एंजायटी म्हणजे काय?। Anxiety Meaning In Marathi

Anxiety Meaning in Marathi मित्रांनो आपण एखादे कार्य करत असताना सतत आपल्या मनात विचार येत असतो की, आपण ते कार्य करू शकतो का?, किंवा ते कार्य केल्यास लोक आपल्याला काय म्हणतील?

व्यक्तीला एखाद्या गोष्टीची चिंता असणे हे स्वाभाविक आहे परंतु एखाद्या गोष्टीची गरजेपेक्षा अति चिंता किंवा एखादी गोष्ट करण्यापूर्वी नकारात्मक विचारांचे दडपण येत असेल तर याबद्दल तुम्ही जागरूक होणे खूप गरजेचे आहे कारण नियमित येणारी चिंता तेव्हाच फक्त येणारे नकारात्मक विचार हे एक मानसिक रोगाचे लक्षण आहे. यालाच आपण एंजायटी डिसऑर्डर असे म्हणतात.

परंतु आपल्यातील बऱ्याच लोकांना एंजायटी डिसोर्डर म्हणजे काय? हे माहिती नसल्याने ते लोक अशा समस्यांकडे दुर्लक्ष करतात.

एंजायटी म्हणजे काय?। Anxiety Meaning In Marathi

म्हणून आजच्या Anxiety meaning in Marathi लेखामध्ये आम्ही Anxiety disorder म्हणजे काय? ते सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

आम्हाला अशा आहे की, Anxiety meaning in Marathi हा लेख तुमच्यासाठी नक्कीच फायद्याचा ठरेल.

Anxiety meaning in Marathi एंजायटी म्हणजे काय?

Anxiety ला मराठी मधील चिंता असे म्हणतात. चिंता ही सर्वसामान्य व्यक्ती मध्ये पाहायला मिळते त्यामुळे आपल्याला चिंता हे स्वाभाविक वाटते परंतु काही व्यक्तींमध्ये ही चिंता अधिक पातळी मध्ये पाहायला मिळतात त्यामुळे असे व्यक्ती नेहमी नकारात्मक विचार करतात.

एंजायटी हा एक मानसिक रोग आहे. यामध्ये रुग्णाला सतत अस्वस्थपणा वाटणे, मनात नकारात्मक विचार येणे, सतत चिंता आणि भितीची भावना तयार होणे, हात पाय थरथरणे आणि घाम येणे अशी सामान्य लक्षणे पाहायला मिळतात.

Anxiety ची लक्षणे :

एनआयटी म्हणजेच चिंता चिंता आहे प्रत्येक व्यक्तीमध्ये पहायला आहे परंतु काही व्यक्तींमध्ये चिंतेची पातळी अधिक प्रमाणात असते अशा व्यक्तींचा आपल्या मनावरचा ताबा सुटतो आणि अशा व्यक्ती कधीकधी मन आणि शरीरावरचा ताळमेळ चुकतो म्हणून बहुतेक व्यक्तींमध्ये Anxiety समस्या पाहायला मिळते.

आपल्याला सतत घाबरल्यासारखे किंवा चिंताग्रस्त वाटत असल्यास आपण Anxiety चे शिकार झालो, असे समजून घ्यावे. या व्यतिरिक्त काही इतर लक्षणे आहेत ती पुढीलप्रमाणे-

  1. मन अस्वस्थ होणे
  2. हृदयाची गती वाढणे
  3. एखाद्या विशिष्ट ठिकाणाची किंवा घटनेची भीती वाटणे
  4. श्वास घेण्याची गती वाढणे
  5. सतत नकारात्मक विचार येणे
  6. वाईट स्वप्न येणे
  7. झोपायला त्रास होणे
  8. घाम येणे
  9. हात पाय थरथरणे
  10. नियंत्रित करू शकत नसलेल्या आठवणी येणे
  11. लक्ष केंद्रित करताना समस्या येणे
  12. खूप भीती वाटणे

वरील सर्व एंजायटी ची लक्षणे आहेत यातील काही लक्षणे आपल्यामध्ये दिसत असतील तर आपण Anxiety चे शिकार झाले असे समजून घ्यावे.

Anxiety Meaning In Marathi

Anxiety चे प्रकार :

Anxiety चे काही प्रकार आहेत ते पुढीलप्रमाणे :

1. फोबिया ( Phobia )

Phobia या या प्रकारची Anxiety डिसऑर्डर मध्ये एखाद्या ठिकाणाची किंवा परिस्थितीची सतत भीती मनात असते. जसे एखाद्या उंच ठिकाणी जाणे किंवा एखाद्या वाहनांमध्ये बसण्याची भीती वाटणे.

यामध्ये आपली भीती सतत वाढू शकते तसेच स्वतःच्या मनावर नियंत्रण राहत नाही.

2. पॅनिक एंजायटी डिसऑर्डर Panic Anxiety Disorder :

panic Anxiety Disorder यामध्ये आपल्याला अचानक एखाद्या विशिष्ट परिस्थितीची किंवा घटनेचे भीती वाटायला लागते. पॅनिक एंजायटी डिसऑर्डर झाल्यास त्या वेळी आपल्याला छातीत धडधडणे, हृदयाचे ठोके अचानक वाढणे, घाम येणे, हात पाय थरथरणे इत्यादी लक्षणे दिसून येतात.

तसेच पॅनिक डिसऑर्डर मध्ये कधीकधी आपल्या दम लागल्यासारखे वाटते.

3. सामाजिक एंजायटी डिसऑर्डर Social Anxiety Disorder :

दररोज सामोरे जाणारा सामाजिक परिस्थिती चिंता घेतो अर्थात आपण काही वागल्यास लोक आपल्याबद्दल काय विचार करतील किंवा लोक आपल्याला काय बोलतात? असा विचार करतो तेव्हा समजून घ्यावे की, आपण सामाजिक एंजायटी डिसऑर्डर या समस्यांमध्ये आहोत. आपल्या परीजनांना किंवा एका सोबत अनेक व्यक्तींना बोलताना घाबरणे हे Social Anxiety Disorder चे लक्षण आहे.

4. वेड बाध्यकारि एन्झायटी डिसऑर्डर Obsessive Compulsive Disorder :

या एंजायटी डिसऑर्डर मध्ये व्यक्तींना काही घाणेरड्या सवयी असतात. जसे की, सतत चेहरा धुणे, सतत हात धुणे, घाणीची भीती वाटणे.

5. सामान्यीकृत एंजायटी डिसऑर्डर Generalized anxiety disorder :

सामान्यीकृत एंजायटी डिसऑर्डर मध्ये व्यक्तीला विनाकारण एखाद्या गोष्टीची चिंता वाटते व तणाव येतो. सामान्य कृत एन्झायटी ची लक्षणे तेव्हा स्पष्टपणे दिसून येतात तेव्हा व्यक्तीला एखाद्या गोष्टीची चिंता सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ टिकून राहते.

6. पोस्ट ट्राय मॅट्रिक एंजायटी डिसऑर्डर Post Traumatic Stress Disorder (PTSD) :

पोस्ट ट्राय मॅट्रिक एंजायटी डिसऑर्डर केवळ अशा व्यक्तींना होते ज्या व्यक्तींसोबत काहीतरी दुर्देवी अपघात घडला आहे. अशा व्यक्तींमध्ये सूड घेण्याची भावना निर्माण होते त्यामुळे असे व्यक्ती स्वतःला शारीरिक हल्ले करून घेतात.

Anxiety Meaning In Marathi

एंजायटी होण्याची काही मुख्य कारणे :

एंजायटी होण्याची कारणे हे काही सामान्य असू शकतात तर काही अनुवंशिक आता तर काही जणांना एखादी घटना घडल्यानंतर एंजायटी होण्यास सुरुवात होते. तसेच भीती नियंत्रित करण्यासाठी जबाबदार असलेल्या मेंदूचे क्षेत्र देखील एंजायटी निर्माण करू शकते.

आम्ही आजच्या लेखातून anxiety meaning in Marathi एंजायटी होण्याची काही कारणे सांगितलेली आहेत ती पुढीलप्रमाणे-

1. आनुवंशिक एंजायटी :

एखाद्या व्यक्तीच्या कुटुंबामध्ये पिढीनुसार एंजायटी चे शिकार झालेले व्यक्ती असतील तर अनुवांशिकी त्यानुसार त्या व्यक्तीला देखील anxiety होण्याची खूप मोठी शक्यता पहायला मिळते.

2. आरोग्य संबंधित समस्या असणे :

दमा हृदयरोग यांसारख्या मोठ्या आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्ती चिंता करून anxiety ला बळी पडण्याची शक्यता असते. सतत ताण तणाव मध्ये राहणाऱ्या व्यक्तीला देखील anxiety होण्याची शक्यता असते.

3. मद्यपान केल्यामुळे :

लोक कोणत्याही चिंतेतून मुक्त होण्यासाठी किंवा विविध प्रकारच्या त्रासातून दूर होण्यासाठी नशेचा आधार घेतात. जसे की, अल्कोहोल, आफु, भांग, दारू, सिगारेट, तंबाखू इत्यादी.

4. व्यक्तिगत समस्या :

काही कौटुंबिक किंवा व्यक्तीगत समस्यांमुळे व्यक्तीला ताण तणाव येते व त्यांची चिंता वाढते तेव्हा असे व्यक्ती एंजायटी चे शिकार होतात.

एंजायटीतून वाचण्याचे काही उपाय :

एंजायटीतून वाचण्यासाठी काही उपाय केले जातात हे उपाय नियमित चा जीवनामध्ये केल्यानंतर तुम्हाला नक्कीच एंजायटी मधून मुक्तता मिळेल.

1. नियमित व्यायाम करा :

दररोज किमान 30 मिनिटं व्यायाम करा. सकाळी आणि संध्याकाळी चालण्याची सवय ठेवा यातून तुमची शारीरिक आणि मानसिक आरोग्य निरोगी राहील.

2. योग्य आहार घ्या :

व्यक्तीला मजबूत आणि निरोगी बनवण्यासाठी आहार खूप महत्त्वाचा ठरतो त्यामुळे योग्य आहार घेणे खूप गरजेचे आहे. रोजच्या आहारामध्ये फळे, फळभाज्या, दूध दुग्धजन्य पदार्थ, चरबीयुक्त आहार घेणे खूप गरजेचे आहे.

3. ध्यान करा :

आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ध्यान ला खूप महत्त्वाचे स्थान आहे. प्राचीन संस्कृतीने आपल्याला दिलेली मौल्यवान गोष्ट म्हणजेच ध्यान होय. व्यायाम केल्याने ज्याप्रमाणे आपले शरीर सुदृढ होते त्याप्रमाणे ध्यान केल्याने आपले मन शांत होते. आपल्याला ताणतणावातून तसेच चिंतेतून मुक्ती मिळते. त्यामुळे एंजायटी दूर करायची असेल तर ध्यान करणे खूपच गरजेचे आहे.

4. मानोचिकित्सेचा वापर करा :

चिंता दूर करण्यासाठी मानसपोचार खूप फायदा चा सिद्ध झाला आहे. मानोचिकित्से मध्ये मनावर कसा ताबा मिळवावा या बद्दल शिकवले जाते.

5. पूर्ण झोप घ्या :

तान तणावातून आणि चिंतेतून मुक्त होण्यासाठी जोक घेणे खूप गरजेचे आहे. पूर्ण झोप या व्यक्तीला आनंदी आणि उत्साही बनविण्यासाठी मदत करते. त्यामुळे ताणतणावातून तसेच चिंतेतून म्हणजेच एंजायटी मधून मुक्तता मिळवण्यासाठी झोप महत्वाची आहे.

6. संगीत ऐका :

संगीत ऐकल्याने आपल्या मनातील ताण तणाव कमी होतो एवढेच नसून संगीतामुळे हृदयाची गती, आणि रक्तदाब सुरळीत चालतो. जेव्हा जेव्हा आपल्याला तणाव किंवा चिंताग्रस्त आणि नैराश्‍याची भावना वाटते तेव्हा तेव्हा संगीता ऐकणे फायद्याचे ठरते.

मित्रांनो! आजच्या या आर्टिकल ला तुमच्या इतर मित्रांशी अवश्य शेअर करा जेणे करून त्यांना हि खूप सोप्या पद्धतीने हे माहिती वाचायला मदत होईल… आणि मित्रांनो हा लिखाण ” एंजायटी म्हणजे काय?। Anxiety Meaning In Marathi “ तुम्हाला कस वाटलं हे नक्की Comment द्यारे आम्हाला कळवा…

हे हि अवश्य वाचा :

धन्यवाद!!!!

Leave a Comment