Refurbished म्हणजे काय? । Refurbished Meaning in Marathi

Refurbished म्हणजे काय? । Refurbished Meaning in Marathi

मित्रांनो वर्तमान काळामध्ये ऑनलाइन शॉपिंग ही एक नवीन क्रेझ उद्यास आली आहे ज्याच्या अधीन संपूर्ण तरुण पिढी आली आहे बहुतांशी लोक ऑनलाईन नवनवीन वस्तूंची खरेदी करत असतात.

लॅपटॉप आणि मोबाईल फोन यांसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची देखील ऑनलाइन शॉपिंग केली जाते. मित्रांनो जर तुम्ही देखील ऑनलाइन लॅपटॉप किंवा मोबाईल फोन खरेदी करत असाल तर तुम्ही refurbished हा शब्द नक्कीच वाचला असेल.

परंतु आपल्यातील बहुतांशी जणांना refurbished म्हणजे काय आणि refurbished या शब्दाचा मराठी मध्ये काय अर्थ होतो याबद्दल पुरेशी माहिती नाही. परंतु मित्रांनो तुम्हीदेखील ऑनलाईन मोबाईल किंवा लॅपटॉप घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला refurbished बद्दल सर्व माहिती असणे आवश्यक आहे.

म्हणून आजच या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासाठी refurbished म्हणजे काय? आणि refurbished संबंधित महत्वाची माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Refurbished म्हणजे काय? । Refurbished Meaning in Marathi

आम्हाला आशा आहे की, ” Refurbished म्हणजे काय? । Refurbished Meaning in Marathi” हा लेख तुमच्यासाठी नक्कीच फायद्याचा ठरेल.

Refurbished meaning in Marathi

Refurbished म्हणजे आपल्यातील बहुतेक जणांना एक कंपनी वाटते. कारण आपण जेव्हा ऑनलाईन मोबाइल फोन किंवा लॅपटॉप खरेदी करत असतो तेव्हा refurbished हा शब्द आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे आपल्यातील बहुतांश जणांचा असा समज आहे की, refurbished ही एक कंपनी आहे.

परंतु मित्रांनो, Refurbished फोन किंवा लॅपटॉप हे असे फोन असतात ज्यांच्यात काही प्रॉब्लेम असल्यामुळे ते कंपनीला पुन्हा देण्यात येतात. म्हणजेच एखाद्या

ग्राहकाला फोन वापरताना काही समस्या आल्यास तो फोन कंपनीला पुन्हा देतो. त्यानंतर कंपनी त्या फोनला repair करुन, फोन मधील किंवा लॅपटॉप मधील दुरुस्ती करून पुन्हा ग्राहकांना ऑनलाइन स्वरूपाने विकते म्हणून यांना “Refurbished फोन” असे म्हणतात.

म्हणूनच मित्रांनो तुम्ही कधी बारकाईने निरीक्षण केले असेल तर तुम्हाला दिसेल की, Refurbished फोन हे Original फोनच्या तुलनेत स्वस्त असतात. परंतु हा फोन विकताना कंपनी Refurbished फोन या नावाने विकते. जेणे करुन ग्राहकांना कळले की एखाद्या फोनची किंवा लॅपटॉपची पुन्हा दुरुस्ती झालेली आहे , त्यामुळे ग्राहकांची फसवणूक होणार नाही.

मित्रांनो आम्हाला आशा आहे की आता आपणास refurbished म्हणजे काय? आणि Refurbished meaning in Marathi समजलेच असेल.

Refurbished फोन कसे बनविले जातात?

मित्रांनो आम्ही सांगितलेच आहे की, refurbished म्हणजे एखाद्या जुना फोन मधील समस्या दूर करून त्या फोनला पुन्हा रिपेअर करून विकणे म्हणजेच refurbished होय.

त्यामुळे मित्रांनो, जेव्हा आपण एखादा जुना किंवा Refurbished फोन खरेदी करायला जातो तेव्हा आपल्या मनात खूप शंका असतात.

जसे की,

हा फोन घेणे योग्य तर आहे ना ?

हा फोन जास्त काळ टिकतो का?

हे फोन चांगले असतात का ?

हे कसे बनवले जातात ?

यासारख्या बऱ्याच शंका आपल्या मनामध्ये येतात त्यामुळे आपण refurbished फोन किंवा लॅपटॉप घेण्यासाठी घाबरतो. परंतु आम्ही आजच्या या लेखाच्या माध्यमातून तुम्हाला Refurbished फोन बनविले जातात? आणि Refurbished फोन खरेदी करणे योग्य आहे का नाही?

मित्रानों जेव्हा आपण एखादा नवीन फोन किंवा लॅपटॉप खरेदी करतो तेव्हा ठराविक मोबाईल फोन मध्ये आपल्याला बॅटरी गरम होणे, चार्जिंग लवकर उतरणे किंवा चार्जिंग न होणे, कॅमेरा व्यवस्थित न चालणे, calling मध्ये आवाज येणे असे प्रॉब्लेम्स येतात. तेव्हा आपण असे Phone कंपनीला परत देतो व त्या बदल्यात नवीन फोन घेतो.

कंपनी त्याला repair करुन, त्याचे योग्य प्रकारे परीक्षण करुन तो नीट करते. वहे रिपेअर झालेले फोन कंपनी पुन्हा ऑनलाईन स्वरूपाने ग्राहकांसाठी स्वस्त किमती मध्ये विकायला ठेवते.

अशा प्रकारे repair केलेले फोन ग्राहकांना विश्वासात घेऊन विकण्यासाठी, कंपनीची ब्रँड value चांगली ठेवण्यासाठी तसेच हा फोन repair करण्यात आलेला आहे, हे ग्राहकांना कळावे म्हणून कंपनी असा फोन हा Refurbished फोन या नावाने विकते.

या सोबतच कंपनी refurbished फोन वर २० ते ४० टक्यांपर्यंत discount देखील देते. या सोबतच ग्राहकांनी असे फोन खरेदी करावेत म्हणून कंपनी अशा फोन वर ६ महिन्याची Warranty देखील देते. त्यामुळे बहुतांश ग्राहक refurbished फोनची खरेदी करतात.

Refurbished फोन खरेदी करणे योग्य आहे का नाही?

मित्रानो आता तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की, Refurbished फोन खरेदी करणे योग्य आहे का नाही?

मित्रांनो आजच्या लेखाच्या माध्यमातून आम्ही काही पॉइंट्स सांगितल्या आहेत ज्याच्या मदतीने तुम्ही refurbished phone खरेदी करावा का नाही हे ठरवावे.

Warranty – अशा फोन सोबत तुम्हाला ६ महिन्यांपर्यंतची वॉरंटी मिळते. जर फोन वापरताना तुम्हाला काही प्रॉब्लेम आल्यास तुम्ही जवळच्या service centre ला जाऊन तो फ्री मध्ये नीट करु शकता.

  1. Warranty – Refurbished फोन सोबत तुम्हाला ६ महिन्यांपर्यंतची वॉरंटी मिळते. या सहा महिन्यांमध्ये जर फोन वापरताना तुम्हाला काही प्रॉब्लेम आल्यास तुम्ही जवळच्या service centre ला जाऊन तो फ्री मध्ये नीट करु शकता.
  2. Testing – जेव्हा एखादा फोन repair करुन तो Refurbished म्हणून विकण्यास तयार होतो अशा वेळेस त्याची testing एखाद्या नवीन फोन सारखीच केली जाते. त्यामुळे शक्यतो refurbished मोबाईल फोनमध्ये कसल्याही प्रकारची समस्या येत नाहीत परंतु जर एखाद्या वेळेस काही समस्या आल्यास तुम्ही वारंटी च्या साह्याने फोन फ्री मध्ये नीट करू शकता.
  3. Return Policy – जेव्हा आपण Refurbished फोन घेतो तेव्हा जर तो वापरताना काही प्रॉब्लेम आल्यास आपण तो फोन १० दिवसाच्या आतमध्ये जमा करु शकतो. म्हणजेच refurbished मोबाईल फोन साठी रिटर्न पॉलिसी असते.

Refurbished फोनचे फायदे :

Refurbished फोनचे काही फायदे आहेत ते पुढीलप्रमाणे-

  1. ज्या व्यक्तींकडे नवीन फोन खरेदी करण्यासाठी पुरेसे पैसे नाहीत त्यांच्यासाठी refurbished फोनहा उत्तम मार्ग आहे.
  2. कारण Refurbished फोन फार कमी किमतीत मिळतात. जर तुमचे बजेट कमी असल्यास तुम्हाला कमी किमतीत चांगला Refurbished फोन मिळेल.
  3. Refurbished फोनवर तुम्हाला Return policy तसेच Warranty देखील मिळते त्यामुळे तुम्ही खात्रीने असे फोन खरेदी करु शकता.
  4. त्यामुळे जर एखाद्या वेळेस refurbished फोन मध्ये देखील काही प्रॉब्लेम आढळल्यास तुम्ही तो फोन रिटर्न करून तुमचे पैसे मिळवू शकता.
  5. Refurbished फोन हा second hand फोनपेक्षा फार चांगला असतो.
  6. कंपनी Refurbished फोनची टेस्टिंग ही परत करते त्यामुळे refurbished फोन हे नवीन फोन प्रमाणेच असतात.

Refurbished फोन खरेदी करण्याचे नुकसान :

ज्याप्रमाणे refurbished फायदे आहेत त्याप्रमाणे याचे नुकसान देखील आहेत ते खालील प्रमाणे-

  1. Refurbished फोन सोबत आपल्याला चार्जर किंवा हेडफोन मिळेलच असे नाही.
  2. Refurbished फोनमध्ये पुन्हा प्रॉब्लेम निघण्याची शक्यता असते.
  3. Refurbished फोनची पॅकेजिंग हि नवीन फोन सारखी नसते.

मित्रांनो! आजच्या या आर्टिकल ला तुमच्या इतर मित्रांशी अवश्य शेअर करा जेणे करून त्यांना हि खूप सोप्या पद्धतीने हे माहिती वाचायला मदत होईल… आणि मित्रांनो हा लिखाण ” Refurbished म्हणजे काय? । Refurbished Meaning in Marathi “ तुम्हाला कस वाटलं हे नक्की Comment द्यारे आम्हाला कळवा…

हे हि अवश्य वाचा :

Leave a Comment