ओला दुष्काळ निबंध मराठी । Ola Dushkal Essay In Marathi

Ola Dushkal Essay In Marathi मित्रांनो आपल्या देशांमध्ये दरवर्षी दुष्काळग्रस्त परिस्थिती उद्भवते. दुष्काळ हा केवळ दुष्काळ नसून यामध्ये दोन प्रकार पडतात ते म्हणजे ओला दुष्काळ आणि सुका दुष्काळ होय. दुष्काळ म्हणजे अति पाण्याच्या समस्ये मुळे मानवी जीवनावर येणारे संकट होय.

सतत होणाऱ्या अतिवृष्टीमुळे किंवा अतिप्रचंड यामुळे एखाद्या भागामध्ये पूरग्रस्त परिस्थिती निर्माण होते आणि याचा परिणाम त्या भागातील सर्व सजीवांना भोगावा लागतो.

दुष्काळ म्हणजेच पाण्याची त्यायोगे अन्न स्त्रोतांची अनुपलब्धती किंवा तीव्र टंचाई असलेला महिन्यांचा किंवा दीर्घ वर्षांचा कालावधी होय. दुष्काळ येण्याकरिता वातावरणातील अकस्मित घटक वृक्षतोड किंवा ज्वालामुखी उद्रेक किंवा वनवे इत्यादींमुळे पर्यावरणातील जल चक्रामध्ये अडथळा निर्माण होऊन दुष्काळ येऊ शकतो. दुष्काळग्रस्त परिस्थितीमध्ये अन्न पाण्याच्या अभावी माणसांसह बहुसंख्य सजीवांना प्राण संकटास तोंड द्यावे लागते.

ओला दुष्काळ निबंध मराठी । Ola Dushkal Essay In Marathi

आजच्या लेखात दुष्काळाचा एक प्रकार पाहणार आहोत तो म्हणजे ओला दुष्काळ. चला तर मग पाहूया, ओला दुष्काळ निबंध मराठी । Ola Dushkal Essay In Marathi.

ओला दुष्काळ या शब्दामध्येच आपल्याला कळून येईल की, हा दुष्काळ पाण्याच्या अति अभावामुळे येतो. ओला दुष्काळ अतिवृष्टी मुळे होतो.

उदाहरणार्थ, पिकांच्या कापणीच्या काळामध्ये अवकाळी किंवा मुसळधार पावसाने शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होते. भात, कापूस, कांदा, मका अशा अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. ओल्या दुष्काळामध्ये पिके पाण्याखाली जातात किंवा कुजून जातात यामुळे मोठे नुकसान होते.

ओला दुष्काळ म्हणजे काय?

ओला दुष्काळ म्हणजे, एखाद्या विशिष्ट क्षेत्रात काही काळ सतत किंवा नेहमीच पर्जन्यमाना पेक्षा जास्त पाऊस पडल्यामुळे अतिवृष्टी निर्माण होते व त्या भागांमध्ये पाण्याची पातळी खूप मोठ्या प्रमाणात वाढते व त्यामुळे पूरजन्य परिस्थिती निर्माण होते. या पूरजन्य परिस्थितीमध्ये झालेली वित्तहानी, जीवित हानी, पिकांची हानी, पाण्याचा सुकाळ अशी परिस्थिती उद्भवणार म्हणजेच ओला दुष्काळ होय.

ओला दुष्काळ ही परिस्थिती सुका दुष्काळाच्या बिलकुल विरुद्ध असते.

ओला दुष्काळाची कारणे :

ओला दुष्काळ हा पुढीलपैकी काही कारणांमुळे होत असतो. आपण म्हणतो अलीकडे पावसाचे प्रमाण कमी झाले परंतु काही ठिकाणी पावसाचे प्रमाण हे प्रचंड माझ्यापेक्षा अधिक असल्याने तेथे ओला दुष्काळ खूप मोठ्या प्रमाणावर पडतो. बोला दुष्काळाची काही प्रमुख कारणे ते पुढील प्रमाणे;

1. वृक्षतोड :

आजच्या काळामध्ये वाढ झालेल्या वृक्षतोडीमुळे निसर्गाचे चक्र बदलले आहे. अशा परिस्थितीमध्ये पाऊस हा पावसाळा ऋतूमध्ये न पडता इतर ऋतूमध्ये पडतो याचा परिणाम पाऊस पर्जन्य मनापेक्षा आधीक पडतो व परिणामी ओला दुष्काळ यांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते.

2. वाढते औद्योगिकीकरण :

वाढत्या औद्योगिकीकरणामुळे आलिकडच्या काळामध्ये जागोजागी नद्यांवर धरणे बांधून पाणी थांबवले जाते. पावसाळा ऋतु मध्ये जेव्हा पाऊस पडतो तेव्हा पाण्याला वाहण्यासाठी योग्य प्रवाह न मिळाल्याने पुराची परिस्थिती उद्भवते व परिणामी त्या क्षेत्रामध्ये ओला दुष्काळ पडतो.

3. पाण्याचा योग्य निचरा न झाल्याने :

शहरी भागामध्ये पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य पद्धती नसल्याने शहरामध्ये पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे गटारी, नाले तुंबले जातात. परिणामी गटार, नाला यामध्ये पाणी साचून या भागांमध्ये दुष्काळ किंवा पूरग्रस्त परिस्थिती निर्माण होते.

4. नदी- तलाव यांची योग्य साफ सफाई न केल्याने :

आजच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा हा नदी तलाव यांमध्ये सोडून दिला जातो या क्षेत्रांमध्ये अनेक घातक पदार्थ असतात जसे की कॅरीबॅग, प्लास्टिकच्या वस्तू आणि या सर्व वस्तूंमुळे नदी नाल्यातील पाणी हे तुंबले जाते व त्यांचा प्रवाह देखील जागीच थांबला जातो.

अशा परिस्थितीमध्ये नदी नाल्यातील पाणी हे नव्हता जागी थांबले जाते ज्यावेळी अतिवृष्टी होती किंवा पर्जन्यमाना पेक्षा अधिक पाऊस पडतो त्यावेळी नदी नाल्यातील पाणी पुढे न जाता ते चावी थांबले जाते व परिणामी त्या क्षेत्रांमध्ये ओला दुष्काळ परिस्थिती पसरतो आणि पूरग्रस्त परिस्थिती निर्माण होते.

ओला दुष्काळाचे दुष्परिणाम :

ओला दुष्काळामुळे दुष्परिणाम देखील घडून येतात ते पुढील प्रमाणे;

  1. ज्या भागामध्ये ओला दुष्काळ परंतु त्या भागामध्ये कित्येक मोठ्या प्रमाणामध्ये वित्तहानी होते.
  2. तसेच ओला दुष्काळा मुळे जीवित हानी देखील होण्याची शक्यता असते.
  3. ज्या भागामध्ये ओला दुष्काळ बसलेला आहे अशा भागामधील पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होते. पिके पाण्याखाली जातात किंवा कुजून जातात यामुळे कांची मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होते.
  4. ओला दुष्काळ भागांमध्ये संपूर्ण मानवी वस्ती धोक्यामध्ये येते यामुळे आर्थिक नुकसान होते.

ओला दुष्काळावर करण्याजोगे उपाय :

दुष्काळ ही नैसर्गिक प्रक्रिया असते तरीदेखील आपण दुष्काळ रोखण्यासाठी प्रयत्न करू शकतो एवढेच नसून काही उपाय करून आपण दुष्काळग्रस्त परिस्थिती पासून स्वतःचा बचाव करू शकतो.

  1. अतिवृष्टी किंवा अति पर्जन्यमान अशी परिस्थिती उद्भवला नंतर ज्या ठिकाणी नदी किंवा तलाव आहे अशा भागातील लोकांनी तेथील वस्तीत वर इतर कामे करावी व दूरच्या किंवा डोंगरावर सारख्या उंच ठिकाणी रहावे.
  2. तसेच नदी-नाले वेळेवर स्वच्छ करून त्यांचा प्रवाह योग्य आहे का नाही तो तपासणे देखील गरजेचे आहे.
  3. नदी नाल्यांमध्ये कॅरीबॅग किंवा प्लास्टिकच्या वस्तू जाऊ न देणे जेणेकरून नदी-नाल्यांच्या पाणी तुंबणार नाही.
  4. आपण वृक्षतोड देखील थांबवली पाहिजे जेणेकरून पाऊस हा पावसाळ्यातच पडेल पण त्याचे प्रमाण देखील आपल्याला पाहिजे तेवढेच असेल.

अशाप्रकारे काही उपाय करून आपण ओला दुष्काळ यांसारख्या परिस्थिती पासून स्वतःचा बचाव करू शकतो.

मित्रांनो! आजच्या या आर्टिकल ला तुमच्या इतर मित्रांशी अवश्य शेअर करा जेणे करून त्यांना हि खूप सोप्या पद्धतीने हे माहिती वाचायला मदत होईल… आणि मित्रांनो हा लिखाण ” ओला दुष्काळ निबंध मराठी । Ola Dushkal Essay In Marathi “ तुम्हाला कस वाटलं हे नक्की Comment द्यारे आम्हाला कळवा…

हे हि अवश्य वाचा :

धन्यवाद !!

Leave a Comment