वृक्षाचे महत्व मराठी निबंध । Vruksha Che Mahatva in Marathi

Vruksha Che Mahatva in Marathi आपला हा परिसर संतुलित आहे तो केवळ निसर्गामुळे आणि ह्या निसर्गाचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे वृक्ष.

मानवी जीवन हे पूर्णपणे निसर्गावर अवलंबून आहे. झाडे हि निसर्गाचा खूप महत्त्वाचा आणि अग्रेसर असलेला महत्वपूर्ण भाग आहे. आपल्या सभोवतालचे वातावरण आणि पृथ्वीवर सतत बदलत चाललेले निसर्गचक्र हे केवळ झाडामुळे संतुलित आहे म्हणून व्यक्तीच्या जीवनामध्ये वृक्षाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे आणि आजच्या लेखामध्ये आम्ही तुम्हाला वृक्षाचे महत्व मराठी निबंध पटवून सांगणार आहोत.
चला तर मग पाहूया, वृक्षाचे महत्व मराठी निबंध Essay on Important of Trees in Marathi.

वृक्षाचे महत्व मराठी निबंध । Vruksha Che Mahatva in Marathi

मित्रानो मनुष्याला जगण्यासाठी तसेच पृथ्वीतलावर असणाऱ्या सर्व सजीवांना जगण्यासाठी अन्न वस्त्र आणि निवारा आणि हवा म्हणजेच ऑक्सिजनची आवश्यकता असते आणि या सर्व गोष्टी आपल्याला मिळतात त्या केवळ वृक्षांमुळे च त्यामुळे माणसाच्या जीवनामध्ये वृक्षाचे महत्त्व आहे, शब्दांमध्ये मांडता येणार नाही एवढे मोठे आहे.

वृक्ष आणि माणूस यांचे नाते आताचे नसूनही खूप वर्षांपूर्वीचे आहे हे संबंध परंपरेनुसार चालत आलेले आहेत प्राचीन काळामध्ये मनुष्य झाडांच्या असल्या खाली आपले जीवन जगत होता. वृक्षांच्या पानांचा आणि सालींचा उपयोग स्वतःचे अंग झाकण्यासाठी करत होता तर वृक्षांची फळे आणि फुले अन्न म्हणून खात होता. या व्यतिरिक्त सर्वात महत्वाचे म्हणजे वृक्षांपासून मिळणारा प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजन हा सर्व मनुष्याला जगण्यासाठी अत्यंत आहे त्यामुळे शिव्या कोणताही मनुष्य पृथ्वीवर काही मिनिटात जगू शकत नाही त्यामुळे वृक्षाचे महत्त्व मानवी जीवनामध्ये किती आहे याचा अंदाज लावू शकतो.

झाडे सूर्यापासून ऊर्जा आणि सूर्यप्रकाश घेतात व त्यापासून अन्न तयार करतात हे अन्न मनुष्य आपल्या दैनंदिन जीवनामध्ये खातो आणि जगतो. वृक्षांच्या लाकडाचा उपयोग माणूस लाकूड इंधन म्हणून करतो या व्यतिरिक्त वृक्षांच्या लाकडापासून फर्निचर च्या वस्तू म्हणजे टेबल-खुर्च्या, कपाट, खिडकी, दरवाजे बनविले जातात. वृक्षांचा असा एक ही भाग नाही ज्याचा माणसाच्या रोजच्या आयुष्यात वापर होत नाही.

साधं आपण वृक्षाच्या पानांचा विचार केला असता वृक्षांची पाने सजावटीमध्ये वापरली जातात. घराला तोरण, पूजा, धार्मिक कार्यामध्ये वृक्षांच्या पानाला खूप महत्व दिले जाते.

वृक्षांच्या फूलांचा विचार केला असता, फुले सजावटीसाठी वापरली जातात तसेच बायका केसांमध्ये घालण्यासाठी देखील वापर करतात देवाला अर्पण करण्यासाठी देखील फुले वापरली जातात.

हा झाला वृक्षांच्या प्रत्येक भागाचे महत्व. याव्यतिरिक्त देखील रुक्ष मानवाला वेगवेगळ्या प्रकारे उपयोगात येतात. झाडे फार परोपकारी आहेत. त्यांचे संपूर्ण आयुष्य जगाच्या सेवेत व्यतीत होऊन जाते. झाडे आपल्याला थंड सावली देतात.

झाडांमुळे वातावरणातील हवा शुद्ध राहते. झाडांमुळे वातावरणाचे चक्र संतुलित राहते आणि पाऊसही जास्त पडतो. झाडांची हिरवीगार पाने आणि रंगबेरंगी फुले वातावरणाला सुंदर बनवतात.

खरोखरच झाडे आपल्या पर्यावरणाचा अविभाज्य घटक आहेत. जर या पृथ्वीवर झाडे नसती तर सजीव जीवन देखील असले नसते. झाडांच्या सहवासात राहून माणूस निरोगी राहतो. आपले ऋषी-मुनी वनांमध्येच राहायचे. आपले प्राचीन गुरुकुल देखील वनांमध्येच असायचे. म्हणूनच भारतीय जीवन झाडे आणि वनस्पतींशी सखोलतेने जुळलेले आहे.

वृक्षाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे आपल्या आजूबाजूला होणारे प्रदूषण रोखण्यासाठी झाडे खूप महत्वाची भूमिका बजावतात. झाडे वातावरणातील कार्बन डायऑक्साईड वायू शोषून घेतात आणि आपल्याला जीवनावश्यक वायू ऑक्सिजन देतात. झाडे जमिनीची धूप होण्यापासून जगतात झाडांची मुळे जमिनीत खोलवर जातात व मातीला घट्ट धरून ठेवतात त्यामुळे जमिनीची धूप होत नाही.

झाडे पाऊस पाण्यामध्ये देखील महत्त्वाची भूमिका बजावतात. ज्या प्रदेशांमध्ये अधिक वृक्षाचे प्रमाण असते त्या प्रदेशांमध्ये पावस मोठ्या प्रमाणे मध्ये पडला जातात त्यामुळे पाऊस पाडण्यामागे देखील झाडांची खूप महत्त्वाची भूमिका आहे.

मानवाला निरोगी स्वास्थ देण्यामागे देखील झाडांची खूप महत्त्वाची भूमिका आहे. आपल्या आसपास अशी अनेक झाडे आहेत ज्यामध्ये औषधीय गुणधर्म आहेत ते वृक्षांपासून विविध प्रकारची औषधे तयार केली जाते जी वेगवेगळ्या आजारांवर खूप फायद्याचे ठरतात माणसाला विविध रोगांवर मात करून नवीन जन्म देण्यात मदत करतात. आयुर्वेदामध्ये देखील झाडांना खूप महत्त्वाचे स्थान दिले जाते कारण आयुर्वेदिक औषधे बनवण्यासाठी विविध झाडांची साली, फळे, फुले आणि मूळ यांचा वापर केला जातो.

त्यामुळेच वृक्षाचे महत्व हे खूप मोठे आहेत हे वृक्ष आहेत म्हणून आपण आपल्या पृथ्वीतलावर निरोगी आणि आनंदी जीवन जगत आहे.

परंतु आज आपण वृक्षाचे महत्त्व विसरलो आहोत. आपण आपल्या स्वार्थासाठी मोठ्या प्रमाणात झाडांची कापणी करत आहोत. मोठमोठी चांगले आणि झाडे तोडून त्या जागी मोठमोठ्या इमारती बांधल्या जात आहेत.

यामुळे वने आणि जंगले नष्ट होत आहेत. झाडे तोडल्यामुळे पाऊस कमी होऊ लागला आहे. पाण्याअभावी बर्‍याचदा आपल्याला दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. पाणीटंचाईच्या समस्येला आपल्याला तोंड द्यावे लागत आहे, त्यात असंख्य लोकांचे प्राण जात आहेत.

याव्यतिरिक्त वृक्षतोड केल्याने प्रदूषणाचे देखील समस्या उद्भवत आहे. प्रदूषणामुळे वातावरण दुषित होत आहे, लोकांना अनेक रोगांचा सामना करावा लागत आहे. तसेच वृक्षतोडीमुळे जागतिक तापमान वाढ ही देखील समस्या उद्भवली आहे त्यांच्या तोडीमुळे पावसाचे प्रमाण तर कमी झालेच यासोबतच प्रदूषणाचे प्रमाण वाढत ओझोन वायूचा थर देखील कमी झाला असता मग सूर्यापासून निघणारी अतिउष्ण किरण हे जसेच्या तसे पृथ्वीवर पोहोचत आहे त्यामुळे जागतिक तापमान वाढ यासारख्या समस्यांना तोंड द्यायची वेळ आलेली आहे. या सर्व समस्यांवर वृक्षारोपण हा एकच उपाय आहे. म्हणूनच आपण सर्वांनी वृक्षारोपण केले पाहिजे. कारण आपण केवळ वृक्षांशी मैत्री करुनच आनंदी, निरोगी आणि सुंदर आयुष्य जगू शकतो.
कारण आपल्या जीवनामध्ये वृक्षाचे महत्व हे पणाने साधारण आहे.

मित्रांनो! आजच्या या आर्टिकल ला तुमच्या इतर मित्रांशी अवश्य शेअर करा जेणे करून त्यांना हि खूप सोप्या पद्धतीने हे माहिती वाचायला मदत होईल… आणि मित्रांनो हा लिखाण ” वृक्षाचे महत्व मराठी निबंध । Vruksha Che Mahatva in Marathi “ तुम्हाला कस वाटलं हे नक्की Comment द्यारे आम्हाला कळवा…

हे हि अवश्य वाचा :

Leave a Comment