उदकशांती म्हणजे काय? । Udaka Shanti Pooja Benefits in Marathi । उदक शांती पूजा

Udaka Shanti Pooja Benefits in Marathi । उदक शांती पूजा

मित्रांनो तुम्ही उदक शांती पूजा बद्दल नक्की ऐकले असेल, परंतु तुम्हाला उदक शांती म्हणजे काय असते ते माहिती आहे का?

आपल्यातील बहुतांश जणांनी उदक शांती पूजा बद्दल ऐकले असेल परंतु त्यांना उदक शांती पूजा म्हणजे काय उदक शांती पूजा केव्हा केली जाते याबद्दल पुरेशी माहिती नाही. म्हणून आजच्या या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासाठी उदक शांती पूजा म्हणजे काय? तसेच उदक शांती पूजा चे फायदे मराठी मध्ये घेऊन आलोत.

उदकशांती म्हणजे काय ? । Udaka Shanti Pooja Benefits in Marathi । उदक शांती पूजा

चला तर मग पाहूया, Udaka Shanti Pooja Benefits in Marathi । उदक शांती पूजा

उदक शांती पूजा चा अर्थ

मित्रांनो उदक शांती पूजा म्हणजे काय? आणि या पूजा चे काय फायदे हे जाणून घेण्यापूर्वी आपल्याला उदक शांती पूजा याचा अर्थ माहिती असणे आवश्यक आहे.

मित्रांनो, उदक म्हणजे “पाणी” आपल्या पृथ्वीवरील 71 टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे. या पृथ्वीतलावर कुठल्याही गोष्टीच्या शुद्धीकरण करण्यासाठी पाण्याची आवश्यकता भासत एक उदाहरण कपडे धुण्यासाठी, भांडी घासण्यासाठी, आंघोळ करण्यासाठी थोडक्यात शुद्ध होण्यासाठी पाण्याची आवश्यकता भासते. पाण्याची जागा ही अन्य कोणताही पदार्थ घेऊ शकत नाही.

त्यामुळे उदक शांती या पूजा मध्ये पाण्याला अभिमंत्रित करून त्या पाण्याने घराचे शुद्धीकरण केले जाते यालाच “उदक शांती पूजा” असे म्हटले जाते.

उदक शांती पूजेची माहिती Information About Udaka Shanti Pooja in Marathi

उदक शान्ति पूजा कुठल्याही शुभ परिणामासाठी, वित्तीय समस्या, घर , कामावर तणाव , स्वास्थ्य या साठी केली जाते. तसेच विवाह, उपनयन, गृहप्रवेश, घरातील नवीन जन्म या सारख्या शुभ कार्यक्रमांत, घराच्या शांतीसाठी ही केली जाते.

म्हणजेच उदक शांती पूजा मुख्य स्वरूपाने घर शांतीसाठी केली जाणारी एक पूजा आहे. उदक शांती पूजा ची सुरुवात ही पूजा गणपति पूजनाने होते. या पूजेत १ ४ ४ १ ओळींचा पाठ ३ तास असतो. .या पूजेत गंगा नदीचे पवित्र पाणी एका कलशात ठेवतात आणि पवित्र परमेश्वराला त्यात निवास करण्यासाठी आमंत्रित केले जाते.

उदक शान्ति पूजेतील मंत्र अग्नि आणि विष्णु देव यांना बोलले जाते. सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी या दोन देवताना अनुरोध केला जातो ज्यामुळे सर्वांना सुखी आणि समृद्ध जीवन मिळेल. अशाप्रकारे उदक शांती पूजेचे महत्त्व आहे त्यामुळे बरेच जण कुठल्याही शुभकार्याच्या सुरुवातीला घरा मध्ये उदक शांती पूजा करतात.

उदक शांती पूजा विधी :

उदक शांती पूजा मुख्य स्वरूप आणि घर शांती साठी केली जाते या मध्ये सर्वात प्रथम गणपतीची पूजा केली जाते. पूजा करणारे ब्राह्मण किंवा गुरुजी असतात ते प्रथम पाठावरील कलशास गुग्गुल‌ने फिरवितात त्यानंतर पाठवर ब्रह्मदेवाला स्थापना करून ब्रह्मदेवाच्या तोही बाजूने धूप फिरवितात.

या पूजेत गंगा नदीचे पवित्र पाणी एका कलशात ठेवतात आणि पवित्र परमेश्वराला त्यात निवास करण्यासाठी आमंत्रित केले जाते. उदक शान्ति पूजेतील मंत्र अग्नि और विष्णु यांना बोलाले जाते. सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी दोन देवताना अनुरोध केला जातो.

उदक शांती या पूजा मध्ये प्रामुख्याने तीन स्वरूपाने शुद्धीकरण केले जाते.

 1. गुग्गलचे धूर
 2. वेदमंत्रांचे स्पंदने
 3. पाण्याला अभिमंत्रित करून केले जाणारे शुद्धीकरण

या नंतर ब्राह्मण मंगल मंत्रांचे पठण करतात त्यानंतर घरातील सर्व कुटुंब संकल्प घेतात की, सर्व कुटुंबियातील सदस्यांना सुदृढ आयुष्य, आरोग्य प्राप्त होऊन सर्व प्रकारची शांती मिळावी म्हणून आजच्या दिवशी ब्राह्मणांना बोलावून या उदकशांती पूजेची विधी करतो.

यानंतर पुण्याहवाचन केले जाते यामध्ये आलेल्या ब्राह्मणांकडून हा दिवस आम्हाला , पुण्यकारक, ऋद्धि कारक, श्री कारक व कल्याणकारक असो असा आशीर्वाद घेतला जातो.

जे मुख्य ब्राह्मण संस्था त्यांच्या हातातून पिवळी मोहरी , पंचगव्य व शुद्ध पाणी घरात प्रोक्षण करून घर शुद्धी केली जाते. यानंतर मुख्य ब्राह्मण वाळूचा ओटा तयार करतात व त्यावर द्रुवा, दर्भ घालून फुले व फळे ठेवतात. चार बाजूने एक विशिष्ट संख्येने दर्भाचि परिस्तरणे घालतात.

उदक शांती च्या वेळी कोशावर धूप किंवा उद जाळून तो धूर संपूर्ण घरामध्ये फिरवतात. यानंतर त्या धूरिने एखादा कलश किंवा कळशी धूपवतात. त्यानंतर या कळशी मध्ये शुद्ध पाणी भरून वेद पुरुष ब्रह्मदेवाचे आवाहन केले जाते. याच कलशामध्ये ब्रह्मदेवाची षोडशोपचार पूजा केली जाते.

उदक शांती पूजा करण्यामागची कारणे :

 1. वास्तुशांतीचे मुहूर्त नसतानादेखील गृहप्रवेश करून घरात राहायला जाणे अत्यंत आवश्यक असल्यास उद्या शांती करतात.
 2. चारधामची यात्रा केव्हा चारधाम पैकी एखादी यात्रा करून आल्यास घरी गंगा पूजन केले जाते तेव्हा देखील उदक शांती पूजा केली जाते.
 3. आपण राहात असलेले ठिकाण किंवा व्यवसायाचे ठिकाण येथील नकारात्मक ऊर्जेचा नाश होण्यासाठी वस्तूमध्ये सकारात्मक ऊर्जा वास करण्यासाठी उदक शांती पूजा केली जाते.
 4. कालसर्प शांती केल्यानंतर उदक शांती पूजा करावी कारण उदक शांती पूजा केल्याने कालसर्प पूजेचे फळ मिळते.
 5. एखाद्या घरामध्ये व्यक्तीचे निधन घडल्यानंतर तेरावा किंवा चौदाव्या दिवशी घर शुद्धीकरण करण्यासाठी उदक शांती पूजा केली जाते.

उदक शांती पूजाचे फायदे। Udaka Shanti Pooja Benefits in Marathi

 1. नवीन घरात राहायला जायचे असल्यास आपण ग्रहशांती करून घरामध्ये प्रवेश करतो परंतु ग्रहशांती चे मुहूर्त नसल्यास आपण उदक शांती पूजा करून घरामध्ये राहायला जाऊ शकतो.
 2. एखाद्या नवीन वस्तूंची खरेदी केली व ती वस्तू पूर्वी कोणी वापरली असल्यास त्या वस्तूला शुद्ध करण्यासाठी उदक शांती पूजा केली जाते.
 3. उदक शांती पूजा चा सर्वात मोठा फायदा म्हणजे, उदक शांती पूजा केल्याने घरातील नकारात्मक शक्तिचा नाश होऊन घरामध्ये सकारात्मक आणि दैवी शक्तीचा वास होतो.
 4. उदक पूजेमुळे अशांती नाहीसे होऊन प्रसन्न वातावरण निर्माण होते.
 5. घरामध्ये कोणी निधन पावल्यास घर शुद्ध करण्यासाठी व मेलेल्या व्यक्तीच्या आत्म्यास शांती मिळण्यासाठी उदक शांती पूजा केली जाते.

मित्रांनो! आजच्या या आर्टिकल ला तुमच्या इतर मित्रांशी अवश्य शेअर करा जेणे करून त्यांना हि खूप सोप्या पद्धतीने हे माहिती वाचायला मदत होईल… आणि मित्रांनो हा लिखाण ” उदकशांती म्हणजे काय ? । Udaka Shanti Pooja Benefits in Marathi । उदक शांती पूजा “ तुम्हाला कस वाटलं हे नक्की Comment द्यारे आम्हाला कळवा…

हे हि अवश्य वाचा :

Leave a Comment