाचा मित्र देखील म्हटले जाते.
कबुतराला शांततेचे प्रतीक म्हणून मानला जातो. कबूतरची सर्वात मोठी वैशिष्ट्य म्हणजे त्याची विचार करायची क्षमता खूप वेगवान आहे. हेच कारण आहे, जुन्या काळात संदेश देण्यासाठी वापरले जात असे. कबुतराचे शरीर पंखांनी झाकलेले असते. तसेच यात एक चोच आहे.
तसे, कबूतर बर्याच रंगात आढळतो. पण भारतात कबूतरचा रंग राखाडी आणि पांढरा आहे. जगभरात आढळणानाऱ्या या पक्ष्यांपैकी हा एक पक्षी आहे.कबूतर हा शाकाहारी पक्षी आहे जो धान्य, डाळी, धान्य, बियाणे इ. खातो. त्याचे कबुतराचे सरासरी वय ६ ते १० वर्षे आहे.
सहसा कबूतर ताशी ५० ते ६० किलोमीटर वेगाने उड्डाण करू शकते. पूर्वीच्या काळात युद्धाच्या वेळी संदेश देणार्या कबुतराला युद्ध कबूतर असे म्हणतात.लोक त्यांच्या घरात कबूतर ठेवतात. यामागील त्यांचे मुख्य उद्देश कबूतरांकडून मांस मिळविणे हे आहे, कारण त्याचे मांस खूप पौष्टिक आहे. ( Ten Birds Information in Marathi ) या पक्ष्याला कळपात रहायला आवडते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, कबूतर ६००० पेक्षा जास्त वर्षांपासून मानवांनी पाळलेले आहेत. खरं तर कबूतर हा शांत स्वभावाचा पक्षी आहे.
कबुतर पक्षी कोठे आढळतो?
मित्रांनो कबूतर हा पक्षी देखील समाजप्रिय पक्षी आहे त्यामुळे हा पक्षी मानवी वस्तीच्या आसपास खूप मोठ्या प्रमाणात आढळतो कारण मानवी वस्तीमध्ये कबुतरांना खाद्य सहजरीत्या प्राप्त होते.
कबूतर उंच झाडावर आपली घरटी करून राहतात तसेच पडक्या इमारती मोठमोठ्या इमारती वरील खिडक्यांमध्ये कबुतर आपली घरटी करतात.
कबुतराचा आहार :
मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का? कबूतर हा पक्षी सहकारी आहे कबूतर मुख्य स्वरूपाने डाळी, धान्य, शेंगा या प्रकारचे खाद्यपदार्थ आहार म्हणून खातात.
कबुतराचा जीवन कालावधी :
मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का कबुतराचा जीवन कालावधी हा पाच ते दहा वर्षाचा असतो.
5. हंस पक्षाची माहिती मराठी मध्ये । Swan Information in Marathi
दिसायला अतिशय सुंदर आणि सर्वांचे स्वतःकडे लक्ष वेधून घेणारा पक्षी म्हणजे हंस पक्षी होय. पांढऱ्या शुभ्र रंगाचा हा पक्षी जणू दुधा प्रमाणेच दिसतो.
हंस पक्षी हे दिसायला सुंदर असतात त्यासोबत बुद्धिमान देखील असतात. मित्रांनो आपण सर्वांनी पांढऱ्या रंगाचे हंस पक्षी पाहिले पण तुम्हाला माहिती आहे का काळ्या रंगाचे देखील हंस पक्षी असतात.
हे पक्षी पाण्यामध्ये देखील राहू शकतात आणि आकाशामध्ये देखील उडू शकतात.
हंस हे पक्षी आकाशामध्ये 90 ते 95 किलोमीटर वेगाने उडतात.
जगभरात हंसाच्या 7 पेक्षा जास्त प्रजाती आढळतात. हंसाची लांबी जवळपास दीड मीटर लांब आणि वजन 10 ते 12 किलो असते.
हंस लाल गुलाबी रंगाचे असतात. ते दिसण्यात खूप आकर्षक असतात. हंस पक्षी कोठे आढळतात?
मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का हंस हा पक्षी उभयचर पक्षी आहे. म्हणजेच हंस पक्षी पाण्यामध्ये देखील राहू शकतात आणि जमिनीवर देखील राहू शकतो. प्रामुख्याने मोठ्या प्रमाणामध्ये पाण्यामध्ये हंस पक्षी आढळतात. नदी, तलाव, नाले, आणि उथळ पाणवठे असलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आढळतात.
हंस पक्षाचा आहार :
हंस आपले भोजन पाण्यातील वृक्ष, गवत, किडे, फळ, मासे आणि बी खाऊन प्राप्त करतात.
हंस पक्षाचा जीवन कालावधी :
मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का हंस पक्षाचा जीवन कालावधी दहा ते पंधरा वर्षाचा असतो.
मित्रांनो! आजच्या या आर्टिकल ला तुमच्या इतर मित्रांशी अवश्य शेअर करा जेणे करून त्यांना हि खूप सोप्या पद्धतीने हे माहिती वाचायला मदत होईल… आणि मित्रांनो हा लिखाण ” विविध पक्षांची मराठी माहिती मध्ये । Bird Information in Marathi “ तुम्हाला कस वाटलं हे नक्की Comment द्यारे आम्हाला कळवा…
हे हि अवश्य वाचा :
- श्री विष्णु सहस्त्रनाम स्तोत्रम । Vishnu Sahasranamam Lyrics in Marathi । Vishnu Sahasranamam
- Frangipani म्हणजे काय? । Frangipani in Marathi
- बँकेचे सर्व अर्ज कसा लिहायचा । Bank arj format in Marathi
- चेक बुक मिळणे बाबत विनंती पत्र । Application For Cheque Book in Marathi
- श्री शिव स्तुति मराठी । Shiv Stuti in Marathi