गुरु पौर्णिमा मराठी संपूर्ण माहिती । Guru Purnima In Marathi । Important Of Guru Purnima

Guru Purnima in Marathi | Important of guru Purnima

भारत देशामध्ये दर वर्षी कित्येक असं साजरे केले जातात ते सणाची स्वतःचे काही विशिष्ट महत्व असते त्याप्रमाणेच गुरूंना वंदन करण्यासाठी आणि आपल्या गुरूंची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी भारतामध्ये गुरुपौर्णिमा हा सण साजरा केला जातो.

भारतीय संस्कृतीमध्ये गुरूंना देव समजले जाते व गुरूंची पूजा केली जाते. म्हणून अशा या गुरूंना वंदन करण्यासाठी गुरु पौर्णिमा या दिवशी गुरूंची पूजन केले जाते. त्यामध्ये गुरुपौर्णिमा हे दरवर्षी खूप मोठ्या उत्साहात आनंदात आणि श्रद्धापूर्वक साजरी केली जाते लहानांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येक जण आपापल्या गुरूंची कृतज्ञता व्यक्त करीत असतो.

गुरु पौर्णिमा मराठी संपूर्ण माहिती । Guru Purnima in Marathi | Important Of Guru Purnima

आजच्या लेखांमधून (Guru Purnima in Marathi | Important of guru Purnima in Marathi ) आम्ही गुरुपौर्णिमा विषयी मराठी माहिती घेऊन आलो.

या तर मग पाहुया, Guru Purnima in Marathi | Important of guru Purnima.

आषाढ महिन्या मध्ये येणार्‍या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा म्हटले जाते. या दिवशी संपूर्ण भारत देशांमध्ये गुरु पौर्णिमा हा सण साजरा केला जातो.

वेदव्यास यांना प्रथम गुरूंच्या दर्जा देण्यात आलेला आहे कारण त्यांनी संपूर्ण जगाला चार वेदाचे ज्ञान प्राप्त करून दिले.

गुरु म्हणजे अज्ञानाचा अंधकार दूर करून, मानव जातीतील प्रत्येक मनुष्याला ज्ञानाच्या दिशेने आणि प्रकाशाच्या वाटेने घेऊन जाणारा वंदनीय व्यक्ती होय. अशा या व्यक्तीला कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांचे आभार मानवण्यासाठी गुरु पौर्णिमा हा सण साजरा केला जातो.

गुरुपौर्णिमा हा भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वाचा सण आहे कारण भारतीय संस्कृती मध्ये गुरूंना देवाचा दर्जा दिला जातो व गुरूंची पूजा केली जाते. गुरुपौर्णिमेला भारत देशामध्ये गुरुपूजन केले जाते. प्रत्येकच व्यक्ती आपल्या गुरूचे पूजन करतो व त्यांचे आभार मानत असतो.

यामुळेच भारत देशामध्ये गुरुपौर्णिमा हा सण मोठ्या आनंदाने उत्सवाने आणि श्रद्धापूर्वक साजरा केला जातो.

गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असे‌‌ का म्हणतात?

गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा म्हणण्या मागचे कारण म्हणजे गुरुपौर्णिमा या दिवशी महाभारत रचणारे महर्षी व्यास या ऋषींचा जन्म झाला होता. महर्षी व्यास ऋषींनी सहा शास्त्र आणि अठरा पुराणांचे लिखाण केले आहे. तसेच माढा व कल्याणासाठी महर्षी ऋषी यांनी वेदांचा विस्तार देखील केलेला आहे.

महर्षी व्यास ऋषींनी महाभारतासोबत रामायण, ब्रह्मसूत्र आशा पुराणांची देखील रचना केली.

भगवत गीतेमध्ये विष्णूंचा 24 अवतारांचे वर्णन देखील महर्षी व्यास ऋषींनी केलेले आहे. यासोबतच महर्षी व्यास ऋषी यांनी गुरुपौर्णिमा या दिवशी आपल्या पहिल्या शिष्यांना आणि तपस्वींना पुराणाचे ज्ञान प्रदान केले होते. म्हणूनच गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा म्हणून देखील ओळखले जाते.

Guru Purnima speech in marathi

गुरुपौर्णिमेचे महत्व | Important of Guru Purnima

हिंदू धर्माचा विचार केला असता वर्षभरामध्ये येणाऱ्या प्रत्येक पौर्णिमेला अत्यंत महत्त्वाचे स्थान दिले जाते परंतु या सर्व पौर्णिमा पेक्षा गुरुपौर्णिमा एक अत्यंत महत्त्वाचे मानले जाते कारण त्या दिवशी सर्वजण आपल्या गुरूंना वंदन करीत असतात.

गुरु पौर्णिमा या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केले जाते. दान, धर्म, तप सर्वांसाठी एक पवित्र तिथी समजली जाते. गुरु मंत्र प्राप्त करण्यासाठी गुरु पौर्णिमा हा दिवस अधिकच शुभ मानला जातो. होळी पौर्णिमा या दिवशी आपण ज्यांना गुरुमंत्र त्यांचा आदर करावा त्यांना नमस्कार करावा.

कारण गुरूंनी दिलेल्या ज्ञानातून आपल्या जीवनातील अज्ञानाचा अंधकार दूर झालेला असतो व आपण ज्ञानाच्या प्रकाशात मध्ये गेलेले असतो. त्यामुळे गुरुद्वारे आपल्याला भगवंताची प्राप्ती होते.

गुरूंकडून मिळालेल्या ज्ञानाच्या भंडारातून आपण जीवनातील प्रत्येक मार्गावर यशस्वीरित्या वाटचाल करू शकतो. त्यामुळे प्राचीन काळापासून ते वर्तमान काळापर्यंत गुरुशिष्यांची परंपरा ही अशी चालत आलेली आहे. गुरु पौर्णिमा या दिवशी केवळ गुरुणांनाच नव्हे तर आपल्या घरातील मोठे सदस्य जसे की, आई-वडील, आजी, आजोबा यांना देखील सन्मान करावा व त्यांचे देखील वंदन करावे.

लाहनापासून ते मोठे होईपर्यंत आपल्याला ज्या व्यक्तीकडून काहीतरी नवीन गोष्टी शिकायला मिळतात त्या सर्वांना च गुरु मानावे व त्यांचा आदर करावा.

विद्येविना मती गेली | मती विना निती गेली ||

नीतीविना गती गेली | गतीविना वित्त गेले ||

वित्तविना शूद्र खचले | इतके अनर्थ एका अविद्येने केले ||

वरील वाक्यातून महात्मा ज्योतिराव फुले यांनी अविद्या हे गुलामगिरीचे कारण बनू शकते असे सांगितले आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये विद्या असणे आवश्यक या आहे आणि ही विद्या किंवा शिकवण आपल्याला आपल्या गुरूंकडून मिळते.

म्हणूनच गुरुंसाठी म्हटले जाते की, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा | गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः ||

या वाक्यातून गुरूंना त्रिदेव यांची भूमिका देण्यात आलेली आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या जीवनामध्ये गुरूला अनन्यसाधारण महत्त्व आहे व प्रत्येकाने आपल्या गुरूचा आदर करा. गुरू इतके आपल्या जीवनामध्ये कोणालाही महत्वाचे स्थान नाही कारण गुरु हे आपल्याला जीवनामध्ये पाहू शकत नाही सर्व चांगल्या गुणांची ओळख करून देत असतात.

गुरु पौर्णिमा कशी साजरी केली जाते?

यावर्षी भारत देशामध्ये आषाढी पौर्णिमेला गुरुपौर्णिमा खूप आनंदात आणि उत्साहात साजरी केली जाते.

प्राचीन काळामध्ये गुरूंकडून ज्ञानप्राप्ती केल्यानंतर स्वगृही परतताना गुरू-दक्षिणा देण्यासाठी गुरुपौर्णिमा साजरी केली जात होते असे अनेक प्राचीन व्यक्तींकडून सांगण्यात आले आहे.

परंतु गुरुपौर्णिमा साजरी करायची पद्धती वर्तमान काळामध्ये देखील चालत आलेली आहे. गुरु पौर्णिमा या दिवशी प्रत्येक व्यक्ती आपल्या मना मध्ये असणाऱ्या गुरूंना वंदन करीत असतो.

परंतु आधुनिक काळामध्ये गुरुपौर्णिमा साजरी करण्याची पद्धती आधुनिक काळाप्रमाणे बदलत गेलेली आहेत आजच्या काळामध्ये प्रत्येक शिष्य आपल्या गुरूंना भेटवस्तू देऊन गुरुपौर्णिमा साजरी करतात. काही ठिकाणी केक कापून गुरुपौर्णिमा साजरी केली जाते.

काही ठिकाणी तर गुरु पौर्णिमा या दिवशी मोठमोठे कार्यक्रमांचे आयोजन केले जाते उपयोग या कार्यक्रमातून प्रत्येक वर्षी आपल्या गुरूंबद्दल दोन शब्द बोलून त्यांची कृतज्ञता व्यक्त करीत असतो.

आपल्या मनामध्ये आपल्या गुरू बद्दल किती आदर आहे हा सांगण्याचा सर्वोत्कृष्ट क्षण म्हणजे गुरुपौर्णिमा चा उत्सव आहे.

अशा प्रकारे दर वर्षी भारतामध्ये आषाढी पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा खूप मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करून सर्वजण आपापल्या गुरूंना वंदन करतात गुरूंचे आभार मानतात व मुलांना भेटवस्तू देऊन गुरुंना कृतज्ञता व्यक्त करतात.

मित्रांनो! आजच्या या आर्टिकल ला तुमच्या इतर मित्रांशी अवश्य शेअर करा जेणे करून त्यांना हि खूप सोप्या पद्धतीने हे माहिती वाचायला मदत होईल… आणि मित्रांनो हा लिखाण ” गुरु पौर्णिमा मराठी संपूर्ण माहिती । Guru Purnima In Marathi । Important Of Guru Purnima “ तुम्हाला कस वाटलं हे नक्की Comment द्यारे आम्हाला कळवा…

हे हि अवश्य वाचा :

धन्यवाद!!!

Leave a Comment