Marathi Mahine List । मराठी महिने, मराठी महिन्यांची माहिती, मराठी महिने नावे व दिवस, Marathi Months

Marathi Mahine हिंदू पंचांगानुसार एका वर्षामध्ये बारा महिने असतात. या बारा महिनांना बारामास असे म्हटले जाते. एका महिन्यातल्या एका दिवसाला तिथी असे म्हटले जाते. एक दिवस म्हणजे एक तिथी होय आणि एका दिवसामध्ये चोवीस तास असतात. पंचांगानुसार एका महिन्यामध्ये 30 दिवस असतात. आणि त्या महिन्याची गणना सूर्य आणि चंद्र यांच्या स्थितीनुसार होत असते.

म्हणजे चंद्राच्या कमी-अधिक होण्याच्या स्थितीवरून एका महिन्याचे दोन भागांमध्ये विभाजन केले जाते. एका भागा मध्ये पंधरा दिवस असतात त्यांना कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष असे म्हणतात.

Marathi Mahine । मराठी महिने, मराठी महिन्यांची माहिती, मराठी महिने नावे व दिवस, Marathi Months

कृष्ण पक्ष म्हणजे काय?

चंद्राच्या स्थितीवरून दोन पक्ष पडतात म्हणजेच पौर्णिमा आणि अमावस्या यांच्यातील 15 दिवसाच्या अंतराला कृष्णपक्ष असे म्हणतात. पोर्णिमा झाल्यानंतरच्या दुसऱ्या दिवसापासून कृष्ण पक्षाची सुरुवात होते. असे म्हणतात की, कृष्ण पक्षामध्ये कोणत्याही शुभकार्याला सुरुवात करू नये. कारण कृष्ण पक्षांमध्ये चंद्राचा आकार हळूहळू कमी होत जातो आणि रात्रीचा अंधार वाढत जातो. चंद्राचा आकार जसजसा कमी होतो तसंच रात्री मोठी होते.

शुक्लपक्ष म्हणजे काय?

अमावस्या आणि पौर्णिमा यांच्यातील 15 दिवसाच्या अंतराला शुक्लपक्ष असे म्हटले जाते.अमावस्या च्या दुसऱ्या दिवसापासून शुक्लपक्ष याची सुरुवात होत असते. या पक्षामध्ये चंद्र अधिक बलवान होतो आणि रात्र कमी होते. त्यामुळे या पक्षांमध्ये कोणत्याही कार्याला सुरुवात करणे शुभ मानले जाते.

आता आपण Marathi Mahine | मराठी महिने, मराठी महिन्यांची माहिती, Marathi Mahine Chi Naave व दिवस पाहणार आहोत.

1. चैत्र महिना :

चैत्र महिन्याला मराठी महिन्यांमधील वर्षाचा पहिला महिना म्हणून ओळखले जाते. चैत्र महिन्याची सुरुवात ही अमावस्या पासून होते. चैत्र महिन्या मध्ये वर्षाचे स्वागत करण्यासाठी येणारा स्थळ म्हणजेच गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो. तसेच चैत्र महिन्यामध्ये गोळीचा देखील येतो. कॅलेंडर नुसार हा महिना मार्च ते एप्रिल महिन्यांदरम्यान असतो.

चैत्र महिन्याला Month Of Spring असे देखील म्हटले जाते.

2. वैशाख महिना :

वैशाख हा वर्षाचा दुसरा महिना असतो. इंग्रजी कॅलेंडर नुसार हा महिना एप्रिल-मे महिन्यांत दरम्यान असतो. वैशाख महिन्याला पीक कापणी (season of crop harvesting) चा महिना म्हणून देखील ओळखले जाते. कारण या महिन्यांमध्ये शेतकरी शेतातील नवीन पीक काढतात. पंजाब प्रांतांमध्ये वैशाख महिन्याला बैसाखी असे म्हणतात. व तेथे बैसाखी की हा सण खूप मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो.

3. ज्येष्ठ महिना :

जेष्ठ महिना हा वर्षाचा तिसरा महिना आहे. इंग्रजी कॅलेंडरनुसार हा महिना मे- जून महिन्याच्या दरम्यान असतो. या महिन्यामध्ये महाराष्ट्र राज्यात वटसावित्री पौर्णिमा साजरी केली जाते.

4. आषाढ महिना :

बेस्ट महिन्याला मराठी वर्षाचा चौथा महिना म्हणून देखील ओळखली जाते इंग्रजी कॅलेंडरनुसार हा महिना जून जुलै महिन्याच्या दरम्यान असतो. आषाढ महिन्या मध्ये गुरुपौर्णिमा आणि आषाढी एकादशी हे उत्सव येतात.

5. श्रावण महिना :

श्रावण महिन्याला वर्षाचा पाचवा महिना म्हणून देखील ओळखली जाते. इंग्रजी कॅलेंडरनुसार हा महिना जुलै -ऑगस्ट महिन्याच्या दरम्यान असतो. श्रावण महिन्यामध्ये नागपंचमी आणि नारळी पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन साजरे केले जातात. तसेच श्रावण महिन्यामध्ये रिमझिम पाऊस असतो.

6. भाद्रपद महिना :

भाद्रपद महिन्याला मराठी वर्षाचा सहावा महिना म्हणून ओळखले जाते. इंग्रजी कॅलेंडर नुसार हा महिना ऑगस्ट- सप्टेंबर महिन्यांच्या दरम्यान असतो. हा महिना सर्वांच्या आवडती चा महिना आहे कारण या महिन्यांमध्ये देशभरामध्ये गणेश चतुर्थी साजरी केली जाते म्हणजेच सर्वांच्या घरी लाडके गणपती बाप्पांचे आगमन होते.

7. अश्विन महिना :

भाद्रपद महिन्याला वर्षाचा सातवा महिना म्हणून ओळखले जाते. इंग्रजी कॅलेंडर नुसार हा महिना सप्टेंबर ऑक्‍टोबर महिन्याच्या दरम्यान असतो. हिंदू धर्मामध्ये साजरा होणारा सर्वात मोठा सण म्हणजे नवरात्रीचा सण होय. म्हणजेच अश्विन महिन्यामध्ये नवरात्र हा उत्सव साजरा केला जातो. तसेच अश्विन महिन्यामध्ये दुर्गापूजा, कोजागिरी, दसरा, दिवाळी इत्यादी सण उत्सव साजरे केले जातात.

8. कार्तिक महिना :

कार्तिक महिन्याला वर्षाचा आठवा महिना म्हणून ओळखले जाते. इंग्रजी कॅलेंडरनुसार हा महिना ऑक्टोंबर नोव्हेंबर महिन्याच्या दरम्यान येतो. भाऊबीज हा सण या महिना मध्ये साजरा केला जातो.

9. मार्गशीष महिना :

मार्गशीष महिन्याला वर्षाचा नववा महिना म्हणून ओळखले जाते.इंग्रजी कॅलेंडर नुसार हा महिना नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यांच्या दरम्यान येतो. या महिन्यामध्ये स्त्रिया महालक्ष्मी देवीचे व्रत करतात. या महिन्या मध्ये दत्त जयंती साजरी केली जाते.

10. पौष महिना :

पौष महिन्याला वर्षाचा दहावा महिना म्हणून ओळखले जाते. इंग्रजी कॅलेंडरनुसार हा महिना डिसेंबर -जानेवारी महिन्याच्या दरम्यान येतो. स्त्रियांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असलेला सण म्हणजे मकर संक्रांत हा सण या महिन्यामध्ये साजरा केला जातो.

11. माघ महिना :

माघ महिन्याला वर्षाचा अकरावा महिना म्हणून ओळखले जाते. इंग्रजी कॅलेंडरनुसार हा महिना जानेवारी -फेब्रुवारी महिन्याच्या दरम्यान येतो. या महिन्या मध्ये महाशिवरात्रीचा उत्सव साजरा केला जातो. या महिन्यामध्ये सर्वजण भगवान शिवशंकराची आराधना करतात व पूजा करतात.

12. फाल्गुन महिना :

फाल्गुन महिना हा वर्षाचा बारावा महिना म्हणजेच शेवटचा महिना म्हणून ओळखला जातो. हा इंग्रजी कॅलेंडरनुसार फेब्रुवारी मार्च महिन्याच्या दरम्यान असतो. फाल्गुन महिना मध्ये होळी हा सण साजरा केला जातो.

मित्रांनो! आजच्या या आर्टिकल ला तुमच्या इतर मित्रांशी अवश्य शेअर करा जेणे करून त्यांना हि खूप सोप्या पद्धतीने हे माहिती वाचायला मदत होईल… आणि मित्रांनो हा लिखाण ” Marathi Mahine । मराठी महिने, मराठी महिन्यांची माहिती, मराठी महिने नावे व दिवस, Marathi Months “ तुम्हाला कस वाटलं हे नक्की Comment द्यारे आम्हाला कळवा…

हे हि अवश्य वाचा :

धन्यवाद!!

Leave a Comment