विज्ञान आणि आपत्ती व्यवस्थापन निबंध मराठी । Apatti Vyavasthapan Nibandh Marathi

Apatti Vyavasthapan Nibandh Marathi मित्रांनो विज्ञानाचे महत्त्व तर आपल्याला माहितीच आहे ज्ञान कशाप्रकारे आपल्याला उपयोगी पडतो हे कोणाला सांगण्याची गरज नाही परंतु आपत्ती व्यवस्थापनामध्ये विज्ञान किती फायद्याचा ठरतो आणि विज्ञानाची भूमिका काय आहे हे आम्ही आजच्या विज्ञान आणि आपत्ती व्यवस्थापन निबंध मराठी मधून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे.

झाड आणि आपत्ती व्यवस्थापन निबंध विद्यार्थ्यांना नेहमीच परीक्षांमध्ये तसेच राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित केलेल्या स्पर्धा परीक्षांमध्ये देखील विचारला जातो. त्यामुळे हा निबंध प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी खूप फायद्याचा ठरेल.

चला तर मग पाहूया, विज्ञान आणि आपत्ती व्यवस्थापन निबंध मराठी । Apatti Vyavasthapan Nibandh Marathi

विज्ञान आणि आपत्ती व्यवस्थापन निबंध मराठी । Apatti Vyavasthapan Nibandh Marathi

आपत्ती कालची आजची नसून प्राचीन काळापासून माणसाला आपत्ती या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मित्रांनो आपण सर्वांना तर माहितीच आहे, आपत्ती ही दोन प्रकारची असते एक मानवनिर्मित आणि दुसरी नैसर्गिक आपत्ती होय.

परंतु आपत्ती ही नैसर्गिक असो किंवा मानवनिर्मित असो आपत्तीचा परिणाम या पृथ्वीतलावरील प्रत्येक सजीवाला भोगावाच लागतो.

नैसर्गिक आपत्तीमध्ये पूर, दुष्काळ, चक्रीवादळे, भूकंप, भूस्खलन, ज्वालामुखी, जंगलातील आग, आकाशातील वीज, सुनामी लाटा हवामानामुळे होणारे विमान अपघात, वादळी, जहाजे समुद्रात बुडणे इत्यादी आपत्तींचा समावेश होतो. तर मानवनिर्मित आपत्तीमध्ये आगी लावणे, अपघात घडवून आणणे, युद्ध, दहशत , कारखान्यांमध्ये होणारे, अपघात, खून, मारामाऱ्या,मोर्चे घेराव, ट्रॅफिक जाम होणे, हवा- पाणी- मृदा प्रदूषण, मालमत्तांचे नुकसान, चोरी, दरोडा इत्यादीं सर्व आपत्तींचा समावेश होतो.

आणि अशा या आपत्तींपासून मानव जातीला पाठवण्यासाठी आपल्याला त्याला व्यवस्थापन करणे गरजेचे आहे त्यालाच आपत्ती व्यवस्थापन असे म्हणतात. म्हणजे आपत्ती होण्याअगोदर केल्या जाणाऱ्या उपाय योजना किंवा आपत्ती पासून बचाव करण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजना व आपत्तीनंतर झालेली नुकसानाची भरपाई किंवा मनुष्यजातीचे होणारे नुकसान कमी व्हावे यासाठी केलेल्या उपाय योजना म्हणजेच आपत्ती व्यवस्थापन होय.

त्यामुळेच आपत्ती मानवनिर्मित असो किंवा नैसर्गिक असून त्यावर उपाययोजना किंवा व्यवस्थापन करने ही गरजेची गोष्ट आहे. आधुनिक युगाच्या विज्ञानामुळे किंवा तंत्रज्ञानामुळे मानवनिर्मित किंवा नैसर्गिक दोन्ही प्रकारच्या आपत्ती व व्यवस्थापन करणे शक्‍य झाले आहे त्यामुळे विज्ञान आणि आपत्ती व्यवस्थापन यांमधील नाते हे खूपच घट्ट आणि दृढ झाले आहे.

नैसर्गिक आपत्ती चा विचार केला असता तर दरवर्षी कोठे ना कोठे त्सुनामी, चक्रीवादळ किंवा अवकाळी पावसामुळे कित्येक लोकांचे नुकसान होते आर्थिक नुकसान होते जीवितहानी देखील होते. अशा आपत्तीमध्ये हजारो मनुष्यांचा बळी जातो प्राणी, पक्षी देखील मृत्युमुखी पडतात.

अशावेळी आपत्तीच्या ठिकाणी बचाव कार्यसंघ आणि मदत एजन्सी अनेकदा बचाव मोहिमा आयोजित करण्यासाठी आणि प्रभावित झालेल्यांना मदत करण्यासाठी विज्ञान झालेल्या संशोधन आणि तंत्रज्ञानावर अवलंबून असतात. वर्षानुवर्षे, प्रथम प्रतिसाद देणाऱ्यांची कार्यक्षमता आणि परिणामकारकता सुधारण्यासाठी नवीन तंत्रज्ञान विकसित केले गेले आहे, ज्यामुळे आपत्ती मदत निवारणात तंत्रज्ञानाची भूमिका अधिक सखोल झाली आहे. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन कारणांमध्ये विज्ञान खूप महत्त्वाची भूमिका बजावतो.

विज्ञान आणि आपत्ती व्यवस्थापन निबंध मराठी । Apatti Vyavasthapan Nibandh Marathi

नैसर्गिक आपत्तीला पूर्णपणे टाळणे किंवा आता तिच्या डोसा काय सोनं मानव जातीला वाचवणे हे संभव नाही तरीदेखील विज्ञानाचा आणि तंत्रज्ञानाचा वापर करून योग्य उपाययोजना करून आपण नैसर्गिक आपत्तीचा धोका कमी करू शकतो. नैसर्गिक आपत्ती पासून होणाऱ्या नुकसानाची तीव्रता देखील कमी करू शकतो. आपत्ती सज्जता आणि आपत्तींचे व्यवस्थापन विकसित करून मात्र आपत्तीपासून होणारा त्रास काही प्रमाणामध्ये कमी केला जाऊ शकतो. मात्र हे करण्यासाठी गरज असते ती म्हणजे योग्य व्यवस्थापनाचे आणि ह्या व्यवस्थापनाला भर घालते ते म्हणजे विज्ञान म्हणून विज्ञान आणि आपत्ती व्यवस्थापन हे नातं कधी तुटणार आहे.

आधुनिक काळामध्ये विज्ञानाने खूपच प्रगती केलेली आहे त्यामुळे याचा परिणामत वातावरणातील घटकांवर देखील झालेल्या आहेत त्यामुळे चक्रीवादळ, सुनामी, पूर यांसारख्या घटना घडताना दिसत आहे म्हणजेच आपत्तीचे निवारण करण्यासाठी किंवा व्यवस्थापन करण्यासाठी विज्ञानाची गरज असते परंतु कोठे ना कोठे या विज्ञानाच्या परिणामामुळे आपत्ती देखील घडून येत आहे.असे असले तरी अवकाशामध्ये हवामान विषयक उपग्रह सोडलेले आहेत त्यांचा वापर करून अशा संकटांचा पूर्व अंदाज घेणे शक्य होते. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन अधिकच सोपे होऊ लागले आहे. आपत्ती व्यवस्थापनाची विज्ञान हे एक नवेच शास्त्र विकसित होत आहे आणि त्यामुळे मानवी जीवन अधिक सुरक्षित होऊ लागले आहे.

21 व्या शतकामध्ये विज्ञान वेगात प्रगती करत आहे त्या वेगामध्ये आपत्तीच्या समस्यादेखील उद्भवत आहेत त्यामुळे प्रत्येक देश आपत्तीला लढण्यासाठी विविध आपत्ती व्यवस्थापन करण्यासाठी विविध आपत्ती विभाग सुसज्ज करत आहेत. जेणेकरून आपण आपल्या देशाचा आपत्ती पासून बचाव करू किंवा आपत्ती पासून होणारे नुकसान टाळावे .आपल्या देशाने सुद्धा राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाची स्थापना केली आहे. ज्यावेळी देशांमध्ये कुठेही काही नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्ती येतात तेव्हा हे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाचे जवान त्या ठिकाणी जाऊन आपत्तीचे व्यवस्थापन करण्यामध्ये मदत करतात. अशा प्रकारे मदत करण्याची कार्यप्रणाली निश्चित केली गेली आहे.

मानवाने विज्ञानाच्या जोरावर विविध संशोधन केलेले आहे , अशा संशोधनात काही उपग्रह अवकाशात सोडले आहे जेणेकरून येणाऱ्या आपत्तीचे आपल्याला पहिलेच खात्री होईल व आपण त्यावर काही उपाययोजना करून त्या आपत्ती पासून बचाव करू. पण एक वर्षां पासून संकट काळामध्ये विज्ञान महत्त्वाची भूमिका बजावत आहे हे आपल्याला सहज दिसून येते मागील काही वर्षी कोल्हापूर मध्ये झालेल्या महापुरा मध्ये कित्येक गावे पुरामध्ये वाहून गेले कित्येक जीवितहानी झाली आणि आर्थिक हानी देखील झाली परंतु आपल्या देशाच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाच्या जवानांनी महत्वपूर्ण कामगिरी करून प्रत्येक प्राण्यांचे पक्षांचे तसेच मनुष्याचे जीवन वाचवले हा केव्ळ विज्ञानाचा चमत्कार होता.

मागील काही वर्षांमध्ये उत्तराखंड येथील केदारनाथ येथे झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे तिची दशा झाली त्यावेळी आपत्ती व्यवस्थापन विभागाने जी कामगिरी केली ती अद्भुत ठरली. त्यावेळी स्वतः शिवशंकर लोकांच्या मदतीला आले त्या प्रमाणे आपत्ती व्यवस्थापन विभाग लोकांसाठी देव ठरले.

विज्ञान आणि आपत्ती व्यवस्थापन निबंध मराठी । Apatti Vyavasthapan Nibandh Marathi

विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने आपल्याला सर्व प्रकारच्या आपत्तीची कल्पना पहिल्याचे आपत्ती मानवनिर्मित असो किंवा नैसर्गिक असो प्रत्येक आपत्तीला व्यवस्थापन करण्यासाठी विज्ञानाची गरज आपल्याला पडते. विज्ञानाने अनेक अशा यंत्रणा तयार केल्या आहेत ज्याच्या मदतीने आपण भूकंपाची तीव्रता मोजू शकतो. याव्यतिरिक्त अनेक अशा यंत्रणा आहेत त्याच्या मदतीने आपत्ती व्यवस्थापन करणे सहजशक्य झाले आहे.

जास्त विचार करण्याची गरज नाही गेल्या दोन वर्षाचा विचार केला असला तरी आपल्या लक्षात येईल की विज्ञाने आपल्यासाठी किती महत्वपूर्ण आहे आणि कशाप्रकारे फायद्याचे ठरते. गेल्या दोन वर्षामध्ये कोरोना सारख्या महामारी चा फैलाव संपूर्ण जगभरामध्ये झाला होता. यावेळी कित्तेक शास्त्रज्ञांनी विज्ञानाच्या जोरावर काही महिन्यांमध्येच कोरोना महामारी वर लस शोधून काढली. जगातील कोट्यावधी लोकांना या लसीचा फायदा झाला आणि त्यांचे प्राण वाचले जात आहे आपत्ती व्यवस्थापन मध्ये अशाप्रकारे विज्ञानाचा फायदा त्यांना दिसून येत आहे.

एवढेच नव्हे तर विज्ञानाचे चमत्कार अनेक आहेत यामध्ये इंटरनेट, मोबाइल,‌कम्युनिकेशन ची साधने हेदेखील विज्ञानाचा चमत्कार आहेत आणि या सर्व साधनांचा वापर आपत्तीच्या वेळी फायद्याचा ठरतो.
विज्ञानाचा वापर करून आपण नैसर्गिक धोक्यांच्या मूल्यांकनांच्या विश्लेषणाची गुणवत्ता आणि शक्ती सुधारू शकते,

थोडक्यात सांगायचे एवढेच आपत्ती व्यवस्थापन करण्यासाठी जागोजागी आपल्याला विज्ञानाची गरज पडते त्यामुळे विज्ञान आणि आपत्ती व्यवस्थापन ही न चुकणारी बाब आहे. जेव्हा जेव्हा आपत्ती व्यवस्थापन ही गोष्ट येईल तेव्हा तेव्हा विज्ञानाची सांगड घालावीच लागेल.

मित्रांनो! आजच्या या आर्टिकल ला तुमच्या इतर मित्रांशी अवश्य शेअर करा जेणे करून त्यांना हि खूप सोप्या पद्धतीने हे माहिती वाचायला मदत होईल… आणि मित्रांनो हा लिखाण ” विज्ञान आणि आपत्ती व्यवस्थापन निबंध मराठी । Apatti Vyavasthapan Nibandh Marathi “ तुम्हाला कस वाटलं हे नक्की Comment द्यारे आम्हाला कळवा…

हे हि अवश्य वाचा :

Leave a Comment