Pradushan Ek Samasya Essay in Marathi : मित्रांनो आपल्या आजूबाजूला अनेक समस्या पाहायला मिळतात. जागतिक तापमानवाढ, लोकसंख्या वाढ आणि प्रदूषण.
प्रदूषण एक समस्या मराठी निबंध । Pradushan Ek Samasya Essay in Marathi
प्रदूषण ही समस्या अलीकडच्या काळामध्ये खूप झपाट्याने वाढत आहे. मोठमोठ्या शहरांमध्ये तर प्रदूषणाची समस्याही खूपच गंभीर रूप धारण केली आहे. प्रदूषणाचे वेगवेगळे प्रकार पडतात. हवा म्हणजेच वायुप्रदूषण त्यानंतर ध्वनि प्रदूषण आणि जल प्रदूषण यांसारख्या प्रदूषणाच्या गंभीर समस्या बनल्या आहेत.
म्हणून आजच्या या लेखाच्या माध्यमातून Pradushan Ek Samasya Essay in Marathi प्रदूषण एक समस्या मराठी निबंध या विषयावर निबंध शाळेमध्ये विद्यार्थ्यांना नेहमीच परीक्षेमध्ये किंवा शाळेमध्ये प्रदूषणावर निबंध विचारले जातात. त्या लेखामध्ये दिलेला प्रदूषण एक समस्या मराठी निबंध प्रत्येक विद्यार्थ्यासाठी नक्कीच फायद्याचे ठरेल.
प्रदूषण एक समस्या मराठी निबंध । Pradushan Ek Samasya Essay in Marathi (250 words)
प्रदूषण ही एक अशी समस्या आहे ज्याचा प्रभाव आपल्याला हळूहळू पर्यंत सोबत तीव्र स्वरूपाचा जाणवतो. प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस वाढत जात आहे आणि गंभीर रूप धारण करत आहे. प्रदूषणाचा परिणाम पृथ्वीवर राहणाऱ्या संख्या सजीवसृष्टीला होत आहे.
प्रदूषण म्हणजे हवेमध्ये, पाण्यामध्ये, ध्वनी मध्ये अतिरिक्त पदार्थाचं भर होणे याला प्रदूषण असे म्हणतात. प्रदूषण नैसर्गिक वातावरणामध्ये दूषित पदार्थाची भर घालून वातावरणात दूषित करते. प्रदूषणाचे मुख्य तीन प्रकार पडतात, वायु प्रदूषण, जल प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण हे प्रदूषणाचे मुख्य तीन प्रकार आहेत.
वातावरणामध्ये वायुप्रदूषण हे वाहनातून निघणारा धूर, इंधन जाळल्याने त्यातून निघणारा धूर, कारखान्यातून निघणारा धूर, वाऱ्यामुळे उडणार्या धुली कणांन मुळे होत असते. वायु प्रदूषणामुळे संपूर्ण वातावरण दूषित होते मनुष्याला श्वास घेण्यासाठी त्रास होतो वायू प्रदूषणाचा परिणाम इतर सजीवांवर की पहायला मिळतो.
दुसरे प्रदूषण म्हणजे जल प्रदूषण होय. जलप्रदूषण हीदेखील खूप झपाट्याने वाढणारी प्रदूषणाचे एक समस्या आहे. जल म्हणजे पाणी आणि प्रदूषण म्हणजे दूषित होणै म्हणजे जलप्रदूषण याचा अर्थ असा होतो की पाणी दूषित होऊन. जेव्हा पाण्यामध्ये विषारी घटक मिसळतात तेव्हा जलप्रदूषण होते. कारखान्यातून नदी, नाला आणि तलाव मध्ये सोडणारे विषारी घटक, पाण्यामध्ये सोडणारा प्लास्टिक कचरा या सर्वामुळे जल प्रदूषण होते.
तिसरे मुख्य प्रदूषण म्हणजे ध्वनिप्रदूषण होय. ध्वनी प्रदूषण वाहनांचे हॉर्न, औद्योगिक कारखान्यातील मशीन चे आवाज, लग्न तसेच इतर समारंभातील डीजे इत्यादी अनेक कारणांमुळे होते. अत्याधिक ध्वनिप्रदूषणामुळे बहिरेपणा आणि काना संबंधी रोग वाढतात.
प्रदूषण हे अनेक पद्धतीने होत असले तरी देखील आपल्याला रोखण्यासाठी उपाययोजना करायला हव्यात. प्रदूषणामुळे संपूर्ण सजीव सृष्टी धोक्यात आलेली आहे त्यामुळे प्रदूषण रोखणे ही काळाची गरज आहे.
प्रदूषण एक समस्या मराठी निबंध । Pradushan Ek Samasya Essay in Marathi (500 word)
मित्रांनो आजच्या युगाला विज्ञानाचे युग म्हटले जाते बरोबर विज्ञानाच्या जोरावर प्रत्येक देश आपापली प्रगती साधून घेतात परंतु विज्ञानामुळे जेवढी प्रगती होत आहे तेवढेच त्याचे दुष्परिणाम देखील आहे.
प्रदूषण ही समस्या देखील विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे तर काही प्रमाणात वाढलेली दिसत आहे.
प्रदूषण एक समस्या आहे जी दिवसेंदिवस गंभीर रूप धारण करत आहे पृथ्वीवर तीन प्रकारचे प्रदूषण पाहायला मिळते, वायू प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण या तिने प्रदूषणामुळे आपले संपुर्ण वातावरण दूषित होत चालले आहे श्वास घेण्यासाठी स्वच्छ हवा मिळेना पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळेना आणि कानावर येणारा कर्कश आवाजामुळे कानाच्या संबंधित गंभीर समस्या उद्भवत आहे.
विकसनशील देशांना प्रदूषणाच्या समस्या मुळे गंभीर नुकसान होत आहे. भारत, थायलंड, पाकिस्तान यांसारख्या देशांमध्ये प्रदूषणाची समस्या अधिक मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
तंत्रज्ञानाचा वापर करून मोठमोठे उद्योगधंदे उभारले जात आहेत जंगले तोडून त्या ठिकाणी इमारती कारखाने उभारले जात आहेत परंतु याचा परिणाम प्रदूषणामध्ये दिसून येत आहे प्रदूषणामुळे स्वच्छ पाणी प्यायला मिळत नसल्याने अनेक रोगाला आमंत्रण मिळत आहे.
आजच्या काळामध्ये मोठ्या मोठ्या शहरांचा आणि महानगर यांचा विस्तार खूप झपाट्याने होत आहे. त्यामुळे अधिक प्रमाणात वापरली जाणारी वाहने मोटारसायकल, बसेस, रिक्षा यामुळे वायू प्रदूषणाचा सामना करण्याची वेळ आपल्यावर आली आहे. उडता विकसित झालेल्या शहर आणि महानगरांमध्ये औद्योगीकरणाची झपाट्याने वाढ झालेली आहे. आणि याचा परिणाम आपल्या संपूर्ण निसर्ग असंतुलित झाले आहे. कारखान्यांच्या धुराड्यातून रुग्णाला कार्बन डाय-ऑक्साइड वायू वातावरणातील ऑक्सिजन वायूचे प्रमाण कमी करतो त्यामुळे माणसाला श्वास घेताना त्रास होत आहे यातून श्वसनाचे आजार यांसारखे गंभीर आजारांची संभावना आधीकच वाढली आहे. बऱ्याचदा दूषित दहाव्या मध्ये श्वास घेतल्यास हृदयाचे झटके देखील येण्याची संभावना आहे.
ध्वनी प्रदूषण हे देखील जल प्रदूषण आणि वायू प्रदूषण या प्रमाणेच घातक ठरत आहे. मोठमोठ्या शहरांमध्ये आणि महानगरांमध्ये वाहनांचे हॉर्न, कारखान्यांचे भोंगे, सण-समारंभ वाजवले जाणारे ताशा, डीजे , कर्कश आवाज इत्यादी सर्व कारणांमुळे ध्वनी प्रदूषण देखील मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे.
आपल्या कानाला आवश्यकतेपेक्षा जास्त आवाज पडल्यास बहिरेपणा आणि कानाच्या संबंधित इतर आजार उद्भवत आहेत त्यामुळे ध्वनी प्रदूषण देखील मानवी आरोग्यासाठी खूप घातक, हानिकारक आहे.
प्रदूषण हे कोणत्याही प्रकारचे असो परंतु त्याचा परिणाम हा संपूर्ण सजीवसृष्टीला बघायचा आहे त्यामुळे प्रदूषण कमी करण्यासाठी उपाय योजना करणे प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे प्रदूषण रोखण्यासाठी आपण वृक्षतोड थांबवली पाहिजे, वृक्षारोपण मोठ्याप्रमाणात केले पाहिजे तसेच खाजगी वाहनांचा वापर कमी करून सार्वजनिक वाहनांचा वापर मोठ्या प्रमाणात करायला हवा आवश्यकतेपेक्षा जास्त मोठा आवाज कोठेही ऐकायला येणार नाही याची काळजी घ्यायला हवी. शासनाने देखील प्रदूषणाची समस्या कमी व्हावेत यासाठी उपाययोजना करत आहे परंतु प्रदूषण कमी करायची ही जबाबदारी शासनाची नसून प्रत्येक व्यक्तीची आहे त्यामुळे प्रत्येक व्यक्ती जर प्रदूषणाला थांबविण्यासाठी उपाययोजना करू लागला तर प्रदूषणाची समस्या नक्कीच एक दिवशी संपेल.
अशा प्रकारे योग्य त्या उपाययोजना केल्यास नक्कीच प्रदूषणाची समस्या कमी होऊ शकते.
प्रदूषण एक समस्या मराठी निबंध । Pradushan Ek Samasya Essay in Marathi (1,000 words)
आजच्या डिजिटल जगाला विज्ञाना कडून बरेच काही वरदान मिळाले आहेत वरदाना सोबत शापही मिळाले आहे यामध्ये प्रदूषण देखील सामील आहे. प्रदूषण ही एक अशी समस्या आहे जी अलीकडच्या काळामध्ये वारंवार वाढत चालली आहे आणि याचे परिणाम संपूर्ण सजीव सृष्टीला भोगावे लागत आहेत.
आज पृथ्वीवर वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या आपल्याला पाहायला मिळतात जसे की जागतिक तापमान वाढ, लोकसंख्या वाढ, कमी पर्जन्यमान परंतु या सर्व समस्यांमध्ये प्रदूषण ही एक अशी समस्या आहे ज्या समस्येमुळे बाकीच्या सर्व समस्या उद्भवल्या आहेत. प्रदूषण हे मुख्य कारण आहे ज्यामुळे आपल्या आसपास
तापमान वाढ , आणि कमी पर्जन्यमान या समस्या उद्भवल्या आहेत. त्यामुळे सर्वप्रथम आपल्याला प्रदूषणाच्या समस्या ला आळा घालणे खूप आवशक्य आहे.
प्रदूषण म्हणजे काय?
प्रदूषण म्हणजेच नैसर्गिक संतुलन ना मध्ये दोष देऊन संपूर्ण निसर्ग असंतुलित होणे म्हणजेच प्रदूषण. प्रदूषणामुळे आजच्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या आजार उत्पन्न होत चाललेले आहे त्यामुळे प्रदूषण एक समस्या खूप गंभीर रूप धारण करत आहे.
प्रदूषणाचे प्रकार :
प्रदूषण हे वेगवेगळ्या प्रकारचे असते जसे की जल प्रदूषण, वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण आणि भूमी प्रदूषण.
1. जल प्रदूषण ( Water Pollution ) :
जल म्हणजे पाणी आणि प्रदूषण म्हणजे दूषित होणे, म्हणजे पाणी दूषित होणे याला जलप्रदूषण असे म्हणतात. पाण्यामध्ये विषारी पदार्थ मिसळणे त्यामुळे पाणी दूषित होते.
अलीकडच्या काळामध्ये वाढलेले औद्योगिकरणामुळे जल प्रदूषणाचे समस्या वाढलेली आहेत औद्योगीकरण मधून निघणारे विषारी पाणी हे जसेच्या तसे नदी, नाले आणि तलावांमध्ये सोडले जाते ज्यामुळे जलप्रदूषण होते. जल प्रदूषणाचा परिणाम हा मनुष्यावर होतो सोबत पाण्यामध्ये राहणार्या सजीवांवर देखील होतो. दूषित झालेले पाणी आपण पिल्यास आपल्याला गंभीर समस्या होऊ शकतात जसे की अतिसार, जुलाब ,पोट दुखी.
2. वायू प्रदूषण ( Air Pollution ) :
वायु म्हणजे हवा आणि प्रदूषण म्हणजे दूषित होणे, म्हणजे हवा दूषित होणे याला वायुप्रदूषण असे म्हटले जाते. हावे मध्ये विषारी वायू मिसळल्याने वायू प्रदूषण होते. वायू प्रदूषणाचे मुख्य कारण म्हणजे वाढत्या जाणाऱ्या वाहनांची संख्या वाहनांमधून निघणाऱ्या कार्बन डाय ऑक्साईड वायू हा वातावरणामध्ये मिसळला जातो. त्यामुळे वातावरणातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊन कार्बन-डाय-ऑक्साइडचे प्रमाण वाढते. ही हवा आपण श्वसनावाटे शरीरामध्ये घेतल्यास आपल्याला श्वसनाचे आजार आणि हृदयाचे आजार होण्याची शक्यता आहे.
3. ध्वनि प्रदूषण ( Sound Pollution ) :
ध्वनी प्रदूषण हे देखील आजच्या काळामध्ये वाढत चाललेली प्रदूषणाची एक समस्या आहे. ध्वनी प्रदूषणाची समस्या मुख्य स्वरूपात मोठ्या शहरांमध्ये आणि महाराजांमध्ये पाहायला मिळतात वाहनांचे हॉर्न, कारखान्याचे भोंगे, लग्न समारंभामध्ये वाजवले जाणारे डीजे, आणि कर्कश आवाज यामुळे ध्वनी प्रदूषणाची समस्या उद्भवते ध्वनी प्रदूषणाच्या समस्या याचा परिणाम हा आपल्या आरोग्यावर होतो. कानावर पडल्यास बहिरेपणा आणि कानाच्या संबंधित अनेक समस्या उद्भवतात.
4. भूमी प्रदूषण ( Land Pollution ) :
भूमी म्हणजे जमीन आणि प्रदूषण म्हणजे दूषित होणे, म्हणजेच जमीन दूषित होणे याला भूमी प्रदूषण असे म्हणतात.
आजच्या काळामध्ये विज्ञानाने केलेल्या प्रगतीचे बरेच दुष्परिणाम हे देखील आहेत त्यामध्ये प्रदूषणाचा सामावेश आहे. वेग वेगळी कीटकनाशके आणि रसायने जमिनीवर वापरल्यास जमीन नापीक होते. परिणामी भूमी प्रदूषण होते.
प्रदूषणाची कारणे :
प्रदूषणाच्या या विकट समस्येचे मूळ म्हणजे औद्योगिक क्रांती आणि वाढती लोकसंख्या. गिरणी, कारखाने आणि वाहनांमधून निघणारा धूर वातावरणाला दुषित बनवत आहे. गॅस प्लांटमधून होणार्या गॅस गळतीच्या दुर्घटनांमुळे वातावरण भयंकर दुषित बनत आहे. रासायनिक कचरा, औद्योगिक वसाहतींमधून निघणारा कचरा आणि गटारींचे पाणी नद्या, तलाव आणि समुद्रांच्या पाण्याला दुषित बनवत आहेत. ट्रेन, विमान, मोटर, रेडिओ, दूरदर्शन आणि लाऊड स्पीकर्समधून निघणारे ध्वनी ध्वनीप्रदूषण वाढवित आहेत. फटाके आणि बॉम्ब हे ध्वनी प्रदूषण वाढविण्यास हातभार लावत आहेत. शहरांमधील घाण वस्ती, यांत्रिकीकरणाची वाढती प्रवृत्ती आणि, जंगले आणि झाडे यांचा नाश ही प्रदूषणाची मुख्य कारणे आहेत.
प्रदूषणाचे परिणाम :
प्रत्येक प्रदूषणाचा दुष्परिणाम हा वेगवेगळ्या जरी असला तरी त्याचे परिणाम संपूर्ण सजीवसृष्टीला चे भोगावे लागणार आहेत.
प्रत्येक प्रकारचे प्रदूषण हे पृथ्वीवरील जीवनाचे शत्रू आहेत. वायू प्रदूषणामुळे वातावरणात कार्बन-डाय ऑक्साईडचे प्रमाण वाढत आहे. यामुळे, पृथ्वीच्या वातावरणावरील महत्वाचा घटक ओझोन वायुवरही तीव्र परिणाम होत आहे. पृथ्वीच्या अनियमित तापमानामुळे ऋतूंचा बदल देखील विचलित होत आहे. हवा आणि पाण्याच्या प्रदूषणामुळे विविध प्रकारचे प्राणघातक रोग पसरत आहेत. शेती नष्ट होत आहे. पृथ्वीची सुपीकता कमी होत आहे. ध्वनी प्रदूषणामुळे माणूस बहिरापणा, निद्रानाश, रक्तदाब आणि मानसिक रोगांना बळी पडत आहे.
प्रदूषण कमी करण्याचे उपाय :
प्रदूषण एक समस्या पासून मानवजातीला वाचवायचे असेल तर प्रदूषण कमी करण्याचे उपाय करणे खूपच आवश्यक आहे. प्रदूषणापासून पूर्णपणे मुक्त होणे शक्य नाही, परंतु ते कमी केले जाऊ शकते. यासाठी लोकांमध्ये जनजागृती करावी लागेल. वृक्षतोड थांबवावी लागेल आणि वृक्ष लागवडीला प्रोत्साहन द्यावे लागेल. जर आपण हुशारीने काम केले तर आम्ही लोकसंख्येचा वाढीचा दर कमी करू शकतो आणि उपकरणांच्या वापरावर नियंत्रण ठेवू शकतो, त्यामुळे आपण प्रदूषणाच्या समस्येवर बर्याच अंशी विजय प्राप्त करू शकू.
या पृथ्वीतलावर संपूर्ण मानव जातीला सुखी समाधानी जीवन जगायचे असेल तर प्रदूषणा सारखा समस्येला आळा घालणे खूप आवशक्य आहे.
मित्रांनो! आजच्या या आर्टिकल ला तुमच्या इतर मित्रांशी अवश्य शेअर करा जेणे करून त्यांना हि खूप सोप्या पद्धतीने हे माहिती वाचायला मदत होईल… आणि मित्रांनो हा लिखाण ” प्रदूषण एक समस्या मराठी निबंध । Pradushan Ek Samasya Essay in Marathi “ तुम्हाला कस वाटलं हे नक्की Comment द्यारे आम्हाला कळवा…
हे हि अवश्य वाचा :
- वृक्षाचे महत्व मराठी निबंध । Vruksha Che Mahatva in Marathi
- विज्ञान वर निबंध मराठी । Essay on Science in Marathi
- Sampurn Haripath in Marathi । संपूर्ण हरिपाठ मराठी मधून । हरिपाठ संपूर्ण मराठी
- माणूस हसणे विसरला तर…..? । Manus Hasne Visarla Tar Nibandh Marathi
- लाला लाजपत राय यांची माहिती मराठी । Lala Lajpat Rai information in Marathi