Manvi Jivnat Sanvadache Mahatva भाषा देवाने माणसाला दिलेली सर्वात मोठी देणगी आहे भाषेचा वापर करून व्यक्ती एकमेकांशी आपले विचार मांडू शकतो. जगभरामध्ये विविध प्रकारच्या भाषा बोलल्या जातात. भाषा कोणतीही असो त्या भाषेचा वापर करून जेव्हा दोन व्यक्ती किंवा दोन पेक्षा अधिक व्यक्ती एकमेकांशी बोलतात, आपले विचार मांडतात तेव्हा त्याला संवाद असे म्हटले जाते.
प्रत्येक व्यक्तीला आपले विचार मांडण्यासाठी संवाद खूप महत्त्वाचा ठरतो त्यामुळे मानवी जीवनात संवादाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे आणि आजच्या ” मानवी जीवनातील संवादाचे महत्त्व । Manvi Jivnat Sanvadache Mahatva “
लेखातून आपण मानवी जीवनातील संवादाचे महत्त्व जाणून घेणार आहे.
मानवी जीवनातील संवादाचे महत्त्व । Manvi Jivnat Sanvadache Mahatva
बोलण्यासाठी आपले विचार भावना व्यक्त करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला गरज असते ती म्हणजे संवादाची. संवाद हा एखाद्या व्यक्तीला त्याचे विचार व्यक्त करण्याची संधी देतात कोणाच्या मनामध्ये काय चालू आहे हे संवादा मार्फतच आपल्याला म्हणून म्हणतात-
घडला नसता संसार,
जुळली नसती नाती।।
नसता जर संवाद,
तर घडल्या नसत्या भेटी।।
वरील चार ओळीतून आपल्या लक्षात येईल की, बोलण्यासाठी वेळ असतो तर संवाद हा नाती जवळ करण्यासाठी असते व्यवहार जपून ठेवण्यासाठी असतो आणि संसाररूपी गाडा हाकण्यासाठी महत्त्वपूर्ण असतो.
प्रत्येक व्यक्तीला जगण्यासाठी आपल्या संसाराचा गाडा हाकण्यासाठी नवीन नवीन नाती बनवण्यासाठी, एकमेकांच्या भेटीगाठी करण्यासाठी संवादाची आवश्यकता पडते. जर हा संवाद नसता तर हे संपूर्ण जग अबोल झाले असते.
संवाद हा प्रत्येक नात्याचा प्राणवायू आहे…. मग ते नातं पालक-पाल्यांचं असो, प्रियकर-प्रेयसीचं असो, नवरा-बायकोचं असो कि मित्र- मैत्रिणीचं. प्रत्येक नात्याला जपून ठेवण्यासाठी आपल्याला गोड अशा संवादाचे आवश्यकता भासते. एखादं नातं जपण्यासाठी आपल्याला एकमेकांच्या विश्वासाची गरज आणि हा विश्वास जवळून घेण्याचं काम संवाद या मार्फतच होत असतं.
संवादा शिवाय नातं फुलतंही नाही आणि बहरतंही नाही. ज्याप्रमाणे डिंक किंवा एखादा चिकट पदार्थ दोन पदार्थांना जवळ ठेवण्याचं काम करतो त्याप्रमाणेच संवाद दोन व्यक्तींना , नात्यांना, व्यवहारांना जोडून ठेवण्याचे काम करतो. म्हणूनच मानवी जीवनामध्ये संवादाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे, त्यामुळे आपला संवाद हा नेहमी गोड असायला हवा.
या पृथ्वीतलावर कित्येक सजीव पाहायला मिळतात परंतु मानवाला बुद्धिमान प्राणी म्हटले जाते कारण माणसाकडे अशा काही शक्ती आहेत ज्या इतर प्राण्याकडे पाहायला मिळत नाही तर यामध्ये संवादाचा देखील सामावेश आहे. माणसाला इतर प्राण्यांपेक्षा वेगळी ठरविण्या मागे संवाद देखील महत्त्वाची भूमिका बजावतो.
संवाद हा सगळ्या समस्या वर एकमेव उपाय ठरतो. समस्या कोणत्याही असो त्याचे निरसन करण्यासाठी आपल्याला संवादाची आवश्यकता भासते. जर दोन व्यक्तींमध्ये भांडण होत असतील आणि त्या भांडणांना सोडवायचे असेल तर आपल्याला सु-संवादाची भाषा बोलावी लागते.
परंतु आजच्या काळामध्ये टेक्नॉलॉजीने खूप मोठी प्रगती केली आहे त्यामुळे आजच्या काळातील संवाद हरवत चाललेला आहे. आज लोक केवळ मोबाईल च्या मार्फत चॅटिंग च्या माध्यमातून आणि सोशल मीडियावर किंवा व्हिडिओ कॉल च्या माध्यमातून एकमेकांशी संवाद करतात पूर्वीसारखा एकमेकांना भेटून केला जाणारा संवाद आज हरवला आहे.
तरी काही लोक एकमेकांशी भेटून बोलत असतील तरी त्यांच्या संवादा मधील मोकळेपणा हरवलेला दिसतो. लोकांच्या संवादामुळे मोकळेपणा नाही तर कृत्रिमपणा दिसून येते.
सु-संवादापेक्षा वि-संवादाचे संभाषण अधिक केल्या जाते. त्यामुळे माणसामाणसातील नात्याचे बंध उलगडू लागले आहेत. आज व्यवहारामध्ये देखील संवाद वापरला जातो तो केवळ तात्पुरताच. व्यवहारांना टिकून ठेवण्यासाठी संवाद खूप महत्त्वपूर्ण होतो परंतु आज व्यवहारामध्ये देखील संवाद वापरला जात नाही मोबाईल मधून किंवा कॉल करूनच एकमेकांशी संवाद केला जातो ते देखील तात्पुरता.
पूर्वीच्या आणि आजच्या संवादांमध्ये फारसा फरक जाणवत आहे पूर्वी संवादाची साधने नव्हती परंतु आज संवादाची देखील खूप सारे साधने उपलब्ध झालेली आहेत त्यामुळे संवादाची रूपच बदलून गेलेले जाणवत आहे.
पूर्वी संवादाची फारशी साधने उपलब्ध नव्हती. प्रत्यक्ष भेटून किंवा पत्राच्या माध्यमातून एकमेकांशी संवाद साधला जायचा. हल्लीच्या आधुनिक युगात कम्युनिकेट करण्यासाठी बरीच साधनं उपलब्ध झाली आहेत. या साधनांमुळे जगाच्या या टोकावरील माणूस त्या टोकावरच्या माणसाशी जोडला गेला. तंत्रज्ञानामुळे संवादाचे रूप बदलले असले तरी देखील त्याचे परिणाम आपल्या नातेवाईक आणि कुटुंबावर होत आहे. सकाळी उठल्यापासून संध्याकाळ पर्यंत काम, नोकरी ,शाळा यामुळे आपल्या कुटुंबाला देण्यासाठी पहिलेच वेळ मिळत नाही त्यामध्ये अजून तंत्रज्ञानाची भर झाल्याने संवाद खूपच कमी झाला आहे.
त्यामुळे नातेसंबंध दृढ करण्यासाठी आता आपल्याला संवादाचे दरवाजे उघडावे लागतील. संवाद ही कला आहे. आपण काय बोलतो यावर नात्याचं भवितव्य अवलंबुन असतं. आपल्या बोलण्यानं एखाद्याला प्रेरणाही मिळू शकते किंवा एखाद्याचं मनही दुखू शकतं. म्हणून तर संत तुकाराम महाराज म्हणतात,
बोलावे बरे | बोलावे खरे |
कोणाच्याही मनावर |
पाडू नये चरे ||
प्रत्येक व्यक्तीच्या बोलण्यामध्ये निघणे गोडवा असावा. संवाद करत असताना एखाद्याचे मन दुखवता आले नाही तो खऱ्या अर्थाने संवाद ठरते. अर्थात ही एक अशीच कला आहे ज्यामुळे आपल्याला एखाद्याचे मन जगता येते किंवा त्यांना टिकवता येते आणि व्यवहार देखील टिकवता येतो. संवादाची कला शिकण्यासाठी आपल्याकडे कोणतेही कौशल्य असण्याची गरज नाही केवळ आपली भाषा गोड असावी लागते आणि समोरच्या व्यक्तीचे मन दुखणार नाही अशा शब्दांचा वापर करावा लागतो.
आपल्या प्रेमाच्या माणसांशी बोलताना मनात आणि शब्दात प्रेम, आपलेपणा आणि आत्मियता असली कि प्रत्येक शब्द संवाद ठरतो. समोरच्याचे एकूण आणि समजून घ्यायची तयारी असली तर क्षणात हा संवाद सुसंवाद बनतो.
परंतु काही व्यक्ती समोरच्याचे ऐकून न घेता मोठ्याने किंवा रागाने बोलतात तर तो सुसंवाद न ठरता विसंवाद होतो.
त्यामुळे आपण संवाद करत असताना एखाद्याचे मन दुखणार नाही माझी काळजी करून बोलला जाणारा एकेक शब्द हा सुसंवाद त्यामध्ये परिवर्तन होत असतो आणि यामुळेच संवाद हा गोड होता आणि यामुळे नाती देखिल जपली जातात आणि व्यवहार देखील चांगल्या प्रकारे होतो.
व्यक्तीच्या जीवनामध्ये संवादाचे महत्त्व हे सांगावे तितकेच कमी आहे .व्यक्तीने आपल्या जीवनातील संवादाचे महत्त्व समजून सुसंवाद करण्याचा प्रयत्न करावा संवादातून नाती तुटली ही जातात आणि जपली ही जातित परंतु नाती तोडायची का जपायची हे आपल्या हातात असतं. आणि हे सर्व अवलंबून असते ते केवळ आपल्या संवादावर त्यामुळे संवाद करत असताना विचारपूर्वक करावा.
मित्रांनो! आजच्या या आर्टिकल ला तुमच्या इतर मित्रांशी अवश्य शेअर करा जेणे करून त्यांना हि खूप सोप्या पद्धतीने हे माहिती वाचायला मदत होईल… आणि मित्रांनो हा लिखाण ” मानवी जीवनातील संवादाचे महत्त्व । Manvi Jivnat Sanvadache Mahatva “ तुम्हाला कस वाटलं हे नक्की Comment द्यारे आम्हाला कळवा…
हे हि अवश्य वाचा :
- विज्ञान आणि आपत्ती व्यवस्थापन निबंध मराठी । Apatti Vyavasthapan Nibandh Marathi
- प्रदूषण एक समस्या मराठी निबंध । Pradushan Ek Samasya Essay in Marathi
- वृक्षाचे महत्व मराठी निबंध । Vruksha Che Mahatva in Marathi
- विज्ञान वर निबंध मराठी । Essay on Science in Marathi
- Sampurn Haripath in Marathi । संपूर्ण हरिपाठ मराठी मधून । हरिपाठ संपूर्ण मराठी