खेळाचे महत्व मराठी निबंध । Khelache Mahatva in Marathi

खेळाचे महत्व मराठी निबंध । Khelache Mahatva in Marathi

नमस्कार मित्रांनो आजच्या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुमच्या साठी खेळाचे महत्व मराठी निबंध लिहून आलोत. जगातील कोणतीही व्यक्ती असो त्या व्यक्तीने जन्मल्यापासून ते आत्तापर्यंत कधी ना कधी कुठला ना कुठला खेळ नक्कीच खेळला असेल खेळाचे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदे होतात खेळामुळे आपल्याला निरोगी आरोग्य मिळण्यास मदत होते.

म्हणून आजच्या ” खेळाचे महत्व मराठी निबंध । Khelache Mahatva in Marathi “ या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला खेळाचे महत्व सांगणार आहोत.

खेळाचे महत्व मराठी निबंध । Khelache Mahatva in Marathi

प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी आणि अनेक रोगांपासून दूर ठेवण्यासाठी निरोगी आणि तंदुरुस्त शरीर असणे खूप आवश्यक आहे. निरोगी शरीर असेल तर त्या शरीरामध्ये निरोगी मन आणि बुद्धीचा विकास होत असतो त्यासोबतच नेहमी प्रसन्न राहते व कामांमध्ये रुची लागते.

शरीराला निरोगी ठेवण्यासाठी वेगवेगळे मार्ग आहेत जसे की व्यायाम योगा आणि समतोल आहार याव्यतिरिक्त देखील शरीराला निरोगी ठेवण्याचा आणखीन एक मार्ग आहे तो म्हणजे खेळ.

शरीराला स्वस्थ आणि निरोगी ठेवण्यासाठी खेळाचे महत्व अनन्यसाधारण आहे. त्यातल्या त्यात लहान मुलांसाठी खेळाचे महत्व शब्दांमध्ये मांडता येणार नाही एवढे मोठे आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते त्यासोबत मनाला देखील निरोगी करण्यामध्ये खेळाची खूप मोठी भूमिका असते.

खेळ खेळत असताना आपण लहान मुलांप्रमाणे वागतो, बागडतो आणि मनसोक्त असे घेतो त्यामुळे आपले शरीराचा तर व्यायाम होतो सोबत मानाचा देखील विकास होतो आपले मन प्रसन्न राहते व निरोगी राहते. म्हणून प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये खेळाचे महत्त्व मोठे आहे.

वर्तमान काळामध्ये सर्वांचे जीवन हे अगदी व्यस्त झाले आहे अशा व्यस्त जीवनामध्ये खेळ आपल्याला निरोगी आयुष्य प्रदान करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. विशेषता विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये केलेला खूप महत्त्वाचे स्थान आहे.

त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांने थोडा वेळ काढून खेळ खेळल्याने त्यांना निरोगी आयुष्यासोबत प्रसन्न मन आणि मनोरंजन देखील होते.

कोणताही खेळ खेळल्याने व्यक्तीचा शारीरिक विकासासोबत मानसिक विकासही होतों. खेळ खेळत असताना आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवाचा व्यायाम होत असतो. खेळताना डोळे, मेंदू व शरीराच्या प्रत्येक अवयवाचा वापर करावा लागतो. त्यामुळे खेळ खेळणे आपल्याला व्यायाम करण्यासाठी वैयक्तिक वेळ देण्याची देखील आवशक्यता नाही. खेळांमुळे शरीराचे संतुलनही वाढते. नियमित कोणतातरी खेळ खेळल्याने चित्त प्रसन्न राहते. शारीरिक अवयवांचा व्यवस्थित विकास होतो. मनात उल्हास आणि उत्साह वाढून आयुष्यातील प्रत्येक क्षेत्रात यश मिळते.

तसेच खेळ खेळा नंतर आपल्याला तहान आणि भूक देखील वाढते त्यामुळे आपल्या शरीराला आवश्यक तेवढी ऊर्जा मिळते. आपल्या शरीराच्या वाढीसाठी शरीराला ऊर्जा मिळणे खूप आवश्यकता आहे परंतु आपण काही काम न करता किंवा खेळ न करता एकाच जागी बसून राहिल्याने शरीराला हवी तेवढी ऊर्जा मिळत नाही त्यामुळे खेळ खेळण्याने आपल्याला तहान आणि भूक चे प्रमाण वाढते त्यामुळे शरीराला वाढीसाठी ऊर्जा मिळते.

खेळांचे देखील वेगवेगळे प्रकार असतात काही खेळ शारीरिक तर काही मानसिक असतात. त्यालाच आपण बैठे खेळ आणि मैदानी खेळ कसे म्हणतो. शारीरिक खेळ खेळण्यासाठी शरीराला श्रम करावे लागते, तर मानसिक खेळांमध्ये मेंदूचे कार्य असते.

त्यामुळे खेळाचे जरी वेगवेगळे प्रकार असले तरी प्रत्येक प्रकाराचा फायदा हा आपल्या शरीराला होतो शारीरिक खेळामुळे आपल्या शरीराचा व्यायाम होतो तर बैठे किंवा मानसिक खेळामुळे आपल्या मेंदूच्या कार्याला चालना मिळते व आपल्या बुद्धीचा विकास होतो.

फुटबॉल, हॉकी, व्हॉलीबॉल, क्रिके, टेनिस, कबड्डी इत्यादी शारीरिक खेळ आहेत. या खेळांना खेळण्यासाठी शारीरिक ताकत लागते. दुसरीकडे बुद्धिबळ, पत्ते, चौपट इत्यादी मानसिक खेळ आहेत, ज्यांना खेळण्यासाठी मानसिक शक्तीचा वापर करावा लागतो, म्हणजे मेंदूला चालना द्यावी लागते.

मैदानावर खेळाला जाणार खेळ कोणताही असो तो आपल्या शरीराला स्वस्थ आणि मनाला प्रसन्न करतो. खेळ मनुष्याचा व्यक्तिमत्त्व विकास करतात. त्यामुळे प्रत्येक शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी एक तास दिलेला असतो जेणेकरून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकास घडून यावा. खेळ एकमेकांमध्ये सहकार्य व बंधुता वाढवतात. खेळांमुळे परंपरा सन्मान आणि प्रेम देखील वाढते. अश्या पद्धतीने खेळ आपल्याला गुणवान, चारित्र्यवान आणि एक खरा व्यक्ती बनवतात.

खेळ आणि त्याचे फायदे । 10 Benefits of Playing Game in Marathi

खेळ खेळाचे फायदे आपल्या आरोग्यावर वेगवेगळ्या प्रकारे होतात. खेळाचे काही महत्त्वाचे फायदे आहेत ते पुढीलप्रमाणे-

  1. त्यामुळे आपल्याला निरोगी आयुष्य मिळते.
  2. खेळ हे आपल्याला वेळेचे बंधन, धैर्य, शिस्त आणि गटामध्ये काम करणे व एकमेकांना सहकार्य करणे इत्यादी महत्वपूर्ण गोष्टी शिकवतात.
  3. खेळ आत्मविश्वासाची पातळी वाढविण्यास आणि सुधरवण्यास मदत करतात.
  4. नियमित खेळ खेळल्याने अनेक आजारापासून सुरक्षित राहण्यास मदत होते.
  5. नियमित खेळ खेळल्याने आपण अधिक सक्रिय आणि निरोगी राहू शकतो.
  6. खेळ आपल्याला शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सुदृढ हॅलो बनवते.
  7. खेळ आपल्यातील राग आणि चिडचिड पणा दूर करून समस्यांवर मात देण्यास शिकविते.
  8. खेळ आपल्याला शारीरिक बळ आणि मानसिक समर्थ देते.
  9. खेळामुळे आपल्या बुद्धीचा विकास होतो.
  10. आपले व्यक्तिमत्त्व विकास सुधरवण्यासाठी खेळ महत्त्वाची भूमिका बजावतात.

मित्रांनो! आजच्या या आर्टिकल ला तुमच्या इतर मित्रांशी अवश्य शेअर करा जेणे करून त्यांना हि खूप सोप्या पद्धतीने हे माहिती वाचायला मदत होईल… आणि मित्रांनो हा लिखाण ” खेळाचे महत्व मराठी निबंध । Khelache Mahatva in Marathi “ तुम्हाला कस वाटलं हे नक्की Comment द्यारे आम्हाला कळवा…

हे हि अवश्य वाचा :

Leave a Comment