हरितालिका कथा मराठी । Hartalika Vrat Katha in Marathi

Hartalika Vrat Katha in Marathi मित्रांनो हरितालिका व्रत आहे. हरितालिका या व्रताची उपासना पतीव्रता स्त्रिया किंवा कुमारी मुली करतात ज्या मुलींना स्वतःच्या इच्छेने पती हवा असे अशा कुमारिका मध्ये यावे त्याची उपासना करतात असे म्हणतात की माता पार्वतीने भगवान शिव शंकरा सोबत विवाह करण्यासाठी केव्हा भगवान शंकरांना मिळवण्यासाठी या व्रताची उपासना केली होती त्यामुळे त्या काळापासून ते आजपर्यंत स्त्रिया हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करत असतात बहुतांशी स्त्रिया सर्व नेमधर्म पाळून हे व्रत करतात परंतु त्यांना हे व्रत काळात मागची खरी कहाणी माहिती नसते. म्हणून ” हरितालिका कथा मराठी । Hartalika Vrat Katha in Marathi “ आजच्या लेखाच्या माध्यमातून आम्ही सर्वांसाठी हरतालिकेची कहाणी मराठी मध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

चला तर मग पाहूया, Hartalika Vrat Katha in Marathi हरितालिकेची कहाणी मराठी

हरितालिका कथा मराठी । Hartalika Vrat Katha in Marathi

मित्रांनो आजच्या या लेखांमधून आम्ही तुमच्यासाठी हरतालिका व्रत कथा इंन मराठी घेऊन आलोत. हरतालिका या व्रताला तिज व्रत देखील म्हटले जाते. लेखाच्या माध्यमातून तुम्हाला‌ हरतालिका व्रताच्या उपवासाची कथा, उपासना पद्धत, आरती आणि उपवासाचे महत्त्व याबद्दल बरेच काही वाचायला मिळेल.
हरतालिका तीज हा हिंदी संस्कृती मधील खूप पवित्र सण आहे दर वर्षी भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला साजरा केला जातो. विशेषता हिंदू धर्मामध्ये स्त्रिया या सणाला अधिक महत्त्व देतात.

जरी एका वर्षात चार तीज एक येत असले तरी देखील, हरतालिका तीज या सर्वांमध्ये सर्वात महत्वाची मानली जाते. हा पती अविवाहित मुलींकडून चांगला नवरा मिळवण्यासाठी पाळला जातो. तर विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी निर्जला उपवास करतात आणि नंतर पूजेनंतर दुसऱ्या दिवशी हा उपवास मोडला जातो.

हरतालिकेची कहाणी कथा । Hartalika Teej Vrat Katha Marathi

एके दिवशी शंकरपार्वती कैलास पर्वतावर बसली होती. त्यावेळी पार्वतीनं शंकराला विचारलं, स्वामी सर्व व्रतात चांगलं असं व्रत कोणते? श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असलं तर मला सांगा. मी कोणत्या पुण्याईनं आपले पदरी पडले हेही मला सांगा. त्यावर भगवान शंकर म्हणाले, ” देवी, जसा नक्षत्रांत चंद्र श्रेष्ठ, ग्रहात सूर्य श्रेष्ठ, चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवात विष्णू श्रेष्ठ, नद्यांत गंगा श्रेष्ठ त्याप्रमाणे हरितालिका हे व्रत सर्वांत श्रेष्ठ आहे.” त्यावर माता पार्वती म्हणाल्या, “स्वामी तुम्ही हे व्रत मला सांगाल.”

तेव्हा भगवान शंकर म्हणाले, ” हे हरितालिका व्रत आणि याचे महत्वते तुला सांगतो. तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस, ते व्रत ऐक.

हरतालिकेची कहाणी कथा । Hartalika Teej Vrat Katha Marathi

हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावं. ते पूर्वी तू कसं केलंस ते मी तुला आता सांगतो. तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलंस. चौसष्ट वर्षं तर झाडाची पिकली पानं खाऊन होतीस. थंडी, पाऊस, ऊन ही तिन्ही दु:ख सहन केलीस. हे तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला फार दु:ख झालं व अशी कन्या कोणाला द्यावी? अशी ‍त्याला चिंता पडली. इतक्यात तिथं नारदमुनी आले. हिमालयानं त्यांची पूजा केली व येण्याचं कारण विचारलं. तेव्हा नारद म्हणाले, तुझी कन्या उपवर झाली आहेत ती विष्णूला द्यावी, तो तिचा योग्य नवरा आहे. त्यांनीच मला तुजकडे मागणी करण्यास पाठविलं आहे म्हणून इथं मी आलो आहे. हिमालयाला मोठा आनंद झाला. त्यांने ही गोष्ट कबूल केली.

नंतर नारद तेथून विष्णूकडे गेले. नारद गेल्यावर तुझ्या बापानं ही गोष्ट तुला सांगितली, ती गोष्ट तुला रुचली नाही. तू रागावलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागावण्याचं कारण विचारलं, तेव्हा तू सांगितलंस, महादेवावाचून मला दुसरा पती करायचा नाही, असा माझा निश्चय आहे, असं असून माझ्या बापानं मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे, ह्याला काय उपाय करावा? मग तुला तुझ्या सखीनं एका घोर अरण्यात नेलं. तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली. जवळच एक गुहा आढळली. त्या गुहेत जाऊन तू उपास केलास. तिथं माझं लिंग पार्वतीसह स्थापिलस. त्याची पूजा केलीस. तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतिये चा होता. रात्री जागरण केलंस. त्या पुण्यानं इथलं माझं आसन हाललं. नंतर मी तिथं आलो, तुला दर्शन दिलं. आणि वर मागण्यास सांगितलं तू म्हणाली, तुम्ही माझे पती व्हावं, याशिवाय दुसरी इच्छा नाही! नंतर ती गोष्ट मी मान्य केली. मी गुप्त झालो.

पुढे दुसर्‍या दिवशी ती व्रतपूजा विसर्जन केलीस. मैत्रिणीसह त्याचं पारणं केलंस. इतक्यात तुझा बाप तिथं आला: त्यांन तुला इकडं पळून येण्याचं कारण विचारलं. मग तू सर्व हकीकत सांगितलीस. पुढं त्यानं तुला मलाच देण्याचं वचन दिलं. तुला घेऊन घरी गेला. मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केली. अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली. याला हरतालिका व्रत असं म्हणतात. याचा विधी असा आहे.

ज्या ठिकाणी हे व्रत करावयाचं असेल, त्या ठिकाणी तोरण बांधावं, केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं. पुढं रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं. षोडशोपचारांनी त्याची पूजा करावी, मनोभावे त्याची प्रार्थना करावी. नंतर ही कहाणी करावी व रात्री जागरण करावं. या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो. साता जन्मांचं पातक नाहीसं होतं. राज्य मिळतं. स्त्रियांचं सौभाग्य वाढतं ह्या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर सात जन्म वंध्या होतात. दळिद्रं येतं व पुत्रशोक होतो. कहाणी ऐकल्यावर सुवासिनींना यथाशक्ति वाण द्यावं. दुसरे दिवशी उत्तरपूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं.

अशी ही साठ उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवाब्राह्मणांचे द्वारी, गाईचे गोठी, पिंपळाचे पारी हरितालिका व्रताची कहाणी Hartalika Vrat Katha सुफळ संपूर्ण.

हरितालिकेच्या व्रताचे महत्व काय आहे?

देवी पार्वतीला शिव शंकर यांना पतीच्या स्वरूपात प्राप्त करण्यासाठी तब्बल 107 वेळा जन्म घ्यावा लागला होता.त्यानंतर 108 वा जन्म घेतल्यानंतर माता पार्वतीच्या कठोर तपश्चर्या तसेच भक्तीमुळे भगवान शिव यांनी त्यांना आपली पत्नी म्हणुन स्वीकार केले होते. म्हणून हरितालिका व्रताला विशेष महत्त्व दिले जाते खास करून स्त्रिया या वृत्ताला महत्त्व देतात आणि अनुभवाने या व्रताचे उपासना करतात.

कोणीती ही स्त्री सर्व नियम पाळून या व्रताची उपासना करेल त्या स्त्रीवर माता पार्वतीने प्रसन्न होऊन हे व्रत जी स्त्री करेल तिच्या पतीला दिर्घायुष्य लाभेल असे वरदान दिले होते.

तेव्हापासून सर्व स्त्रिया हे व्रत आपल्या पतीच्या दिर्घायुष्यासाठी ठेवत असतात. हरितालिकेचे व्रत हे सगळयात आधी देवी पार्वतीने शिव शंकर महादेवासाठी ठेवले होते.म्हणुन हे व्रत अत्यंत खास व्रत मानले जाते.

जी स्त्री हे व्रत करत असते तिच्यावर शंकर पार्वतीची विशेष कृपा दृष्टी असते.असे देखील ह्या व्रताबाबद सांगितले जाते.

हे व्रत करत असताना स्वता देवी पार्वतीने अन्न आणि पाण्याचा त्याग केला होता म्हणुन सर्व स्त्रिया देखील हे व्रत निर्जल ठेवत असतात.

सदर व्रत माता पार्वतीने महादेवाला आपला पती बनवण्यासाठी ठेवले होते.याचे फलस्वरूप महादेवाने पार्वतीला पत्नीच्या स्वरुपात स्वीकार देखील केले होते. म्हणुन हे व्रत ठेवत असलेल्या स्त्रियांच्या पतीला माता पार्वती प्रसन्न होऊन दिर्घायुष्यी होण्याचा आशिर्वाद देत असतात.

हरितालिकेच्या व्रताचे नियम :

  1. हरतालिका व्रत पाळत असलेल्या प्रत्येक स्त्रीने ह्या दिवशी अन्न तसेच पाण्याचे सेवन करू नये.कारण हे व्रत निर्जल व्रत असते म्हणजे ह्या दिवशी स्त्रिया अन्नच नव्हे तर पाणी देखील पिऊ शकत नसतात.इतके कठोर हे व्रत असते.
  2. व्रताच्या दुसरे दिवशी लवकर उठुन अंघोळ वगैरे करून पुजा करावी त्यानंतरच आपले व्रत पाणी पिऊन सोडावे.
  3. हरतालिका च्या दिवशी आपण म्हणजेच प्रत्येक स्त्रीने रात्रभर जागरण करून भजन किर्तन करावे आणि रात्रभर देवाचे श्रदधेने नामस्मरण करावे.
  4. मग दुसरे दिवशी सकाळी लवकर उठुन अंघोळ वगैरे करून भक्तीभावाने पुजा करावी आणि मग पुजा संपन्न झाल्यानंतर एखाद्या सवाशिन स्त्रिला साज श्रृंगाराचे साहित्य जसे की दागिने,वस्त्र याचसोबत फळांचे देखील दान करावे.
  5. एकदा हे व्रत जर आपण धरले तर ते आपण अर्धवट सोडु शकत नाही.
  6. ह्या दिवशी कोणाची चेष्टा मस्करी करू नये आणि कोणाचा आपल्याकडुन अपमान होईल असे देखील वागु नये. अशा प्रकारे संपूर्ण मनोभावाने आहे नियम पाळूनहे व्रत केले असता माता पार्वती आणि भगवान शिवशंकर तुमचृयावर प्रसन्न होऊन आपल्या सर्व इच्छा आणि मनोकामना पूर्ण होतील.

मित्रांनो! आजच्या या आर्टिकल ला तुमच्या इतर मित्रांशी अवश्य शेअर करा जेणे करून त्यांना हि खूप सोप्या पद्धतीने हे माहिती वाचायला मदत होईल… आणि मित्रांनो हा लिखाण ” हरितालिका कथा मराठी । Hartalika Vrat Katha in Marathi “ तुम्हाला कस वाटलं हे नक्की Comment द्यारे आम्हाला कळवा…

हे हि अवश्य वाचा :

Leave a Comment