अकस्मात पडलेला पाऊस निबंध मराठी । Akasmat Padlela Paus Essay in Marathi

Akasmat Padlela Paus Essay in Marathi

नमस्कार मित्रांनो आजच्या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासाठी अकस्मात पडलेला पाऊस निबंध मराठी घेऊन आलोत. मित्रांनो पावसाळा ऋतु हा आपल्यातील बहुतांश जणांचा आवडता ऋतू आहे. पावसाळ्यामध्ये पाऊस खा वेगवेगळ्या प्रकारांमध्ये पडत असतो कधी रिमझिम असतो, तर कधी धो-धो असतो. परंतु अकस्मात पडलेला पाऊस म्हणजेच अचानक स्वरूपाने पडलेला पाऊस होईल.

अकस्मात पडलेला पावसाचे स्वरूप हे खूप भयंकर किंवा आगळेवेगळे असते. हा पाऊस नेहमी पडत नाही हा पाऊस कधी तरी पडतो परंतु याचा अनुभव हा मनमोहक असतो. म्हणून आजच्या अकस्मात पडलेला पाऊस निबंध मराठी । Akasmat Padlela Paus Essay in Marathi या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला अकस्मात पडलेल्या पावसाचा अनुभव सांगणार आहोत.

अकस्मात पडलेला पाऊस निबंध मराठी । Akasmat Padlela Paus Essay in Marathi

जून महिना नुकताच सुरू झाला होता पहिला सर्वांना पावसाचे चालू होते परंतु दरवर्षीपेक्षा यावर्षी पावसाने थोडा उशीरच केला होता. उन्हाळ्याच्या कडाक्यात वाचवण्यासाठी सर्व जण पावसाची आतुरतेने वाट पाहत होतो परंतु पाऊस मध्ये पडायलाच तयार नव्हता!!

आम्हाला सर्व लहान मुलांना देखील सुट्टी संपण्याचा आली होती आणि शाळेचा दिवस जवळ येणार होता. शाळा सुरू होण्याच्या अगोदर पावसाचे भिजण्याची इच्छा आम्हा सर्व मुलांची अगदी गगनाला भिडले होती‌.
म्हणून आम्ही देखील अगदी चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहत होतं. परंतु पावसाचा एक थेंब देखील दिसत नव्हता.

आकाशाकडे पाहिले तरी सूर्याच्या उन्हामुळे डोळ्यांना त्रास होऊ लागला. उन्हाळा संपला होता परंतु सूर्याचे ऊन मात्र काही कमी झाले नव्हते.

अशा परिस्थितीत म्हाताऱ्या आजी आजोबांना यांदा पाऊस खूप कमी पडणार आहे असा अंदाज आज देखील लावला होता.शेतकरी तर अगदी निराश झाले होते.

जून महिन्याचा एक दिवस असाच जात होता. सर्व जण पावसाची वाट पाहत होते. जून महिना सरत आला. मी आमच्या शेजारी उन्हामुळे वाळून चाललेल्या झाडांना पाणी घालण्यासाठी बाहेर गेलो.

मी झाडांना पाणी घालत बसलो होतो तेवढ्यात वातावरणामध्ये अचानक बदल झाला. संपूर्ण वातावरण काळोख्या मध्ये चढले अचानक काळे काळे ढग आकाशा मधून कोठून तर प्रकटले!!

एका क्षणासाठी मी खूप घाबरलो. हे काय नवीन प्रकार घडत आहे असे वाटले तेवढ्यात झाडांची पाने खूप जोर जोरात वाजू लागली. संपूर्ण वातावरणामध्ये चक्रीवादळा प्रमाणे बदल घडत आले.

संपूर्ण आभाळा मध्ये जणू धुळीचे साम्राज्य पसरले होते. मी घाबरून चटकन घरामध्ये जाऊन बसलो. घराची, खिडकी दरवाजा लावले व दरवाजा छोटासा फटका मधून बाहेर पहात होतो. बाहेर सर्वांचा गोंधळ चालू होता सर्व जण आपल्या घरामध्ये जाऊन बसले.

माझी आई आणि दादा कामाला गेले होते मला त्यांची चिंता वाटू लागली. मी मनोमन विचार करू लागलो की हे नेमके काय घडत आहे सर्वत्र काळोख वारा आणि सोबतच धूळ कसं काय आली असेल?
तेवढ्यात जोरात विज कोसळण्याचा कडकडाट आवाज आला, व मी एकदम दचकलोच!!

पाहतो तर काय बाहेर विजा चमकू लागल्या व पावसाच्या धारा देखील बरसत होत्या. सुरुवातीला पाऊस हा रिमझिम होता परंतु अचानकच पावसाचा जोर हा अधिकच वाढला. धो-धो पाऊस पडत होता.
पाऊस पडतोय हे पाहून मला आगदी आनंद झाला कारण एक महिना वाट बघितल्यानंतर आज अखेर पाऊस पडत होता.

परंतु पावसाचा जोर हा नेहमी पडणाऱ्या पावसापेक्षा अगदी जोरात होता. बघता बघता संपूर्ण नदी, नाले व घराशेजारी खड्डे पाण्याने भरून वाहू लागले. मला असे वाटले जणू एक महिना उशीर झालेला पाऊस एकदाच कोसळत आहे. सुमारे तीन ते चार तास हा जोरजोरात पाऊस पडत होता त्यानंतर पावसाचा जोर कमी झाला.

पावसाचा जोर कमी होतात मी घराच्या बाहेर गेलो पाहतो तर काय बाहेरच्या सर्व परिसराचे रूपांतर तलावांमध्ये झाले होते.

शेजारी आजी आजोबा काका काकू सर्व लहान मुले बाहेर येऊन पावसाच्या पाण्यामध्ये खेळू लागले. मी देखील त्यांच्या मध्ये सामावेश झालो आणि अगदी लहान मुलाप्रमाणे पावसाच्या पाण्यामध्ये खेळू लागलो.
अशा या अकस्मात पडलेला पावसामुळे संपूर्ण परिसर बदलले होते. उण्याच्या कडाक्या पासून संतापलेले जमीन शांत झाली होती. पशुपक्षी, झाडे, वेली देखील रिमझिम पावसाचा आनंद घेत डुलत होत्या.
पावसाने अचानक पणे येऊन हा केवढा मोठा कायापालट केला होता. ही किमया फक्त पाऊसच करू शकतो. आज पडलेला हा पाऊस ईश्वराचा अवतार होता. या अकस्मात पडलेल्या पावसामुळे फक्त मनुष्यच नाही तर सर्व पशुपक्षी सुद्धा सुखावले होते.

खरंच पावसाला ईश्वराचे रूप मानले तरी खोटे लागणार नाही. कारण पावसाचे मनुष्याला अत्यंत गरज असताना पावसाने येऊन सर्व मनुष्याला शांत केले.उन्हा च्या परिस्थितीमध्ये सर्वांना शीतलता ची गरज होती अशावेळी हा पाऊस पडून सर्वांच्या मनाला शांत करणारा ठरला. त्यामुळे पावसा येवढी निर्मळ आणि मनावर खोल प्रभाव काढणारी शक्ती दुसरी कुठलीही असू शकणार नाही…..

मित्रांनो! आजच्या या आर्टिकल ला तुमच्या इतर मित्रांशी अवश्य शेअर करा जेणे करून त्यांना हि खूप सोप्या पद्धतीने हे माहिती वाचायला मदत होईल… आणि मित्रांनो हा लिखाण ” अकस्मात पडलेला पाऊस निबंध मराठी । Akasmat Padlela Paus Essay in Marathi “ तुम्हाला कस वाटलं हे नक्की Comment द्यारे आम्हाला कळवा…

हे हि अवश्य वाचा :

Leave a Comment