Meme म्हणजे काय? । Memes in Marathi And । Memes Meaning In Marathi

Memes Meaning In Marathi

मित्रांनो आजच्या वर्तमान काळ म्हणजे प्रत्येक व्यक्ती सोशल मीडियाचा वापर करत असतो सोशल मीडियाचा वापर करत असताना आपल्या दैनंदिन जीवनामध्ये नवीन नवीन शब्दांशी आपली ओळख होते. अलीकडच्या काळामध्ये मीडियाच्या माध्यमातून अधिक प्रचलित झालेला शब्द म्हणजे memes होय.

Meme म्हणजे काय? । Memes in Marathi And । Memes Meaning In Marathi

तरुण पिढी तर पूर्णता memes च्या आहारी गेलेली आपल्याला पाहायला मिळतात बहुतांश जण आपल्या मोबाईल फोन वरती memes वाचण्याचे किंवा तयार करण्याच्या गोष्टी आपण ऐकतो.

परंतु आपल्या तील बहुतांश जणांना मेम्स म्हणजे काय ? तसेच मेम्स संबंधित महत्वाची माहिती जसे की, मेम्स चे प्रकार, mene कशाप्रकारे तयार केला जातो याबद्दल माहिती नाही. म्हणून आजच्या “Meme म्हणजे काय?” या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासाठी memes संबंधित संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

Meme म्हणजे काय? Memes Meaning In Marathi :

Meme या शब्दा चा फुल फॉर्म ‘Mostly Entertain Material Ever’ असा आहे.

मित्रांनो आजच्या काळामध्ये इंटरनेटवर मेम्स हा प्रकार अधिकच प्रसिद्ध झाला आहे लोकांकडून देखील memes ला खूप लोकप्रियता प्राप्त झाली आहे. इंटरनेट वर मीम्स चा वापर करून लोकांना ट्रोल व काही गोष्टींवर टीका टिप्पणी केली जाते.

मित्रांनो प्रत्येक इंग्रजी शब्दाचा मराठी अर्थ हा सहसा एका शब्दांमध्ये स्पष्ट केला जातो जसे की, temple म्हणजे मंदिर असा होतो परंतु मेम्स हा एक असा शब्द आहे ज्याचा अर्थ एका शब्दांमध्ये सांगता येणार नाही कारण या शब्दाची तुमची ओळख इंटरनेटवर नक्कीच झाली असेल.

Memes हा शब्द आपल्या सर्वांच्या परिचयाचा असला तरी memes या शब्दाची उत्पत्ती इंटरनेट आणि सोशल मीडिया अस्तित्वात येण्याच्या अगोदर पासून आहे.

Memes हया शब्दाची उत्पत्ती 1976 च्या दरम्यान झाली होती. 1976 मध्ये Richard Dawkins जे एक जीवशास्त्रज्ञ होते, ह्यांनी “the selfish Gene” नावाचे एक पुस्तक प्रसारित केले होते आणि या पुस्तकात प्रथम Meme या शब्दाचा वापर केला गेला होता. परंतु सुरुवातीच्या काळामध्ये वापरला जाणारा memes हा शब्दाचा अर्थ आज वापरल्या जाणाऱ्या मेम्स या शब्दापेक्षा पूर्णता वेगळा होता.

Richard Dawkins यांच्याद्वारे प्रसारित केल्या गेलेल्या पुस्तका मध्ये ” Meme म्हणजे एक विचार किंवा संकल्पना जे कालांतराने एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे असे प्रसारित होत जाते “, असे असं अर्थ सांगितलं गेला होता.

हल्ली आपण meme शब्दाचा वापर एका अशा कला कृतींसाठी वापरतो, जे अगदी कमी शब्दात भावना व्यक्त करतात.

तसेच अलीकडच्या काळामध्ये memes चा वापर करून काही लोकांना ट्रोल केले जाते तर काही लोकांनी पोस्ट केलेल्या पोस्टवर टिपणी केली जाते. तसेच कोणाबद्दल चांगले वाईट विचार मांडायचे असेल तर memes चा वापर मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो.

शब्दाची मांडणी करून एखाद्याला प्रतिसाद देण्यापेक्षा मेंस म्हणजे चित्र आणि विनोदाच्या माध्यमातून एखाद्याला प्रतिसाद देणे किंवा टिप्पणी करणे हे अधिक पसंद केले जात आहे त्यामुळे अलीकडच्या काळामध्ये memes ला अधिक लोकप्रियता प्राप्त झाली.

मीम्सचे विविध प्रकार । Types of Memes Marathi :

सोशल मीडिया वापरणार्‍या प्रत्येक व्यक्तीला मीम्स बदल नक्कीच ऐकले असेल. मीम्स मुळे बहुतांश लोक सोशल मीडिया वापरतात हे म्हणने देखील चुकीचे ठरणार नाही. मनोरंजनाचे आणखीन एक साधन बनलेले मीम्स हे वर्तमान काळामध्ये अधिकच प्रसिद्ध झाले आहे.

मीम्स चे वेगवेगळे प्रकार आहेत त्यातील काही प्रसिद्ध प्रकार पुढीलप्रमाणे-

1. क्लासिक मिम्स Classic Memes in Marathi :

Classic memes हे memes ची साधी आणि सोपी पद्धत आहे. सर्वसाधारणपणे क्लासिक मीम्स चा वापर मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. यामध्ये एखाद्या व्यक्तीच्या किंवा कोणत्याही फोटोवर text च्या माध्यमातून memes बनविले जातात.

2. सिरीज मीम्स Series Memes in Marathi

Series memes या नावाप्रमाणेच सीरिजमध्ये असतात इंस्टाग्राम वर आढळणाऱ्या बहुतांश memes या सिरीज मीम्स या प्रकाराच्या असतात.मीम्स series मध्ये असून ते माहितीपर गोष्टी दाखवण्याकरिता मुख्यतः वापरतात.

3. शैक्षणिक मीम्स Educational Memes in Marathi

शैक्षणिक memes चा मुख्य उद्देश हा मनोरंजक नसून शैक्षणिक माहिती पुरविणे हा असतो. अगदी कमी वेळेमध्ये शैक्षणिक मीम च्या माध्यमातून आपल्याला थोडक्यात आणि स्पष्ट एखाद्या विषयाची माहिती मिळवून जाते. Education meme प्रकारच्या मिम द्वारे कोणत्याही प्रकारची शैक्षणिक माहिती प्रसारित केली जाऊ शकते.

4. अस्पष्ट मीम्स Obscurity Memes in Marathi

अस्पष्ट meme या मनोरंजनाच्या उद्दिष्टाने तयार केलेल्या मीम चा प्रकार आहे. या meme केवळ मनोरंजनासाठी असतात या मीमचा विषय देखील अस्पष्ट असतो.

ह्या प्रकारातील मीम्स हास्य व विनोद दृष्टिकोन ठेवून तयार केले जातात म्हणून ते मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होतात.

5. ट्रेडिंग मीम्स Trending Memes in Marathi :

Trending memes या नावावरूनच आपणाला कळेल की या meme ट्रेंडिंग असतात. जेव्हा एखादी अशी घटना घडते, जी कमी वेळात खूप प्रसिद्ध होते, साधारणतः अशा घटनांवर मीम्स बनवले जातात.

ट्रेडिंग मीम्स थोड्या काळासाठी असतात नंतर ट्रेंड नुसार जाऊन त्याजागी नवीन मेम येतात. ट्रेंड मध्ये असताना हे खूप व्हायरल होतात.

मित्रांनो! आजच्या या आर्टिकल ला तुमच्या इतर मित्रांशी अवश्य शेअर करा जेणे करून त्यांना हि खूप सोप्या पद्धतीने हे माहिती वाचायला मदत होईल… आणि मित्रांनो हा लिखाण ” Meme म्हणजे काय? । Memes Meaning In Marathi “ तुम्हाला कस वाटलं हे नक्की Comment द्यारे आम्हाला कळवा…

हे हि अवश्य वाचा :

Leave a Comment