माझा वाढदिवस मराठी निबंध । My Birthday Essay in Marathi

मित्रांनो वाढदिवस म्हणजेच जन्मदिवस. या पृथ्वीवर जेवढे व्यक्ती आहेत त्या प्रत्येक व्यक्तीचा वाढदिवस असतो. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये वाढदिवसाला आल्याने साधारण महत्व आहे. कारण वाढदिवस या दिवशी आपण जन्माला येतो व या सुंदर अशा सृष्टीला पाहतो.

त्यामुळे वाढदिवसाचा हा दिवस, अविस्मरणीय दिवस आपल्यासाठी खूप खास असतो व हा दिवस आपण कधीही विसरणार नाही यासाठी वाढदिवस साजरा केला जातो. पण मला वाढदिवस साजरा करायला आवडत नाही. परंतु गेल्या वर्षी साजरा केलेला वाढदिवस हा माझ्यासाठी अविस्मरणीय वाढदिवस होता. व त्याच्याच आठवणी मी आज तुम्हाला ” माझा वाढदिवस मराठी निबंध | Essay on my Birthday in Marathi” या लेखाच्या माध्यमातून सांगणार आहे.

माझा वाढदिवस मराठी निबंध । My Birthday Essay in Marathi

माझा वाढदिवस १० ओळीत मराठी निबंध 10 Lines on My Birthday Essay in Marathi (This essay is Helpful for Students of Classes 1, 2, 3 and 4.)

 1. वाढदिवस हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय दिवस असतो.
 2. वाढदिवस म्हणजे आपला जन्म दिवस असतो, वाढदिवसा दिवशी आपण जन्माला येतो म्हणून वाढदिवस साजरा करतात.
 3. माझे नाव प्रिया आहे. मी दरवर्षी 20 सप्टेंबरला माझा वाढदिवस साजरा करते.
 4. सप्टेंबर महिना सुरू होताच मी माझ्या वाढदिवसाची आतुरतेने वाट पाहत असते. कारण वाढदिवस हा वर्षातून एकदाच येतो.
 5. माझे आई बाबा माझा वाढदिवस मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतात.
 6. माझ्या वाढदिवसा दिवशी माझ्या सर्व मित्रांना आणि नातेवाईकांना घरी माझा वाढदिवस साजरा करण्यासाठी आमंत्रण दिले जाते.
 7. चॉकलेट फ्लेवर चा केक मला खूप आवडतो त्यामुळे दर वर्षी माझ्या वाढदिवसाला बाबा चॉकलेट केकच आणतात.
 8. माझे बाबा संपूर्ण घर रंगीबेरंगी फुगे आणि स्ट्रीमर्सने सजवतात.
 9. दर वर्षी आई बाबा माझ्या वाढदिवसा दिवशी मला काहीतरी गिफ्ट देतात. गेल्यावर्षी बाबांनी मला शाळेत जाण्यासाठी सायकल गिफ्ट केली होती.
 10. माझ्या खास दिवशी मला भेट देणाऱ्या माझ्या मित्र आणि नातेवाईकांकडून मला खूप भेटवस्तू आणि शुभेच्छा मिळाल्या.
 11. माझ्या वाढदिवसा दिवशी सर्व मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक एकत्र जमतात त्यामुळे मला माझा वाढदिवस खूप खूप आवडतो!!!

माझा वाढदिवस मराठी निबंध | Essay on my Birthday in Marathi

वाढदिवस हा प्रत्येक व्यक्तींसाठी खूपच खास दिवस असतो त्याप्रमाणे माझ्यासाठी सुद्धा माझा वाढदिवस हा खूप खास दिवस आहे. कारण वाढदिवसा दिवशी मी जन्मलो या सुंदर सृष्टी मध्ये पहिले पाऊल टाकले. त्यामुळे माझी आई बाबा मी लहान असल्यापासून आज माझा वाढदिवस साजरा करत आलेत.

माझा वाढदिवस हा वर्षभरातील माझा आवडता दिवस आहे. भेटवस्तू किंवा केक किंवा सजावटीमुळे नाही, तर माझ्या जवळच्या मित्र आणि कुटुंबाकडून मला मिळालेल्या विशेष लक्ष आणि प्रेमामुळे. एक वर्ष मोठे होण्याचा विचार नेहमीच अतिवास्तव आणि रोमांचक असतो. मला सहसा वाढदिवसाच्या पार्टी करायला आवडत नाहीत, पण गेल्या वर्षीची माझी छोटी सरप्राईज बर्थडे पार्टी अनोखी आणि खूप खास होती

कारण गेल्या वर्षी माझ्या वाढदिवसाची पूर्वतयारी ही 15 दिवस अगोदर पासूनच सुरु झाली होती. आई बाबा आणि नातेवाईक हे मला सरप्राईज पार्टी देण्याच्या विचारांमध्ये होते. आणि जास्त काही लक्ष दिले नाही कारण मला वाढदिवस साजरा करण्यामागे विशेष आवड नाही. कारण मला वाटते की वाढदिवस साजरा करण्यामागे मध्ये आपण जे काही खर्च करतो किंवा पार्टीसाठी जो खर्च करतो तो खर्च एखाद्या अनाथ आश्रम ला किंवा गरिबांना दान केले तर बरे नाही का!!!

त्यामुळे मी वाढदिवस साजरा करण्यासाठी मित्र-मैत्रिणींना पार्टी देण्यामध्ये जराही आवड नाही.

परंतु गेल्या वर्षी चा वाढदिवसा हा माझ्या आजपर्यंतच्या वाढदिवसा मध्ये सर्वात खास ठरला. कारण त्या दिवशी सर्व काही माझ्या मनासारखे घडले. माझ्या वाढदिवसाच्या दिवशी देखील मी शाळेला सुट्टी घेतली नव्हती. आईबाबा माझ्यासाठी काहीतरी पार्टीचे आयोजन करणार किंवा नातेवाईकांना बोलवणार असे मला वाटले त्यामुळे मी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी निखिल शाळेला गेलो.

शाळा सुटल्यानंतर मी घरी परतलो. घरी परतल्यानंतर घरातील सर्व लाइट्स बंद होत्या. त्यामुळे मला वाटले की मला सरप्राईज देण्यासाठी माझे मित्र मैत्रीण किंवा नातेवाईक जमले असतील. मी विचारच करत होतो की आई-बाबांनी माझ्या वाढदिवसासाठी खूप खर्च केला असेल? त्यामुळे मला थोडा राग आला. कारण मला वाढदिवसाच्या नावाखाली केलेला खर्च मुळीच आवडत नाही.

म्हणून मी रागामध्ये आईला आवाज दिला. ” आई, लाईट ओन कर मी आलोय.” तेवढ्यात कोणीतरी घरातील लाईट चालू केली. पाहिले तर काय करा मध्ये सर्व नातेवाईक जमले होते आणि माझे मित्र मैत्रिणी की जमले होते परंतु सोबतच शेजारील अनाथ आश्रम मधील काही अपंग मुले देखील आली होती.

मी आईला विचारले , आई हे काय आहे?

तेव्हा आईने मला सांगितले की तुझ्या वाढदिवसा निमित्ताने आम्ही शेजारील आश्रमात त्यांना घरी जेवण करायला बोलावले आहे. हे ऐकताच माझा आनंद गगनात मावेनासा झाला. व मी आनंदाने नाचू लागलो……

हा माझा प्रथम वाढदिवस होता ज्या दिवशी मी एवढा खुश आणि आनंदी होतो. मी लगेच माझे दप्तर माझ्या अभ्यासाच्या रूम मध्ये ठेवले. व मी फ्रेश होऊन बाहेर आलो. मामानी माझ्यासाठी केक आणला होता. काकांनी मला नवीन ड्रेस देखील आणला. मी नवीन ड्रेस घालून तयार झालो.

माझ्या मित्र मैत्रिणी देखील माझ्यासाठी खूप काही गिफ्ट ग्रीटिंग कार्ड घेऊन आले होते. सर्वांनी मला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या.

त्यानंतर केक कापण्याची वेळ झाली. त्यानंतर केक कापून सर्व अनाथ मुलांमध्ये वाटण्यात आला. त्यादिवशी मी तर खुश होतो त्यासोबत अनाथ आश्रम मधील अपंग मुले देखील इतकी खुश होते त्यांना पाहून आम्ही सगळे आनंदी झालो.

त्यानंतर बाबांनी सर्व अनाथ मुलांना जेवणासाठी बसवले. सर्वांना जेवण वाढून झाल्यानंतर माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने सर्व अनाथ मुलांना नवीन कपडे वाटण्याचा निर्णय घेतला. आणि माझ्या या निर्णयाला माझ्या आई बाबांची पुर्णतः साथ होती.

सर्व अनाथ मुले जेवण करेपर्यंत मी आणि बाबांनी बाजार पेठ मध्ये जाऊन नवीन कपडे खरेदी केली. व घरी येऊन ती कपडे अनाथ मुलांना वाटली. अशाप्रकारे गेल्या वर्षीचा वाढदिवस हा माझ्यासाठी अविस्मरणीय वाढदिवस ठरला.

वाढदिवस म्हटलं की सर्वांच्या समोर पार्टी, गिफ्ट अशा वस्तू दिसतात. परंतु मला वाटते की वाढदिवस हा आपला जन्मदिवस असतो या दिवशी आपण जन्माला येतो. मौल्यवान अशी जीवन आपल्याला मिळते. मग आपण जीवनात आलेला हा दिवस पार्टीमध्ये उगीच व्यर्थ करायचा का?

जीवन हे आपल्याला एकदाच येते. या जीवनाचे वाढदिवस दरवर्षी येतो. वाढदिवसाच्या आपल्याला आठवण करून देण्यासाठी येतो कि आपण जन्माला येऊन एक वर्ष सरत आहे. मग या वर्षामध्ये आपण किती लोकांना मदत केली आहे, आपली जीवन खऱ्या अर्थाने सार्थक होते आहे का नाही? या गोष्टी लक्षात आणून देण्यासाठी वाढदिवस येतो असे, मला वाटते.

त्यामुळे आपल्याकडून एखाद्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करणे, त्यांचे मन तृप्त करणे, गरजू लोकांना मदत करणे म्हणजे खऱ्या अर्थाने वाढदिवस साजरा करणे होय.

म्हणून मी माझ्या वाढदिवसा दिवशी पार्टीसाठी पैसे खर्च न करता गरजू लोकांना मदत करणे अधिक चांगले समजतो. आणि माझ्या या अशा विचारांना सुरुवात झाली ती म्हणजे माझ्या गेल्या वर्षीच्या वाढदिवसापासून……

इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक वाढदिवसाला आम्ही अशाचप्रकारे लोकांची मदत करेल. यातून मिळणारा आनंद हा खरच कधी न विसरणारा अविस्मरणीय आहे. म्हणून सर्वसाधारण व्यक्तीप्रमाणे माझ्याही जीवनामध्ये वाढदिवसाला खूप महत्त्व आहे. कारण वाढदिवसाच्या निमित्त माझ्याकडून गरजू लोकांना मदत होते व याचा मला खूप आनंद आहे.

मित्रांनो! आजच्या या आर्टिकल ला तुमच्या इतर मित्रांशी अवश्य शेअर करा जेणे करून त्यांना हि खूप सोप्या पद्धतीने हे माहिती वाचायला मदत होईल… आणि मित्रांनो हा लिखाण ” माझा वाढदिवस मराठी निबंध । My Birthday Essay in Marathi “ तुम्हाला कस वाटलं हे नक्की Comment द्यारे आम्हाला कळवा…

हे हि अवश्य वाचा :

Leave a Comment