ब्लॉग म्हणजे काय? । ब्लॉग कसा लिहितात । Blog Writing in Marathi

Blog Writing in Marathi

मित्रांनो आजच्या काळामध्ये इंटरनेटचा वापर खूप मोठ्या प्रमाणामध्ये केला जात आहे इंटरनेट शिवाय आपले जीवन हे अशक्य झाले आहे. एखादे नवीन कौशल्य शिकण्यासाठी किंवा एखाद्या विषयाची माहिती मिळवण्यासाठी आपण इंटरनेटच्या साह्याने गुगल सारख्या सर्च इंजिनचा वापर करत असतो.

गुगल हे असे सर्च इंजिन आहे जे सर्वाधिक प्रमाणात वापरले जाते गुगलवर आपल्याला लहानात लहान ची माहिती सहजरीत्या प्राप्त होते. ज्याला आपण ब्लॉग असे म्हणतो.

ब्लॉग म्हणजे काय? । ब्लॉग कसा लिहितात । Blog Writing in Marathi

गुगल वर आपण एखाद्या विषया संबंधीत सर्च केले असल्यास आपल्यासमोर बर्‍याचश्या वेबसाईट येतात आणि आपण हव्या त्या वेबसाईटमध्ये प्रवेश करून आत या वेबसाईटवरील त्या विषयाच्या संबंधित ब्लॉग वाचून माहिती मिळवतो. त्यामुळे विविध प्रकारची माहिती मिळवण्यासाठी ब्लॉग खूप महत्वपूर्ण समजला जातो.

परंतु मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का ब्लॉग म्हणजे काय असते आणि ब्लॉग कसा लिहिला जातो How to write Blog in Marathi.

तर मित्रांनो तुम्हाला ब्लॉग कसा लिहिला जातो हे माहिती नसेल तर निराश होण्याचे काहीही गरज नाही. कारण आजच्या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासाठी ब्लॉग कसा लिहितात Blog writing in Marathi सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत.

ब्लॉग म्हणजे काय । What is Blog in Marathi :

मित्रांनो सरळ सोप्या मराठी भाषेमध्ये ब्लॉग म्हणजे काय सांगायचं म्हणजे ब्लॉग हा एक प्रकारचा लेख असतो. म्हणजे मराठीमध्ये ब्लॉग ला लेख असे म्हणतात.

एखाद्या विषयावर सविस्तर आणि मुद्देसूद केलेली मांडणी केलेला लेख म्हणजेच ब्लॉग होय.

मित्रांनो गुगल वर आपण एखादा विषय सर्च केला असल्यास आपल्यासमोर बऱ्याचशा वेबसाइट किंवा ब्लॉग पोस्ट येतात यांच्या माध्यमातून आपण सर्च केलेल्या विषया संबंधित माहिती सविस्तर आणि मुद्देसूद वाचू शकतो.

ब्लॉग हा साधारणता तीनशे ते एक हजार किंवा एक हजार पेक्षा जास्त शब्दांचा असतो.

ब्लॉग हा वाचायला अतिशय सोपा सविस्तर आणि त्यांची भाषा देखील आपल्याला समजावी अशी असते. ब्लॉगच्या माध्यमातून आपल्याला कोणताही विषय सहज रित्या समजण्यास सोपे जाते. त्यामुळे बहुतांश लोक एखाद्या विषया संबंधीत माहिती प्राप्त करण्यासाठी ब्लॉग वाचत असतात.

मित्रांनो आता आपणास ब्लॉग म्हणजे काय What is Blog in Marathi हे कळाले सर चला आता आपण ब्लॉक कसे लिहितात How to write Blog in Marathi हे पाहूया.

ब्लॉग कसा लिहितात । Blog writing in Marathi

मित्रांनो ब्लॉग लिहिण्यासाठी आपल्याला कोणत्याही विशिष्ट प्रशिक्षणाची आवश्यकता नाही. Blog writing साठी आपल्याकडे केवळ लिहिण्याचे कौशल्य असणे आवश्यक या आहेत.

मित्रांनो जर तुम्ही कोणत्याही विषयावर किंवा तुमच्या आवडत्या विषयावर तीनशे ते एक हजार शब्दांपर्यंत लेख लिहू शकता तर तुम्ही उत्तम रित्या ब्लॉग रायटिंग करण्यास सक्षम आहात.

परंतु ब्लॉग लिहीत असताना काही महत्त्वपूर्ण गोष्टी लक्षात ठेवून ब्लॉग लिहिणे आवश्यक आहे, कारण उत्तम, मुद्देसूद आणि सोप्या भाषेमध्ये लिहिलेला ब्लॉग हा सर्वोत्कृष्ट ब्लॉग समजला जातो.

ब्लॉग शीर्षक, मुख्य परिच्छेद, प्रतिमा, निष्कर्ष इत्यादी गोष्टी लक्षात ठेवून ब्लॉग लिहिला असल्यास तो ब्लॉग उत्तम ब्लॉग समजला जातो.

  1. शीर्षक Title

ब्लॉग रायटिंग करत असताना शीर्षक हा ब्लॉगचा आत्मा समजला जातो. कारण शीर्षक शिवाय वाचकाला एखादा ब्लॉग वाचावासा वाटत नाही. तसेच शीर्षक आपण लिहित असलेला ब्लॉग कोणत्या विषया संबंधित आहे याचे ज्ञान थोडक्यात देत असतो.

त्यामुळे ब्लॉगचा शीर्षक हा अतिशय प्रभावी आणि वाचकाला आकर्षित करणारा असावा. त्यामुळे आपल्या ब्लॉगला ठळक आणि वैशिष्ट्यपूर्ण शीर्षक देणे महत्त्वाचे आहे.

तसेच ब्लॉगचा शीर्षक हा अतिशय मोठा किंवा वाक्यामध्ये असायला नको. शीर्षक हा लहान आणि आपण लिहीत असलेल्या ब्लॉगच्या विषयाचा अर्थ थोडक्यात स्पष्ट करणारा असावा. जेणेकरून वाचक आपल्या ब्लॉगचा शीर्षक वाचून आपल्या ब्लॉगचा विषय समजून घेऊन ब्लॉग वाचण्याकडे लक्ष केंद्रित करतील.

  1. मुख्य परिच्छेद Paragraph

ब्लॉगच्या शीर्षकानं तर सर्वात महत्त्वपूर्ण आणि आपल्या विषयाला सुरुवात होणारा भाग म्हणजे मुख्य परिच्छेद होय.

आपण ज्या विषयावरती ब्लॉग लिहिणार आहोत त्या संबंधित सर्व माहिती ही मुख्य परिच्छेद म्हणजेच paragraph मध्ये येत असते. मुख्य परिच्छेद ला ब्लॉगचे शरीर असे म्हटले जाते.

कारण मुख्य परिच्छेदामध्ये आपण आपला विषय सविस्तरपणे आणि सुटसुटीत मांडणार असतो. त्यामुळे एक पूर्ण ब्लॉग मध्ये तीन ते चार मुख्य paragraph असणे खूप गरजेचे आहे.

तसेच paragraph हे आपल्या ब्लॉगची शोभा वाढवण्यास देखील मदत करतात. तसेच वाचकाला आपला लेख कंटाळवाणा वाटू नये, आपला लेख वाचत असताना वाचकाला सर्व गोष्टी सहज समजतील यासाठी मुख्य परिच्छेद चा वापर केला जातो. तसेच मुख्य परिच्छेदाचे ची रचना पूर्ण झाल्यानंतर आपण आपल्या लेखातील शब्दरचना आणि व्याकरण बरोबर आहे की नाही हे तपासून घेणे गरजेचे आहेत.

इंटरनेट वरती बर्‍याचशा वेबसाईट आहेत ज्या लेख ची व्याकरण आणि शब्दरचना तपासत असतात.

  1. प्रतिमा images

आपल्या ब्लॉगची शोभा वाढवण्यासाठी आणि वाचकाला आपल्या ब्लॉग कडे आकर्षित करण्यासाठी प्रतिमा खूप महत्त्वाची भूमिका बजावते. प्रतिमा शिवाय आपल्या blog ला शोभा येणार नाही.

मुख्य परिच्छेदामध्ये आपण लिहत असणाऱ्या ब्लॉगच्या विषया संबंधित प्रतिमा लावल्यास वाचकाला ते वाचण्याचा आणि समजण्यास अधिक सोपे जाते. तसेच आपला ब्लॉग वाचायला आणि पाहणाऱ्याच्या दृष्टीला देखील व्यवस्थित वाटेल.

Pexels, Photolia या सारख्या साईट्स जेथे आपल्याला मोफत प्रतिमा मिळतील. याचा वापर आपण ब्लॉग मध्ये करून अधिक आकर्षक बनवू शकता.

  1. निष्कर्ष conclusion

निष्कर्ष हा आपल्या ब्लॉगचा शेवटचा टप्पा असतो. आपण लिहीत असणाऱ्या ब्लॉगच्या विषयासंबंधी ची माहिती निष्कर्षांमध्ये थोडक्यात सांगितली जाते. एखाद्या वाचकाने आपला ब्लॉग पूर्ण न वाचता केवळ निष्कर्ष वाचला तरी देखील त्याला आपला ब्लॉग कोणत्या विषया संबंधीत आहे याची जाणीव व्हावी, अशाप्रकारे निष्कर्ष लिहावा.

ज्याप्रमाणे मेंदू आपल्या संपूर्ण शरीरावर लक्ष देत असते त्याप्रमाणेच निष्कर्ष हा संपूर्ण ब्लॉगचा मेंदू समजला जातो.

म्हणजे तात्पर्य आपण लिहिलेल्या ब्लॉग मधून काय तात्पर्य होते किंवा काय बोध होतो, वाचकाला नवीन काय शिकायला मिळते या सर्व गोष्टी निष्कर्ष मध्ये लिहाव्यात.

Blogging साठी कोणता प्लॅटफॉर्म निवडावा :

मित्रांनो आता तुम्हाला ब्लोगिंग संबंधित महत्त्वाची माहिती समजली असेल आता ब्लॉगिंगसाठी कोणता प्लॅटफॉर्म निवडावा हा प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये नक्कीच पडला असेल.

कारण ब्लॉगिंग करायचे असेल तर आपल्याकडे ब्लॉगिंग करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म असणे आवश्यक आहे.

आजच्या ब्लॉग कसा लिहितात Blog writing in Marathi या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला ब्लॉगिंग करण्यासाठी कोणता प्लॅटफॉर्म निवडावा किंवा ब्लॉग लिहिण्यासाठी कोणता प्लॅटफॉर्म निवडावा हे सांगणार आहोत.

ब्लॉग्स start करण्यासाठी तुमच्याकडे दोन पर्याय आहेत. म्हणजे ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म हे दोन प्रकारचे आहेत एक म्हणजे wordpress आणि blogger

  1. WordPress

वर्ड प्रेस हे ब्लॉगिंग सॉफ्टवेअर आहे ज्याचा वापर ब्लॉगिंग करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो.

वर्डप्रेसवर blogging करण्यासाठी तुम्हाला डोमेन आणि hosting आवश्यकता असते यासाठी साधारण तर तुम्हाला तीन हजार ते सहा हजार रुपये खर्च येतो.

  1. Blogger

Blogger.com हा गुगल द्वारे चालवणारा ब्लॉगिंगसाठी फ्री प्लॅटफॉर्म आहे.

यावर तुम्ही अगदी मोफत ब्लॉग सुरु करू शकतात ज्यात तुम्हाला सबडोमेन मिळतो जसे abc.blogspot.com ( इथे abc च्या ठिकाणी तुमच्या ब्लॉग च नाव असेल )

यात आपल्या वयक्तिक (personal blog) नावाने अथवा एका विशिष्ठ नावाने blog सुरु करू शकता.

मित्रांनो! आजच्या या आर्टिकल ला तुमच्या इतर मित्रांशी अवश्य शेअर करा जेणे करून त्यांना हि खूप सोप्या पद्धतीने हे माहिती वाचायला मदत होईल… आणि मित्रांनो हा लिखाण ” ब्लॉग कसा लिहितात Blog Writing in Marathi “ तुम्हाला कस वाटलं हे नक्की Comment द्यारे आम्हाला कळवा…

हे हि अवश्य वाचा :

Leave a Comment