खूपच छान – मराठी बोधकथा आणि तात्पर्य सोबत । Marathi Bodh Katha

खूप छान मराठी बोधकथा तात्पर्य सोबत । Marathi Bodh Katha

मित्रांना कथा ऐकायला कोणाला आवडत नाही प्रत्येक व्यक्तीला कथा ऐकायला खूप आवडतात आणि अशा काही कथा आहेत ज्या खूप प्रसिद्ध आहेत परंतु कथांमध्ये देखील वेगवेगळे प्रकार पडतात यामध्ये बोधकथा ही ऐकायला जेवढी चांगली असते त्याप्रमाणे त्या कथेमधून आपल्याला नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात मधूनच आपल्याला कळेल की या कथांमधून आपल्याला कोणता तरी चांगला असा बोध किंवा तात्पर्य मिळणार आहे.

त्यामुळे बोधकथा या लहान मुलांना नक्कीच वाचून दाखवायला हवा. बोधकथा मधून आपल्याला चांगला अशा गोष्टी शिकायला मिळतात ज्या लहान मुलांच्या कानावर पडणे अत्यंत आवश्यक य आहे. कारण बोधकथातून शिकलेली गोष्ट आपण कधीही विसरू शकत नाही, त्यामुळे बोधकथाच्या माध्यमातून केलेले संस्कार हे मुल अजन्मा पाळतात.

म्हणून आजच या लेखाच्या माध्यमातून आणि तुमच्यासाठी बोधकथा मराठी मधून घेऊन आलेत.
चला तर मग पाहूया, बोधकथा मराठीमध्ये । Marathi Bodh Katha

खूप छान मराठी बोधकथा तात्पर्य सोबत । Marathi Bodh Katha

१. कावळा आणि कोल्हा :

एकदा काय झालं एक कावळा रानावना मध्ये फिरत असताना त्याला एक चपाती चा तुकडा मिळाला चपाती चा तुकडा घेऊन येतो काळा जंगलातील एका झाडावर बसला.

चपाती खाण्याचा विचार करत असताना काळाच्या मनात कल्पना आली की आता एक चपाती मिळाले उद्या पर्यंत अन्न शोधण्याची गरज भासणार नाही तेवढ्यात झाडाखालून एक कोल्हा जात होता व त्या कुणाची नजर झाडावर बसलेल्या कावळ्याच्या चोचीतील चपाती कडे गेली.

आपल्याला देखील कावळ्याच्या चोचीतील चपाती खाण्याची तीव्र इच्छा झाली त्यासाठी एक युक्ती सुचवली.
कोल्हा कावळ्याला म्हणाला, ” काय कावळे भाऊ कसे आहात फार दिवसांनी दर्शन झाले तुमचे. फार दिवस झाले तुमचा आवाज ऐकला नाही आणि तुमच्या आवाजातील गाणे देखील ऐकले नाही किती मधुर आहे तुमचा आवाज एकदा मला तुम्ही गाणे म्हणून दाखवा.”

कोल्हे यांनी केलेली स्तुती ऐकून कावळा अगदी आनंदित झाला व गाणे म्हणण्यासाठी कावळ्याने आपली चोच उघडतात चोचीतील चपाती खाली पडली को्हा्याने ती चपाती पटकन उचलली आणि पळाला.
जात असताना कुर्ल्याला वाटेमध्ये एक नदी लागली कोल्हा पळून खूप दमला होता व त्याने पाणी पिण्यासाठी नदीमध्ये वाकून पाहिले असता त्याला स्वतःचे प्रतिबिंब दिसले.

कोल्हा होता मूर्ख त्यांना वाटले की नदीमध्ये आणखीन एक कोणतातरी कोल्हा आहे व त्याच्या तोंडामध्ये एक चपाती आहे मग ही देखील चपाती आपल्याला मिळाल्याने दोन चपात्या मिळतील व आपले पोट भरेल असे विचार करून कोल्हाने‌ ओरडण्यासाठी तोंड उघडताच त्याच्या तोंडातील चपाती नदीमध्ये पडली. अशाप्रकारे कोल्ह्याला चपाती खायला मिळाली नाही व त्याला त्याची चूक करावी.

तात्पर्य: मित्रांनो या कथेतून आपल्याला दोन गोष्टी शिकायला मिळता.
एक म्हणजे कधीही खोटी प्रशंसा वर आनंदित होऊ नये.
दुसरी म्हणजे लालच खूप वाईट सवय आहे.

२. कबूतर आणि शिकारी :

एका जंगलामध्ये खूप सारे कबूतर एकत्र राहात होते. एका शिकाऱ्यांना या जंगलामध्ये राहणाऱ्या कबुतरांची चाहूल झाली व त्याने या कबुतराला पकडण्यासाठी एक युक्ती केली. शिकारी आणि कबूतर राहणाऱ्या आसपासच्या जागेमध्ये जाळी घातले व त्या जाळांमध्ये डाळींबाचे बीअंथरले.

तेथे एक कबुतरांचा थवा आला व त्या थव्यातील कबूतरांनी केवळ डाळिंबी चे बी पाहिले व ते बी खाण्यासाठी कबुतरखाने जाळ्यावर झेप घेता सर्व कबूतर जाळ्यामध्ये अडकले.

तेव्हा सर्व कबुतरांच्या लक्षात आले की आपण एखाद्या शिकाऱ्याच्या कावडी मध्ये सापडला त्या आजारातून सुटका करण्यासाठी एक एक कबूतर बळ मिळवून देण्याचा प्रयत्न करू लागली पण एकाही कबुतराला जाळ्यातून सुटका करता आली नाही. सर्व कबूतर हा तास झाले व त्यांना वाटले की आता आपण शिकार होणार तेवढा कबुतराच्या थव्यातील एक म्हातारी कबूतर पुढे आले व सर्व कबुतरांना सांगत ते म्हणाले, ” एकट्याच्या बलाने हे जाळ उडणे अतिशय कठीण आहे परंतु सर्व कबुतराने एकसाथ मिळून ताकद लावली तर आपण हे सर्व जाळे घेऊन पडू शकतो.”

म्हाताऱ्या कबुतरा चे बोलणे सर्व कबुतरांचा लक्षात आले व सर्वांनी एक साथ मिळून ताकत लावताच जाळे उडाले व सर्व कबूतर जाळ्यात सोबत पळून गेले अशा प्रकारे सर्व कबुतरांची शिकाऱ्याच्या हातातून सुटका झाली.

तात्पर्य: मित्रांनो या बोधकथा येतो आपल्याला एकताची ताकद लक्षात येते.

३. ससा आणि कासव :

एका जंगलामध्ये एक ससा आणि कासव राहत होते ससा हा नावाप्रमाणे चतुर आणि चपळ आणि कासव थोडे मंद असते. परंतु दोघांची चांगली मैत्री असते.

एकदा सशाच्या मनामध्ये कासवा सोबत पैज लावण्याची इच्छा होते व तसे ससा कासवाला म्हणतो की, आपल्या दोघांमध्ये पैज लावूया जो कोणी या पैजमध्ये जिंकेल तो सर्वश्रेष्ठ असेल. ठरल्याप्रमाणे कासव देखील पैज लावायला हो म्हणतो. त्यावर ससा कासवाला म्हणते की जो कोणी समोरच्या टेकडी पर्यंत सर्वात प्रथम पोहोचेल तो ही शर्यत जिंकेल.

ठरल्या प्रमाणे दुसर्या दिवशी कासवाची आणि सशाची पैज लागली. ससा होता चटळ ससा शर्यतीमध्ये सुरुवातीलाखूप धावत पळत सुटला आणि कासव हळूहळू शर्यत जिंकण्याचा प्रयत्न करीत होते.
थोडे पुढे धावत आले आणि त्याने मागे वळून पाहिले तर त्याला कासव कोठे ही दिसले नाहीत त्यावर कसा म्हणाला, ” ्जोपर्यंत कासव माझ्यापर्यंत पोचतील तोपर्यंत एक झोप घेतो.” असे म्हणून ससा एका झाडाखाली एक विश्रांतीसाठी थांबला.

कासव हळूहळू चालत ससापर्यंत आले व कासवाने पाहिले ते ससा विश्रांतीसाठी झोपला आहे.
कासव आपल्या मंद पावलाने हळूहळू टेकडीच्या दिशेने चालतं होते. कासव टेकडी पर्यंत पोचणार तोच सशाला जाग आली. ससा उठून पाहतो तर काय कासव त्याला कोठेही दिसेना त्यावर ससाने टेकडीच्या दिशेने धाव घेतली व तेथे गेल्याने त्याला कळाले की ही शर्यत कासवाने जिंकलेली आहे.
अशाप्रकारे ससा च्या चपळता पुढे कासवाचा प्रयत्न जिंकला.

तात्पर्य : या बोधकथा यावरून आपल्या लक्षात येते की कधीही कोणाला कमी समजू नये व प्रयत्न केल्यानंतर यश आपोआप मिळते.

४. लाकूडतोड्या आणि देवदूत :

एक गाव होते त्या गावांमध्ये एक लाकूडतोड्या राहत असे तो लाकूडतोड्या रोज नदीकाठी असलेल्या एका झाडावर चढून एक लाकूडतोड्या लाकडे तोडत असतो. एक दिवस काय झाले लाकूडतोड्या नदीकाठी एका झाडावर चढून लाकडे तोडत असताना अचानक त्याची कुर्‍हाड नदीत पडते. नदी खोल असल्यामुळे त्याला नदीत जाऊन ती कुर्‍हाड काढता येत नव्हती. तो दुःखी होऊन रडू लागतो.

हे पाहून नदीतून एक देवदूत येतो. तो त्याला म्हणतो की, काळजी करू नकोस. मी तुला तुझी कुर्‍हाड काढून देतो. तो देवदूत नदीत डुबकी मारतो व सोन्याची कुर्‍हाड काढतो व म्हणतो ही का तुझी कुरहाड? लाकूडतोड्या म्हणतो, नाही ही माझी कुर्‍हाड नाही..

देवदूत पुन्हा नदीत डुबकी मारतो व चांदीची कुर्‍हाड काढतो व म्हणतो ही का तुझी कुर्‍हाड? लाकुडतोड्या म्हणतो नाही. मग तो देवदुत लोखंडाची कुर्‍हाड काढतो. लाकू़डतोड्या आता मात्र हीच माझी कुर्‍हाड असल्याचे सांगतो. कुर्‍हाड परत मिळाल्याने आनंदी होतो. लाकूडतोड्याचा प्रामाणिकपणा पाहून देवदूत लाकूडतोड्यावर प्रसन्न होतो. त्याला सोन्याची व चांदीची अशा दोन्ही कुर्‍हाडी बक्षीस म्हणून देतो.

तात्पर्य: नेहमी प्रामाणिक राहावे कारण प्रामाणिकपणाचे फळ नक्कीच एक दिवशी मिळते.

५. मेहनतीचे फळ :

एक गाव होते त्या गावांमध्ये एक शेतकरी माणूस राहत होता त्या माणसाला चार मुले होती परंतु त्याचे चारही मुले अगदी अळशी होती. एक जणी ही काम धंदा करत नव्हते शेतकऱ्यांच्या जीवावर त्यांचे आयुष्य सुखात चालले होते.

पण एक दिवस काय झाले शेतकऱ्याची तब्येत अचानक खराब झाली व त्याला कळाले आता आपण मरण पावणार परंतु आपण मरण पावल्याने आपल्या मुलांचे काय होणार? असा विचार तो करीत होता.

एके दिवशी शेतकऱ्याची तब्येत अधिकच खराब झाली तेव्हा त्यांनी आपल्या चारही मुलाला जवळ बोलावले आणि सांगितले,” मुलांनो तुमच्यातील एकही जण काही काम करत नाही मी निघालो होतो तुमच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून मी आपल्या शेतामध्ये एकदा गेलेली भरलेला हंडा पुरला आहे जो कोणी हा फंडा खोडून काढत त्याला ते सर्व धन मिळेल.”

असे सांगून शेतकऱ्याने आपला शेवटचा श्वास घेतला. त्यानंतर शेतकऱ्याचे चारही मुले आपल्या शेतामध्ये जाऊन संपूर्ण शेत खोदून काढले परंतु त्यांना दागिन्यांनी भरलेला हंडा कुठेही मिळाला नाही. तेव्हा शेतकऱ्याचे चारही मुले खूप उदास झाली. ते दिवस होते पावसाळ्याचे.

आता खोदलेल्या शेताचे काय करायचे म्हणूनच शेतकऱ्यांच्या एका मुलाने शेतीमध्ये दाणे टाकले. पाऊस पडल्याने काही दिवसातच ते जाणे बघून आले व बघता बघता शेतामध्ये मौल्यवान असे धान्य डुलु लागले.
देवा शेतकराच्या मुलांच्या लक्षात आले की, बाबांनी सांगितलेलला तो मौल्यवान दागिन्यांनी भरलेला हंडा म्हणजेच आपली शेती आहे.”

अशाप्रकारे शेतकऱ्यांच्या मुलांना त्यांची चूक लक्षात आले व सर्व मुले मिळून शेती करू लागले व आनंदाने जगु लागली.

तात्पर्य : मेहनतीचे फळ नक्कीच एकदा एक दिवशी मिळत असते.

६. परोपकार :

एका गावात एक निर्धन मनुष्‍य राहत होता. परिस्थिती गरीबीची असूनही तो मनाने उदार होता. आपल्‍या घासातील घास देण्‍यासही तो कमी पडत नसे. एकदा एका शेठजीकडे तो जेवावयास गेला असताना त्‍या शेठजीने त्‍याला पंचपक्‍वान्‍नाचे ताट वाढून दिले. ती भरगच्‍च पदार्थांनी भरलेली थाळी बघून त्‍या गरीबाला वाटले की यातून किमान तीन माणसांची भूक भागू शकेल. त्‍याने शेठजीची परवानगी मागितली व त्‍यातील अन्‍न त्‍याने बरोबर घेतले व घराकडे जाण्‍यास निघाला. रस्‍त्‍यात त्‍याला एक भिकारी भेटला त्‍याला त्‍याने खायला दिले. त्‍यातून उरलेले अन्‍न घेऊन तो घरी आला, तो जेवायला बसणार इतक्‍यात एक भिक्षुक या माणसाच्‍या घरी आला व त्‍याने त्‍याला अन्‍नदान करण्‍याची विनंती केली. गरीबाने त्‍याच्‍यासमोरील ताट त्‍या भिक्षुकाच्‍या स्‍वाधीन केले.

त्‍यानंतर अजून एक अपंग व्‍यक्ती दाराशी आली त्‍यानेही या गरीबाकडे अन्न मागितले त्‍यालाही याने आपल्‍या थाळीतील अन्न खायला दिले. आता याच्‍याकडे देण्‍यासारखे काहीच शिल्लक राहिले नाही तेव्‍हा याने स्‍वत:ची भूक भागविण्‍यासाठी एक भांडेभर पाणी घेतले तर समोरून एक वृद्ध व्‍यक्ती आली व तिने ते पाणी पिण्‍यासाठी मागितले. याला आता खाण्‍यापिण्‍यासारखे काहीच उरले नाही तरीही ही व्‍यक्ती समाधानात होती आजचा दिवस आपल्‍यामुळे किमान चार लोकांना तरी खाण्‍यापिण्‍यास मिळाले.

तो ह्याच विचारात असताना तेथे देव प्रगटले व म्‍हणाले,’मी तुझी परीक्षा घेण्‍यासाठीच भिकारी, भिक्षुक, अपंग आणि वृद्ध व्यक्तिचे रूप घेतले होते व तुझ्याकडून काही ना काही मिळते का नाही हे पाहिले आणि तु स्‍वत:चा विचार न करता दुस-याचा जीव जाणून घेतलास व देत राहिलास. आता या पुढे तुला काहीच कमी पडणार नाही असा मी तुला वर देतो.” इतके बोलून देव अंतर्धान पावले.

तात्‍पर्य : देण्‍यातच खरे सुख लपलेले आहे. कुणाचाही घास हिरावून घेण्‍यापेक्षा कुणाला तरी एखादा घास देता कसा येईल याचा विचार करणे यातच खरे सुख लपलेले आहे.

७. कधीही कुणाला कमी समजू नये :

एका गावामध्ये एक खूप चांगले पंडित राहत होते. एकदा नेपाळचे राजे सामान्य वेशात पंडितांमागे फिरू लागले, माझ्या आजोबांचे पिंडदान करून द्या, माझ्याजवळ काहीच पैसे नाहीत. थोडेसे लाडू भरून आणलेत तेच दक्षिणा म्हणून स्वीकार करून घ्या. जे लोभी पंडित होते त्यांना पैशाची हाव होती त्यांनी या सामान्य वेशातील राजांना नकार दिला. अशा वेळेस राजांना तेथील एक पंडित गाठ पडला. त्याला महाराजांनी पिंडदान करण्याची विनंती केली. त्याने ती कबूल केली. तो म्हणाला, भाऊ! पैशाची काही बाब नाही. मी पिंडदान करून देतो.

त्या पंडिताने फाटक्या तुटक्या कपडय़ात आलेल्या राजांचे पिंडदान पूर्ण करून दिले. यावर महाराज खूश झाले. त्या वेळेस ते त्याला म्हणाले, पंडितजी! या कार्यानंतर काही न काही दक्षिणा मी तुम्हास देणे लागतो. मी घरून काही लाडू आणले आहेत त्याचा तुम्ही स्वीकार करावा. मात्र या लाडूचे गाठोडे तुम्ही घरी जाऊन उघडावे.

पंडित म्हणाले, बरं भाऊ, तुम्ही गरीब दिसता पण तुम्ही प्रेमाने दिलेल्या लाडूचा मी स्वीकार करतो. या नंतर पंडितास ते गाठोडे देऊन राजे निघून गेले. पंडिताने घरी जाऊन जेवायला बसायची तयारी केली. अचानक त्याला लाडूची आठवण झाली त्यावर त्याने ते गाठोडे सोडून पाहिले असता तो चकित झाला. कारण त्या गाठोडय़ात वीस सोन्याचे लाडू होते. 

तात्पर्य : कधीही कुणाला कमी समजू नये कारण कोणत्या रुपात कोण असेल याचा भरवसा नाही दैनिक.

८. वेळेचे महत्व :

एक घोड स्वार आपल्या घोड्याला खरारा करून त्याच्यावर खोगीर घालत असताना घोड्याच्या एका पायाच्या नालेचा एक खिळा सुटून पडला आहे असे त्याला दिसून आले. पण तेथे दुसरा खिळा बसविण्याचे काम त्याने मागे टाकले. काही वेळाने लढाईला जाण्याचा इशारा देणारे शिंग वाजू लागताच तो स्वार आपल्या घोड्यावर बसून लढाईच्या जागेकडे निघाला.

तिथे गेल्यावर त्या फौजेच्या सेनापतीने हुकूम सोडला की, ‘सर्वांनी आपली घोडी भरधाव सोडून शत्रूंवर तुटून पडावे आणि त्यांचा पाठलाग करावा.’ हुकूमाप्रमाणे तो स्वार आपला घोडा उडवीत चालला असता खिळा पडल्यामुळे सैल झालेला घोड्याची नाल पडली व त्यामुळे घोडा लंगडत- लंगडत पळू लागला. लंगडताना एका दगडावर त्याचा पाय आपटल्याने स्वार घोड्यावरून खाली पडला व तो शत्रूच्या हाती सापडताच शत्रूने लगेचच त्याला मारले.

तात्पर्य : वेळच्या वेळी काम न करता ते आळसाने पुढे ढकलणे ही सवय वाईट व घातक आहे.

९. गौतम बुद्धांची एक कथा :

बुद्ध हे मनोविजयी होते हे सर्वज्ञात आहे. ते नेहमी शांत, सस्मित, आणि प्रसन्न असत. त्यांच्या सहवासात येणारया लोकांनाही या प्रसन्नतेचा लाभ होत असे. पण काही लोक असेही होते की त्यांना गौतमांना मिळणारा सन्मान सहन होत नसे. त्यांचा अगदी जळफळाट होत असे. असाच एक माणूस एकदा गौतमांना रागवावयास भाग पाडायचेच, त्यांचा अपमान करायचाच, फजिती करायचीच असे ठरवून त्यांच्या प्रवचनाच्या ठिकाणी आला.

प्रचंड जनसमुदाय जमला होता. तथागत शांतपणे त्या समुदायाला मार्गदर्शन करत होते. तेंव्हा हा माणूस तेथे पोचला आणि सर्वांसमोर त्याने गौतमांना न भूतो न भविष्यति अश्या शिव्या दिल्या. जमलेले लोक अस्वस्थ झाले, संतापलेही. पण तथागत शान्त होते. त्यांच्या चेहरयावरील स्मित जरासुद्धा ढळले नव्ह्ते. तो माणूस बराच वेळ अद्वातद्वा शिव्याशाप देत होता. बरयाच वेळाने तो थकून थांबला व डोळे तारवटून गौतमांकडे पहात राहिला.

तथागतांनी स्मितहास्य केले व शान्त स्वरात ते बोलले,
“मी तुला एक प्रश्न विचारू काय?”
“विचारा” तो गुरगुरला.
“जर तुला कोणी एखादी वस्तू भेट दिली आणि ती भेट स्वीकारण्यास तू नकार दिलास तर त्या भेटीवर मालकी कुणाची?”
“मालकी?”
“हां, ती भेटवस्तू कोणाकडे राहील?”
“इतकही कळत नाही? सोपं आहे, ती वस्तू त्या देणारयाकडे राहील” तो माणूस म्हणाला.
“अगदी बरोबर!” तथागत स्मित करीत म्हणाले, “मग जर मी तुझे हे शिव्याशाप स्वीकारण्यास नकार दिला तर ते कोणाकडे रहातील?”
तो माणूस सुन्न झाला आणि तथागतांच्या चरणी लागला.

तात्पर्य : जगात कोण आपल्याला काय बोलेल यावर आपण नियंत्रण ठेवू शकत नाही. पण त्यांच्या स्तुतिशापांचा स्वीकार करणे न करणे हे पुर्णपणे आपल्याच हाती असते. आपण स्वताचा अपमान करून घ्यायचा म्हटला तर तो घोर अपमान होऊ शकतो अन्यथा ते असतात केवळ शब्दांचे बुडबुडे!

१० गरुड आणि घुबड :

एक गरुड आणि एक घुबड, फार दिवस एकमेकांशी भांडत असत. शेवटी त्यांनी परस्परांशी मित्रत्वाने वागण्याची शपथ घेतली व एकमेकांच्या पिल्लांस खाऊ नये असे ठरविले.

घुबड गरुडास म्हणाले, ‘गडया ! पण माझी पिल्ले कशी असतात, हे तुला ठाऊक आहे ना? ठाऊक नसेल, तर ती दुसऱ्या एखादया पक्ष्याची आहेत असे समजून तू त्यांना गट्ट करशील, अशी मला भीति वाटते,’ गरुड म्हणाला, ‘खरेच, तुझी पिल्ले कशी असतात, हे मला मुळीच ठाऊक नाही.’

घुबड म्हणाले, ‘ ऐक तर. माझी पिल्ले फार सुंदर असतात. त्यांचे डोळे सुंदर, पिसे सुंदर, सगळेच काही सुंदर असते. या वर्णनावरून माझी पिल्ले कोणती हे तुला सहज समजेल.’ पुढे एके दिवशी, एका झाडाच्या ढोलीत, गरुडास घुबडाची पिल्ले सापडली. त्यांजकडे पाहून तो म्हणाला, ‘किती घाणेरडी, कंडाळवाणी आणि कुरूप पिल्ले ही ! आपली पिल्ले फार सुंदर असतात, म्हणून घुबडाने सांगितले आहे. तेव्हा, ही घुबडाची पिल्ले खास नव्हते. यास मारून खाण्यास काही हरकत नाही.’ असे म्हणून त्याने त्या पिलांचा फडशा उडविला!

आपली पिल्ले नाहीशी झालेली पाहून घुबड गरुडाला म्हणाले, ‘गडया ! माझी पिल्ले तूच मारून खाल्लीस, असे मला वाटते.’ गरुड म्हणाला, ‘मी खाल्ली खरी, पण तो माझा दोष नव्हे. तू आपल्या पिल्लाचे जे खोटेचे वर्णन केलेस, त्यामुळे ती मला ओळखिता आली नाहीत. इतकी कुरूप पिल्ले घुबडाची नसतील, दुसऱ्या एखादया पक्ष्याची असतील, असे समजून मी ती मारून खाल्ली, यात माझा काय अपराध आहे बरे?’

तात्पर्य : स्वतःसंबंधाची खरी हकीकत लपवून ठेवून, भलतीच हकीकत सांगणारा मनुष्य शेवटी आपणास संकटात पाडून घेतो.

मित्रांनो! आजच्या या आर्टिकल ला तुमच्या इतर मित्रांशी अवश्य शेअर करा जेणे करून त्यांना हि खूप सोप्या पद्धतीने हे माहिती वाचायला मदत होईल… आणि मित्रांनो हा लिखाण ” खूप छान मराठी बोधकथा तात्पर्य सोबत । Marathi Bodh Katha “ तुम्हाला कस वाटलं हे नक्की Comment द्यारे आम्हाला कळवा…

हे हि अवश्य वाचा :

Leave a Comment