आठवणीतील दिवाळी मराठी निबंध । Diwali Nibandh in Marathi
नमस्कार मित्रांनो आजच्या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासाठी आठवणीतील दिवाळी निबंध घेऊन आलोत.
मित्रांनो आपल्या भारतीय संस्कृती मध्ये वर्षभरामध्ये विविध सण साजरे केले जातात. प्रत्येक सणाचे महत्त्व आणि वैशिष्ट्य हे वेगवेगळे असते. परंतु प्रत्येक क्षणाचा हेतू हा आपआपसा मध्ये आणि कुटुंबामध्ये आनंद आणि उत्साह घेऊन येण्याचा च असतो.
रंगपंचमी हा सण एकमेकांतील दुरावा कमी करून नात्यांमध्ये प्रेमाचे रंग भरण्याचे काम करतो. तर गणपती या सणा मधुन उत्साह आणि आनंदाची भावना जागृती केली जाते. रक्षाबंधन हा सण बहीण भावाच्या नात्यांना दर्शवतो. गुढीपाडवा हा सण नवीन वर्षाचे स्वागत करत येतो. अशाप्रकारे हिंदू संस्कृतीमध्ये साजरा करणारा प्रत्येक सणाचे हे विशेष असे महत्व असते.
परंतु या सर्व सणांमध्ये सर्व “सणांची राणी” म्हणून ओळखला जाणारा हा सण म्हणजे दिवाळी सण होय.
म्हणून आजच या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासाठी आठवणीतील दिवाळी निबंध (Diwali Nibandh in Marathi) घेऊन आलो होतो जो पुढील प्रमाणे आहे-
आठवणीतील दिवाळी मराठी निबंध । Diwali Nibandh in Marathi
फटाक्यांच्या आवाजामध्ये आणि देवाच्या रोषणाई मध्ये जो सण साजरा केला जातो तो म्हणजे दिवाळी सण होय. दिवाळी सणाच्या आठवणी खरोखरच अतिशय आनंददायी, उत्साही आणि इतर सर्व सणांचा पेक्षा आगळ्या वेगळ्या असतात. पहाटेच्या गाढ झोपी मध्ये अचानकच कानावरती आवाज येतो, ” उठा उठा पहाट झाली, मोती साबणाने अंघोळ करण्याची वेळ आली” या आवाजाने खोलीचा दरवाजा वाजवत आई उठवायला येते. आंघोळ करून, नवीन कपडे परिधान कर असा आदेश देते.
सर्व सणांमध्ये माझा आवडती चा सण हा दिवाळी सण आहे कारण दिवाळीच्या सणाच्या आठवणी आणि दिवाळी हा सण साजरा करण्याच्या पद्धती या इतर सणां पेक्षा खूपच अविस्मरणीय असतात. दिवाळी सण येणार म्हणताच सर्वात जास्त आनंद होतो, तो म्हणजे लहान मुलांना आणि विद्यार्थ्यांना. कारण दिवाळीच्या निमित्ताने दहा दिवसांची सुट्टी मिळते.
त्यामुळे दिवाळी ह्या सणांमध्ये मिळणाऱ्या आनंद असतो तो हा गगना एवढा असतो त्यातल्या त्यात दिवाळी या सणाच्या निमित्ताने करण्यात येणारे फळ खाण्याची मजा चकली, चिवडा, लाडू ,करंज्या, शंकरपाळी अशा सर्व फळांची मेजवानी मिळणार याचा आनंद तर शब्दात देखील सांगता येणार नाही. शाळा सुरू होताच डब्यामध्ये फराळ घेऊन जाणे मित्र-मैत्रिणींमध्ये ते वाटणे हे क्षण दिवाळी या क्षणाला अधिकच अविस्मरणीय करतात.
सतत कामांमध्ये मग्न राहणाऱ्या वडिलधाऱ्या माणसांना विश्रांतीसाठी आणि आपल्या नातेवाईकांसाठी वेळ घालवण्यासाठी दिवाळी हा सण येत असावा. वडीलधार्या माणसांचा भागातील लहान मुलांमध्ये दिवाळी या सणाची आतुरता अधिकच असते.
आमच्या लहानपणी दिवाळी हा सण येतात संपूर्ण कर स्वच्छ करून घराला डेकोरेशन केलेले जायचे रोषणाई केली जायची. दिवाळी सणा मध्ये सकाळी पहाटे उठून मोती साबणाने आंघोळ करायची जणू शर्यतच लागलेली. दिवाळी या सणाच्या निमित्ताने माझ्या मामाची आणि त्यांची मुले आणि माझी चुलत सख्खी भावंडे एकत्र जमायचो. दिवाळीच्या निमित्ताने आमच्या घरामध्ये एक मोठा कार्यक्रमात साजरा व्हायचा.
मग पहाटे उठून आंघोळीची शर्यत. परंतु या शर्यती मध्ये मी नेहमीच शेवटी यायचे. कारण दिवाळी हा सण हिवाळ्याच्या कडक्क थंडीमध्ये तो पहाटे उठून आंघोळ करणे म्हणजे थंडीला चॅलेंज दिल्यासारखे त्यामुळे मी सर्वात शेवटला अंघोळ करायचै. आंघोळ झाली की नवीन कपडे परिधान करायचे फटाके फोडण्यासाठी रस्त्यावर जायचे. फटाके फोडून दमून आल्यानंतर पुन्हा फराळाचा आनंद घ्यायचा. तेवढ्यात आईचा कुठून तरी आवाज यायचा, ” जास्त फराळ खाऊन नको नाहीतर खोकला होईल.”
मी माझ्या मोठ्या भावांना आणि लहान भावंडांना अभंग स्नान घालायचे. त्यानंतर त्यांना ओवाळणी करायचे ओवाळणी च्या निमित्ताने माझे मोठे भाऊ मला पैसे देत होता. एखाद्या वेळेस मला पैसे दिले नाही तर मी मोठ मोठ्याने ओरडायचे आणि रडायचे माझ्या या अशी हट्टीपणा मुळे मला दिवाळीमध्ये भरपूर पैसे जमा व्हायचे.
त्यानंतर दारामध्ये सुंदरशी फुलांची रांगोळी टाकायची. दिवाळीच्या या दहा दिवसांमध्ये सतत कामांमध्ये मग रहायचं त्यामुळे दिवाळी हा सण कधी येऊन गेला आणि संपला याचे भान देखील राहात नव्हता. दिवाळी या सणा मध्ये केवढा आनंद, मज्जा, मस्ती, मौज , उत्साह असतो. रात्रीच्या वेळी संपूर्ण घराला र रोशनाई करायचं आणि अंगणामध्ये दिवे लावायचो.
मोठे भाऊ अंगणामध्ये फटाके फोडायचे, आवाज ऐकून माझ्या हृदयाचे ठोके आपोआप वाढत होते. त्यामुळे मी फटाके फोडण्याची हिंमत कधीच केलीच नाही.
कोणी लवंगी फटाका, लक्ष्मी बॉम्ब,सुतळी बॉम्ब, पाऊस, भुईचक्र, तर कोणी चिली मिली वाजवायचो,काही जण तर फटाक्याच्या अवजानेच घरात पाळायचे,तसे मी पण सुरूवातीला त्याच प्रकारात मोडायची. अत्ता असे बोलताना किंवा लिहिताना हसायला येते.
लहानपणी मला फटाक्यांची खूप भीती वाटायची फटाक्याचा आवाज ऐकला की माझ्या हृदयाचे ठोके वाढायचे वाली एकदम दचकत असते त्यामुळे माझ्या मित्र मैत्रीण माझ्यावर नेहमी हसत. मित्र-मैत्रिणींना माझ्यावर हसताना पाहून मला रडू यायचे व मी एकटीच घरामध्ये जाऊन रडत बसत. परंतु फटाक्याच्या आवाजामध्ये दिव्यांच्या रोषणाई मध्ये आमचा घर जणू पृथ्वीवरचा स्वर्गच दिसायचा. आमच्या शेजारी देखील दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी आणि फटाके फोडण्यासाठी आमच्या घरी यायचे. त्यामुळे तुमच्या घरांमध्ये कार्यक्रम चालू आहे असेच वाटायचे.
माझी आई देखील शेजारच्या सर्व काकू काका यांना घरी फराळासाठी आमंत्रण द्यायचे. दरवर्षी सगळे जण आमच्या घरी फराळ खाण्याला आवर्जून यायचे. दिवाळी हा सण मुख्यता पाच दिवसांचा असतो. वसुबारस, दिवाळी पाडवा, लक्ष्मीपूजन, भाऊबीज आणि धनत्रयोदशी अशा पाच दिवसांचा मिळून दिवाळी हा सण साजरा केला जातो आणि यामधील पाच दिवसांना विशेष महत्त्वाचे स्थान आहे.
वसुबारस या दिवशी माझी आई कणीकचे दिवे करून पहाटेच घराच्या दरवाजा मध्ये लावत असते. तसेच वसुबारस या दिवशी पुरणपोळी चा नैवेद्य करून गाईंना दिला जायचा. या दिवसापासून खऱ्या अर्थाने दिवाळीला सुरुवात व्हायचे या दिवसापासून रोज रात्री आम्ही घरांमध्ये आणि अंगणामध्ये दिवे लावायला सुरुवात करायचं आणि रांगोळी टाकायला सुरुवात करायचो.
दिवाळी पाडवा हा दिवाळीतील सर्वात महत्त्वाचा दिवस व या दिवशी नवीन वस्त्र परिधान करून पहाटेचे आम्ही फटाके फोडण्यासाठी बाहेर जायचो.
लक्ष्मीपूजन या दिवशी घराघरांमध्ये लक्ष्मीची पूजा केली जायची त्याप्रमाणे आमच्या घरामध्ये देखील लक्ष्मीची पूजा केली जायची. सर्व नातेवाईकांना आणि आजूबाजूच्या शेजाऱ्यांना आणि लक्ष्मीपूजन च्या निमित्ताने घरी बोलावले जाते व लक्ष्मीची आरती वगैरे केली जाते.
दिवाळीमध्ये येणारा चौथा महत्त्वपूर्ण सण म्हणजेच भाऊबीज होय. रक्षाबंधन सणा व्यतिरिक्त बहिण भावाच्या नातवांना दर्शवणारा भाऊबीज हा दुसरा सण आहे. या दिवशी मी सकाळी लवकर उठून माझ्या मोठ्या भावनांना अभंग स्नान घालते व त्यांची ओवाळणी करून त्यांना रुमाल आणि करदोडा भेटवस्तू म्हणून देते. माझे भावंड ही मला त्या बदल्यात काहीतरी भेटवस्तू देतात.
धनत्रयोदशी या दिवशी घरातील सर्व मोल्यवान वस्तूंची पूजा करते.
अशा प्रकारे माझ्या आठवणीतील दिवाळी ( आठवणीतील दिवाळी मराठी निबंध । Diwali Nibandh in Marathi) सण हा अतिशय आनंदाचा आणि उत्साहाचा व सर्व कुटुंबाला नातेवाईकांना जवळ घेऊन येणारा आपुलकी वाढवणारा हा सण आहे.
म्हणून मला दिवाळी हा सण खूप खूप आवडतो!!!!
मित्रांनो! आजच्या या आर्टिकल ला तुमच्या इतर मित्रांशी अवश्य शेअर करा जेणे करून त्यांना हि खूप सोप्या पद्धतीने हे माहिती वाचायला मदत होईल… आणि मित्रांनो हा लिखाण ” आठवणीतील दिवाळी मराठी निबंध । Diwali Nibandh in Marathi “ तुम्हाला कस वाटलं हे नक्की Comment द्यारे आम्हाला कळवा…